Monday, 30 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –30 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
विधानसभा निवडणुकीसाठी अनेक मान्यवरांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर विधानसभा मतदार संघातून जोरदार शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. निवडणूकीनंतर राज्यात काँग्रेस आघाडीचाच मुख्यमंत्री असेल असा विश्वास, थोरात यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथून उमेदवारी अर्ज दाखल केला
बीड जिल्ह्यातल्या गेवराई विधानसभा मतदार संघातून शिवसेना नेते बदामराव पंडित यांनी एक अर्ज अपक्ष तर एक अर्ज शिवसेनेच्या वतीनं दाखल केला.

बीड जिल्ह्यातल्या एकूण सहा मतदारसंघात नऊ उमेदवारांनी बारा अर्ज, परभणी जिल्ह्यात सहा उमेदवारांनी सहा अर्ज, जालना जिल्ह्यातल्या पाच पैकी दोन विधानसभा मतदारसंघातून दोन उमेवारांनी, तर उस्मानाबाद जिल्ह्याच्या परांडा विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला

औरंगाबाद इथल्या सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची सिल्लोड विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज सत्तार यांना अधिकृत उमेदवारीचा ए बी फॉर्म दिला. उमेदवारी जाहीर होताच सिल्लोडमध्ये शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि घोषणा देऊन जल्लोष केला.
****
शिवसैनिकांची संमती असेल, तर विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याची घोषणा, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते. आदित्य ठाकरे यांना वरळी मतदार संघातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
****
धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर आज भारतीय जनता पक्षात परतले. मुंबईत प्रवेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत पडळकर यांनी पक्षात प्रवेश केला, मुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्षांनी त्यांचं स्वागत केलं. पडळकर यांना बारामती मतदार संघातून विधानसभेची उमेदवारी देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शिरपूरचे आमदार काशिनाथ पावरा, शिरपूरचे काँग्रेस नेते प्रभाकर चव्हाण यांच्यासह अनेकांनी यावेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. परळी इथं गोपीनाथ गडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी नमिता मुंदडा यांचं पक्षात स्वागत केलं.
***
धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी विधानसभा निवडणुक लोकसंग्राम या आपल्या पक्षातर्फेच लढवणार असल्याची घोषणा केली, ते आज धुळे इथं समर्थकांच्या मेळाव्यात बोलत होते. जो पक्ष आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद देईल त्या पक्षात प्रवेश करण्यास आपण तयार असल्याचंही अनिल गोटे यांनी जाहीर केलं.
****
केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीच्या घेतलेल्या निर्णयाचे पडसाद नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं उमटले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी लासलगाव इथं कांदा लिलाव बंद पाडला तसंच मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं.
****
जालना शहरात, औरंगाबाद मार्गावर आज सकाळी स्कुटीवरून जाणाऱ्या दोन महिलांना अज्ञात वाहनानं धडक दिली, या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. मनिषा इंगोले असं मृत महिलंचे नाव आहे.
****
रक्तदानाविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी यादृष्टीनं उद्या एक ऑक्टोबर हा दिवस ‘ऐच्छिक रक्तदान दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. “आयुष्यात एकदा तरी रक्तदान करा” हे यावर्षीचं घोषवाक्य आहे. औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात ऑक्टोबर महिन्यात यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. रक्ताची तूट भरून काढण्यासाठी नागरिकांच्या सक्रीय सहभागाची आवश्यकता असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
महात्मा गांधींजींच्या १५० व्या जयंती निमित्तानं, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा क्षेत्रीय जनसंपर्क विभाग आणि महात्मा गांधी मिशन यांच्या संयुक्त विद्यमानं, उद्या औरंगाबाद इथं गांधीजींच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. हे चित्रप्रदर्शन उद्यापासून तीन ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य चालू राहणार आहे.
****
परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठच्या सात गावातल्या नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार तसंच अधिकारी आणि पुढाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातल्या रस्त्यांच्या दूरवस्थेकडे प्रशासनाकडून लक्ष दिलं जात नसल्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी हा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे
****


AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.09.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30  September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०१ दुपारी .०० वा.
****


 बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. परळी इथं गोपीनाथ गडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी नमिता मुंदडा यांचं पक्षात स्वागत केलं. नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत काल बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी जवळपास नक्की करण्यात आली असून, केजमधून नमिता मुंदडा यांचं नाव निश्चित झालं असल्याचं मुंदडा समर्थकांनी सांगितलं. भाजप प्रवेशापूर्वी नमिता मुंदडा यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईमेलद्वारे पाठवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, केज विधानसभा मतदार संघातून नमिता मुंदडा यांना नुकतीच उमेदवारी जाहीर केली होती. नमिता मुंदडा या माजी मंत्री दिवंगत विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत. 
****

 नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल केला. भोकर इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयात चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. चव्हाण यांच्या सुविद्या पत्नी अमिता चव्हाण यांचाही उमेदवारी अर्ज भरण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****

 फिट इंडिया अभियानात तरुणांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज चेन्नई इथं भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टीच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते. विविध शाखांमध्ये विशेष गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पदकं तसंच पदवी प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली.
****

 जम्मू काश्मीर मधून कलम ३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे देशाच्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ३५ हजार हुतात्मा सैनिकांना खरी श्रद्धांजली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटल आहे. ते आज गुजरातमधल्या अह्मदाबाद इथं शीघ्र कृती दलाच्या २७ व्या स्थापना दिनानिमित्त बोलत होते. १९९२ मध्ये शीघ्र कृती दलाची स्थापना जातीय दंगली रोखण्यासाठी तसंच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी शाह यांनी हुतात्मा सैनिकांच्या पत्नींना आणि जवानांना वीरता पुरस्कारानं सन्मानित केलं.
****

 जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या एका पीठानं, या सर्व याचिका घटनापीठाकडे वर्ग केल्या आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये लागू असलेल्या निर्बंधावरही या याचिकांमधून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. न्यायमूर्ती एन व्ही रामना यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ या याचिकांवर सुनावणी घेणार आहे.
****

 स्वच्छ भारत मोहिमेची माहिती जाणून घेण्यासाठी जगातले अनेक देशांचे मंत्री भारतात येत आहेत. गेल्या वर्षी जगभरातल्या विविध देशांच्या 55 मंत्र्यांनी भारताला भेट देऊन या मोहिमेची माहिती घेतली असं युनिसेफचे भारतातले स्वच्छता अभियानाचे प्रमुख, निकोलस ऑस्बर्ट यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारचं स्वच्छ भारत अभियान हे जगासाठी चांगलं उदाहरण असून या अभियानामुळे भारतीय समाजाचा स्वच्छतेकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
****

 ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं मुंबईत निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांसह मराठी आणि इंग्रजी रंगभूमीवर त्यांनी विविध भूमिका साकारल्या. शोले या चित्रपटातली कालिया डाकूची भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****

 उस्मानाबाद तालुक्यातल्या आंबेजवळगे गावचे माजी सरपंच मनोहरराव उर्फ मनू काका कुलकर्णी यांचं आज सकाळी निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. ते सलग ५० वर्ष अंबेजवळग्याचे सरपंच होते. बार्शी अर्बन बॅंकेचे अध्यक्ष, पांगरी इथल्या शिक्षण संस्थांचे अध्यक्ष यासह विविध संस्थांचं अध्यक्षपदही त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं. त्यांच्या पार्थिव देहावर आंबेजवळगे इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****

 जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाची धडक बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात हा अपघात झाला. श्याम होळे असं मृत तरुणाचं नाव असून, संतप्त जमावानं, मंत्र्यांच्या वाहनाचं नुकसान केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.
****

 भारताचा बॅडमिंटनपटू कौशल धर्मामेर यानं मालदिवची राजधानी माले इथं झालेल्या मालदिव आंतरराष्ट्रीय बॅडमिन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात कौशलनं सिरील वर्माचा सरळ सेटमध्ये पराभव केला. मात्र महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यांना जपानच्या सायाक होबारा आणि नात्सुकी सोनी या जोडीनं १०-२१, २१-१७, १२-२१ असं हरवलं. मिश्र दुहेरीत साईप्रतिक कृष्णप्रसाद आणि अश्विनी भट या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं.
*****
***0

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.09.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३०  सप्टेंबर  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 भारताकडून जगाच्या मोठ्या अपेक्षा असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज चेन्नईत एका कार्यक्रमात बोलत होते. संपूर्ण जगाला लाभ होईल, अशा उत्कर्षाच्या मार्गावर देशाला नेण्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. अन्य एका कार्यक्रमात चेन्नई सिंगापूर हॅकेथॉन मधल्या विजेत्यांनाही पंतप्रधानांनी पुरस्कार प्रदान केले.
****

 महाराष्ट्र आणि हरियाणात येत्या २१ऑक्टोबरला होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची नावं निश्चित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या  केंद्रीय निवडणूक समितीची काल दिल्ली इथं पक्षाच्या  मुख्यालयात बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह भाजपाचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते.
****

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं आज मुंबईत निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांसह मराठी आणि इंग्रजी रंगभूमीवर त्यांनी विविध भूमिका साकारल्या. शोले या चित्रपटातली कालिया डाकूची भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****

 भारताचा बॅडमिंटनपटू कौशल धर्मामेर यानं मालदिवची राजधानी माले इथं झालेल्या मालदिव आंतरराष्ट्रीय बॅडमिन स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात कौशलनं सिरील वर्माचा सरळ सेटमध्ये पराभव केला. मात्र महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यांना जपानच्या सायाक होबारा आणि नात्सुकी सोनी या जोडीनं १०-२१, २१-१७, १२-२१ असं हरवलं. मिश्र दुहेरीत साईप्रतिक कृष्णप्रसाद आणि अश्विनी भट या जोडीला, तसंच पुरुष दुहेरीत अरुण जॉर्ज आणि सन्याम शुक्ला या जोडीलाही उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं.
*****
***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 September 2019
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۰ ؍ستمبر  ۲۰۱۹ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸

 اسمبلی انتخا بات کے لیے کانگریس پارٹی نے کل اپنے 51؍ امید واروں کے ناموں پر مشتمل پہلی فہرست جا ری کی۔ اِس میں ناندیڑ ضلعے کے بھو کر حلقے انتخاب سے سابق وزیر اعلیٰ اشوک چو ہان کو امید واری دی گئی ہے۔ جبکہ ناندیڑ شمال حلقے سے  ڈی  پی   ساونت ‘  نایے گائوں سے وسنت رائو چو ہان‘  دیگلور سے رائو صاحیب انتا پو رکر ‘  ہنگولی ضلعے میں کلمنوری سے  سنتوش ٹار پھے ‘ پر بھنی ضلعے میں پا تھری سے  سُریش ورپوڈ کر ‘ اورنگ آباد ضلعے میں پھُلمبری سے ڈاکٹر کلیان کاڑے  ‘  لاتور ضلعے میں لاتور شہر حلقہ انتخاب سے  امیت دیشمکھ ‘  نلنگا  سے اشوک پاٹل نلینگیکر ‘  اوَ سا سے بسو راج پاٹل ‘   اورعثمان آ باد ضلعے میں تلجاپور سے رکن اسمبلی مدھو کر رائو چو دھری کو پارٹی امید وار نامزد کیا گیا ہے۔
  پہلی فہرست میں کانگریس پارٹی نے23؍ موجودہ اراکینِ اسمبلی کو دو بارہ موقع دیا ہے جبکہ 18؍ نئے چہرے شامل کیئے گئے ہیں۔ عام آدمی پارٹی کی جانب سے بھی کل مزید سات امید واروں کے ناموں کا اعلان کیا گیا ہے۔جس میں جالنہ سے کیلاس پھولاری کو امید واری دی گئی ہے جبکہ دیگر حلقوں میں تھا نہ ‘  شو لا پور اور پو نا  ضلعے کے امید واروں کے نام شامل ہیں ۔

***** ***** ***** 

 مہاراشٹر او رہر یانہ میں ہونے والے اسمبلی انتخا بات کے لیے امید واروں کے ناموں پر غور کرنے کے مقصد سے بی جے پی کی مرکزی انتخا بی کمیٹی کی میٹنگ کل نئی دِلّی ہو ئی۔ اِس اجلاس میں وزیر اعظم نریندر مودی بھی موجود تھے۔ ذرائع سے ملی اطلاع کے مطا بق اِس اجلاس میں شیو سینا کے ساتھ اتحاد کے لیے نشتیوں کی تقسیم سے متعلق بھی اتفاق کر لیا گیا  اور
دونوں پارٹیوں کے اتحاد سے متعلق آج یاکل اعلان ہونے کا امکان ہے ۔ شیو سینا کے لیے تقریباً سوّا  سو  نشستیں چھوڑ نے اور یہ انتخا بات موجودہ وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس کی قیادت میں لڑنے کا  فیصلہ بھی اِس اجلاس کیا گیا۔
 اِسی دوران شیو سینا پارٹی کے سر براہ اُدھو ٹھا کرے نے کل ممبئی میں تقریباً سبھی موجودہ اراکینِ اسمبلی میں امید واری کے لیے لازمی  اے  بی   فارم تقسیم کیئے۔  فارم پانے والوں میں اورنگ آباد مغرب حلقے سے سنجئے شر ساٹھ ‘  پیٹھن سے  سندیپان بھومرے  ‘  جالنہ سے مملکتی وزیر ارجن کھو تکر ‘ ہنگولی سے سنتوش بانگر  ‘ عثمان آباد سے گیان راج چو گُلے اور واشم سے وشوناتھ سانپ کا نام شامل ہیں۔

***** ***** ***** 

  شیتکری کامگار پارٹی نے شولا پور ضلعے میں سانگولا اسمبلی حلقہ انتخاب سے پارٹی کے با وُثوق امید وار کی حیثیت سے بھائو صاحیب روپنرکو نامزد کیا ہے۔ رکن اسمبلی گنپت رائو دیشمکھ اور پارٹی کے سیکریٹری رکن اسمبلی جینت پاٹل نے کل یہ اعلان کیا۔ واضح رہے کہ اِس حلقے پر گذشتہ 50؍ برسوں سے سیشیتکری کامگار پارٹی کا غلبہ ہے۔ 

***** ***** ***** 

  مرکزی حکو مت نے پیاز کی بڑھتی قیمتوں پر قا بو پانے کے لیے تمام اقسام کی پیاز بر آمد کرنے پر پا بندی عائد کر دی ہے۔ یہ پا بندی فور ی طورپر نافذ کر دی گئی ہے۔کامرس کی مرکزی وزا رت نے پیاز کی بر آمد سے متعلق پالیسی میں اصلاح کرنے کے بعد یہ فیصلہ کیا ہے۔ اِس سے قبل مرکزی حکو مت نے جوائنٹ سیکریٹری درجہ کے دو افسران کو پیاز کی دستیا بی کا صحیح اندازلگا نے اور بازار میں مزید پیاز کی فراہمی  سے متعلق کسانوں ‘ تاجروں اور بر آمد کنند گان سے بات چیت کرنے کے لیے  مہاراشٹر بھیجا تھا  ۔ خوراک اور صارفین امور کے وزیر  رام وِلاس پاسوان نے بتا یا کہ مرکزی حکو مت ریاستوں کی  پیاز کی ضرورت پوری کرنے کے لیے تمام ضروری اقدا مات کرے گی۔

***** ***** ***** 

 نوجوان نسل ملک کا مستقبل ہے ۔ اُنھیں نشے کی لعنت سے بچا نے کے لیے حکو مت نے   ای  سگریٹ پر پا بندی عائد کی ہے۔  اِن خیا لا ت کا اظہار وزیر اعظم نریندر مودی نے کیا ۔ وہ کل آ کاشوانی سے نشر ہونے والے پروگرام من کی بات میں اظہار خیال کر رہے تھے۔ وزیر اعظم نے کہا کہ ہما ری تہذیب میں خواتین کو بہت زیادہ اہمیت دی جا تی ہے اسی لیے آئندہ دیوالی کے موقعے پر ملک بھر میں خواتین کے اعزاز میں مختلف پروگراموں کا اہتمام کر کے نئے انداز میں دیوالی منائیں۔
مودی نے کہا کہ اِسکے علا وہ سوشل میڈیا پر خواتین کی کا میابیوں کا بڑے پیما نے پر ذکر کیا جا نا چا ہیے۔ اپنے خطاب میں اُنھوں نے ملک بھر میں حا لیہ دنوں میں منائے جا رہے مختلف تہواروں اور آنے والے دنوں میں منا ئے جانے والے تہواروںکی مبارکباد بھی پیش کی۔ اِس موقعے پر اُنھوں نے عوام سے اپیل کی کہ ایک ہی مرتبہ قابل استعمال پلاسٹک کے خلاف آئندہ2؍ اکتوبر سے شروع ہونے جا رہی مہم میں ضرور حصہ لیں۔ 

***** ***** ***** 

 پر بھنی شہر میں کھنڈو با بازار میں پانی کے ممبے کے قریب پانی کی مین پائپ لائن پھوٹ جانے کی وجہ سے آبرسانی کا نظام درہم بر ہم ہو گیا ہے۔ جسکی وجہ سے شہر میں دو روز تک پانی فراہمی نہیں کی جا سکے گی۔ پر بھنی بلدیہ کے سٹی انجینئر وسیم پٹھان نے یہ اطلاع دی ہے۔ اُنھوں نے بتا یا کہ پائپ لائن کی مرمت کا کام جنگی پیما نے پر کیا جا رہا ہے۔

***** ***** *****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
**** 

v  विधानसभा निवडणुकीसाठी  काँग्रेसच्या  ५१ उमेदवारांची घोषणा; २३ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी; १८ नवीन चेहरे; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, सुरेश वरपूडकर आणि डॉक्टर कल्याण काळे यांचा समावेश
v  भारतीय जनता पक्ष- शिवसेना युतीच्या जागा निश्चित; आज किंवा उद्या घोषणा होण्याची शक्यता; शिवसेनेनं विद्यमान आमदारांना दिले एबी फार्म
v   दर नियंत्रणासाठी सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
v मुलींच्या सन्मानार्थ कार्यक्रमांचं आयोजन करून, त्यांचं स्वागत करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
आणि
v एक लाख रुपयांची लाच घेताना पैठणचा तहसिलदा महेश सावंतला अटक
****

 काँग्रेस पक्षानं राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काल ५१ उमेदवारांची पहिली यादी घोषित केली. यात नांदेड जिल्ह्यातल्या भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली. नांदेड उत्तरमधून डी.पी. सावंत, नायगाव- वसंतराव चव्हाण, देगलूर- रावसाहेब अंतापूरकर, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीतुन - संतोष टारफे, परभणी जिल्ह्यातल्या पाथरीतून  सुरेश वरपुडकर, औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्रीतून डॉक्टर कल्याण काळे, लातूर जिल्ह्यातल्या लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख, निलंगा -अशोक पाटील निलंगेकर, औसा- बसवराज पाटील, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरमधून आमदार मधुकरराव चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय संगमनेरमधून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, ब्रम्हपुरीतून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नागपूर उत्तर माजी मंत्री -नितीन राऊत, धारावी -वर्षा गायकवाड, सोलापूर मध्य- प्रणिती शिंदे, पलुस-कडेगावमधून विश्वजीत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसनं २३ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे तर यादीत १८ नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. ाशिवाय काही ाजी आमदारांनाही पुन्हा संधी देण्यात आली आहे.

 आम आदमी पक्षानंही काल आणखी सात उमेदवारांची घोषणा केली. यात जालन्यातून कैलास फुलारी यांच्यासह ठाणे, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातल्या उमेदवारांचा समावेश आहे.
****

 महाराष्ट्र आणि हरियाणातल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेसोबतच्या युतीसाठी जागा निश्चितीचं धोरणही ठरवण्यात आलं आहे. दोन्ही पक्षाच्या युतीची आज किंवा उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला जवळपास सव्वाशे जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्याबाबत निर्णय झाला असल्याचं सूत्रानं सांगितलं.

 दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जवळपास सर्वच विद्यमान आमदारांना काल मुंबईत उमेदवारीसाठी आवश्यक असलेले एबी फॉर्म वाटप केले. यात औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाठ, पैठण- संदीपान भुमरे, जालन्यातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर, हिंगोलीतून संतोष बागर, उमरग्यामधून ज्ञानराज चौगुले,  आणि वाशिममधून विश्वनाथ सानप यांचा समावेश आहे.
****

 सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब रूपनर यांच्या नावाची घोषणा काल आमदार गणपतराव देशमुख आणि पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली. गेल्या ५० वर्षापासून हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे. सलग ११ वेळा आमदार गणपतराव देशमुख यांनी या मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे.
****

 कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. ही बंदी तात्काळ प्रभावानं लागू झाली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयानं कांद्याच्या निर्यातीवरच्या बंदीबाबतच्या धोरणात दुरुस्ती करुन हा निर्णय घेतला. त्याआधी, कांद्याच्या उपलब्धतेचा नेमका अंदाज यावा, तसंच बाजारात आणखी कांदा आणण्याबाबत शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांना तयार करता यावं, यासाठी सरकारनं संयुक्त सचिव दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांना त्यांच्याशी चर्चा करण्याकरता महाराष्ट्रात पाठवलं होतं. केंद्र सरकार राज्यांच्या मागणीनुसार त्यांना कांद्याचा पुरवठा करत आहे. सरकार कांद्याची मागणी भागवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करेल, असं अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री राम विलास पासवान यांनी सांगितलं.
****

 मुलींच्या सन्मानार्थ कार्यक्रमांचं आयोजन करून, नव्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते काल बोलत होते. या श्रृंखलेचा सत्तावन्नावा भाग काल प्रसारित झाला. आपल्या संस्कृतीमध्ये मुलींना लक्ष्मी मानलं गेलं आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत गावांमध्ये आणि शहरांमध्ये मुलींच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचं आयोजन करावं, त्याचबरोबर आपल्या मुलींच्या यशाबद्दल सामाजिक माध्यमातून अधिकाधिक माहिती शेअर करावी, यासाठी ‘भारत की लक्ष्मी’ या हॅशटॅगचा वापर करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. सध्या देशभरात सुरू झालेल्या नवरात्र, गरबा, दुर्गापूजा आणि येणाऱ्या दसरा, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा अशा सर्व सणांनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

 दोन ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकवेळ उपयोगात येणाऱ्या प्लास्टिक मुक्ती मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 खरेदी केलेली कुळाची जमिन परत मिळण्याच्या मूळ मालकाच्यावतीनं दाखल झालेल्या प्रकरणात, तक्रारदाराच्या बाजूनं निकाल देण्यासाठी एक लाख रुपयांची लाच घेताना औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठणचे तहसिलदार महेश सावंत यांच्यासह तिघाजणांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. विधिज्ञ कैलास सोपान लिपणे पाटील आणि बद्रीनाथ कडूबा भवर अशी अन्य दोघांची नावं आहेत. तहसिलदारानं सावंत यांनी तक्रारदाराच्या बाजूनं निकाल देण्याकरता लिपणे यांच्या मार्फत ३० लाख रूपयांची लाच मागितली होती. या लाचेचा पहिला हप्ता भवर मार्फत स्वीकारताना काल या तिघांना पकडण्यात आलं. 
****

 शारदीय नवरात्रोत्सवाला काल उत्साहात सुरुवात झाली. उत्सवाचा पहिलाच दिवस पर्यटक आणि भाविकांनी देवीच्या सर्वच ठिकाणच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. देवीच्या महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात संबळ-तुतारीच्या निनादात आणि आई राजा उदे उदेच्या जयघोषात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.

 नांदेड जिल्ह्यातल्या माहूर गडावरील रेणुका मातेच्या, तसंच बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी देवीच्या उत्सवालाही काल मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. कोल्हापूर इथं महालक्ष्मीच्या मंदिरात सकाळी साडे आठ वाजता तोफेची सलामी देत देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली. परभणी जिल्ह्यातही नवरात्रोत्सवाला पारंपारिक पद्धतीनं सुरुवात झाली.

 औरंगाबाद शहरात कर्णपुरा देवीच्या मंदिरात काल पहाटे महापूजा, आरती आणि घटस्थापना करण्यात आली.
****

 नवरात्र महोत्सवानिमित्त पंढरपूर इथल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रुक्मिणी मंदिरात फुलांची, तर विठ्ठल मंदिरात तुळशीच्या पानांची आरास करण्यात आली आहे. चौथ्या माळेला रुक्मिणीला फुलांची साडी, तर दसऱ्याच्या दिवशी सोन्याची साडीने सजवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाचे प्रभारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी गुरव यांनी दिली.
****

 तुळजापूरच्या तुळजाभवानीसाठीचा अहमदनगर जिल्ह्यातल्या निंबलक येथून पलंग पाठवण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे. काल या पलंगाचं प्रस्थान झालं असून, अहमदनगर शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढून हा पलंग तुळजापूरकडे मार्गस्थ झाला.
****

 काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं प्रचार फेरी काढून शक्ती प्रदर्शन केलं. या फेरीत आमदार मिता चव्हाण, आमदार अमर राजूरकर सहभागी झाले होते. नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांनी सहकुटुंब माहूर इथं जाऊन रेणुकामातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर भोकर इथं येऊन कालपासून प्रचाराला प्रारंभ केला.

 दरम्यान, चव्हाण हे आज भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
****

 साहित्यिकांना आपल्या साहित्याबद्दल ममत्व असणं ही बाब घातक असल्याचं मत ज्येष्ठ साहित्यिक, चित्रकार  भ. मा. परसवाळे यांनी व्यक्त केलं आहे. हिंगोली इथं झालेल्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या ७६वा वर्धापन दिन सोहळ्यात ते काल बोलत होते. निरपेक्ष बुद्धीनं साहित्याची निर्मिती होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. यावेळी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉक्टर दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिकराव अतकरे, समीक्षक-विचारवंत ऋषिकेश कांबळे, माजी प्राचार्य जे. एम. मंत्री यांची  उपस्थित होती.
****

 परभणी शहरातल्या खंडोबा बाजार इथल्या जलकुंभ परिसरातली मुख्य जलवाहिनी फुटल्यानं पाणी वितरण व्यवस्था खोळंबली आहे. जलवाहिनी दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून, शहरात दोन दिवस पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेचे शहर अभियंता वसीम पठाण यांनी दिली.
****

 नांदेड जिल्ह्यात जिल्हाधिकारी अरुण डोंगरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून गरोदर महिलांसाठी 'दुर्गा बाळ गणेश महोत्सव' साजरा करण्यात येत आहे. गरोदर माता आणि नवजात शिशुंचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून, याअंतर्गत महिलांना आरोग्य, आहारासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या १६ ग्रामिण आणि आदिवासी प्रकल्पांतून ९० अंगणवाडी पर्यवेक्षिकांमार्फत २७० अंगणवाडी केंद्रातल्या दोन हजार २४७ गरोदर महिलांसाठी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात येत आहे.
*****
***

Sunday, 29 September 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.09.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –29 September 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर २०१ सायंकाळी ६.००
****
महाराष्ट्र आणि हरियाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती निवडणूक समितीची बैठक नवी दिल्ली इथं पक्षाच्या मुख्यालयात सुरू झाली आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ आणि राज्य स्तरावरचे नेते उपस्थित असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मतदारांच्या सोयीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत असून, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘सी व्हिजिल’ या ॲप्लिकेशनसह दिव्यांगासाठी ‘पी डब्ल्यू डी’ आणि ‘व्होटर्स हेल्पलाईन’ ही ॲप्लिकेशन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे तीनही ॲप्स गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहेत.
आदर्श आचारसंहितेच्या भंग झाल्याची तक्रार करण्यासाठी ‘सी व्हिजिल’ या प्रभावी ॲपचा वापर करता येऊ शकतो. या निवडणुकीत दिव्यांग नागरिकांना मतदान करणं सोयीचं व्हावं, यासाठी ‘पी डब्ल्यू डी’ हे ॲप विकसित केलेलं आहे. तसंच ‘व्होटर्स हेल्पलाईन’ या ॲपद्वारे मतदार यादीतील नाव शोधणं, नवीन अर्ज अथवा यादीतल्या नावाचं हस्तांतरण सहज शक्य असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
मतदारांना मतदान केंद्र आणि मतदार यादीतील त्यांचा क्रमांक मिळण्याची सुविधा निवडणूक आयोगाच्या इलेक्टोरल सर्च डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचं औचित्य साधून त्यावर मतदानाची तारीखही छापण्यात आली आहे. ही माहिती फक्त मतदारांच्या सोयीसाठी असून, ती ओळखपत्र म्हणून वापरता येणार नाही, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
देवीच्या महाराष्ट्रातल्या साडे तीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात आज शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरुवात झाली. संबळ-तुतारीच्या निनादात आणि आई राजा उदे उदे च्या जयघोषात उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.
नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावरील रेणुका मातेच्या, तसंच बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई इथल्या योगेश्वरी देवीच्या उत्सवालाही आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. कोल्हापूर इथं महालक्ष्मीच्या मंदिरात सकाळी साडेआठ वाजता तोफेची सलामी देत देवीच्या मंदिरात घटस्थापना करण्यात आली.
उत्सवाचा पहिलाच दिवस आणि रविवारची सुटी असल्यामुळे पर्यटक आणि भाविकांनी देवीच्या सर्वच ठिकाणच्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
****
औरंगाबाद इथल्या ऐतिहासिक कर्णपुरा देवीच्या यात्रेला आजपासून सुरवात झाली आहे. नवरात्रातील नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात आज पहाटे महापूजा, आरती आणि घटस्थापना करण्यात आली. दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षा आणि व्यवस्थेची चोख तयारी करण्यात आली असून, लहान मुलांसाठी खेळणी, गृहोपयोगी वस्तूंची दुकानेही येथे थाटलेली आहेत.
****
काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी आज नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथं प्रचारफेरी काढून शक्ती प्रदर्शन केलं. या फेरीत आमदार अमिता चव्हाण, आमदार अमर राजूरकर सहभागी झाले होते. नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांनी सहकुटुंब माहूर इथं जाऊन रेणुकामातेचं दर्शन घेतलं. त्यानंतर भोकर इथं येऊन आजपासून प्रचाराला प्रारंभ केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून भाऊसाहेब रूपनर यांच्या नावाची घोषणा आज आमदार गणपतराव देशमुख आणि पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
गेल्या ५० वर्षापासून हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे. सलग ११ वेळा आमदार गणपतराव देशमुख यांनी या मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं आहे. वयोमानामुळे पुढील निवडणूक लढविणं शक्य नसल्यानं पक्षानं दुसरा उमेदवार द्यावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यावर आज पत्रकार परिषद घेऊन पुढील उमेदवार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.09.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29  September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर २०१ दुपारी .०० वा.
****

 युवा पिढी हे देशाचं भवितव्य आहे. नशेच्या व्यसनांमुळे युवकांची पिढी उध्वस्त होऊ नये, यासाठीच सरकारनं ई-सिगारेटवर निर्बंध लावले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमात ते बोलत होते. तंबाखूचं व्यसन सोडून द्या आणि ई-सिगारेटबाबत कोणतेही गैरसमज बाळगू नका, असं सांगत त्यांनी आरोग्यपूर्ण भारताच्या निर्मितीसाठी संकल्प करण्याचं आवाहन केलं. पर्यटनाविषयीच्या स्पर्धात्मक निर्देशांकात भारताच्या स्थानात सुधारणा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

 सध्या देशभरात सुरू झालेल्या नवरात्र, गरबा, दुर्गा पूजा आणि येणाऱ्या दसरा, दिवाळी, भाऊबीज, छठपूजा अशा सर्व सणांनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या. आपल्या संस्कृतीमध्ये मुलींना लक्ष्मी मानलं गेलं आहे. त्यामुळे येत्या दिवाळीत गावांमध्ये, शहरांमध्ये मुलींच्या सन्मानार्थ कार्यक्रमांचं आयोजन करून नव्या पद्धतीनं लक्ष्मीचं स्वागत करावं. आपल्या मुलींच्या यशाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक माहिती शेअर करावी आणि ‘भारत की लक्ष्मी’ या हॅशटॅगचा वापर करावा, असंही नरेंद्र मोदी यांनी सुचवलं.

 दिवाळीत कुठेही फटाक्यांमुळे आगीच्या दुर्घटना होऊ नयेत, कोणाचं नुकसान होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली. तसंच २ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या सिंगल युज प्लास्टिक मुक्ती मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं. येत्या १३ ऑक्टोबरला पोप फ्रान्सिस यांच्याकडून मरियम थ्रेसिया यांना संत पद घोषित केलं जाईल. यानिमित्त पंतप्रधानांनी सिस्टर मरियम थ्रेसिया यांना श्रद्धांजली अर्पण करत, देशातल्या ख्रिस्ती नागरिकांचं अभिनंदन केलं.
****

 महाराष्ट्र आणि हरियाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतल्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाची मध्यवर्ती निवडणूक समिती आज संध्याकाळी बैठक घेणार आहे. नवी दिल्ली इथं पक्षाच्या मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

 दोन्ही केंद्रीय मतदारसंघांतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी कॉंग्रेस मध्यवर्ती निवडणूक समितीची बैठक उद्या होणार आहे.
****

 राज्यात मतदारांची संख्या वाढल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी एक हजार १८८ सहायक मतदान केंद्रं सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्राची एकूण संख्या ९६ हजार ६६१ एवढी असणार आहे. साधारणपणे चौदाशे मतदारांमागे एक मतदान केंद्र, असं प्रमाण आहे. गेल्या काही दिवसांत मतदारांना नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली होती, यामध्ये मतदारांची वाढ झाल्याचं दिसून आल्यानं मतदान केंद्रंही वाढण्यात आल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे.
****
 विधानसभा निवडणुकीत प्रशासनानं विविध पथकांची नियुक्ती केली आहे. स्थायी पथक, व्हिडीओ सर्वेक्षण पथक आणि तपासणी नाका पथकांमधील कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेत प्रामाणिकपणे काम करावं. उमेदवारांच्या खर्चावर बारकाईनं लक्ष ठेवून प्रत्येक खर्चाची नोंद करावी, अशा सूचना बुलढाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी आज दिल्या. या सर्व पथकांच्या समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या.
****

 नवरात्र महोत्सवानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रुक्मिणी मंदिरात फुलांची, तर विठ्ठल मंदिरात तुळशीच्या पानांची आरास करण्यात आली आहे. चौथ्या माळेला रुक्मिणीला फुलांची साडी, तर दसऱ्याच्या दिवशी सोन्याची साडी नेसवण्यात येणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाचे प्रभारी अधिकारी गजानन गुरव आणि व्यवस्थापक बालाजी गुरव यांनी दिली.
****

 बेल्जियम इथं सुरू असलेल्या हॉकी सामन्यांमध्ये भारताच्या पुरूष हॉकी संघानं जागतिक क्रमवारीत ८ व्या क्रमांकावर असलेल्या स्पेन संघाचा ६-१ नं पराभव केला.
*****
***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.09.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 September 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ सप्टेंबर २०१ सकाळी ७.१० मि.
****  

v  विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता
v  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव गोवल्यामुळे उद्विग्नतेून राजीनामा दिल्याचं, अजित पवार यांचं स्पष्टीकरण
v  शिवसेनाप्रमुखांना दिलेल्या वचनानुसार, राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसवण्याचा निर्धार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून व्यक्त
v समाज माध्यमांवर खोट्या बातम्यांचं प्रमाण वाढलं- ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई
आणि
v  शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ
****

 विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. अमेरिका दौऱ्यावरून काल परतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपच्या संसदीय समितीची आज बैठक होईल,  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता, पक्षाच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या जवळपास १०० उमेदवारांच यादीही आज जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी १२५ जागा लढवण्याचा आणि ३८ जागा मित्र पक्षांना देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. काल या दोन्ही पक्षांनी मित्र पक्षांना द्यावयाच्या ३८ जागांबाबत चर्चा केली. आज याबाबत निर्णय होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.
****

 महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव गोवल्यामुळे आलेल्या उद्विग्नतेून राजीनामा दिल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार यांनी परवा सायंकाळी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते काल दुपारपर्यंत कोणाच्याही संपर्कात नव्हते. काल दुपारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार हे राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर नव्हते, बँकेचे सभासद नव्हते, त्यांचा दुरान्वयानेही संबंध नव्हता, तरीही त्यांचं नाव या प्रकरणात आणलं गेलं, हा सगळा निव्वळ बदनामीचा डाव असल्याचंही अजित पवार म्हणाले. जवळपास अकरा हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या, राज्य सहकारी बँकेत पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा कसा होणार, असा प्रश्नही अजित पवार यांनी उपस्थित केला.
****

 सरकार सूडबुद्धीचं राजकारण करत असल्याचं शरद पवार यांचं म्हणणं चुकीचं आणि न्याय व्यवस्थेवर संशय घेणारं आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं एका कार्यक्रमात बोलत होते. शिखर बॅँक घोटाळ्यासंदर्भात उच्च न्यायालयात २०१५ मध्ये जनहित याचिका दाखल झाली होती, आणि त्यात शरद पवार यांचं नाव असून, उच्च न्यायालयाच्या आदेशान्वयेच गुन्हा दाखल झाल्याची माहितीही भंडारी यांनी दिली.
****

 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेल्या वचनानुसार, राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकाला बसवण्याचा निर्धार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत, पक्षाच्या जिल्हाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील, असा दावा भाजप नेत्यांकडून केला जात आहे, त्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांचं हे विधान महत्त्वाचं असून, शिवसेनेकडे अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद मागितलं जाणार असल्याचे, हे संकेत मानले जात आहेत. भाजप- शिवसेना युतीबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी बोलणं झालं असून, लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असंही ठाकरे यांनी सांगितलं.
****

 स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार, लोकभारती, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आणि बहुजन विकास पार्टी या सर्व पक्षांनी मिळून काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीकडे ५० जागा मागितल्या आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांनी काल सांगली इथं ही माहिती दिली. आघाडीनं मात्र ३८ जागा देण्याचं मान्य केलं असून, उर्वरित १२ जागांसाठी चर्चा सुरू असल्याचं शेट्टी यांनी सांगितलं.
****

 कायम खाते क्रमांक - पॅन आणि आधार क्रमांक लिंक करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाने येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदत उद्या ३० सप्टेंबर रोजी संपणार होती, मात्र ही मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली असल्याचं, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या परिपत्रकात म्हटलं आहे.
****

 ‘मन की बात' या आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या कार्यक्रम श्रृंखलेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी ११ वाजता देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. मन की बात या कार्यक्रम मालिकेचा हा सत्तावन्नावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरुन या कार्यक्रमाचं प्रसारण होईल.
****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****

 पत्रकारिता हा सध्या व्यवसाय झाला असून, समाज माध्यमांवर खोट्या बातम्यांचं प्रमाण वाढल्याची खंत, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. काल औरंगाबाद इथं, महात्मा गांधी मिशनच्या वतीनं घेण्यात आलेल्या अरूण साधू स्मृती व्याख्यानमालेत ‘आजची माध्यमं आणि राजकारण’ या विषयावर ते बोलत होते. समाज जोडण्याचं आणि समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम पत्रकारितेच्या माध्यमातून होणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. खासदार कुमार केतकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर तीव्र टीका केली. चुकीचा इतिहास लिहिला जात असल्याचा आरोपही केतकर यांनी यावेळी केला.
****

 शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. मराठवाड्यात माहूर इथली रेणुका देवी, तुळजापूर इथली तुळजाभवानी तसंच अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीच्या मंदिरात घटस्थापनेनं विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ होईल. तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा पूर्ण होऊन, देवी आज पहाटे सिंहासनारूढ झाली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास घटस्थापना होणार आहे. राज्यात कोल्हापूर इथं अंबाबाई देवी तसंच नाशिक जिल्ह्यातल्या सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरातही नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक उपक्रम होणार असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****

 शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी विद्यापीठाला बळ मिळावं, यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या मुंबई शाखेचे संचालक प्राध्यापक शुभाशिष चौधुरी यांनी केलं आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा बावीसावा दीक्षान्त समारंभ काल झाला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कुलगुरू डॉ.उद्धव भोसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पदवी मिळवणं हे सहजसाध्य असेलही, पण ज्ञान मिळवणं अवघड आहे. ज्ञान हे गतीमान असल्यामुळे, आपला संशोधन लेख प्रकाशित होईपर्यंत, त्यातली अर्धी मूल्यं कमी होतात, याचं भान ठेवून वाटचाल करावी, असा सल्लाही प्राध्यापक चौधुरी यांनी यावेळी दिला.
****

 परभणी जिल्ह्यात आचारसंहितेच्या भंगाचा गुन्हा काल नोंदवण्यात आला. जिंतूर तालुक्यातल्या मौजे कोरवाडी इथं आमदार विजय भांबळे यांच्या स्थानिक विकास निधीतून सांस्कृतिक सभागृह सभामंडप बांधकाम उद्घाटनाचा फलक कायम राहिला होता. ग्रामसेवक संदीप बारवे यांनी यात दोषी आढळल्यानं त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****

 परभणी महानगर पालिकेच्यावतीनं शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून ही मोहीम रात्रीच्यावेळी राबवण्यात येत आहे. या अभियानासाठी महापालिकेनं आधिकारी आणि कर्मचार्यांच्या पथकांची नियुक्ती केली असून, त्याद्वारे जनजागृती करण्याचं काम सुरु आहे.
****

 जालना इथं झालेल्या १४ वर्षांखालील मुलामुलींच्या राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेत काल झालेल्या अंतिम सामन्यात मुलांच्या गटात कोल्हापूरच्या संघानं पुणे संघाचा पराभव करत विजय मिळवला. तर मुलींच्या गटात पुण्याच्या संघानं, लातूर संघाचा पराभव करत पहिलं स्थान पटकावलं. या स्पर्धेतून १४ वर्षांखालील राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी मुला, मुलींच्या महाराष्ट्र संघाची निवड करण्यात आली.
****

 नाशिक पुणे महामार्गावर काल संध्याकाळी ट्रक आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. सिन्नर शिवारात गायींचा कळप आल्यानं कार चालकानं अचानक ब्रेक दाबला, त्यामुळे मागून येणारा ट्रक कारवर आदळल्याचं सिन्नर पोलिसांनी सांगितलं. 
****

 कृष्णा खोऱ्यातलं पुराचं पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्यासह दुष्काळी भागात नेण्याची योजना, प्राधान्यक्रमाने राबवली पाहिजे, असं मत, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं आहे. ते काल कोल्हापूर जिल्ह्यात कवठेमहांकाळ इथं, शिवसेना मेळाव्यात बोलत होते. सांगली कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी वेळीच मार्ग काढणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या भागातली शेती आणि शेतकरी उध्वस्त झाला आहे, त्यांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे, असंही खासदार माने म्हणाले.
*****
***