AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.12.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31  December 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ डिसेंबर २०१  दुपारी .०० वा.

****



 राज्यसभेचं कामकाज आज सुरू झाल्यावर काही वेळातच सदस्यांच्या गोंधळामुळे स्थगित करण्यात आलं. अण्णाद्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी नदीवरच्या प्रस्तावित धरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळाला सुरुवात केली. विरोधी पक्षांची सदनाचं कामकाज सुरू ठेवण्याची इच्छा असल्याचं विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद नमुद करत असतानाही या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे उपसभापती हरिवंश सिंह यांना सभागृहाचं काम दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं. मुस्लिम महिला वैवाहिक हक्क संरक्षण विधेयक, अर्थात तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेसमोर मांडण्यात येणार आहे. दरम्यान, लोकसभेचं कामकाज सुरू होताच, काँग्रेसनं राफेल व्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठी,तर अण्णाद्रमुक पक्षानं कावेरी नदी प्रश्नासंदर्भात घोषणाबाजी सुरू केली. विरोधी पक्षांच्या गोंधळातही प्रश्नकाळाचं कामकाज काही काळ सुरू राहिलं, मात्र हा गदारोळ सुरूच राहिल्यानं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना कामकाज बारा वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं होतं.बारा वाजता कामकाज सुरू झालं असलं तरी विरोधीपक्ष सदस्यांची घोषणाबाजी सुरूच आहे.

****


 खनिज तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिका चीन व्यापार युद्ध आणि अमेरिकेचा अर्थिक संकुचितपणा, अशा बाह्य कमजोर घटकांच्या पार्श्वभूमीवर भारत पुढच्या आर्थिक वर्षात अधिक चांगला आर्थिक वृद्धी दर नोंदवेल, असं सीआयआय, अर्थात भारतीय उद्योग महासंघानं म्हटलं आहे. सेवा आणि पायाभूत सुविधा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे हे शक्य होणार असल्याचं महासंघानं म्हटलं आहे.

****

 आगामी लोकसभा निवडणुकांसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. येत्या अकरा आणि बारा तारखेला नवी दिल्लीमध्ये ही बैठक होणार असून, या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री आणि पक्षातले पदाधिकारी, यांच्यासह बारा हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याचं भाजपचे राष्ट्रीय महासचिव अनिल जैन यांनी म्हटलं आहे.

****



 शासनाच्या विविध योजना  गरजू लोकांपर्यंत पोचल्यानंतर त्याचा होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यात आवश्यक वाटणाऱ्या सुधारणा, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. येत्या बुधवारी म्हणजे दोन जानेवारीला सकाळी अकरा वाजता होणाऱ्या ”लोकसंवाद” या कार्यक्रमातून मुख्यमंत्री लाभार्थ्यांशी दूरदृष्य संवाद प्रणालीमार्फत बोलणार आहेत. समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम थेट पाहता येईल.

****


 राज्यातल्या बहुचर्चित तेलगी बनावट स्टँप घोटाळा खटल्यातल्या सर्व आरोपींची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी. आर.देशमुख यांनी आज हा निकाल दिला.

****

 राज्य परिवहन महामंडळ –एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनाही आता सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मिळणार आहे. परिवहन मंत्री आणि एस.टी.चे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल ही घोषणा केली. महिला कर्मचाऱ्यांसह पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी, तसंच ज्याची पत्नी असाध्य आजारानं पीडित आहे, अशा पुरुष कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या रजेसाठी लागू असलेल्या अटी आणि नियम एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहेत.

****


 पत्रकारितेच्या क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांसाठीचा, लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार, यावर्षी सिद्धार्थ वरदराजन यांना जाहीर झाला आहे. केसरी मराठा संस्थेचे विश्वस्त डॉक्टर दीपक टिळक यांनी काल याबाबतची घोषणा केली. येत्या चार तारखेला या पुरस्काराचं पुण्यात वितरण होणार आहे.

****


 पुण्यात सुरू असलेल्या प्रिमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेत काल किदांबी श्रीकांतच्या नेतृत्वाखालच्या बंगलुरू रॅप्टर्स संघानं पुणे सेव्हन एसेस संघाला चार –तीन अशा गुणांनी पराभूत केलं. आज संध्याकाळी  अवध वॉरियर्स संघाचा सामना मुंबई रॉकेट्स संघाशी होणार आहे.

*****

*** 

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.12.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

३१ डिसेंबर   २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 काश्मीरच्या नौगाम जिल्ह्यात नियंत्रणरेषेवरील एका भारतीय चौकीवर हल्ला करण्याचा पाकिस्तान सीमा कृती दलाचा प्रयत्न मोडून काढताना भारतीय सैन्यानं दोन संशयित पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं आहे. या ठिकाणी शस्त्रं आणि स्फोटकांचा फार मोठा साठाही सैन्यानं जप्त केला आहे. पाक सैन्यानं सुरू केलेल्या गोळीबाराच्या कवचाखाली काही घुसखोर भारतात शिरत असताना सैन्यानं ही कारवाई केली. याठिकाणी अजून काही घुसखोर असण्याची शक्यता लक्षात घेत सैन्यानं शोध मोहीम हाती घेतली आहे.

****

 एका वेळी तीन तलाक देण्याच्या पद्धतीला गुन्हा ठरवणारं तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत सादर होणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपआपल्या खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचा व्हिप काढला आहे. हे विधेयक आहे त्या स्वरूपात मंजूर होऊ देणार नसल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं आहे. गेल्या गुरुवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं आहे.

****

 केंद्रीय माहिती आयोगाच्या मुख्य आयुक्तपदी केंद्र सरकारनं सुधीर भार्गव यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय सरकारनं अन्य चार माहिती आयुक्तांची नियुक्तीही केली असून, यात वनजा सरना या एकमेव महिला आयुक्तांचा समावेश आहे.

****

 कोरेगाव भीमाच्या लढ्याच्या दोनशे एकाव्या वर्धापनदिनानिमित्त उद्या तिथे आयोजित कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी भीम आर्मीचे प्रमुख  चंद्रशेखर आझाद काल पुण्यात पोहचले आहेत. सरकारनं परवानगी नाकारली तरी आपण भीमा कोरेगावला जाणार असल्याचं आझाद यांनी पत्रकारांना सांगितलं.

****

 अंदमान निकोबारमधल्या तीन बेटांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामकरण केलं असून रॉस नावानं ओळखलं जाणारं बेट आता  नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीप नावानं,नील बेट शहीद द्वीप नावानं आणि हॅवलॉक बेट आता स्वराज द्वीप या नावानं ओळखलं जाईल. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर इथे तिरंगा फडकवण्याच्या घटनेला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी काल याबाबतची घोषणा केली.

****

 तिसरी राष्ट्रीय महिला मुष्टीयुद्ध स्पर्धा आजपासून कर्नाटकच्या विजयनगरमध्ये सुरू होत आहे. सहा जानेवारीपर्यंत चालणार असलेल्या या स्पर्धेत देशाच्या नामांकित खेळाडू भाग घेणार आहेत.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 31 December 2018
Time:  8:40 to 8:45 AM
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۱ ؍دِسمبر۲۰۱۸؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
 وزیر اعظم نریندر مودی نے کہا ہے کہ ملک نے غریبی ختم کرنے کے میدان عمل میں ریکارڈ تر قی کی ہے اور متعدد عالمی اِداروں نے اِس تر قی کا اعتراف کیا ہے۔ کل آکاشوانی پر من کی بات پروگرام کے51؍ ویں حصے میں قوم سے خطاب کرتے ہوئے اُنھوں نے کہا کہ اجتما عی کوششوں کے با عث ملک نے تجا رت کو آسان بنا نے میں فقید المثال ترا میم کی ہیں۔ اِس کے علا وہ شمسی توا نائی اور ما حو لیاتی تغیر کے میدان میں بھارت کی کار کر دگی دنیا بھر کی نظروں میں آئی ہے۔مودی نے کہا کہ ملک کی حفا ظتی مِشنری بھی مزید مستحکم ہوئی ہے اور اِسی برس ہندوستان نے جو ہری مثلث مکمل کر لیا۔ یعنی بری، بحری اور فضائی تینوں شعبوں میں جوہری طا قت بن گیا ہے۔
 مکر سنکرات، لوہری ، پونگل اور دیگر علا قائی تہواروں اور گرو گو بنِد سنگھ جینتی پر اُنھوں نے قوم کو پیشگی مبارکباد پیش کی۔  جنوری سے پر یاگ راج میں شروع ہو نے والے کمُبھ میلے کا بھی اُنھوں نے ذکر کیا۔
***** ***** *****
ٓ؁ ایک ہی نشِست میں تین طلاق کے طریقہ کار کو تعزیری جرم قرار دینے والا بل آج راجیہ سبھا میں پیش کیا جا سکتا ہے۔ کانگریس نے اِس بل کو موجودہ حالت میں منظور نہ ہونے دینے کا اعلان کیا ہے۔ گذشتہ جمعرات کو لوک سبھا میں یہ بل منظور کیا جاچکا ہے۔
***** ***** *****
 نیشنلِسٹ کانگریس پارٹی کے سر براہ شرد پوار نے کہا ہے کہ مہا آگھاڑی میں شامل پارٹیوں کی قیادت میں وزیر اعظم کے عہدے پر کوئی اختلاف نہیں ہے۔ اور انتخا بات کے بعد تمام جماعتیں مِل کر اِس موضوع پر فیصلہ کریں گے۔ کل احمد نگر میں اخباری نمائندوں سے گفتگو کر تے ہوئے اُنھوں نے کہا کہ مدھیہ پر دیش اور چھتیس گڑھ میں کانگریس حکو متوں کی جانب سے کسا نوں کے قرض معاف کیئے جاینے کے فیصلے پر مودی کا بیان یہ ظاہر کر تا ہے کہ اُنھیں کسا نوں سے کوئی ہمدردی نہیں ہے۔ حکو مت آزاد اور خود مختار اِداروں کو اپنے کنٹرول میں لے کر مخالفین کے خلاف استعمال کر رہی ہے  جس سے ملک میں ایمر جنسی کی سی صورتحال پیدا ہو گئی ہے
 دریں اثناء احمد نگر میونسپل کار پو ریشن میں میئر اور ڈپٹی میئر عہدوں کے لیے بی جے پی امید وار وں کو وٹ دینے والے این سی پی کار پو ریٹروں اور مقا می قائدین کے خلاف پارٹی کی جانب سے تا دیبی کار وائی کا اشارہ بھی شرد پوا ر نے دیا۔
***** ***** *****
 مہاراشٹر سوا بھیمانی پارٹی کے سر براہ نا رائن رانے  نے کہا ہے کہ اُن کی پارٹی لوک سبھا انتخا بات میں تنہا حصہ لے گی  تاہم کتنی نشستوں پر امید وار کھڑے کیئے جائیں گے اِس کا فیصلہ انتخا بی ضابطۂ اخلاق کے نفاذ کے بعد ہی کیا جائے گا۔ وہ کل سندھو درگ ضلع کے پڑ وے میں ایک اطلا عی کانفرنس سے خطاب کررہے تھے۔ اُنھوں نے کہا کہ اگر بی جے پی عوام سے کیئے گئے اپنے وعدے پورا نہیں کر تی تو اُسے لوک سبھا انتخا بات میں نقصان اُٹھا نا پڑ یگا۔
***** ***** *****
 مرکزی وزیر برائے زمینی حمل و نقل نتن گڈ کری نے کہا ہے کہ ریاست کی مختلف مجوزہ شاہراہوں کے کام تر جیحی بنیاد پر تیزی سے مکمل کیئے جائیں گے۔ کل اورنگ آ باد میں گڈ کری کی مو جودگی میں مختلِف سڑکوں کی تعمیر کے کام کا جائزہ لینے کے لیے ایک اجلاس منعقد کیا گیا تھا۔ اورنگ آباد شہر کے بیڑ بائے پاس کی تو سیع سے متعلق وزیر موصوف نے کہا کہ اِس شاہراہ کو6؍ ٹریک کر نے کے لیے مفصل منصوبہ تیار کر نے کی ہدا یت کی گئی ہے۔
***** ***** *****
 خصو صی تعا ون اور سماجی انصاف کے وزیر راجکمار بڈو لے نے کہا ہے کہ جا دو ٹو نا اور بد عقیدگی کے قا نون سے متعلق عوامی بیداری کے لیے تشہیر کی جائے گی اور اِس قا نو ن پر موثر عمل در آمد کو یقینی بنا نے کی غرض سے تعلقہ سطح پر کمیٹیاں تشکیل دی جائیں گی۔ اُنھوں نے کہا کہ تو ہم پر ستی کے با عث معاشرے میں ہونے والی جعلسازی کے تدا رُک کے لیے یہ قا نون نہا یت موثر ثابت ہو سکتا ہے۔
***** ***** *****
 اسٹیٹ روڈ ٹرانسپورٹ کار پو ریشن کے ملازمین کو بھی اب 6؍ ماہ کی چائلڈ کیئر رخصت مل سکے گی۔ ٹرانسپورٹ کے وزیر اور ایس ٹی کار پو ریشن کے چیئر مین دِیوارکر رائو تے نے کل یہ اعلان کیا۔ خواتین ملازمین سمیت وہ مرد حضرات جن کی اہلیہ حیات نہ ہو یا وہ ملازمین جن کی اہلیہ غیر معمو لی عارضے میں مبتلا ہو اُنھیں یہ6؍ ماہ کی رخصت مل سکے گی۔ اِس رخصت کے لیے ریاستی حکو مت کے ملازمین کے لیے جو شرائط ہیں وہی شرائط ایس ٹی ملازمین پر بھی لا گو ہوں گے۔
***** ***** *****
 معروف فلمساز و ہدایت کار مر نال سین کل صبح کو لکتہ میں چل بسے وہ95؍ برس کے تھے۔ سماجی اور سیاسی موضوعات پر فلمیں بنا نے کے لیے مشہور مر نا ل سین نے  ’’ ایک دن اچانک ‘‘  او ر  ’’ مر گیہ ‘ ‘  سمیت کئی مقبول فلموں میں ہدا یت کاری کی۔ اُنھیں پد م بھو شن، دادا صاحب پھالکے سمیت
12؍ بین الاقوامی فلم ایوارڈ دیئے جاچکے ہیں۔
***** ***** *****
 پر بھنی ضلع میں کل شب ایک جیپ اور ٹو وہیلر کے ما بین پیش آئے سڑک حادثے میں تین افراد ہلاک اور ایک شخص شدید مجروح ہو گیا۔
***** ***** *****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.12.2018 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31  December 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१  डिसेंबर २०१ सकाळी ७.१० मि.

****



Ø दारिद्र्य निर्मूलनाच्या क्षेत्रात भारताची विक्रमी वेगान प्रगती - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Ø महाआघाडीत पंतप्रधानपदावरून कोणताही वाद नाही, लोकसभा निवडणुकीनंतर सर्व पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील- शरद पवार

Ø राज्यातल्या विविध रस्त्यांची प्रस्तावित विकास कामं प्राधान्यानं, पूर्ण करण्याच्या केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांच्या सूचना

आणि

Ø मेलबोर्न क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकशे सदोतीस धावांनी विजय

****



 भारतानं दारिद्र्य निर्मूलनाच्या क्षेत्रात विक्रमी वेगान प्रगती केली असून, जगातल्या नामवंत संस्थांनी भारताच्या या वाढीची दखल घेतली आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या एक्कावन्नाव्या भागात बोलत होते. सामुहिक प्रयत्नांच्या जोरावर आपल्या देशानं व्यापार सुलभतेच्या क्रमवारीत अभूतपूर्व सुधारणा अनुभवली आहे सौर ऊर्जा आणि हवामान बदल या क्षेत्रांमध्ये भारताच्या प्रयत्नांची नोंद जगानं घेतली आहे.

 मोदी म्हणाले की देशाची संरक्षण यंत्रणा अधिक मजबूत झाली असून, याच वर्षी आपल्या देशानं आण्विक त्रिकोण यशस्वीरीत्या पूर्ण केला, म्हणजेच आता भारत जमीन, पाणी आणि आकाश या तीनही क्षेत्रात अण्वस्त्रसज्ज झाला आहे.



 येत्या १५ जानेवारीपासून प्रयागराज इथं  जगप्रसिद्ध कुंभमेळा  आयोजित होत आहे. कुंभमेळा हे आत्मशोधाचं प्रभावी साधन आहे. गेल्यावर्षी युनेस्कोने कुंभमेळ्याला मानवतेच्या अद्भुत सांस्कृतिक परंपरांच्या यादीत स्थान दिलं. यावरून आपल्याला त्याच्या जागतिक महत्तेची कल्पना येऊ शकते. यंदाच्या कुंभमेळ्याला जगातल्या दीडशेहून अधिक देशांमधले भाविक येण्याची शक्यता आहे. कुंभाच्या दिव्यतेतून भारताची भव्यता संपूर्ण जगात आपल्या विविधरंगी खुणा उमटवेल, असं मोदी म्हणाले.



 लोहरी, पोंगल, मकर संक्रांति, उत्तरायण, मादी, मग आणि  बिहू या सणांसाठी मोदी यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या गुरुगोविंद सिंग यांच्या जयंतीच्याही शुभेच्छा मोदी यांनी यावेळी दिल्या. नवी प्रेरणा, नवा उत्साह, नवा संकल्प, नवी सिद्धी, आणि नव्या उंचीसह पुढ पावल टाकत स्वतः बदल घडवू आणि देशातही बदल घडवू, असं ते म्हणाले.

****



 एका वेळी तीन तलाक देण्याच्या पद्धतीला गुन्हा ठरवणारं तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत सादर होण्याची शक्यता आहे. हे विधेयक आहे त्या स्वरूपात मंजूर होऊ देणार नसल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं आहे. गेल्या गुरुवारी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं आहे.

****



 महाआघाडीतल्या नेत्यांमध्ये पंतप्रधानपदावरून कोणताही वाद नसून, निवडणूक झाल्यावर सर्व पक्ष एकत्र येऊन याबाबत निर्णय घेतील, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते काल अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. कॉंग्रेसनं मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नसल्याचं दिसून येतं, असा आरोप शरद पवार यांनी केला. सरकार स्वायत्त संस्थांना लक्ष्य करून विरोधकांना नाउमेद करत असल्यानं देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान, अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर आणि स्थानिक नेत्यांवर पक्षाकडून गंभीर कारवाई करण्यात येईल, असं पवार यांनी सांगितलं.

****



 महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढणार आहे, मात्र राज्यात किती जागा लढवायच्या याचा निर्णय निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर घेणार असल्याची माहिती या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पडवे इथं ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते. दिलेली वचनं पूर्ण केली नाहीत तर, भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत धक्का बसेल, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****



 राज्यातल्या विविध रस्त्यांची प्रस्तावित विकास कामं प्राधान्यानं आणि वेगानं पूर्ण करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, मंत्री  नितीन गडकरी यांनी संबंधीतांना दिल्या आहेत. औरंगाबाद इथं काल गडकरी यांच्या उपस्थितीत विविध रस्त्यांच्या  कामांची  आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास मार्गाच्या विस्ताराबाबत बोलतांना गडकरी यांनी हा रस्ता सहा पदरी करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल- डी.पी.आर. तयार करण्याचं सूचित केलं. या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरसह नजिकच्या भागातील जमिनींबाबतच्या अडचणी, धुळे-सोलापूर महामार्ग याबाबत चर्चा झाली.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन . आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणार असून, या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. अंधश्रद्धांच्या माध्यमातून समाजाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा कायदा उपयुक्त ठरेल, असं बडोले यांनी म्हटलं आहे.

****



 राज्य परिवहन महामंडळ एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनाही सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मिळणार आहे. परिवहन मंत्री आणि एस.टी.चे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल ही घोषणा केली. महिला कर्मचाऱ्यांसह पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी, तसंच ज्याची पत्नी असाध्य आजारानं पिडित आहे, अशा पुरुष कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या रजेसाठी लागू असलेल्या अटीशर्तीही एस.टी.च्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहेत.

****



 भिमा-कोरेगाव इथं उद्या एक जानेवारीला शौर्य दिनानिमित विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्यांच्या वाहनांना  पथकर माफ करण्याचं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार पक्षाच्या शिष्टमंडळानं  सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना याबाबत निवेदन दिलं होतं.

****



 परभणी जिल्ह्यात काल रात्री एका जीपनं दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात तीन जण मरण पावले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. सेलू-परभणी मार्गावर हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अपघातग्रस्त सर्व ढेंगळी पिंपळगावचे रहिवासी आहेत. गंभीर जखमीवर नांदेड इथं उपचार सुरू आहेत.

****



 येत्या चोवीस तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  

****



 भारतानं मेलबोर्न इथं ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात एकशे सदोतीस धावांनी पराभूत करून चार सामन्यांच्या या मालिकेत दोन-  एक अशी आघाडी घेतली. सामन्याच्या पाचव्या दिवशी काल ऑस्ट्रेलियानं परवाच्या आठ बाद दोनशे अट्ठावन्न या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली आणि अवघ्या तीन धावांची भर घालून त्यांचे शिल्लक दोन फलंदाज बाद झाले. जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि इशांत शर्मानं प्रत्येकी दोन गडी बाद केले. बुमराह सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला अखेरचा सामना गुरुवार तीन जानेवारीपासून सिडनी इथं खेळला जाईल.

****



लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आलेले लातूर महापालिकेचे नगरसेवक सचिन मस्के आणि पूनित पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याचं लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी काल सांगितलं. त्यांच्याकडून खुलासा प्राप्त झाल्यानंतर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल असं शेख म्हणाले.

****



 परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तालुक्यात काल सलग तिसऱ्या दिवशी शेतातला ऊस जळण्याची घटना घडली आहे. सिमुरगव्हाण शिवारात काल दोन शेतकऱ्यांच्या चार ते पाच एकर शेतातला ऊस जळून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही.

****



प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं काल सकाळी कोलकत्यात निधन झालं. ते पंचाण्णव वर्षांचे होते. सामाजिक तसंच राजकीय मुद्द्यांवर केंद्रित चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सेन यांनी, एक दिन अचानक, मृगया आणि भुवन शोम यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं.

*****

***

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.12.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2018

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० डिसेंबर २०१८ सायंकाळी ६.००

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अंदमान निकोबार बेटांच्या भेटीदरम्यान आज कार निकोबारला भेट दिली. या बेटावरच्या आदिवासी प्रमुखांशी आणि क्रीडापटूंशी पंतप्रधानांनी संवाद साधला. अरोंग इथे पंतप्रधानांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसंच आधुनिक क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं, जनतेला संबोधित केलं. विकासाच्या मार्गावर कोणतीही व्यक्ती किंवा कोणताही भाग मागे राहता कामा नये, हा आपल्या सरकारचा निर्धार असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी यावेळी केला.

****

संगणक आणि मोबाईलमधील माहिती तपासण्याची परवानगी दिल्या गेलेल्या संस्थांना याबाबतचा सर्वाधिकार दिलेला नसून, कोणत्याही संगणक किंवा मोबाईल मधील माहिती तपासण्यासाठी त्यांना यासाठीच्या नियमांचं पालन करावंच लागेल, असं गृहमंत्रालयानं आज म्हटलं. याबाबतचे सगळे नियम पूर्वीप्रमाणेच असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. या महिन्याच्या वीस तारखेला गृहमंत्रालयानं जारी केलेल्या, दहा संस्थांना कोणत्याही संगणक आणि मोबाईलमधली माहिती तपासण्याचे अधिकार दिल्याबाबतच्या सूचनेवर विरोधी पक्षांनी कठोर टीका केली होती.

****

प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचं आज सकाळी कोलकत्यात निधन झालं. ते पंचाण्णव वर्षांचे होते. सामाजिक तसंच राजकीय मुद्द्यांवर केंद्रित चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सेन यांनी, एक दिन अचानक, मृगया आणि भुवन शोम यासह अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांना पद्मभूषण तसंच दादासाहेब फाळके पुरस्कारासह अन्य बारा आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृणाल सेन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

****

देशांतर्गत १०० विमानतळांवर स्थानिक वस्तूंची दालनं थाटली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्य आणि नागरी उड्डयनमंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे. ते काल सावंतवाडी इथं पर्यटन महोत्सवाला भेट देण्यासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. गोवा इथं या अंतर्गत पहिलं दालन लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. सिंधूदूर्गच्या चिपी विमानतळाचं उदघाटन लवकरच करण्यात येईल, असंही सुरेश प्रभू यांनी यावेळी सांगितलं. 

****

महाआघाडीतल्या नेत्यांमध्ये पंतप्रधानपदावरून कोणताही वाद नसून, निवडणूक झाल्यावर सर्व पक्ष एकत्र येऊन याबाबत निर्णय घेतील, असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते आज अहमदनगर इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. कॉंग्रेसनं मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नसल्याचं दिसून येतं, असा आरोप शरद पवार यांनी केला. सरकार स्वायत्त संस्थांना लक्ष्य करून विरोधकांना नाउमेद करत असल्यानं देशात आणीबाणीसदृष्य परिस्थिती असल्याचं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. दरम्यान, अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर आणि स्थानिक नेत्यांवर पक्षाकडून गंभीर कारवाई करण्यात येईल, असं पवार यांनी सांगितलं.

****

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढणार आहे, मात्र राज्यात किती जागा लढवायच्या याचा निर्णय निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर घेणार असल्याची माहिती या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पडवे इथं ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दिलेली वचनं पूर्ण केली नाहीत तर, भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत धक्का बसेल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

****

परभणी जिल्ह्यात काल रात्री एका जीपनं दुचाकीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात तीन जण मरण पावले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. हे सर्व ढेंगळी पिंपळगावचे रहिवासी आहेत. गंभीर जखमीवर नांदेड इथं उपचार सुरू आहेत. सेलू-परभणी मार्गावर हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.12.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 December 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० डिसेंबर २०१ दुपारी १.०० वा.

*****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. सरत्या वर्षात भारतानं केलेल्या प्रगतीचा आढावा घेताना त्यांनी, जगातल्या सर्वात मोठ्या, आयुष्मान भारत, या आरोग्य विमा योजनेच्या प्रारंभाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. गत वर्षात देशातल्या प्रत्येक गावात वीज पोचल्याचं नमूद करत, जगातल्या प्रतिष्ठित संस्थांनी, भारत विक्रमी गतीनं गरिबीवर मात करत असल्याचं मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं. देशवासियांच्या निर्धारामुळे देशात स्वच्छतेच्या बाबतीत फार मोठी सुधारणा झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. देशाची संरक्षण व्यवस्था बलवान झाली असून, भूदल, नौदल आणि वायुदलही अण्वस्त्रसंपन्न झाल्याचं त्यांनी सांगितलं. वाराणसीत सुरू झालेल्या, देशाच्या पहिल्या जलमार्गाचा तसंच बोगीबिल या देशातल्या सर्वात लांब दुहेरी पुलाचाही गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला. भारतीय खेळाडूंनी विविध जागतिक स्पर्धांमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. कोरियामध्ये कराटे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या काश्मीरच्या हानिया निसारचं तसंच कनिष्ठ महिला मुष्टीयुद्ध स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱ्या रजनीचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. सर्वात अधिक गतीनं सायकलवरून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली आशियायी व्यक्ती ठरल्याबद्दल पुण्याच्या वेदांगी कुलकर्णीची प्रशंसा करून, तिची जिद्द ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. भारतात होणारे कुंभ मेळे हे विराट आणि जगाचं लक्ष वेधून घेणारे असल्याचं सांगत त्यांनी पंधरा जानेवारीपासून प्रयागराज इथे सुरु होणार असलेल्या महाकुंभ मेळ्यात भाविक यावर्षीपासून अक्षयवटाचं दर्शन घेऊ शकतील, असं नमूद केलं. नव्या वर्षात सर्व देशवासियांनी प्रगतीपथावर रहात स्वत: बदलावं आणि देशालाही बदलावं, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी दिल्या.

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अंदमान आणि निकोबार बेटांवर विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन होत आहे. पंतप्रधानांनी आज सकाळी निकोबार इथे, २००४ च्या त्सुनामीत बळी पडलेल्या लोकांच्या स्मारकावर पुष्पांजली वाहिली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ऐतिहासिक अंदमान भेटीला पंचाहत्तर वर्षं पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ पंतप्रधान आज पोर्ट ब्लेअर इथल्या कारागृहाला भेट देणार असून, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली वाहणार आहेत.

****



 भारतानं मेलबोर्न इथं ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात एकशे सदोतीस धावांनी पराभूत करून चार सामन्यांच्या या मालिकेत दोन एक अशी आघाडी घेतली. सामन्याच्या पाचव्या दिवशी आज ऑस्ट्रेलियानं कालच्या आठ बाद दोनशे अट्ठावन्न या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली आणि अवघ्या तीन धावांची भर घालून त्यांचे शिल्लक दोन फलंदाज बाद झाले. जसप्रीत बुमरा आणि रविंद्र जडेजानं प्रत्येकी तीन तर मोहम्मद शमी आणि इशांत शर्मानं प्रत्येकी दोन गडी बाद केले. बुमरा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. मालिकेतला अखेरचा सामना तीन जानेवारीपासून सिडनीत खेळला जाईल.

****

 एका वेळी तीन तलाक देण्याच्या पद्धतीला गुन्हा ठरवणारं तिहेरी तलाक विधेयक उद्या राज्यसभेत सादर होण्याची शक्यता आहे. हे विधेयक आता आहे त्या स्वरूपात मंजूर होऊ देणार नसल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं आहे. हे विधेयक गेल्या गुरुवारी लोकसभेत मंजूर झालं आहे.

****



 जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करणार असून, या कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर समिती स्थापन करणार असल्याची माहिती सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी दिली आहे. अंधश्रद्धांच्या माध्यमातून समाजाची होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा कायदा उपयुक्त ठरेल, असं बडोले यांनी म्हटलं आहे.

****



 उत्तर भारतात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे देशात पसरलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम पूर्ण मराठवाड्यात जाणवत आहे. परभणी जिल्ह्यात काल गेल्या अनेक दशकातल्या सगळ्यात कमी म्हणजे तीन अंश सेल्शियस तापमानाची नोंद झाली. आज  देखील परभणीचं तापमान ३पूर्णांक ३ अंश सेल्सिअस  असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

*****

***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 December 2018
Time:  8:40 to 8:45 AM
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ: 30  ؍دِسمبر۲۰۱۸ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸
 شمالی بھارت کی شدیدسردی کی لہرتمام ملک میںپھیل گئی ہیں۔ریاست کے کئی علاقوں میںدرجہ حرارت میں کمی درج کی گئی۔پونامیںگذشتہ دس سال میں سب سے کم پانچ اعشاریہ 9؍ڈگری سیلسیس درجہ حرارت درج کیاگیا۔ناسک ضلع میں تین یوم میںسردی میںاضافہ ہوگیاہے۔نپھاڑمیں درجہ حرارت 7؍ڈگری سے کم درج کیاگیا۔انگورکے باغات پراس سردی کااثرہوگا۔کساراگھاٹ پرکہرے کی وجہہ سے آمدورفت میں خلل پیداہورہاہے۔امرائوتی ضلع میں کل سے سردی میں اضافہ ہوا۔احمدنگرضلع میں سردلہریں جاری ہیں۔ ناگپورمیںکل دن میں درجہ حرارت پانچ اعشاریہ 7؍ڈگری سیلسیس سے کم پہنچ گیاتھا۔
 دھولیہ ضلع میں سردی میں اضافہ ہوا۔کل دھولیہ میں درجہ حرارت دواعشاریہ 2؍سیلسیس درج یاگیا۔ تھانہ،گڑچرولی ، رائے گڑھ اضلاع میںبھی سردی کاقہرجاری ہے۔
 مراٹھواڑہ میںتمام اضلاع میںسردلہریں جاری ہیں۔پربھنی ضلع میں سب سے کم درجہ حرارت یعنی 3؍ڈگری سیلسیس درج کیاگیا۔زرعی یونیورسٹی کے محکمہ موسمیات نے اس کااندراج کیاہے۔اورنگ آبادمیںپانچ اعشاریہ 8؍ڈگری سیلسیس اورناندیڑمیں7؍اعشاریہ 5؍ڈگری سیلسیس درجہ حرارت درج کیاگیا۔
***** ***** *****
 اقلیتی سماج کاسیاسی استحصال ختم کرنے کے لئے تعلیم یہ بہترین علاج ہے۔مرکزی اقلیتی اُمورکے وَزیرمختارعباس نقوی نے یہ بات کہی ہے۔ممبئی میںانجمن اسلام کی جانب سے تعمیر کئے جانے والے طالبات کے ثانوی اسکول اورجونیئرکالج عمارت کی سنگ بنیادتقریب سے وہ کل مخاطب تھے۔گذشتہ چارسال میںاقلیتی سماج کے تقریباً تین کروڑگیارہ لاکھ طلبہ وطالبات کواسکالرشپ دی گئی۔جس میں 60؍فیصدطالبات ہیں۔یہ فخرکی بات ہے۔نقوی نے یہ کہتے ہوئے کہا کہ غریب طلباء کواسکالرشپ بغیر کسی رکاوٹ کے حاصل ہو۔ اس لئے اس سال نیشنل اسکالرشپ پورٹل موبائیل ایپ بھی شروع کیاگیاہے۔ اسکولوں میںمسلم طالبات کے کم ہونے کاتناسب 70؍فیصد سے 35؍سے 40؍فیصد تک ہوگیاہے۔ یہ بات اُنہوںنے کہی۔
***** ***** *****
 بھیماکورے گائوں میں یکم جنوری کومنعقدہونے والے یومِ بہادری کے پروگرام کے موقع پرگذشتہ سال کے تشددکے مدنظر سخت پولس بندوبست رکھاگیاہے۔اسپیشل انسپکٹر جنرل آف پولس وِشواس ناگرے پاٹل اورضلع کلکٹر نول کشوررام نے یہ بات کہی۔کل اس علاقے کے بندوبست کاجائزہ لینے کے بعد وہ صحافیوں سے مخاطب تھے۔سخت بندوبست سمیت پولس کے ہیلمیٹ میں کیمرے اورپچاس خفیہ کیمرے نصب کئے گئے ہیں۔اس کی اطلاع اس موقع پردی گئی۔
***** ***** *****

 وزیراعظم نریندرمودی آج صبح گیارہ بجے آکاشوانی سے من کی بات پروگرام میںاپنے خیالات پیش کریںگے۔یہ ان کا51؍واں ماہانہ ریڈیو پروگرام ہوگا۔جودوردرشن اورآکاشوانی کے پورے نیٹ ورک سے نشرکیاجائے گا۔وزیراعظم کے دفتر میں یوٹیوب چینل،اطلاعات ونشریات کی وزارت، آکاشوانی اورڈی ڈی نیوزپربھی یہ پروگرام نشر کیا جائے گا۔ساتھ ہی ساتھ یہ پروگرام آکاشوانی کی ویب سائٹ www.allindiaradio.gov.inسے نشرکیاجائے گا۔ہندی نشریے کے فوراً بعد آکاشوانی علاقائی زبانوں میں اس پروگرام کوپیش کرے گا۔علاقائی زبانوں میں اس پروگرام کورات آٹھ بجے دوبارہ سناجاسکے گا۔
***** ***** *****
 وَزیراعظم اُجولا گیس یوجنا کے تحت لاتورضلع کے ہرایک خاندان میں گیس کنکشن دئیے جائیں گے اورجلد ہی دھویں سے آزادکیاجائے گا۔اس کی اطلاع ہندوستان پٹرولیم کارپوریشن کے شولاپورڈیویژن کے سینئرکامرس منیجر کوشل کھنڈیلوال نے دی۔وہ کل لاتورمیںصحافیوں سے مخاطب تھے۔اس اسکیم کے تحت لاتورضلع میں اب تک 99؍ہزار213؍مستحقین کوگیس کنکشن دئیے گئے۔اس میںہندوستان پٹرولیم نے 39؍ہزار875، بھارت پٹرولیم نے 42ہزار942 اورانڈین آئیل نے 16؍ہزار346؍کنکشن دئیے۔
***** ***** *****
 شجرکاری کے نشانے تک ہی محدود نہ رہتے ہوئے مراٹھواڑہ کوسبزکرنے کے لئے سماجی جنگل پانی محکمہ کے افسران آگے آئیں۔ایسی ہدایت محکمہ جنگلات کے سیکریٹری وکاس کھرگے نے کل اورنگ آبادمیںافسران کودی۔محکمہ جنگلات کے میٹنگ ہال میں 33؍کروڑپودے لگانے کانشانہ اوراس کی منصوبہ بندی کے سلسلے میںکھرگے نے ڈیویژنل سطح پرجائزہ میٹنگ لی اس سے وہ مخاطب تھے۔
***** ***** *****
 بھارت اورآسٹریلیاء کے درمیان میلبورن میں جاری تیسرے کرکٹ ٹیسٹ میچ میں اب سے کچھ دیرپہلے بھارت نے 137؍رنزسے کامیابی حاصل کرلی۔ جسپریت بھومبراکومین آف دی میچ قراردیاگیا۔
***** ***** *****