आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
▼
Thursday, 31 May 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.05.2018 - 17.25
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 31 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
वसतिगृहात
राहणाऱ्या अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात
प्रत्येकी १५ किलो धान्य देणार असल्याचं अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास
पासवान यांनी सांगितलं आहे. नवी दिल्ली इथं आज राज्यांच्या अन्न सचिवांसोबत झालेल्या
बैठकीनंतर ते बोलत होते. ज्या वसतिगृहात अनुसूचित जाती जमातीचे दोन तृतीयांश विद्यार्थी
आहेत, त्यांना सगळ्यांना सवलतीच्या दरात धान्य मिळणार असल्याचं ते म्हणाले. भीक मागणाऱ्यांचं
आश्रयगृह आणि नारीनिकेतन सारख्या कल्याणकारी संस्थामंध्ये सार्वजनिक वितरण प्रणालीची
व्यवस्था नसून, यासाठी सरकारनं धान्याच्या अतिरिक्त वितरणासाठी असलेल्या योजनेला अधिक
विस्तृत बनवलं असल्याचं पासवान यांनी सांगितलं.
****
पालघर
लोकसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे राजेंद्र गावित विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या
श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला. तर भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत
राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
****
निवडणूक
यंत्रणा भ्रष्ट असल्याचं मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला, त्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत
पत्रकार परिषदेत बोलत होते. निवडणूक आयुक्त हे सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं बनलं
असल्याची टीका त्यांनी केली. सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात गुन्हा दाखल करावा,
असंही ते म्हणाले. गेल्या निवडणुकीत भाजपनं मोठ्या मताधिक्यानं जिंकलेली पालघरची जागा
आज काही हजारांच्या फरकानं जिंकली, यावरून भारतीय जनता पक्षाचा जनाधार घटला असल्याचं,
ते म्हणाले.
****
राज्याचे
कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी दुःख
व्यक्त केलं आहे. फुंडकर यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चांगली जाण होती आणि त्या
प्रश्नांच्या सोडवणुकीची प्रामाणिक इच्छा होती. त्यांच्या निधनानं महाराष्ट्रानं एक
उत्तम संसदपटू गमावला असल्याचं सांगून, राज्यपालांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही
फुंडकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. फुंडकर यांच्या पार्थिव देहावर उद्या
बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
राजमाता
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मंत्रालयात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केलं.
औरंगाबाद
विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी, तर जिल्हाधिकारी
कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
औरंगाबाद
जिल्हा परिषदेतही अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन
करण्यात आलं.
****
दरम्यान,
अहमदनगर जिल्ह्यातल्या चौंडी इथं अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम सुरु
असताना, धनगर आरक्षणाच्या मागणीसंबंधी घोषणा देणारे बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ.इंद्रकुमार
भिसे यांना पोलिसांनी अटक केली. धनगर आरक्षणाच्या मागणीवरुन या कार्यक्रमात आज गोंधळ
घालत बहुजन एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, यावेळी पोलिस जखमी झाल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
जालना
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं जिल्ह्यातल्या १४ रुग्णालयांना नियमाचं उल्लंघन
केल्यामुळे नोटीस बजावली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक एम.के.राठोड यांच्या अध्यक्षतेखालील
समितीनं जिल्ह्यातली ३५० रुग्णालयं आणि सोनोग्राफी केंद्रांची पाहणी केल्यानंतर ही
कारवाई करण्यात आली. अचानक या रुग्णालयांची तपासणी केल्यानंतर त्याठिकाणी कायद्याचं
उल्लंघन होत असल्याचं निदर्शनास आल्याचं राठोड यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला बोलताना
सांगितलं.
****
जागतिक
तंबाखू विरोधी दिन आज सर्वत्र पाळण्यात आला. त्यानिमित्त औरंगाबाद जिल्हा परिषदेत तंबाखूच्या
दुष्परिणामांविषयी पोस्टर प्रदर्शनाद्वारे जनजागृती करण्यात आली. तरुणांनी तंबाखूच्या
व्यसनापासून दूर राहून दुसऱ्यांनाही या सवयींपासून दूर करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं
असल्याचं मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी व्यक्त केलं.
****
बीड
इथं शिवसंग्राम संघटनेच्या वतीनं बिंदुसरा नदी पात्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.
पात्रातली घाण, तसंच कचरा काढून पात्र स्वच्छ करण्यात आलं. या अभियानात शिवसंग्राम
संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्यासह विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.05.2018 13.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे
२०१८
दुपारी १.०० वा.
****
लोकसभेच्या भंडारा-गोंदिया, तसंच पालघर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची
मतमोजणी आज होत आहे. पालघरमध्ये पंधराव्या फेरीनंतर भाजपचे राजेंद्र गावित आघाडीवर
आहेत. तर भंडारा - गोंदिया मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे तीन हजार २००
मतांनी आघाडीवर असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. गेल्या सोमवारी झालेल्या मतदान
प्रक्रियेदरम्यान, भंडारा-गोंदिया मतदार संघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रं बंद पडल्याच्या
तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर काल या मतदार संघात ४९ ठिकाणी फेरमतदान घेण्यात आलं.
****
कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर
यांच्या निधनामुळे एका ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सहकाऱ्याला आपण मुकलो, अशा शब्दात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी फुंडकरांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विरोधी पक्षनेते, आमदार,
संसद सदस्य, भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी भक्कमपणे सांभाळल्या
आणि पक्षाला नव्या उंचीवर नेण्यात मोठे योगदान दिलं, असं मुख्यमंत्र्यांनी ट्विटर संदेशात
म्हटलं आहे.
फुंडकर यांच्या निधनानं कृषि आणि सहकार क्षेत्रातल्या
प्रश्नांची खरी जाण असणारा नेता आपण गमावला, असं सांगून शिक्षण मंत्री विनोद तावडे
यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली, तर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी, फुंडकर यांच्या अकाली निधनानं ग्रामीण भागातलं नेतृत्व कायमचं हरवलं असल्याची भावना
व्यक्त केली. फुंडकर यांचं आज पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं
निधन झालं, ते सदुसष्ठ वर्षांचे होते.
****
आयएनएक्स मिडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीच्या
उच्च न्यायालयानं माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना येत्या तीन जुलै पर्यंत
अटकेपासून संरक्षण दिलं आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं ही याचिका दाखल केली
आहे. चिदंबरम यांनी याप्रकरणी सीबीआयला चौकशीत सहकार्य करावं, असंही न्यायालयानं सांगितलं
आहे. तसंच चिदंबरम यांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन याचिकेवरही न्यायालयानं सीबीआयला
उत्तर देण्यास सांगितलं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी तीन जुलैला होणार आहे.
****
जम्मू काश्मीरमधल्या हंदवाडा परिसरात सुरक्षा बलाचे
जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. आज सकाळी ही चकमक
झाली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली नसून, या परिसरात शोधमोहीम राबवण्यात
येत असल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
देशभरातल्या सुमारे दहा लाख बँक कर्मचाऱ्यांनी, अत्यल्प
पगारवाढीच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. यामध्ये एकवीस सार्वजनिक,
तेरा जुन्या खाजगी, सहा परदेशी आणि छप्पन्न प्रादेशिक ग्रामीण बँकांमधल्या कर्मचाऱ्यांचा
समावेश आहे.
राज्यभरातले सुमारे साठ हजार बँक कर्मचारी
या संपात सहभागी झाल्यानं, बँकिंग सेवेवर परिणाम झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या
सुमारे दोनशे बँक शाखा, तसंच परभणी जिल्ह्यातल्या १९ बँक शाखांचं कामकाज या संपामुळे
ठप्प झालं आहे. बीड, जालना, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद सह सर्वच ठिकाणी या
सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनं करून, आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधून घेतलं.
****
वस्तू
आणि सेवा कराअंतर्गत असलेले कर परताव्याचे दावे निकाली काढण्यासाठी केंद्र सरकारनं
आजपासून पंधरा दिवसांची एक विशेष मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ३० एप्रिल
२०१८ पर्यंत दाखल झालेले सर्व दावे पूर्ण करण्यासाठी सीमा शुल्क, केंद्र
आणि राज्य जीएसटीचे अधिकारी या पंधरवड्यात सर्वतोपरी प्रयत्न करतील, असं
अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. जीएसटीचे कर परतावे हा केंद्र सरकारसाठी चिंतेचा विषय
असून, सरकारनं आतापर्यंत ३०
हजार कोटी रुपयांच्या जीएसटी कर परताव्यांना
मंजुरी दिली आहे.
****
लैंगिक
शोषणाला बळी पडलेल्या मुलांचा समावेश पीडित नुकसान भरपाई निधीत करण्यासाठी
आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहन केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केलं
आहे. अंतरिम मदतीसह संपूर्ण नुकसान भरपाई वेळेवर दिली जावी, अशी विनंती
महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी एका पत्राद्वारे केली आहे. लैंगिक
अत्याचारांच्या घटनांमध्ये मुलं सर्वाधिक दुर्लक्षित असून, त्यांना
नुकसान भरपाईची रक्कम मिळत नाही. त्यामुळे त्यांचा समावेश या निधीसाठी केला जावा, असं
त्या म्हणाल्या.
****
पॅरिस
इथं सुरु असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत युकी भांबरी - दिविज शरण
या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली आहे. पहिल्या फेरीत त्यांनी भारताचा
पूरव राजा आणि त्याचा फ्रेंच जोडीदार फॅब्रिक मार्टीन या जोडीचा सहा - तीन, पाच - सात,
सहा - चार असा पराभव केला. त्याआधी भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा फ्रेंच जोडीदार
रॉजर व्हॅसलीन या जोडीनंही पुरुष दुहेरीची दुसरी फेरी गाठली असून, या फेरीत आज त्यांचा
सामना फ्रान्सच्या जोडीसोबत होणार आहे.
*****
***
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.05.2018 11.00AM
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१ मे
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
राज्याचे कृषिमंत्री आणि जेष्ठ
भाजप नेते पांडुरंग फुंडकर यांचं आज पहाटे मुंबईत हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं, ते सदूसष्ठ वर्षांचे होते. फुंडकर यांना मुंबईत
ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फुंडकर यांनी तीन वेळा अकोल्याचं खासदारपद
भूषवलं, तर दोन वेळा ते आमदार राहिले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते, तसंच भाजपचे
प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. ग्रामीण भागात भाजपाचा विस्तार करण्यात
त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. उद्या सकाळी बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथं त्यांच्या
पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुंडकर
यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष वाढवण्यात
फुंडकर यांचा मोलाचा वाटा होता, असं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
****
लोकसभेच्या भंडारा-गोंदिया तसंच पालघर मतदार संघाच्या
पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी आज होत आहे. पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित, तर
भंडारा - गोंदिया मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे आघाडीवर आहेत. गेल्या सोमवारी,
झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान, भंडारा-गोंदिया मतदार संघात अनेक ठिकाणी मतदान यंत्रं
बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर काल या मतदार संघात ४९ ठिकाणी फेरमतदान
घेण्यात आलं.
****
नैऋत्य
मोसमी पाऊस राज्यात दाखल झाल्यानंतरसुद्धा, शेतकऱ्यांनी
पेरणीची घाई करू नये, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. एक जूननंतर
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज आहे, मात्र
या कालावधीत कमाल तापमान अधिक असेल. मराठवाड्यात, वीजांपासून
संरक्षणासाठी पुरेशी खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
परभणी
जिल्ह्याच्या पालम तालुक्यात संजय गांधी निराधार योजना तसंच श्रावण बाळ योजनेतल्या
लाभार्थ्यांनी काल तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. खासदार संजय जाधव यावेळी
उपस्थित होते. १३ जूनपर्यंत लाभार्थ्यांना मानधन वाटप न केल्यास, तहसील कार्यालयालास
टाळे ठोकू, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
*****
***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 31 May 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۱ ؍مئی ۲۰۱۸
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
تازہ خبرکے مطابق مہا راشٹر کے وزیر زراعت پانڈو رنگ پھُنڈکر ممبئی میں چل بسے ۔ اُنھیں دل کا دورہ پڑ نے کے بعد ممبئی کے
Somaiya Hospitalمیں بھر تی کیا گیا تھا جہاں آج علی الصبح ساڑھے چار بجے اُنھوںنے آخری سانس لی۔ پھُنڈکر67؍ برس کے تھے۔ کسان رہنما کے طور پر جانے جانے والے پھُنڈکر آکو لہ سے تین مر تبہ بی جے پی کے رکن پارلیمنٹ بھی رہے۔
***** ***** *****
مہاراشٹر میں لوک سبھا کی دو سیٹوں بھنڈا را-گوندیا اور پال گھر کے لیے ہوئے ضمنی انتخا بات کے نتیجوں کا آج اعلان کیا جائے گا۔ گذشتہ پیر کے روز ہوئی رائے دہی کے دوران بھنڈا را-گوندیا حلقے میں کئی مقا مات پر الیکٹرونِک ووٹنگ مشینوں کے بند پڑ جانے کی شکا یتیں سامنے آ نے کے بعد کل اِس حلقے کے49؍ مقا مات پر دو بارہ ووٹِنگ ہوئی۔ اِن مقا مات پر قریب49؍ فیصد رائے دہی ہو نے کی خبر ہے۔
دونوں لوک سبھا حلقوں میں ووٹوں کی گنتی شروع ہو چکی ہے۔
***** ***** *****
مہاراشٹر کے وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے بیمہ کمپنیوں کو ہدا یت دی ہے کہ وہ اِس بات کا خیال رکھیں کہ کسا نوں کے فصل بیمہ کی رقم 7؍ جون سے پہلے کسا نوں کے بینک کھاتوں میں جمع ہو جائے۔ وزیر اعظم فصل بیمہ منصو بے کی ممبئی میں منعقدہ جائزہ میٹنگ میں وزیر اعلیٰ بول رہے تھے۔ اُنھوں نے کہا کہ آ نے والے خریف کے موسم کے لیے فصل بیمہ منصو بہ شروع کیا جا چکا ہے اور اِسکا فائدہ کسانوں تک پہنچا نے کے لیے بیمہ کمپنیاں اور بینکوں کو مل جل کر کوششیںکر نی ہو گی۔پھڑ نویس نے کسا نوں سے بھی دیئے گئے وقت میں در خواستیں پیش کر کے فصل بیمہ منصو بے میں شامل ہو نے کی اپیل کی۔
***** ***** *****
ملک کے لیے خود کو وقف کر نے اور اعلیٰ معیار کے معا ملے میں National Defence Academy (NDA) کے تر بیت یافتہ جوان
ملک بھر کے نو جوانوں کے لیے مثا لی حیثیت رکھتے ہیں۔ صدر جمہو ریہ جناب رامناتھ کو وِند نے کل پو نے میں واقع NDA کی134؍ ویں بیچ کی پاسِنگ آئوٹ پریڈ سے خطاب کر تے ہوئے یہ بات کہی۔ اِس موقع پر تر بیت یافتہ جوانوں کو صدر جمہوریہ کے بہترین کیڈیٹ کے انعام سے بھی نوازا گیا۔
اپنے پو نے دورے کے دوران صدر جمہوریہ نے ماتو شری رما بائی امبیڈکر گارڈن میں نصب کیئے گئے رما بائی امبیڈکر کے مجسمے کی نقاب کشائی بھی کی۔ اُنھوں نے کہا کہ رما بائی امبیڈکر کی زندگی سے ہر بھار تی خا تون کو تحریک حاصل کر نی چا ہیے۔ صدر جمہو ریہ نے سادھو واسوانی اِنٹر نیشنل اسکول کا افتتاح بھی کیا۔
***** ***** *****
اپنی تنخواہوں میں اضا فے کے مطالبے پر ملک بھر کے قریب دس لاکھ بینک ملازمین کی دو روز ہ ہڑ تال کل سے شروع ہو گئی ہے۔ ہڑتال میں عوامی شعبے کے21؍ پرائیویٹ سیکٹر کی13؍ ، 6؍ غیر ملکی اور56؍ علاقائی دیہی بینکوں کے ملازمین حصہ لے رہے ہیں۔ مہا راشٹر سے بھی قریب 60؍ہزار بینک ملازمین ہڑتال میں شامل ہیں جسکی وجہ سے بینکنگ خد مات مفلوج ہو کر رہ گئی ہیں۔ اورنگ آباد ضلع کی200؍ اور پر بھنی ضلع کی19؍ بینک شاخوں میں ہڑ تال کی وجہ سے کل کا م کاج ٹھپ رہا۔ مراٹھواڑہ کے دیگر شہروں بیڑ، جالنہ، ہنگولی، لاتور،ناندیڑ اور عثمان آباد سمیت سبھی مقا مات پر بینک ملازمین نے کل احتجاج کیا اور اپنے مطالبات کی جانب حکو مت کی توجہ مبذول کر وانے کی کوشش کی۔
***** ***** *****
ریاستی تعلیمی بورڈ کی جانب سے لیے گئے بار ہویں جما عت کے نتیجوں کا کل اعلان کر دیا گیا۔ اِس سا ل ریاست بھر سے
88.41؍ فیصد طلباء کامیاب ہو ئے ہیں۔ کامیا بی کا یہ تنا سب گذشتہ سال کے مقابلے قریب 2؍ فیصد کم ہے۔
اورنگ آباد ڈویژن کا نتیجہ88.74؍ فیصد رہا۔ لاتور ڈویژن میں88.31؍ فیصد طلباء کو کامیاب قرار دیا گیا۔ مراٹھواڑہ کے اورنگ آباد، بیڑ،ناندیڑ اور لاتور ضلعوں کا نتیجہ اوسطاً89؍ فیصد رہا جبکہ پر بھنی میں90؍ فیصد جالنہ میں87؍ فیصد، ہنگو لی میں86 ؍ فیصد اور عثمان آ باد میں
87؍ فیصد طلباء کو کامیاب قرار دیا گیا۔ کامیاب طلباء میں لڑ کیوں کا تنا سب92؍ فیصد اور لڑ کوں کی تعداد85؍ فیصد رہی۔
***** ***** *****
شو لا پور ڈِسٹرکٹ سینٹرل کو آپریٹیو بینک کے بورڈ آف ڈائریکٹرس کو بر خاست کر دیا گیا ہے۔ ریزرو بینک آف اِنڈیا کی سِفارش پر حکو مت نے یہ کار وائی کی۔ شو لا پور کے ڈِپٹی رجسٹرار اویناش دیشمکھ کو بطور ایڈمِنسٹریٹر نامزدکیا گیا ہے۔ اُنھوں نے کل اپنے عہدے کا جائزہ لیا۔ اِس سے متعلق خبر میں کہا گیا ہے کہ بینک کے پاس مو جود سر مائے اور قرض کی تقسیم میں فرق کے منظر عام پر آ نے کے بعد NABARD نے بینک کو کام کاج میں سُدھار لانے کی ہدا یت دی تھی۔ تاہم ایسا نہ ہونے پر بینک کے بورڈ آف ڈائریکٹر س کو برخاست کر نے کی کار وائی کی گئی ۔
***** ***** *****
مہاراشٹر حکو مت نے کسا نوں سے کہا ہے کہ مانسو نی بارش کے ریاست میں داخل ہو نے کے بعد بھی وہ تخم ریزی میں جلد بازی نہ کریں۔ واضح ہو کہ ایک جون کے بعد وِدربھ، مراٹھواڑہ اور وسطی مہاراشٹر میں غیر مو سمی بارش ہو نے کی پیشن گوئی کی گئی ہے۔ تاہم اِس دوران بھی در جہ حرارت بھی زیادہ رہیگا۔ مراٹھواڑہ میں آ سمانی بجلی سے بچنے کے لیے حفا ظتی اقدا مات کر نے کی اپیل بھی کی گئی ہے۔
***** ***** *****
ایوت محل سے ناگپور جا رہی شیو شاہی بس اور موٹر سائیکل کے در میان کل ہوئے ایک حادثے میں دو لو گوں کی موت ہو گئی جبکہ اٹھا رہ افراد زخمی ہو گئے ہیں۔ مر نے والوں میں مو ٹر سائیکل سوار اور بس میں سفر کر رہی خاتون مسافر شامل ہے۔ یہ حادثہ کل رات ایوت محل -کلمب شاہراہ پر پیش آیا۔
***** ***** *****
اورنگ آباد میں کل لگا تار دو سرے دِن بھی کوریئر کمپنی کے ذریعے پارسل میں آئے سات ہتھیاروں کو پو لس نے ضبط کر لیا۔ اِس سے پہلے منگل کے روز بھی اِسی طرح کی کار وائی میں28؍ ہتھیار ضبط کیئے گئے تھے۔
***** ***** *****
پر بھنی ضلعے کے پا لم تعلقے میں سنجئے گاندھی نِر آدھار یو جنا اور شراون بال یو جنا کے مستحقین نے کل تحصیل دفتر کے رو برو دھر نا احتجاج کیا۔ اِس موقع پر رکن پارلیمنٹ سنجئے جا دھو بھی مو جود تھے۔ اُنھوں نے انتباہ دیا کہ 13؍ جون تک مستحق افراد کو رقم ادا نہ ہو نے کی صورت میں وہ تحصیل دفتر پر تا لہ لگا دیں گے۔

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.05.2018 06.50AM
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 31 May 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
३१ मे २०१८
सकाळी ६.५०
मि.
*****
Ø देशासाठी समर्पण आणि उत्कृष्टता याबाबतीत, एनडीएचे प्रशिक्षणार्थी,
देशभरातल्या युवकांसाठी आदर्श - राष्ट्रपतींचं प्रतिपादन
Ø पीक
विम्याची रक्कम येत्या सात जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दक्षता घ्यावी- मुख्यमंत्र्यांचे विमा कंपन्यांना निर्देश
Ø सोलापूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त
Ø बारावीचा निकाल जाहीर; औरंगाबाद विभागाचा चौथा तर लातूर
विभागाचा पाचवा क्रमांक
आणि
Ø बँक कर्मचारी संपामुळे मराठवाड्यातल्या बँकिंग सेवा प्रभावित
*****
देशासाठी समर्पण आणि उत्कृष्टता याबाबतीत, राष्ट्रीय
संरक्षण अकादमीचे प्रशिक्षणार्थी, देशभरातल्या युवकांचे आदर्श बनले आहेत, असं प्रतिपादन
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी - एनडीए च्या एकशे
चौतीसाव्या तुकडीच्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. यावेळी सर्वश्रेष्ठ प्रशिक्षणार्थी
साठींची राष्ट्रपती पदकंही प्रदान करण्यात आली.
काल आपल्या पुणे दौऱ्यात राष्ट्रपतींनी, पुणे महानगरपालिकेच्या
मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात, रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण
केलं. रमाबाई आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातून प्रत्येक भारतीय महिलेनं प्रेरणा घ्यावी,
असं आवाहन, राष्ट्रपतींनी यावेळी केलं. दरम्यान, साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे उद्धघाटन
राष्ट्रपतींच्या हस्ते काल करण्यात आलं.
****
पीक
विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या सात जूनपूर्वी जमा होईल, याची दक्षता
विमा कंपन्यांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रधानमंत्री
पीक विमा योजनेसंदर्भातल्या एका आढावा बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते. येत्या खरीप
हंगामासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यासाठी,
विमा कंपन्या आणि बॅंकांनी, एकत्रितपणे प्रयत्न करावेत, तसंच, शेतकऱ्यांनीही दिलेल्या
मुदतीत योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी
केलं.
****
राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी होईपर्यंत सरकारनं
हमीभाव खरेदी केंद्रं सुरू ठेवावीत आणि या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विधान
परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. सध्या हजारो शेतकऱ्यांचा हरभरा,
नोंदणी करूनही खरेदी अभावी पडून असल्याकडे मुंडे यांनी लक्ष वेधलं.
****
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या शिफारशीनुसार
सरकारनं ही कारवाई केली. सोलापूरचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांची बँकेचे प्रशासक म्हणून
नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी काल पदभार स्वीकारला. बँकेकडे तारण मालमत्ता आणि
कर्जवाटप यात तफावत आढळल्यानंतर, कामकाज सुधारण्याचे निर्देश राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण
विकास बँक - नाबार्डनं दिले होते. मात्र सुधारणा न झाल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण
मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला.
यंदा राज्यातून ८८ पूर्णांक ४१ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्या
वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे दोन टक्क्यांनी कमी आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल
८८ पूर्णांक ७४ टक्के तर लातूर विभागाचा निकाल ८८ पूर्णांक ३१ टक्के इतका लागला आहे.
मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, नांदेड
आणि लातूर जिल्ह्यांचा निकाल सरासरी ८९ टक्के लागला असून, परभणी ९० टक्के, जालना ८७
टक्के, हिंगोली ८६ टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल ८३ पूर्णांक ६४ शतांश टक्के एवढा लागला आहे.
उत्तीर्ण होणाऱ्या एकूण परीक्षार्थींमध्ये
मुलींचं प्रमाण ९२ पूर्णांक ३६ शतांश टक्के तर मुलांचं प्रमाण ८५ पूर्णांक २३ शतांश
टक्के, इतकं आहे.
****
राज्य लोकसेवा आयोगानं सप्टेंबर २०१७
मध्ये घेतलेल्या परीक्षेत जळगाव जिल्ह्यातले रोहितकुमार राजपूत यांनी राज्यात प्रथम
क्रमांक पटकावला आहे. मागासवर्गीयातून सोलापूर इथले अजयकुमार नष्टे तर महिलांमधून पुणे
जिल्ह्यातल्या रोहिणी नऱ्हे यांनी पहिला क्रमांक मिळवला. औरंगाबाद जिल्ह्यातले दत्तू
शेवाळ राज्यातून पाचव्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले. या सर्वांची उपजिल्हाधिकारी पदासाठी
निवड झाली असून, औरंगाबादचे सुदर्शन राठोड यांची पोलीस उपाधीक्षकपदी निवड झाली आहे.
****
लोकसभेच्या भंडारा-गोंदिया
तसंच पालघर मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी आज होणार आहे. गेल्या
सोमवारी, झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान, भंडारा-गोंदिया मतदार संघात अनेक ठिकाणी
मतदान यंत्रं बंद पडल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर काल या मतदार संघात ४९
ठिकाणी फेरमतदान घेण्यात आलं, या
मतदान केंद्रांवर सुमारे ४९ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे.
*****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
देशभरातल्या सुमारे दहा लाख बँक कर्मचाऱ्यांनी, अत्यल्प
पगारवाढीच्या निषेधार्थ कालपासून दोन दिवसीय संप पुकारला आहे. यामध्ये एकवीस सार्वजनिक,
तेरा जुन्या खाजगी, सहा परदेशी आणि छप्पन्न प्रादेशिक ग्रामीण बँकांमधल्या कर्मचाऱ्यांचा
समावेश आहे.
राज्यभरातले सुमारे साठ हजार बँक कर्मचारी
या संपात सहभागी झाल्यानं, बँकिंग सेवा प्रभावित झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या
सुमारे दोनशे बँक शाखा तसंच परभणी जिल्ह्यातल्या १९ बँक शाखांचं कामकाज या संपामुळे
ठप्प झालं आहे. बीड, जालना, हिंगोली, लातूर, नांदेड,
उस्मानाबाद सह सर्वच ठिकाणी या
सर्व कर्मचाऱ्यांनी काल आंदोलनं करून, आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधून घेतलं.
****
नांदेड आकाशवाणी केंद्राचे सहायक संचालक भीमराव शेळके
हे आज सेवा निवृत्त होत आहेत. कार्यक्रम अधिकारी म्हणून आकाशवाणीत रुजू झालेले शेळके
यांनी मुंबई, पुणे आणि सोलापूर इथं कार्य केले. आपली सर्जनशीलता आणि कल्पकता वापरून
शेळके यांनी, नांदेड आकाशवाणीचं एफ एम केंद्र अल्पावधीतच लोकप्रिय केलं. त्यांच्या
या कार्याची दखल घेत, स्थानिक श्रोत्यांनी, येत्या तीन जून रोजी त्यांचा सार्वजनिक
गौरव समारंभ आयोजित केला आहे.
****
इंद्रप्रस्थ जलभूमि अभियानाच्या माध्यमातून येत्या २ जून पर्यंत लातूर जिल्ह्यातल्या
सर्व शासकीय कार्यालयांच्या छतावरचं पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासाठीची कामं पूर्ण
होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालक मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली. ते
काल लातूर इथं बोलत होते. जिल्ह्यात एकूण दोन
लाख शोष खड्डे खोदण्याचं उद्दीष्ट असून, त्यापैकी ९७ हजार खड्ड्यांना मंजूरी देण्यात
आली आहे, तर ३५ हजार खड्ड्यांचं काम पूर्ण झालं असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद इथल्या सहायक निबंधकाला काल दीड हजार
रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. अनिस तय्यबअली सय्यद, असं त्याचं नाव असून,
सावकारीचा परवाना अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यासाठी त्यानं तक्रारदाराकडे तीन
हजार रुपये लाच मागितली होती. लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं, निबंधक कार्यालयातच ही कारवाई
केली.
****
यवतमाळहून नागपूरला जाणारी शिवशाही बस
आणि मोटरसायकलच्या अपघातात दोन जण ठार तर १८ प्रवासी गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दुचाकी
चालक आणि बसमधल्या एका महिला प्रवाशाचा समावेश आहे. यवतमाळ कळंब मार्गावर काल हा अपघात
झाला.
****
पालघर जिल्ह्यात एका कंपनीत बॉयलर लीक होऊन तीन कामगारांचा
मृत्यू झाला, तर एक कामगार अत्यवस्थ आहे. वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोरणा इस्पात
उद्योग कंपनीत काल दुपारी ही दुर्घटना घडली.
****
औरंगाबाद इथं काल सलग दुसऱ्या दिवशी कुरिअर कंपनीतून
पार्सलमधून आलेली सात शस्त्र जप्त करण्यात आली. परवा अशाच कारवाईत २८ शस्त्रं जप्त
करण्यात आली होती.
****
हिंगोली जिल्ह्याचे खनिकर्म आधिकारी तसंच कळमनुरीच्या
तहसीलदारांनी काल कळमनुरी तालुक्यात येलकी इथल्या वाळूसाठ्यावर छापा मारला. या साठ्यातली
रेती, अधिकृत लिलाव घाटातली असल्याचं भासवण्यासाठी संबंधितांनी सादर केलेल्या ५ पावत्यांपैकी
चार पावत्या बनावट असल्याचं सिध्द झालं.
*****
***
Wednesday, 30 May 2018
Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.05.2018 - Evening Bulletin
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 30 May 2018
Time - 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
मातोश्री
रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जीवन चरित्रातून प्रत्येक भारतीय महिलेनं प्रेरणा घ्यावी,
असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या मातोश्री रमाबाई
आंबेडकर उद्यानात रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांच्या हस्ते अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर
राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास
आठवले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
पीक
विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या सात जूनपूर्वी जमा होईल, याची दक्षता
विमा कंपन्यांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
आज मुंबईत, प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भातल्या एका आढावा बैठकीत मुख्यमंत्री
बोलत होते. येत्या खरीप हंगामासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली असून, शेतकऱ्यांना
त्याचा लाभ देण्यासाठी, विमा कंपन्या आणि बॅंकांनी, एकत्रितपणे प्रयत्न करावेत, तसंच,
शेतकऱ्यांनीही दिलेल्या मुदतीत योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत, असं आवाहनही
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
****
राज्यातल्या
सगळ्या शेतकऱ्यांचा हरभरा खरेदी होईपर्यंत सरकारनं हमीभाव खरेदी केंद्रं सुरू ठेवावीत
आणि या योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे
यांनी केली आहे. सध्या हजारो शेतकऱ्यांचा हरभरा, नोंदणी करूनही खरेदी अभावी पडून असल्याकडे
मुंडे यांनी लक्ष वेधलं.
****
सोलापूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या
शिफारशीनुसार सरकारनं ही कारवाई केली. सोलापूरचे उपनिबंधक अविनाश देशमुख यांची बँकेचे
प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज सकाळी पदभार स्वीकारला. बँकेकडे
तारण मालमत्ता आणि कर्जवाटप यात तफावत आढळल्यानंतर, कामकाज सुधारण्याचे निर्देश राष्ट्रीय
कृषी आणि ग्रामीण विकास बँक, नाबार्डनं दिले होते, मात्र सुधारणा न झाल्यानं ही कारवाई
करण्यात आली.
****
‘गाळमुक्त
धरण आणि गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत राज्यातल्या धरणांमधला गाळ काढण्यासंदर्भात स्थापन
समितीनं आज या बाबतच्या कामांचा आढावा घेतला. बुलढाणा जिल्ह्यात गाळ काढण्याची सर्वाधिक
कामं झाल्याची आणि या मोहिमेत विविध खाजगी संस्था आणि पाणी फाऊंडेशनचीही मदत होत असल्याची
माहिती यावेळी देण्यात आली.
****
तापी
बुराई सिंचन प्रकल्पाचं काम तातडीनं पूर्ण करावं, या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यात
आज शेतकऱ्यांनी जलसत्याग्रह आंदोलन केलं. शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी तापी नदी
पात्रात उतरुन निदर्शनं केली. नंदुरबारच्या पूर्व भागासह दोंडाईचा परिसराला लाभ होणं
अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचं काम, आठ वर्षांपासून सुरु असूनही पूर्ण झालेलं नाही.
याबाबत योग्य ती कारवाईचं आश्वासन प्रशासनानं दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.
****
छोटा
राजनचा हस्तक फरीद तनाशा याच्या खून प्रकरणातल्या अकरा आरोपींना मुंबईच्या विशेष मकोका
न्यायालयानं दोषी ठरवलं असून, त्यातल्या सहा आरोपींना जन्मठेपेची आणि ऊर्वरित पाच आरोपींना
दहा वर्षं तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. तनाशा याची जून २०१० मध्ये हत्या करण्यात
आली होती.
****
‘निपाह’
व्हायरसविषयी खबरदारी घेण्याचे आदेश पशुसंवर्धन आयुक्तांनी दिल्यानंतर धुळे जिल्हा
परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे धुळे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणांहून ५० वराहांचे
रक्तजल नमुने घेण्यात आले असून हे नमुने आज नाशिक इथे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्याची सूचना
पशुसंवर्धन विभागानं केली आहे.
****
कर्मचारी
भविष्य निर्वाह निधी संघटनेनं २०१७-१८ या वर्षासाठी, आठ पूर्णांक पंचावन्न शतांश टक्के
व्याजदर देण्याचे निर्देश दिले आहेत. सुमारे पाच कोटी लाभार्थ्यांना याचा लाभ होणार
आहे.
****
लोकसभेच्या
भंडारा गोंदिया तसंच पालघर मतदार संघातल्या काही केंद्रांवर आज फेरमतदान होत आहे. या
दोन्ही मतदार संघातल्या मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे.
****
कर्नाटकच्या
किनारपट्टीवर कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे एका बालिकेसह तीन जणांचा मृत्यू
झाला. मंगलोर इथं काल, चारशे चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राष्ट्रीय आपत्ती निवारण
दलाची पथकं मंगलोर आणि उडुपी जिल्ह्यांमध्ये दाखल झाली आहेत.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.05.2018 13.00
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० मे
२०१८
दुपारी १.०० वा.
****
माध्यमिक आणि उच्च
माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल
आज जाहीर झाला. यंदा राज्यातून अट्ठ्यांऐंशी पूर्णांक एक्केचाळीस शतांश टक्के विद्यार्थी
उत्तीर्ण झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सुमारे दोन टक्क्यांनी कमी
आहे. उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचं प्रमाण ब्याण्णव पूर्णांक छत्तीस शतांश टक्के तर मुलांचं
हे प्रमाण पंच्याऐंशी पूर्णांक तेवीस शतांश टक्के, इतकं आहे. राज्यात कोकण विभागाचा
निकाल सर्वाधिक ९४ पूर्णांक ३६ टक्के इतका असून,
औरंगाबाद विभागाचा निकाल ८८ पूर्णांक ७४ आणि लातूर विभागाचा निकाल ८८ पूर्णांक
३१ टक्के इतका लागला आहे.
****
राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे प्रशिक्षणार्थी, देशासाठी
समर्पण आणि उत्कृष्ठता या बाबतीत, देशभरातल्या युवकांचे आदर्श बनले आहेत, असं राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती
आज पुण्यामध्ये राष्ट्रीय संरक्षण अकादमी,एनडीए च्या एकशे चौतिसाव्या तुकडीच्या
दीक्षांत समारंभानंतर बोलत होते. यावेळी सर्वश्रेष्ठ प्रशिक्षणार्थीं साठीची राष्ट्रपती
पदकंही प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमा आधी राष्ट्रपतींना सैन्याच्या विमानांच्या
एका तुकडीनं हवाई सलामी दिली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जकार्ता इथे इंडोनेशियाचे
राष्ट्रपती जोको विडोडो यांच्याशी चर्चा केली. यानंतर दोन्ही नेत्यांनी एक संयुक्त
पत्रकार परिषद घेतली. या चर्चेनंतर उभय देशांदरम्यान, संरक्षण, अंतराळ, विज्ञान आणि
तंत्रज्ञान क्षेत्रां संदर्भात अनेक करार होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान आज जकार्ता
इथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत.
****
रोटोमॅक, या कानपूरच्या उद्योग समूहाच्या एकशे सत्त्याहत्तर
कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्त वसुली संचालनालयानं टाच आणली आहे. या कंपनीवर, बँकांचं
तीन हजार सहाशे पंचाण्णव कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. मनीलाँडरिंग प्रतिबंधक
कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये या कंपनीच्या
मुंबईतल्या मालमत्तांचाही समावेश आहे.
****
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या हेतूनं रेल्वेमार्गांच्या
अद्ययावती करणाचं काम सुरू असल्यामुळे सध्या अनेक मार्गांवर रेल्वेगाड्या उशिरा धावत
असून, प्रवाशांनी याबाबत रेल्वेला सहकार्य करावं, असं रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी
म्हटलं आहे. गोयल यांनी एका ट्विट संदेशाद्वारे हे आवाहन केलं आहे.
****
बँकांच्या राज्यातल्या
बारा हजार शाखांमधले सुमारे साठ हजार बँक कर्मचारी
आजपासून दोन दिवसांच्या संपावर गेल्यामुळे राज्यातल्या बँकिंग सेवा मोठ्या प्रमाणावर
प्रभावित झाल्या आहेत. देशभरातल्या एकवीस सार्वजनिक, तेरा जुन्या खाजगी, सहा परदेशी
आणि छप्पन्न प्रादेशिक ग्रामीण बँकांमधले सुमारे दहा लाख कर्मचारी, अत्यल्प पगारवाढीच्या
निषेधार्थ या संपावर गेले आहेत.
****
नैऋत्य मॉन्सून काल भारतीय उपखंडात दाखल झाल्याची
अधिकृत घोषणा हवामानखात्यानं केली आहे. केरळसह अंदमान निकोबार बेटं, लक्षद्वीप आणि
तामीळनाडूच्या काही भागात मॉन्सून सक्रिय झाला असून, त्याच्या पुढच्या वाटचालीसाठीही
हवामान पोषक असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. रत्नागिरी शहरात काल मॉन्सूनपूर्व
पावसानं हजेरी लावल्याचं, तसंच सातारा शहर आणि परिसरामध्ये कोकणपट्टीकडून येत असलेल्या
थंड वाऱ्यामुळे तापमानात मोठी घट झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. मराठवाड्याच्या
काही जिल्ह्यांमध्ये आज मॉन्सूनपूर्व पावसाची शक्यता हवामानखात्यानं वर्तवली आहे. दरम्यान,
कर्नाटक मधल्या मंगलोर इथे आज मॉन्सूनच्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाल्याचं
वृत्त आहे.
****
तंबाखूचं कुठल्याही स्वरूपातलं सेवन हे आरोग्याला
घातक असल्यामुळे तरुण पिढीनं तंबाखूपासून दूर राहावं, असं आवाहन सामाजिक न्यायमंत्री
राजकुमार बडोले यांनी केलं आहे. उद्याच्या जागतिक तंबाखू विरोधी दिवसा निमित्त शासनानं
हाती घेतलेल्या ‘तंबाखूमुक्त महाराष्ट्र‘ या तीन दिवसीय जनजागृती अभियानाचं उद्घाटन
काल बडोले यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बडोले
यांनी उपस्थितांना महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्याची शपथ दिली.
****
पॅरिस इथे सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या
पुरुष दुहेरीच्या सामन्यांमध्ये भारताच्या रोहन बोपण्णानं आपला फ्रेंच जोडीदार रॉजर
व्हॅसलिन याच्या साथीनं स्पर्धेची दुसरी फेरी गाठली आहे. पुरुष एकेरीतलं भारताचं एकमेव
आव्हान असलेला युकी भांबरी मात्र पहिल्या फेरीतच पराभूत झाला.
*****
***
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.05.2018 11.00AM
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आपल्या इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर या तीन देशांच्या दौऱ्याच्या
पहिल्या टप्प्यात काल संध्याकाळी इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथे पोहोचले. लष्करी
मान वंदनेसह त्यांचं तिथे स्वागत करण्यात आलं. पंतप्रधानांनी आज इंडोनिशियाचे राष्ट्रपती
जोको विडोडो यांची भेट घेतली.
****
माजी केंद्रीय
मंत्री पी चिदंबरम यांनी, एअरसेल मॅक्सेल मनी लाँडरिंग प्रकरणी अटकेपासून सुरक्षेची
मागणी करणारी याचिका दिल्ली न्यायालयात दाखल केली आहे. यावर, सक्त वसुली संचालनालयानं आपलं या बाबतचं म्हणणं
येत्या पाच जून पर्यंत सादर करावं आणि तोपर्यंत चिदंबरम यांच्यावर दंडात्मक कारवाई
करू नये, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
राष्ट्रीयीकृत
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे
सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीनं आज आणि उद्या,
काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलना मुळे सरकारी बँकांचे व्यवहार या दोन दिवसात
बंद राहतील, मात्र, ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी एटीएममध्ये पुरेशी रोकड ठेवली
असल्याचं बँक युनियननं कळवलं आहे.
****
राज्य माध्यमिक
आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी
एक वाजता जाहीर केला जाणार आहे. हा निकाल मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र
एज्युकेशन डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळासह इतरही सहा संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.
****
भंडारा-गोंदिया
मतदारसंघाच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकी साठीचं फेरमतदान सुरू झालं आहे. सोमवारी
झालेल्या मतदान प्रक्रिये दरम्यान या मतदार संघातल्या एकोणपन्नास मतदान केंद्रांतल्या
व्हीव्हीपॅट यंत्रांमध्ये तांत्रिक दोष दिसून
आल्यानं निवडणूक आयोगानं या केंद्रांवर पुनर्मतदान घेण्याचा आदेश काल दिला होता.
****
महाराष्ट्रात
मॉन्सूनचं आगमन अजून झालेलं नाही, आणि ते झाल्या नंतर सुद्धा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई
करू नये, असं आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे. येत्या एक तारखेनंतर विदर्भ,
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी कोसळतील, असा अंदाज असून, या कालावधीत
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळ आणि विजांपासून संरक्षण होण्यासाठी नागरिकांनी पुरेशी काळजी घ्यावी, असं आवाहनही शासनानं
केलं आहे.
*****
***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 May 2018
Time 8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: ۳۰ ؍مئی ۲۰۱۸
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
وزیر اعظم مُدرا یو جنا ظا ہر ہو نے کے بعد سے بینکس اور مالی اِداروں نے اب تک 12؍ کروڑ نو جوانوں کو 6؍لاکھ کرور روپئے قرض تقسیم کیا ہے ۔ اِسکی اطلاع وزیر اعظم نریندر مودی نے کل دی۔12؍ کروڑ فائدہ حاصل کر نے والوں میں 28؍ فیصد یعنی 3؍ کروڑ25؍ لاکھ نو جوانوں نے پہلی مر تبہ صنعتیں شروع کر نے کے لیے قرض حاصل کیا ہے۔ اِن فائدہ حاصل کر نے والوں میں74؍ فیصد یعنی 9؍ کروڑ خواتین شامل ہیں اور اِس میں
55؍ فیصد مستحقین درج فہرست ذاتوں ،جماعتوں اور دیگر پچھڑے ہوئے طبقوں سے تعلق رکھتے ہیں۔ یہ بات وزیر اعظم نے کہی۔
***** ***** *****
صدر جمہوریہ ہند رام ناتھ کووِند کل پو نا تشریف لا ئے۔ اِس موقع پر گور نر سی وِدیا ساگر رائو ،وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس وغیرہ نے اُنکااستقبال کیا۔ آج پو نا میں این سی سی کی تقسیم اسنادات تقریب، ماتو شری رما بائی امبیڈکر کے مجسمے کی رسم نقاب کشائی وغیرہ تقا ریب میں صدر جمہو ریہ موجود رہیں گے۔
***** ***** *****
ریا ست کے میونسپل کار پو ریشنس ،بلدیہ جات،نگر پنچا یت اور صنعتی شہر کے ضابطوں میں نا جائز تعمیرات کے سلسلے میں جر ما نے کی گنجائش میں تر میم کر نے کا فیصلہ کل کی کا بینی میٹنگ میں لیا گیا۔ اِس کے تحت اب 600؍ مربع فِٹ کے رہائشی تعمیرات پر جر ما نہ معاف کر دیا گیا ہے۔ 601؍ سے 1000؍ مر بع فٹ رہائشی تعمیرات کے لیے مِلکیت ٹیکس کا50؍ فیصد جر ما نہ کر دیا گیاہے۔ تا ہم ایک ہزار ایک مر بع فٹ سے زیادہ رہائشی تعمیرات کو فی الحال کے نرخ سے جر ما نہ عائد کر نے کا فیصلہ میٹنگ میں لیا گیا ۔
***** ***** *****
ریاستی ٹرانسپورٹ )ایس ٹی( کار پو ریشن کی شیو شا ہی اِس ایئر کنڈیشن بس میں بزرگ شہریوں کے لیے سفر کے کرایوں میں سہو لت دینے کا اعلان وزیر ٹرانسپورٹ دیواکر رائوتے نے کیا ہے۔ یکم جون سے یہ سہو لت دی جائے گی۔ شیو شاہی کی سیٹِنگ بس میں بزرگوں کو سفر کے کرایوں میں
45؍ فیصد اور سلیپِنگ بس میں30؍ فیصد سہو لت دی جائے گی۔ فی الحال ایس ٹی کے جنرل، رات رانی اِسی طرح نیم آرام بسوں میں بزرگ شہر یوں کو کرایے میں 50؍ فیصد سہو لت دی جا تی ہے۔
***** ***** *****
لوک سبھا کے بھنڈا را-گوندیا حلقہ ٔ انتخا ب کے49؍ رائے دہی مراکز پر آج دو بارہ رائے دہی ہو رہی ہے۔ پر سو ں ہوئی ووٹِنگ کے دوران اِن رائے دہی مراکز پر ووٹِنگ مشینیںبند ہو جانے کی شکا یت کے بعد یہ دو بارہ رائے دہی کا فیصلہ لیا گیا۔ دو با رہ رائے دہی ہونے والے علاقوں میں رائے دہی کر نے کے لیے سر کاری تعطیل کا اعلان کیا گیا ہے۔
اِسی بیچ گو ند یا کے ضلع کلکٹر Abhimanyu Kaleکا تبا دلہ کر دیا گیا ہے۔ کاڑے یہ بھنڈا را-گو ند یا حلقۂ انتخا ب کے ضلع الیکشن آ فیسر تھے۔ اُن کی جگہ پر ناگپور ضلع پریشد کے چیف آفیسرBhagat Balkawade کا ضلع الیکشن آ فیسر کے طور پر تقرر کیاگیا ہے۔
***** ***** *****
ریاستی ثانوی و اعلیٰ ثانوی تعلیمی بورڈ کی جانب سے لیے گئے بارہویں جماعت کے نتائج آج دو پہر کو ایک بجے ظا ہر کیئے جائیںگے۔ بورڈ کے کار گذرا سیکریٹری ڈاکٹر اشوک بھونسلے نے کل اِسکی اطلاع دی۔ ریاستی بورڈ کی جانب سے فر وری-مارچ میں با رہویں جماعت کے امتحا نات لیے گئے تھے۔ جملہ14؍ لاکھ45؍ ہزار132؍ طلباء و طالبات اِس امتحان میں شریک ہو ئے۔ یہ نتیجہ بوورڈ کے
www.maharashtraeducation.comاِس ویب سا ئٹ سمیت دیگر 6؍ ویب سائٹس پر مہیا ہو گا۔
***** ***** *****
دریں اثناء مرکزی ثانوی تعلیمی بورڈCBSE کے دسویں جماعت کے نتائج کل دو پہر کو ظا ہر کر دیئے گئے ۔ اِس سال 86.7؍ فیصد طلباء و طالبات اِس امتحان میں کامیاب ہوئے۔ جملہ 4؍ طالبات نے ملک میں اول مقام حاصل کر نے کا اعزاز حاصل کیا۔ اِن چاروں طلبات کو
500؍ میں سے499؍ نشا نات حاصل ہوئے۔
***** ***** *****
اورنگ آ باد شہر میں کل ایک کوریئر کمپنی کے آفس پر پولس نے چھا پہ مار کر آ ن لائن خریدی کے ذریعے سے منگوائے گئے ہتھیار ضبط کیئے۔ شہر میں حال ہی میں ہوئے فساد کے تحت یہ ہتھیار منگوائے گئے ایسا پولس کا قیاس ہے۔ اِن ہتھیا روں میں تلوار، چاقو سمیت دیگر28؍ ہتھیار شامل ہیں۔ اِس سلسلے میں کو ریئر کمپنی کے مقامی منجیر کو حراست میں لیا گیا ہے۔
اِسی بیچ کل اورنگ آباد پولس کمشنر کے عہدے کا چارج چِرنجیوپر ساد نے قبول کیا۔ شہر میں مذہبی ہم آہنگی قائم رکھنے پر ہم زور دینگے یہ بات اُنھوں نے اِس موقع پر کہی۔
***** ***** *****
آل اِنڈیا چھا وا تنظیم کا گیار ہواں اجلاس کل اورنگ آ باد میں ہوا۔ مراٹھا سماج کو فوراً ریزر ویشن دیا جائے، کسا نوں کو مکمل قرض معا فی دی جائے، زرعی پمپوں کو مفت بر قی فراہمی وغیرہ مطالبات کی تجویز اِس موقع پر منظور کی گئی۔

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.05.2018 06.50AM
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date
– 30 May 2018
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
३० मे २०१८
सकाळी ६.५०
मि.
*****
Ø प्रधानमंत्री मुद्रा योजनेत आतापार्यंत १२ कोटी युवकांना
६ लाख कोटी रूपये कर्ज वाटप
Ø ६०० चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत निवासी बांधकामाला दंड माफ
Ø भंडारा - गोंदिया
लोकसभा मतदार संघातल्या ४९ मतदानकेंद्रांवर आज फेरमतदान
Ø बारावीचा निकाल आज जाहीर होणार; सीबीएसईच्या दहावी परीक्षेत ८६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
आणि
Ø औरंगाबाद इथं ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून
मागवलेली शस्त्रं जप्त
****
‘प्रधानमंत्री मुद्रा योजना’ जाहीर केल्यापासून बँका
आणि वित्तीय संस्थांनी आतापार्यंत १२ कोटी युवकांना ६ लाख कोटी रूपये कर्जाचं वाटप
केलं असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिली. १२ कोटी लाभार्थ्यांपैकी
२८ टक्के म्हणजेचं ३ कोटी २५ लाख युवकांनी पहिल्यांदाच उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज
घेतलं आहे. या लाभार्थ्यांमध्ये ७४ टक्के म्हणजेच ९ कोटी महिलांचा समावेश आहे. तर यातील
५५ टक्के लाभार्थी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास वर्गातील असल्याचंही पंतप्रधानांनी
म्हटलं आहे. ८ एप्रिल २०१५ पासून सुरू झालेल्या योजनेतंर्गत विना सहकारी, सूक्ष्म,
लघु उद्योगांच्या उभारणीसाठी १० लाख रूपयांचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं काल पुण्यात आगमन
झालं. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी त्यांचं
यावेळी स्वागत केलं. आज पुण्यात राष्ट्रीय छात्रसेनेचा दीक्षांत कार्यक्रम, मातोश्री
रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आदी कार्यक्रमांना राष्ट्रपती उपस्थित राहणार
आहेत.
****
राज्यातल्या महापालिका,
नगरपरिषदा, नगरपंचायती, आणि औद्योगिक नागरी अधिनियमात अनधिकृत बांधकामासंदर्भातल्या शास्तीच्या तरतुदीत
सुधारणा करण्याचा निर्णयही कालच्या
मंत्रिमडळ बैठकीत
घेण्यात आला. यानुसार आता ६०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामाला शास्ती माफ करण्यात
आली असून, ६०१ ते १००० चौरस फुटाच्या निवासी बांधकामासाठी मालमत्ता कराच्या ५० टक्के
इतकी शास्ती करण्यात आली आहे तर १००१ चौरस फुटापेक्षा अधिक निवासी बांधकामाला सध्याच्याच
दरानं शास्ती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
अनुसूचित जाती आणि नवबौद्ध
घटकातल्या दारिद्र्य रेषेखालील भूमिहिनांसाठी असलेल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण
तसंच स्वाभिमान योजनेअंतर्गत, जमीन खरेदीसाठी आर्थिक व्याप्तीत वाढ करण्याचा निर्णयही
कालच्या बैठकीत घेण्यात आला. जिरायतीसाठी कमाल मर्यादा आता प्रति एकरी पाच लाख रूपये
आणि बागायतीसाठी प्रतिएकरी आठ लाख रूपये एवढी करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीत तत्काळ
मदतीसाठी कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्याचा, तसंच नागरी स्वराज्य संस्थांमधील अन्न निरीक्षकांची
३३ पदं आता अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून अन्न-औषधी प्रशासनाकडे देण्याचा निर्णयही कालच्या
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यातल्या ग्राहकांच्या हितासाठी
स्वस्त धान्य दुकानातून तूर डाळ ३५ रूपये प्रतिकिलो या दरानं विक्री करण्यास राज्य
मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीच्या
शिवशाही या वातानुकुलित बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत देण्याची घोषणा
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. परवा एक जूनपासून ही सवलत लागू होईल. शिवशाहीच्या
आसन बसमध्ये ज्येष्ठांना प्रवास भाड्याच्या ४५ टक्के तर शयनयान बसमध्ये ३० टक्के सवलत
असेल. सध्या एसटीच्या साध्या, रातराणी तसंच निमआराम बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास
भाड्यात ५० टक्के सवलत मिळते.
****
लोकसभेच्या भंडारा - गोंदिया मतदार संघातल्या ४९ मतदानकेंद्रांवर आज फेरमतदान
घेण्यात येणार आहे. परवा झालेल्या मतदानावेळी या मतदानकेंद्रांवरची मतदानयंत्र बंद
पडल्याच्या तक्रारीनंतर हे फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला. फेरमतदान असणाऱ्या क्षेत्रात
मतदान करण्यासाठी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची
बदली करण्यात आली आहे. काळे हे भंडारा गोंदिया मतदार संघाचे जिल्हा निवडणूक अधिकारी
होते. त्यांच्या जागी नागपूर जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी भगत बलकवडे यांची जिल्हा
निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
****
राज्य
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल
आज दुपारी एक वाजता जाहीर केला जाणार आहे. मंडळाचे प्रभारी सचिव डॉक्टर अशोक भोसले
यांनी काल ही माहिती दिली. राज्य मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये बारावीची परीक्षा
घेण्यात आली होती. एकूण १४ लाख ४५ हजार १३२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली
होती. हा निकाल मंडळाच्या डब्ल्यू
डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र एज्युकेशन डॉट कॉम या
अधिकृत संकेतस्थळासह इतरही सहा संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.
दरम्यान, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
-सीबीएसईचा इयत्ता दहावीचा निकाल काल दुपारी जाहीर करण्यात आला. यंदा ८६ पूर्णांक सात
टक्के इतका निकाल लागला असून एकूण चार विद्यार्थ्यांनी देशात पहिला येण्याचा मान पटकावला
आहे. या चौघांनाही ५०० पैकी ४९९ गुण मिळाले आहेत.
*****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
पावसाळ्यातल्या संभाव्य आपत्ती आणि
अडचणींना तोंड देण्यासाठी शासनाच्या विविध यंत्रणांनी या काळात अधिक समन्वय ठेवून अडचणींवर
मात करावी, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरण आणि पावसाळा पूर्वतयारी बाबत आढावा बैठक काल मुंबईत झाली, त्यावेळी मुख्यमंत्री
बोलत होते. मुंबई महापलिका, हवामान विभाग, भारतीय सेना, भारतीय वायू सेना, भारतीय नौसेना
त्याचबरोबर राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या क्षेत्रात आपत्ती निवारणासाठी
केलेल्या उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.
****
महिला आणि बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध
करण्याच्या दृष्टीनं शासन, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजानं एकत्र
येऊन काम करणं गरजेचं असल्याचं मत महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त
केलं आहे. ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत काल मुंबईत ‘भारतातील मुलींचे
जग - सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मुलींच्या सुरक्षेबद्दल अभ्यास’ या अहवालाचं प्रकाशन
मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुलींवर होणारा अत्याचार
रोखणं ही काळाची गरज असून घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण अशा गैरप्रकारांना अनेक ठिकाणी
लहान मुलंही बळी पडतात, याचा गांभीर्याने विचार करावा लागेल, असंही मुंडे यावेळी म्हणाल्या.
****
औरंगाबाद शहरात काल एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयावर पोलिसांनी छापा मारून ऑनलाईन खरेदीच्या
माध्यमातून मागवलेली शस्त्रं जप्त केली. शहरात नुकत्याच घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर
ही शस्त्रं मागवण्यात
आली असल्याचं पोलिसांचा कयास आहे. या शस्त्रांमध्ये तलवार, चाकूसह इतर २८ शस्त्रांचा समावेश आहे. याप्रकरणात कुरिअर कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापकाला अटक
करण्यात आली आहे.
दरम्यान, काल औरंगाबाद पोलीस आयुक्त पदाचा पदभार चिरंजीव प्रसाद यांनी स्वीकारला. शहरातील धार्मिक
सलोखा कायम राखण्यावर आपला
भर राहणार असल्याचं, त्यांनी
यावेळी सांगितलं.
****
खगोलशास्त्रानुसार
अवकाशातली गणितं भारतात, पंचागाद्वारे पूर्वापार केली जात असल्याचं, खगोल शास्त्राचे अभ्यासक दा.कृ. सोमण
यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशन संस्थेच्या एपीजे अब्दुल
कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित व्याख्यानात बोलत होते. खगोलीय
घटनांबद्दल अंधश्रध्दा
न बाळगता त्या प्रत्यक्षात अनुभवण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अंबड तालुक्यातल्या रोहिलागड
इथल्या मंडळ अधिकाऱ्यास आठ हजार रूपयांची लाच घेताना काल रंगेहाथ अटक केली. विष्णू जायभाये, असं या अधिकाऱ्याचं नाव असून, वाळू वाहतुकीच्या
वाहनावर कारवाई न करण्यासाठी त्यानं लाचेची मागणी केली होती.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यात
अवैध वाळू उपसा प्रकरणी जिल्हाधिकारी पी. रविशंकर यांनी काल थेट कारवाई केली. वाळूचा
उपसा आणि वाहतूक करणारे सहा ट्रॅक्टर या कारवाईत जप्त करण्यात आले.
****
एक जून रोजी होणाऱ्या शेतकरी संपाला शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीचा
विरोध असल्याची माहिती समितीच्यावतीनं देण्यात आली. शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीची
राज्यस्तरीय बैठक काल औरंगाबाद इथं झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. समितीतर्फे
१२ जून रोजी मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सुभाष लोमटे यांनी
दिली.
****
जालना जिल्ह्यातल्या गोलापांगरी, आलंमगाव, परिसरात काल दुपारी जोरदार वाऱ्यासह पाऊस
झाला. या पावसात झाडे
उन्मळून पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अखिल भारतीय छावा संघटनेचं अकरावं अधिवेशन
काल औरंगाबाद इथं घेण्यात आलं. मराठा समाजाला त्वरित आरक्षण, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी,
शेतीपंपांना मोफत वीज, आदी ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.
*****
***