Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.09.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

दुष्काळ मुक्तीसाठी लोकसहभाग महत्वाचा असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी इथं आज राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या वतीनं आयोजित ‘लातूर आणि उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्ती निर्धार’ समारंभात ते बोलत होते. राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे पाणीपातळी वाढली असून, राज्यातली १६ हजार गावं जलपरिपूर्ण झाल्याचं त्यांनी नमूद केलं. किल्लारी भूकंपाच्या घटनेला आज २५ वर्षं पूर्ण झाली. भूकंपग्रस्त भागातल्या नागरिकांची वाढीव घराची मागणी मान्य केल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. भूकंपानंतर ज्या शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी जमिनी दिल्या होत्या, त्या त्यांना परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असंही ते म्हणाले. किल्लारी भूकंपात सामूहिक शक्तीनं काम केल्यामुळे नागरिकांचं लवकर पुनर्वसन झालं, असं खासदार शरद पवार यावेळी म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या पाणलोटाच्या कामांबाबत पुन्हा एकदा जलतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असंही ते म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, खासदार रवी गायकवाड आणि सुनिल गायकवाड यावेळी उपस्थित होते.

****

राज्यातल्या आदिवासी समाजाला डिसेंबर २०१८ अखेरपर्यंत वनजमीन पट्टे देण्याचं काम पूर्ण करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं आज अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमातर्फे आयोजित अखिल भारतीय कार्यकर्ता संमेलनात ते बोलत होते. आदिवासी क्षेत्रात विविध विकासकामांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला सक्षम बनवण्याचे प्रयत्न सुरू असून, आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेत प्रवेश मिळावा, यासाठी योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ वैद्यकीय मदत पुरवणाऱ्या नागरिकांना कायदेशीर संरक्षण देण्याच्या कर्नाटक सरकारच्या विधेयकाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. दुर्घटनेत जीव वाचवणाऱ्यांनाही कायदेशीर संरक्षण देणारं कर्नाटक हे देशातलं पहिलं राज्य आहे.

****

२०१४ साली पाकिस्तानच्या पेशावरमधल्या शाळेवर झालेला दहशतवादी हल्ला भारताच्या मदतीनं झाल्याच्या पाकिस्तानच्या आरोपाचं भारतानं खंडन केलं आहे. हा आरोप म्हणजे त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलांच्या स्मृतीचा अपमान आहे, असं संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या राजनैतिक अधिकारी एनाम गंभीर यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री मेहमूद कुरेशी यांनी भारतावर केलेल्या आरोपांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानचे हे आरोप बिनबुडाचे आहेत आणि शेजारील राष्ट्रांमध्ये अस्थिरता पसरवण्याचा हा प्रयत्न आहे, असं त्या म्हणाल्या.

****

कुपोषणमुक्तीसह भावी पिढी सशक्त आणि सक्षम बनवण्यासाठी पोषण अभियान प्रभावी असल्याचं नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी म्हटलं आहे. नांदेड इथं आज पोषण अभियान महारॅली काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ही योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

****

पूर्णा ते अकोला या ब्रॉडगेज मार्गाचं लवकरच विद्युतीकरण होणार आहे. त्यासाठी २११ कोटी ५४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथं झालेल्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. काचीगुडा ते नारखेड या इंटरसिटी एक्सप्रेसला वाशिम जिल्ह्यातल्या अमानवाडी इथं थांबा आणि पूर्णा-अकोला या पॅसेंजरचा विस्तार शेगांवपर्यंत करण्यालाही या बैठकीत मंजुरी मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या बैठकीला खासदार अशोक चव्हाण, राजीव सातव, संजय धोत्रे, बंडू जाधव, चंद्रकांत खैरे आणि दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक विनोदकुमार यादव उपस्थित होते.

****

डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजना आणि हनी मिशन अंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातल्या ज्ञानगंगा अभयारण्या मधल्या निसर्ग परिचय केंद्रात आयोजित कर्यक्रमात बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन मधुमक्षिका पालन पेटीचं वाटप करण्यात आलं. वन्य जीवांसाठी आरक्षित असलेल्या अभयारण्या लगतच्या गावातल्या लोकांना रोजगार मिळावा आणि अभयारण्यात मानवी हस्तक्षेप थांबावा, म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

****

तुर्कस्तान इथं सुरू असलेल्या धनुर्विद्या विश्वचषक स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मानं दोन पदकं पटकावली. ज्योती सुरेखा वेन्नम हिच्याबरोबर मिश्र दुहेरी सामन्यात रौप्य, तर वैयक्तिक स्पर्धेत त्यानं कांस्य पदक मिळवलं. वैयक्तिक सामन्यात अभिषेकनं दक्षिण कोरियाच्या किम जोंग हो ला ३०-२७ अशा गुण फरकानं हरवलं.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० सप्टेंबर २०१ दुपारी १.०० वा.

****



 शांततेवर आमचा विश्वास आहे आणि त्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते. या मालिकेचा आज ४८वा भाग प्रसारित झाला. पराक्रम पर्व सारखा दिवस युवकांना आपल्या सशस्त्र दलाच्या गौरवपूर्ण वारशाचं स्मरण करून देतो, देशाची एकता आणि अखंडत्व राखण्यासाठी आपल्याला प्रेरितही करतो, असं ते म्हणाले. देशातली शांतता आणि प्रगतीचं वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आपले सैनिक चोख प्रत्युत्तर देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



 येत्या दोन ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. पुढचे दोन वर्ष आपण गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जगभरात अनेक कार्यक्रम करणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.



सध्या देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानात सहभागी होणाऱ्या नागरिकांचे त्यांनी आभार मानले.



गांधीजींसोबत लाल बहादूर शास्त्री यांचीही जयंती साजरी केली जाणार असल्याचं सांगून, पंतप्रधानांनी, शास्त्रीजींचं सौम्य व्यक्तिमत्व  प्रत्येक  देशवासीयाला सदैव अभिमानास्पद असल्याचं म्हटलं.

 येत्या आठ ऑक्टोबरला हवाई दल दिन साजरा करण्यात येणार आहे. देशासाठी सेवा करणाऱ्या सर्व हवाई सैनिकांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे.



 मदत आणि बचाव कार्य असो किंवा आपत्ती व्यवस्थापन, हवाई दलाच्या प्रशंसनीय कामगिरीप्रती, देश कृतज्ञ असल्याचं ते म्हणाले.



 १२ ऑक्टोबरला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला २५वर्षं पूर्ण होणार असून, एन एच आर सीनं मानव अधिकारांच्या रक्षणाबरोबरच मानवी प्रतिष्ठा वृद्धिंगत करण्याचं कार्य केलं असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं.



 पुढच्या महिन्यात साजऱ्या होणाऱ्या नवरात्री, दुर्गा पूजा, विजयादशमी या सणांच्या पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातच्या दौऱ्यावर असून, आणंद इथं अमूलच्या अत्याधुनिक चॉकलेट प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. पंतप्रधानांनी यावेळी अमूल चॉकलेट संयंत्राची पाहणी  केली. आणंद इथं आधुनिक अन्नप्रक्रिया सुविधांचं उद्घाटन, तसंच आणंद कृषी विद्यापिठाच्या अन्नप्रक्रिया करणाऱ्यावीन उद्योगांना आसरा देणाऱ्या केंद्राचं आणि मुझकुवा गावात सौर सकारी संस्थेचंही उद्घाटन पंतप्रधानांनी यावेळी केलं.

****

 देशात मोबाईल हँडसेटच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी मोबाईल फोन उत्पादनात वापरल्या जाणाऱ्या 35 सुट्या भागांना सीमा शुल्कातून सूट देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशननं सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

****

 छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात काल १५ नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली. यामध्ये एका पती-पत्नीचाही समावेश आहे. या नक्षलवाद्यांपैकी चार जणांना पकडून देण्यासाठी बक्षीस जाहीर केलं होतं. आपण हिंसा आणि नक्षलवादी चळवळीतल्या वरिष्ठ नेत्यांकडून होणाऱ्या शोषणाला कंटाळून शरणागती पत्करत आहोत, असं या नक्षलवाद्यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

****



 राफेल विमान खरेदी हा देशातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या फौजिया खान यांनी केला आहे. त्या काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. राफेल प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीच प्रधानमंत्र्यांची पाठराखण केली नाही, परंतु त्यांच्या वक्तव्याचा भाजपानं विपऱ्यास केला, असंही त्या म्हणाल्या. राफेल घोटाळ्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. देशात न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक आणि माध्यमांची स्वायत्तता धोक्यात आल्याचं त्या म्हणाल्या.

****



 लातूर जिल्ह्यात उदगीर इथं होणाऱ्या ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी समीक्षक कवी डॉ. ऋषिकेश कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. काल परभणी इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत एकमतानं त्यांची निवड करण्यात आली.

****

 वार्षिक सरासरीपेक्षा यंदा कमी पाऊस झाल्यानं, लातूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य स्त्रोत असलेल्या मांजरा धरणाची पातळी मृत साठ्यापर्यंत खाली गेली आहे. शहराचे पूरक स्त्रोत असलेले नागझरी आणि साईबंधारेही कोरडे पडले आहेत. त्यामुळे जनतेनं पाणी काटकसरीनं वापरण्याचं आवाहन लातूर महानगरपालिकेनं केलं आहे.

****

 चेन्नईत काल संपलेल्या २५व्या आशियाई कनिष्ठ वैयक्तिक स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या युवराज वाधवानीनं विजेतेपद पटकावलं. त्यानं अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अनस अलिशाह याचा १३ - ११, ११ - पाच, सहा - ११, १२ - १० असा पराभव केला. या स्पर्धेत भारताला एक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकं मिळाली.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 September 2018
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:30؍سِتمبر۲۰۱۸ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
 زرعی پیداوار کمپنیوں کے سلسلے میں سب کوشامل کرکے اورکسانوں کے حق میں منصوبہ جلد ہی تیارکیاجائے گا۔ اسی طرح زرعی پیداوارکمپنیوں کومارکیٹ کادرجہ دینے کی تجویز حکومت کے زیرغورہے۔ یہ بات وزیراعلیٰ دیویندرپھڑنویس نے کہی ہے وہ کل ناسک ضلع کے دنڈوری میںایک پروگرام سے مخاطب تھے۔ ریاست میںبڑے پیمانے پرزرعی پیداوارکمپنیاں قائم کرکے ان کی گنجائش میںاضافہ کیاجائے توزرعی شعبے میںتبدیلی آئے گی۔ایساتیقن انہوں نے ظاہرکیا۔رانے سدھی میںقائم کئے گئے شمسی توانائی پروجیکٹ کے طرزپرریاست میںشمسی توانائی پروجیکٹس قائم کئے جارہے ہیں یہ بات وزیراعلیٰ نے کہی۔
***** ***** *****
 چھترپتی شیواجی مہاراج سنمان یوجنا کے تحت زرعی قرضوں کی ایک رقمی مفاہمت کے لئے 31 دسمبر تک مدت میںاضافہ کردیاگیاہے۔اس سلسلے میں فیصلہ کل جاری کیاجاگیا۔اس اسکیم کے تحت کسانوں کے لئے ان کے حصے کی مکمل رقم بھرنے کی معیاد میں 31 دسمبر تک اضافہ کردیاگیاہے۔ یہ مدت آج ختم ہورہی تھی۔ یہ فیصلہ ریاستی حکومت کے www.maharashtra.gov.in اس ویب سائٹ پرمہیا ہے۔
***** ***** *****
 وزیراعظم نریندرمودی آج آکاشوانی پراپنے من کی بات پروگرام میںبھارت اوربیرون ملک کے لوگوں کے سامنے اپنے خیالات پیش کریں گے۔یہ ان کا48؍واں ماہانہ ریڈیو پروگرام ہوگا۔ اس پروگرام کوآج دن میںگیارہ بجے آکاشوانی اوردوردرشن کے سبھی نیٹ ورک پرنشرکیاجائے گا۔یہ وزیراعظم کے دفتر ، اطلاعات ونشریات کی وزارت ،آکاشوانی اورڈی ڈی نیوزکے یوٹوب چینلوں پربھی دستیاب ہوگا۔اس پروگرام کوآکاشوانی کی ویب سائٹ www.allindiaradio.gov.in پربھی ساتھ ساتھ نشرکیاجائے گا۔ ہندی نشریے کے فوراً بعد آکاشوانی علاقائی زبانوں میں یہ پروگرام نشر کرے گا۔علاقائی زبانوں میں اس پروگرام کوشام 8؍بجے دوبارہ نشر کیاجائے گا۔
***** ***** *****
 انڈین جین تنظیم نے لاتوراورعثمان آبادان دواضلاع کوقحط سے نجات دلانے کے لئے Adopt کرنے کافیصلہ کیاہے۔ ان دونوں اضلاع میں عمل درآمدکئے جانے والے جل سندھارن کاموں کاافتتاح وزیراعلیٰ دیویندرپھڑنویس کے ہاتھوں آج دوپہر کلاری میںعمل میںآئے گا۔افتتاحی تقریب میں بطور صدرراشٹروادی کانگریس پارٹی کے صدررکن پارلیمنٹ شردپوارموجودرہیںگے۔
***** ***** *****
 1993 میںلاتوراورعثمان آباداضلاع میںآئے تباہ کن زلزلے کوآج 25 سال مکمل ہورہے ہیں۔29 ستمبر 1993 کوگنیش وسرجن کے بعد30ستمبر کوعلی الصبح تین بج کر40 منٹ پرزلزلے کی تباہی ہوئی تھی۔لاتورضلع کلاری سے قریب زلزلے کامرکزتھا۔ اس زلزلے میں لاتورضلع میں تین ہزار667  افراد ہلاک ہوئے تھے اور436؍افرادمعذورہوگئے تھے۔پانچ ہزار973 مویشی بھی ہلاک ہوئے تھے۔
***** ***** *****
 اورنگ آباد سے چالیس گائوںاس ریلوے لائن سمیت مراٹھواڑہ کے التواء میںپڑے ہوئے مطالبات کے لئے ریلوے وزیرپیوش گوئیل نے مثبت رول اختیارکیاہے۔ اس کی اطلاع مراٹھواڑہ ترقیاتی بورڈ کے صدرڈاکٹر بھاگوت کراڑنے دی۔ وہ کل اورنگ آباد میں صحافیوں سے مخاطب تھے۔ڈاکٹر کراڑاورریلوے ایکشن کمیٹی کے اراکین نے حال ہی میںدلی میںریلوے وزیرسے ملاقات کی اور اپنے مختلف مطالبات کامیمورنڈم پیش کیا۔ان میں اورنگ آباد۔چالیس گائوں ، اسی طرح روٹے گائوں ،کوپرگائوں ریلوے لائن مکندواڑی ریلوے اسٹیشن پرپیٹ لائن ڈالنا،منماڑسے پربھنی ڈبل لائن ، روٹے گائوں ریلوے اسٹیشن پرایکسپریس گاڑیوں کوStop دیناوغیرہ مطالبات شامل ہیں۔
***** ***** ***** 
 انڈین آرمی نے 2016 میں کئے گئے سرجیکل اسٹرائیک کوکل دوسال مکمل ہوئے۔ اس سلسلے میں کل یوم بہادری کے موقع پرمختلف پروگرامس کااہتمام کیاگیاتھا۔کابینہ میں سابق فوجیوں اسی طرح بہادرشہیدوں کی بیوائوں کاشال اورناریل دے کراستقبال کیاگیا۔اورنگ آبادضلع ملٹری آفس کی جانب سے ضلع کے سابق فوجیوں اوربہادرشہیدفوجیوں کی بیوائوں اورافرادخاندان کامعززین کے ہاتھوں استقبال کیاگیا۔
***** ***** *****
 اورنگ آبادشہرمیں جاری کچرامسئلے کی وجہہ سے شہرکے ترقیاتی کام التواء میںپڑگئے ہیں۔ یہ بات میئر نندکمارگھوڑیلے نے کہی ہے۔اورنگ آباد میں کل شہر میں کچرے کامسئلہ اور انتظام اس عنوان پرمنعقدایک روزہ مذاکرے سے وہ مخاطب تھے۔
***** ***** *****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ० सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****



vशेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vकृषी कर्जफेडीच्या एकरकमी तडजोडीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

vलातूर आणि उस्मानाबाद दुष्काळमुक्तीसाठीच्या जलसंधारण कामांचा आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते किल्लारीत शुभारंभ

vउदगीर इथं होणाऱ्या ४० व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  समीक्षक कवी डॉ. ऋषीकेष कांबळे यांची निवड

आणि

vडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवात विद्यापीठाचा संघ प्रथम तर देवगिरी महाविद्यालयाला फिरता चषक

****



 कृषी उत्पादक कंपन्यांबाबत सर्व समावेशक आणि शेतकरी हिताचं धोरण लवकरच तयार करण्यात येईल तसंच  शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाजारपेठेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी इथं एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यात मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादक कंपन्या उभारून, त्यांची क्षमता वाढवली तर कृषी क्षेत्रात परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राळेगणसिद्धी इथं उभारलेल्या सौरऊर्जा पथदर्शी प्रकल्पाच्या धर्तीवर, राज्यात सौरप्रकल्पांची उभारणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

****



 छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कृषी कर्जाच्या एकरकमी तडजोडीसाठी येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. या योजनेअंतर्गत मुद्दल तसंच व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हिश्शाची संपूर्ण रक्कम भरण्याची मुदत येत्या ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत आज संपणार होती. हा निर्णय राज्य सरकारच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४८वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****



 भारतीय जैन संघटनेनं लातूर आणि उस्मानाबाद हे दोन जिल्हे दुष्काळमुक्त करण्यासाठी दत्तक घेतले आहेत. या दोन्ही जिल्ह्यात राबवण्यात  येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुपारी किल्लारी इथं करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे राहणार आहेत.

*****



 १९९३ मध्ये लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या प्रलयंकारी भूकंपाला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत. २९ सप्टेंबर १९९३ रोजी गणपती विसर्जनानंतर ३० सप्टेंबरच्या पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी हा भूकंप झाला. लातूर जिल्ह्यातल्या किल्लारी जवळ या भूकंपाचं केंद्र होतं. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर.

 या भुकंपात लातूर जिल्ह्यात  ३हजार ६६७ व्यक्ती मरण पावल्या ४३६ व्यक्ती अपंग झाल्या. ५ हजार ९७३ जनावरेही दगावली. भुकंपग्रस्त कंमिटीनं प्रमुख १५ मागण्या ह्या शासनाकडे केल्या आहेत. भुकंपपुर्नवसन मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी शासन स्तरावर मागण्या पुर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. भुकंपग्रस्त भागातील समस्या गावकऱ्यांच्या सहभागाणं संपवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.

अरूण समुद्रे  आकाशवाणी बातम्यासाठी लातूर.



 या भूकंपामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा आणि लोहरा तालुक्यात अपरिमित नुकसान झालं होतं. नागरिकांचं सर्वांगीण पुनर्वसन आणि विकासासाठी ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या विविध प्रकल्पामुळे या भागाचं रूप हळुहळु पालटत आहे. या विषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…. 



 ज्ञानप्रबोधिनीच्या या प्रकल्पात छोटे वैज्ञानिक आणि खटपट गृह यासारख्या उपक्रमातुन तसंच प्रज्ञाविकास प्रकल्पातून विद्यार्थांच्या मन आणि बुध्दीला चालना दिली जाते. किशोरी विकासाठी किशोरवयीन मुलींना  पोषक आहार, आरोग्य , स्वच्छते संबंधी मार्गदर्शन याशिवाय फळबागशेती, महिला बचत गटाचा अन्न फळ प्रक्रिया उद्योग कापडी पिशव्या तयार करण्याचा उद्योग  इथंचालवला जातोय. प्रकल्प परिसरात सौर उर्जेच्या ९० किलोवॅट वीजनिर्मितीतून वीज स्वयंपूर्णताही इथं आली आहे. डॉ. अण्णा  ताम्हणकर आणि लताताई भिंशीकर यांनी सुरू केलेल्या विविध सेवांच्या प्रकल्पाचं वटवृक्षात रूपांतर होतांना दिसतय.

देवीदास पाठक आकाशवाणी वार्ताहार उस्मानाबाद.

****



 औरंगाबाद ते चाळीसगाव या रेल्वे मार्गासह, मराठवाड्याच्या प्रलंबित मागण्यांसाठी रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी दिली आहे. ते काल औरंगाबाद  इथं वार्ताहरांशी बोलत होते. डॉ. कराड आणि रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी नुकतीच दिल्ली इथं रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं. यामध्ये औरंगाबाद - चाळीसगाव, तसंच रोटेगाव - कोपरगाव रेल्वेमार्ग, मुकुंदवाडी रेल्वेस्थानक इथं पीटलाईन टाकणं, मनमाड ते परभणी दुहेरी रेल्वेमार्गरोटेगाव रेल्वेस्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा, या प्रमुख पाच मागण्यांसह विविध मागण्यांचं निवेदन रेल्वेमंत्र्यांना देण्यात आलं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवा महोत्सवाचा समारोप काल प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या उपस्थितीत  औरंगाबाद इथं झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉक्टर अशोक तेजनकर होते. वेगवेगळ्या प्रकारात १६ पारितोषिकं घेऊन विद्यापीठाचा संघ या महोत्सवात प्रथम आला. तर देवगिरी महाविद्यालयाच्या संघानंही तेवढेच म्हणजे १६ पारितोषिकं प्राप्त करून, फिरता चषक पटकावला. तर कन्नडच्या शिवाजी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचा संघ उत्कृष्ट ग्रामीण संघ ठरला.

****



 अन्य मागासवर्गीय समाजास  राजकीय  पक्षांनी गृहीत धरू नये, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. बीड इथं समता परिषदेच्या मेळाव्यात काल ते बोलत होते. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे अध्यक्षस्थानी होते, तर आमदार जयदत क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून  उपस्थित होते. या मेळाव्यात मराठवाड्यातले समता सैनिक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.



 तत्पूर्वी, जालना जिल्ह्यातल्या दोदडगाव इथं मंडल स्तंभाबाबत माजी आमदार डॉक्टर नारायण मुंढे यांनी लिहीलेल्या ‘गवसणी आकाशाला या कादंबरीचं विमोचन भुजबळ यांच्या हस्ते झालं.

****



 साहित्यिकांनी समाजाला विकृतीकडून संस्कृतीकडे नेण्याचं काम केलं पाहिजे, असं आवाहन ज्येष्ठ कवयित्री सिसिलिया कार्व्हालो यांनी केलं आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं  काल लातूर इथं आयोजित, सतराव्या राज्यस्तरीय प्रतिभा संगम साहित्य संमेलनाचं उद्घाटन कार्व्हालो यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर होते. आज या संमेलनाचा समारोप होणार असून वास्तवातील शेती आणि साहित्यातील शेती याविषयावर परिसंवाद तसंच प्रसिध्द गीतकार संदीप खरे यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे.

****



 भारतीय लष्करानं २०१६ मध्ये केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ अर्थात ‘लक्ष्यभेदी कारवाई’ला काल दोन वर्ष पूर्ण झाली. यानिमित्तानं सर्वत्र शौर्य दिन विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. मंत्रालयात माजी सैनिक तसंच वीरपत्नींचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.



 औरंगाबादच्या जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीनं जिल्ह्यातल्या माजी सैनिक, वीरपत्नी आणि कुटुंबियांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्यामुळेच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा लाभ देशातले नागरिक घेत असल्याचं निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी  यावेळी सांगितलं. 

****



 ज्येष्ठ संवादिनीवादक पंडित तुळशीदास बोरकर यांचं काल मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. १९५० ते १९८० च्या दशकात बोरकरांनी संगीत नाटकांमधून ऑर्गनवर साथसंगत केली होती. संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी त्यांना पद्मश्री, आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.

****



 औरंगाबाद शहरात उद्भवलेल्या कचरा प्रश्नामुळे शहर विकासाचे प्रश्न मागे पडले असल्याचं मत महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं काल ‘शहरातील घनकचरा समस्या आणि व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरविद्याशाखीय चर्चासत्रात ते बोलत होते. कचराप्रश्न अंतिम टप्प्यात असून तो लवकरात लवकर सुटण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचंही महापौर यावेळी म्हणाले. निवृत्त सनदी अधिकारी कृष्णा भोगे या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते.

*****

***

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.09.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 September 2018

Time - 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ सप्टेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशात स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेबाबत शाश्वत विकासाचं ध्येय साध्य करण्याचं आवाहन केलं आहे. ते आज नवी दिल्लीत चार दिवसीय ‘महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदे’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. चांगले शौचालय, आरोग्यसोयी आणि स्वच्छतेअभावी जगण्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतात, असंही ते यावेळी म्हणाले. मुलांना चांगले आरोग्य पुरवण्यासाठी स्वच्छ भारत मोहीम अतिशय महत्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले. देशामध्ये २०३० पर्यंत आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सोयी निर्माण करणं हे देशासमोर मोठं आव्हान असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं.

****

स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या तत्वांची अंमलबजावणी होण्यासाठी शाळा, महाविद्यालयांमधून त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार होणं गरजेचं असल्याचं राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. शिकागो इथल्या धार्मिक संसदेत स्वामी विवेकानंद यांच्या ऐतिहासिक भाषणाच्या १२५व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई इथं आज रामकृष्ण मिशनद्वारे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. देशाचे भावनात्मक ऐक्य आणि अखंडता राखण्यासाठी विवेकानंदांच्या कल्पनांना समजावून घ्यावं लागेल असंही ते यावेळी म्हणाले.

****

मराठवाड्यातल्या विविध विकास कामांचा आराखडा राज्यपालांना सादर करणार असल्याचं, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड यांनी सांगितलं आहे. औरंगाबाद इथं आज मंडळाच्या सर्वसाधारण बैठकीत ते बोलत होते. सरकारच्या विविध योजना मराठवाड्यात प्रभावीपणे राबवून मराठवाड्याला विकासाच्या दिशेनं नेण्यासाठी मराठवाडा विकास मंडळ प्रयत्न करत असल्याचं कराड यांनी सांगितलं.

****

औरंगाबाद शहरात उद्भवलेल्या कचरा प्रश्नामुळे शहर विकासाचे प्रश्न मागे पडले असल्याचं मत महापौर नंदकुमार घोडेले यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबाद इथं आज ‘शहरातील घनकचरा समस्या आणि व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरविद्याशाखीय चर्चासत्रात ते बोलत होते. कचराप्रश्न अंतिम टप्प्यात असून तो लवकरात लवकर सुटण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा असल्याचंही महापौर यावेळी म्हणाले. निवृत्त सनदी अधिकारी कृष्णा भोगे या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते.

****

भारतीय लष्करानं २०१६ मध्ये आजच्या दिवशी केलेल्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ अर्थात ‘लक्ष्यभेदी कारवाई’ला आज दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सर्वत्र शौर्य दिन साजरा करण्यात आला. औरंगाबादच्या जिल्हा सैनिक कार्यालयाच्या वतीनं जिल्ह्यातल्या माजी सैनिक, शहिद सैनिकांच्या विधवा आणि कुटुंबियांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संविधान संरक्षणाचं कार्य सैन्यदल करत असल्याचं प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी यावेळी केलं. भारतीय सैन्यामुळेच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा लाभ देशातले नागरिक घेत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

साहित्यिकांनी समाजाला विकृतीकडून संस्कृतीकडे नेण्याचं काम केलं पाहिजे, असं जेष्ठ कवयित्री सिसिलिया कार्व्हालो यांनी म्हटलं आहे. लातूर इथं आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आयोजित केलेल्या सतराव्या राज्यस्तरीय ‘प्रतिभा संगम साहित्य संमेलना’चं उद्घाटन कार्व्हालो यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानावरुन बोलताना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी, तरुणांनी सामाजिक माध्यमांसाठी किती वेळ द्यायचा याचा गांभीर्यानं विचार करण्याची वेळ आली असल्याचं मत व्यक्त केलं. दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या ठिकाणाला ‘ग.दी.माडगुळकर नगरी’ नाव देण्यात आलं आहे. संमेलनाच्या पहिल्या सत्रात कवयित्री कविता महाजन यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून विद्यार्थी साहित्यीक या संमेलनाला उपस्थित असल्याची माहिती संमेलनाचे निमंत्रक प्रसाद जाधव यांनी दिली.

****

हिंगोली-नांदेड रस्त्यावर कळमनुरी तालुक्यातल्या पारडी जवळ अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. जखमी दोघांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर हिंगोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४८वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

ज्येष्ठ हार्मोनियमवादक पंडित तुळशीदास बोरकर यांचं आज मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं, ते ८३ वर्षांचे होते. १९५० ते १९८० च्या दशकात बोरकरांनी संगीत नाटकात ऑर्गनवर साथ केली होती. बोरकर हे पद्मश्री पुरस्काराबरोबरच विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29  September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ सप्टेंबर २०१दुपारी १.०० वा.

****



 ज्ञाना शिवाय समाज, देश आणि जीवनाची कल्पना करता येणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज पुनरुत्थानासाठी शैक्षणिक नेतृत्व या विषयावरच्या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भविष्यातल्या भारतासाठी अशा विषयावर चर्चा आवश्यक असल्याचं ते म्हणाले. प्रत्येक व्यक्तीचा संतुलित विकास करणं हा शिक्षणाचा उद्देश असून, ज्ञानासोबतच नवकल्पनांचीही गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार शिक्षण क्षेत्रात ज्ञानासोबतच गुंतवणुकीवरही लक्ष केंद्रीत करत असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शिक्षणाचा ठराविक उद्देश असल्याशिवाय त्याचा उपयोग होत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलं. भारतीय शैक्षणिक प्रणालीला भेडसावणाऱ्या आव्हानांवर चर्चा करणं, आणि शैक्षणिक फलनिष्पत्ती तसंच या क्षेत्रातलं नियमन या दोन्हींमध्ये मोठे बदल घडवीण, आराखडा तयार करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशानं सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

****



 देशभरात जमावाकडून होणार्या हिंसेविरोधात गंभीर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा, अशी सूचना केंद्र सरकारनं राज्यांना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार अशा जमावाकडून होणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांची पडताळणी करावी, रेडीयो, दूरदर्शन तसंच इतर माध्यमातून जमावाकडून होणाऱ्या हिंसेवरच्या गंभीर कारवाईबाबत जागृती करावी, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयानं दिल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात पोलिस निरीक्षक स्तरावरचा अधिकारी नियुक्त करुन विशेष पथक नेमून समाज माध्यमांवरचे मजकुरावर लक्ष ठेवावं, अशा सूचनाही गृहमंत्रालयानं राज्यांना दिल्या आहेत.

****

 परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आज संध्याकाळी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत ७३ व्या सत्राला संबोधित करणार आहे. संयुक्त राष्ट्र संघामध्ये मंगळवारपासून विविध विषयावर वादविवाद कार्यक्रमांना सुरूवात झाली असून येत्या सोमवारपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत. सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर अयोजित सार्क बैठकीत बोलताना स्वराज यांनी, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा समूळ नाश करण्याची गरज व्यक्त केली. पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्या उपस्थितीत स्वराज यांनी दक्षिण आशियाच्या आर्थिक विकास आणि शांततेसाठी सार्क देशांच्या सहाकाऱ्याची आवश्यकता असल्याची गरज व्यक्त केली.

****



 आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव एस सी गर्ग यांनी देशाच्या एकूण कर्ज घेण्याच्या अंदाजामध्ये ७० हजार कोटी रुपयांच्या कपातीची घोषणा केली आहे. तसंच सरकारनं आर्थिक तूट ही तीन पूर्णांक तीन दशांश टक्क्यांपर्यंत टिकवण्याचं लक्ष्य ठेवलं असल्याचं गर्ग यांनी सांगितलं. आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रामध्ये गेल्या सहामाहीच्या दोन लाख ८८ हजार कोटींच्या तुलनेत सरकार या सहामाहीमध्ये फक्त दोन लाख ५० हजार कोटी रुपये एवढेच कर्ज घेणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

****



 दहा ट्रीलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचण्याची भारताची क्षमता असून, या मार्गात असलेले अनावश्यक आणि उनुत्पादित नियम रद्द करण्याची गरज असल्याचं उद्योग आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभु यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते काल बोलत होते. अनावश्यक नियम शोधून ते रद्द करण्याच्या दृष्टीनं उद्योग धोरण विभागाच्या सविचांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्योग जगतानंही असे नियम लवकरात लवकर शोधून निदर्शनाला आणून द्यावे, असं आवाहन प्रभू यांनी यावेळी केलं. उद्योगांचं सुलभीकरण करण्यात भारतानं मोठी प्रगती केली असून, याचा परिणाम जिल्हास्तरावरही दिसत असल्याचं त्यांनी नमूद केलं.

****



 सरकार, खाजगी संगीत संस्था, सभा आणि गुरुजन या सगळ्यांनीच संगीत क्षेत्राच्या वाढीसाठी प्रयत्न करायला हवेत, असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. सुप्रसिद्ध गायिका एम एस सुब्बलक्ष्मी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी संगीत क्षेत्रातल्या ५० उदयोन्मुख कलाकरांना फेलोशिप देण्यात आली. राज्यपाल सी विद्यासागर राव, मंत्री प्रकाश मेहता यावेळी उपस्थित होते.

****



 जालन्याचे पोलिस अधीक्षक एस़ चैतन्य यांनी काल संदीप राठोड आणि आतिष चौधरी या दोन पोलिस कर्मचार्यांना निलंबित केलं आहे. घनसावंगी पोलिस ठाण्याअंतर्गत कार्यरत या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांनी हॉटेल मालकानं जेवणाच्या बिलाचे पैसे मागितले म्हणून हॉटेलातल्या साहित्याची तोडफोड करून मारहाण केली होती. दरम्यान, वाळू माफियांशी संबंध ठेवणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांचंही पोलीस अधीक्षकांनी दोन दिवसांपूर्वीच निलंबन केलं होत.

*****

***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.09.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२९  ऑगस्ट  २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 पुनरुत्थानासाठी शैक्षणिक नेतृत्व या विषयावरच्या परिषदेचं उद्घाटन आज नवी दिल्ली इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. भारतीय शैक्षणिक प्रणालीला भेडसावणाऱ्या आव्हानांवर चर्चा करणं, आणि शैक्षणिक फलनिष्पत्ती तसंच या क्षेत्रातलं नियमन या दोन्हींमध्ये मोठे बदल घडवणारा आराखडा तयार करणं हा या परिषदेचा उद्देश आहे. उच्च शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक कृती आराखडा तयार करण्याच्या उद्देशानं सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. ३५०हून अधिक विद्यापीठांचे कुलगुरु या परिषदेत सहभागी होणार आहेत. शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी अध्यापनात सुधारणा करणं, नवनिर्मितीमध्ये सुधारणा, रोजगार निर्मितीसाठी उद्योजकता आणि रचनात्मक अध्ययानाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर या विषयांसह विविध विषयांवर या एकदिवसीय परिषदेत चर्चा होणार आहे.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ४८वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. 

****



 शौर्य दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नांदेड इथं आजी-माजी सैनिकांचा जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. भारतीय सैन्याने २०१६ मध्ये आजच्याच दिवशी लक्षभेदी कारवाई-सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केली होता, त्यामुळे आजचा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो.

****



 कोट्यवधींच्या वाहन घोटाळ्याप्रकरणी बीड प्रादेशिक परिवहन कार्यालयातल्या दोन अधिकाऱ्यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र निकम आणि निलेश भगुरे अशी या दोघांची नावं असून, सय्यद शकीर नावाच्या एजंटलाही अटक करण्यात आली आहे. बनावट निर्मिती आणि विक्री प्रमाणपत्र बनवून सदोष कार विक्री केल्याचा घोटाळा ऑगस्टमध्ये उघडकीस आला होता.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 29 September 2018
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۲۹ ؍سِتمبر۲۰۱۸؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
 کیرالہ کے شبری مالا ایَپّا مندر میں کسی بھی عمر کی خواتین کو داخلہ دینے کا فیصلہ عدالت عظمیٰ نے کیا ہے۔ چیف جسٹِس دیپک مِشرا کی زیر قیادت 5؍ رکنی بینچ نے کل یہ فیصلہ دیا۔ فیصلے میں بینچ نے کہا کہ شبری ما لا مندر میں خواتین کو داخلہ نہ دینا خواتین کے ساتھ اِمتیازی سلوک اور جنسی عدم مسا وات کے مُترا دِف ہے۔ نیز یہ خوا تین کے حقوق کی خلاف ور زی ہے۔ عدالت نے کہا کہ مندروں میںخواتین کے داخلے پر پا بندی مذہب کی کوئی لازمی روا یت نہیں ہے۔ عدالت عظمیٰ نے اِس تاریخی فیصلے کے با عث اِس مندر میں800؍ برس سے چلی آ رہی روایت ختم ہو جائے گی۔ اور ملک کے تمام مندروں میں خواتین کے داخلے کی راہ ہموارا ہو گی۔
***** ***** *****
 نکسلائٹس سے مُبینہ تعلقات کے شُبے میں گرفتار کیئے گئے اِنسا نی حقوق کے 5؍ کار کنوں کے معاملے میں مدا خلت اور بھیما کو رے گائوں پُر تشدد واقعات کی تحقیقات خصو صی ٹیم سے کر وانے کے مطالبے کو عدالت عظمیٰ نے مُسترد کر دیا۔منصف اعلیٰ دیپک مِشرا کی زیر صدا رت سہ رکنی بینچ نے دو  ایک کے فرق سے یہ دو نوں مطالبات مُسترد کر دیئے۔ اِن5؍ انسانی حقوق کار کنوں کی حراست میں 4؍ ہفتوں تک توسیع کرنے کا حکم بھی عدالت نے دیا۔ سپریم کورٹ کے اِس فیصلے پر ردّ عمل دیتے ہوئے مرکزی مملکتی وزیر داخلہ ہنس راج آہیر نے کہا کہ اِس معاملے میں پو لس درست سمت میں تحقیقات کر رہی ہے۔
 وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے بھی عدالت کے اِس فیصلے کا خیر مقدم کیا ہے۔ اُنھوں نے کہا کہ اِس ضمن میں پولس کے پیش کر دہ شواہد نکسلائٹس سے تعلق کی نشاندہی کر تے ہیں اور  مزید شوا ہد پیش کر کے زیر حراست پانچوں ملز مان کو تحویل میں لے لیا جائے گا۔ اُنھوں نے اعتماد ظا ہر کیا کہ ملک کے خلاف سازش کر نے والے اور معا شرے میں خلفِشار پیدا کر نے والے عنا صر یقیناًنا کام ہو ںگے۔ وزیر اعلیٰ نے پو نا پو لس کے کر دار کی ستائش بھی کی۔
***** ***** *****
 ریاستی حکو مت کی جانب سے مو سیقی کے میدان میں ہر برس دیے جانے والے لتا منگیشکر ایوارڈ کے لیے اِس بار بزرگ مو سیقار وجئے پاٹل عرف رام لکشمن کے نام کا اعلان کیا گیا ہے۔ ثقا فتی امور کے وزیر وِنود تائو رے نے کل یہ اعلان کیا۔
***** ***** *****
 بہبود اطفال و خواتین کی مملکتی وزیر وِدیا ٹھاکُر نے کہا ہے کہ مقوی اغذیہ فراہمی مہم کی کا میا بی کے لیے اِس مہم کو تحریک کی شکل دینا اور اِس میں عوامی شمو لیت ضروری ہے۔ کل ممبئی میں اِس مہم کے سلسلے میں منعقدہ ایک پروگرام سے خطاب کر تے ہوئے اُنھوں نے کہا کہ نئے بھا رت کے قیام کے لیے بھُکمری کا مکمل خاتمہ ضروری ہے۔
***** ***** *****
 بین الاقوامی کمپنیوں کے ذریعے آن لائن خرید و فروحت کے خلاف تاجِروں کی کُل ہند تنظیم کے معلنہ ملک گیر بند کا کل ملا جلا اثر رہا۔ اورنگ آباد شہر اور ضلع کے بیشتر اہم تجا رتی مراکز اور دکا نیں بند تھیں۔ لاتور میں بھی تاجروں نے دکا نیں بند رکھ کر خا موش جلوس نکا لا۔
 ادویات کی آن لائن فروخت کے خلاف ادو یات فرو شوں نے بھی کل علیحدہ بند کا اعلان کیا تھا۔ عثمان آ باد میں یہ بند پو ری طرح کا میاب رہا ۔ میڈیکل اسٹور مالکان نے وہاں ضلع کلکٹر دفتر تک ایک جلوس نکا لا اور مطالباتی محضر ضلع کلکٹر کو پیش کیا۔ ناندیر میں ادویات فروشوں نے ضلع کلکٹر دفتر کے رو برو دھر نا دیا۔ ہمارے نا مہ نگاروں نے بتا یا ہے کہ جالنہ ،پر بھنی، ہنگو لی اور دیگر اضلاع میں یہ بند جزوی طور پر کا میاب رہا۔
***** ***** *****
 بھارت کی ٹیم نے 7؍ ویں بار ایشیاء کپ کر کٹ ٹو رنا منٹ جیت لیا ہے۔ کل دو بئی میں کھیلے گئے ٹور نا منٹ کے فائنل میں انتہائی سنسنی خیز مقابلے کے بعد بھارت نے بنگلہ دیش کو میچ کی آخری گیند پر3؍ وکٹوں سے شکست دیدی۔ بنگلہ دیش نے بھارت کو جیت کے لیے 223؍ رنوں کا ہدف دیا تھا۔ جو 50؍ویں اوور کی آخری گیند پر کیدار جا دھو نے بہ مُشکل حاصل کیا۔ بنگلہ دیش کی جانب سے سنچری بنا نے والے لِٹن داس کو مین آف دی میچ اور بھارت کے شِکھر دھون کو مین آف دی سیریز قرار دیا گیا۔
***** ***** *****
 پر بھنی میں میڈیکل کالج اسپتال شروع کر نے کے لیے تشکیل دی گئی اعلیٰ سطحی کمیٹی نے کل ضلع کے سر کا ری اسپتال کا دورہ کیا۔ پر بھنی میں میڈیکل کالج و اسپتال شروع کرنے کے دیرینہ مطالبے پر ریاستی حکو مت نے یہ کمیٹی تشکیل دی تھی۔2؍ روز معائنے کے بعد یہ کمیٹی حکو مت کو اپنی رپورٹ پیش کرے گی۔
***** ***** *****
 کروڑوں روپیوں کی گاڑیوں کے بد عنوا نی کے معاملے میں بیڑ آر ٹی او کے 2؍ افسران کو تھا نہ پولس نے گرفتار کر لیا ہے۔
گرفتار شد گان کے نام راجندر نِکم اور نِلیش بھگورے ہیں۔ اِس کے علا وہ ایک آر ٹی او ایجنٹ سید شا کر کو بھی گرفتار کیا گیا ۔
***** ***** *****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.09.2018 06.50AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 September 2018

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ सप्टेंबर २०१ सकाळी .५० मि.

****



vकेरळमधल्या शबरीमाला अयप्पा मंदिरात कोणत्याही वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

vनक्षलवाद्यांशी संबंधांच्या संशयावरून पाच मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या अटकेसंदर्भात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

vराज्यसरकारचा लता मंगेशकर पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना जाहीर

vअखिल भारतीय व्यापारी संघाच्यावतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद

आणि

vचुरशीच्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करत, भारतानं आशिया चषक जिंकला

****



 केरळमधल्या शबरीमाला अयप्पा मंदिरात कोणत्याही वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय पीठानं काल हा निर्णय देताना, शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश न देणं हा लिंग भेद असून, हिंदू महिलांच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचं, तसंच महिलांना प्रवेशबंदी ही अनिवार्य प्रथा नसल्याचं म्हटलं आहे.  न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयामुळे या मंदिराची ८०० वर्षाची परंपरा आता मोडीत निघणार असून, देशभरातल्या सर्वच मंदिरांमध्ये महिलांना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

****



 नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पाच मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या अटकेसंदर्भात हस्तक्षेप आणि भीमा कोरेगाव हिंसाचाराचा तपास विशेष पथकामार्फत करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठानं दोन विरूद्ध एक या मतानं या दोन्ही मागण्या फेटाळल्या. या पाच जणांच्या नजरकैदेत चार आठवड्यांची वाढ करण्याचे आदेशही न्यायालयाननं दिले आहेत. 

     

 सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी या प्रकरणात पोलिस योग्य दिशेनं तपास करत असल्याचं म्हटलं आहे.



 दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे. पोलिसांनी सादर केलले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित असून, यासंदर्भात आणखी पुरावे सादर करुन अटक केलेल्या पाच जणांचा ताबा घेऊ, असंही मुख्यमंत्री म्हणाले. देशविरोधी षडयंत्र रचणारे, तसंच समाजात तेढ निर्माण करणारे नक्कीच गजाआड जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुणे पोलिसांची भूमिका योग्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

****



 राज्य सरकारतर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावानं दरवर्षी दिला जाणारा पुरस्कार यंदा ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ राम लक्ष्मण यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी काल या पुरस्काराची घोषणा केली. पाच लाख रुपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

****



 पोषण अभियानाचा योग्य परिणाम मिळण्यासाठी या अभियानास चळवळीचं रुप मिळणं आवश्यक असून, यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचं, महिला आणि बाल विकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत सप्टेंबर हा महिना पोषण महिना म्हणून साजरा करण्यात आला, मुंबईत काल या उपक्रमाचा समारोप झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. नवभारताच्या निर्माणासाठी कुपोषणाचं समूळ उच्चाटन आवश्यक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. 

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मन की बात या कार्यकमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ४८ वा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****



 ऑनलाईन कंपन्यांद्वारे चालणाऱ्या खरेदी विक्री विरोधात अखिल भारतीय व्यापारी संघाच्यावतीनं पुकारण्यात आलेल्या बंदला काल संमिश्र प्रतिसाद दिसून आला. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठा बहुतांशी बंद होत्या,

लातूर इथंही व्यापाऱ्यांनी बंद पाळून शहरातून मूक मोर्चा काढला.



 ऑनलाईन औषध विक्रीविरोधात औषध विक्रेत्यांनीही काल स्वतंत्र बंद पुकारला होता. उस्मानाबाद इथं या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून, जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिलं.



 जालना जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड इथं औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. परभणी जिल्ह्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. हिंगोली जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे.



रत्नागिरी, सिंधुदुर्ग अमरावती, वाशिम, भंडारा, सोलापूर जिल्ह्यातही व्यापाऱ्यांनी बंद पाळल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 भारतानं आशिया चषक सातव्यांदा जिंकला आहे. दुबई इथं झालेल्या स्पर्धेच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशवर तीन गडी राखून विजय मिळवला. बांग्लादेशानं भारतासमोर  विजयासाठी २२३ धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताकडून कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक ५५ चेंडूत ४८ धावा केल्या, केदार जाधवनं अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार मारून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बांगलादेशचा १२१ धावा करणारा लिंटन दास सामनावीर तर शिखर धवन मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

****



 केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ अंतर्गत पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या आर्थिक दुर्बल कुटुंबांनी मिळालेल्या अनुदानातून शौचालय बांधलं आहे. जिल्ह्यातील डुंगी पाडा इथं राहणाऱ्या पिंकी खरपडे यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.



मी पिंकी खरपडे, भिंगीपाडा-पालघर येथे राहते.  आम्हाला मोदी सरकारतर्फे स्वच्छता गृह बाधून दिले. स्वच्छ भारत अभियाना तर्फे म्हणून त्यांचे धन्यवाद. आणि येथे स्वच्छता गृह बाधून दिल्यामुळे आम्हाला खूप चांगलं झालं. पहिलं बाहेर जावं लागायचं पाऊसात, जंगलात असं, आता हि योजना बांधल्यामुळे घरात स्वच्छता गृह आले. खूप म्हणजे चांगली सुविधा घेतली.

****



 प्रसिद्ध साहित्यिक कविता महाजन यांच्या पर्थिव देहावर काल सकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. महाजन यांचं परवा रात्री अल्पशा आजारानं निधन झालं, त्या ५१ वर्षांच्या होत्या. कविता महाजन यांच्या निधनानं मराठी साहित्यात स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण ओळख प्रस्थापित करणारी एक महत्त्वाची लेखिका आणि समाज जीवनावरच्या प्रभावी भाष्यकार आपण गमावल्या, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

****



 परभणी इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी स्थापन उका उच्चस्तरीय समितीनं काल जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. परभणी इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती, त्या पार्श्वभूमीवर शासनानं या समितीची स्थापना केली आहे. दोन दिवसांच्या पाहणीनंतर ही समिती आपला अहवाल सादर करेल.

****



 लातूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या ‘प्रतिभा संगम’ या सतराव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं काल ग्रंथ दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये विविध वेशभूषा केलेले विद्यार्थी, घोडेस्वार लक्ष वेधून घेत होते. शहरातल्या विविध शाळा महाविद्यालयातले विद्यार्थी, प्राध्यापक, साहित्यिक यात सहभागी झाले होते. महापौर सुरेश पवार, मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य रामचंद्र तिरुके, उपमहापौर देवीदास काळे यावेळी उपस्थित होते. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन आज होणार आहे. 

****



 जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा- भोगाव रस्त्यावर शालेय विद्यार्थ्यांना घेवून जाणाऱ्या बसला काल सकाळी अपघात झाला. या अपघातात दहा विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. खराब रस्त्यामुळे हा अपघात घडल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं.

****



 उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कृषी पंपांची थकीत वसुली थांबवावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँगेस पक्षानं जिल्हाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला काल टाळं ठोकलं. जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडून थकीत वीज बिलापोटी सक्तीनं करण्यात आलेली  तीन हजार रूपयांची वसुली थांबवावी आणि वीज वितरण कंपनीनं या संदर्भात  काढलेलं परिपत्रक मागं घ्यावं या मागण्या यावेळी करण्यात आल्या असं आमच्या वार्ताहरानं  कळवलं आहे.

****



 व्यभिचारासंबधी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे समाजातली नैतिकता ढळेल आणि व्यभिचार वाढेल असं मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष फौजीया खान यांनी काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलतांना व्यक्त केलं. व्यभिचार हा गुन्हा नाही तर तिन तलाक हा गुन्हा कसा? या एम आय एमच्या खासदार ओवेसी यांच्या  भूमिकेचं त्यांनी यावेळी समर्थन केलं.

****



 कोट्यवधींच्या वाहन घोटाळ्याप्रकरणी बीड प्रादेशिक परिवहन कार्यालयातल्या दोन अधिकाऱ्यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र निकम आणि निलेश भगुरे अशी या दोघांची नावं असून, सय्यद शकीर नावाच्या एजंटलाही अटक करण्यात आली आहे.

****



 भारतीय जनता पक्षाचे उस्मानाबादचे प्रदेश सरचिटणीस तसंच आमदार सुजीत सिंह ठाकुर यांची सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य पदी नियुक्ती झाली आहे. ७ जुलै २०२२ पर्यंत ही नियुक्ती करण्यात आहे.

*****

***