आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
▼
Sunday, 31 May 2020
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.05.2020 18.00
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31
May 2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ मे २०२० सायंकाळी ६.००
****
Ø
राज्याच्या
प्रतिबंधित- कंटेनमेंट क्षेत्र वगळता अन्य भागात विविध व्यवहार
सुरू करण्यास राज्य सरकारची
परवानगी. शाळा, महाविद्यालयं बंदच राहणार.
Ø राज्यातल्या
५२
हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचं
वितरण सुरळीत सुरु. अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ.
Ø
पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर यांची जयंती साजरी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी
केलं अभिवादन.
आणि
Ø
मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, लातूरसह अनेक
ठिकाणी मोसमी पावसाची हजेरी.
****
प्रतिबंधित- कंटेनमेंट
क्षेत्र वगळता अन्य भागात विविध व्यवहार सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य
सरकारनं आज घेतला आहे. या संदर्भातल्या मार्गदर्शक
सूचना आज राज्य सरकारनं जारी केल्या.
राज्यातल्या सर्वाधिक
रूग्णांची संख्या आणि कंटेनमेंट क्षेत्र असलेल्या मुंबई महानगर क्षेत्रासह, पुणे, सोलापूर,
औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, आणि नागपूर या महानगरपालिकांच्या
हद्दीत विविध व्यवहार सुरू करण्यासही राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. या महानगरपालिकांच्या
क्षेत्रात पहिल्या टप्प्यात येत्या ३ जून म्हणजे बुधवारपासून काही अटींवर समुद्र किनारे, सार्वजनिक किंवा खाजगी मैदानं, बागांमध्ये
शारिरीक व्यायाम करण्यास अनुमती देण्यात आली आहे. यामध्ये सायकलिंग, धावणे, चालणे यासारख्या व्यायामांचा समावेश आहे.
प्लंबर, इलेक्ट्रीशियन,
पेस्ट कंट्रोल आणि तांत्रिक स्वयं रोजगार व्यवसाय करणाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझरचा
वापर आणि एकमेकांत अंतर ठेऊन व्यवसाय करण्यास, वाहन दुरूस्तीचे गॅरेज आणि वर्कशॉपही
सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सर्व शासकीय कार्यालयं
१५ कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात पाच जूनपासून सकाळी ९ ते संध्याकाळी पाच
वाजेपर्यंत मॉल्स आणि व्यापारी
संकुलं वगळता सर्व दुकानं आणि बाजारपेठा एकदिवस एका बाजूची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या बाजूची या आधारावर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कपड्यांच्या
दुकानातल्या ट्रायल रूम्स बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर एकदा खरेदी केलेले
कपडे बदलण्यासही परवानगी असणार नाही.
टॅक्सी, रिक्षा, चारचाकी वाहनातून चालकासह दोन
व्यक्तींना, तर दुचाकीवर केवळ एका व्यक्तीलाच प्रवासाची
परवानगी देण्यात आली आहे.
तिसऱ्या टप्प्याला आठ
जूनपासून प्रारंभ होईल, या टप्प्यात सर्व खाजगी कार्यालय १० टक्के कर्मचाऱ्यांच्या
उपस्थितीत सुरू करता येतील.
शाळा, महाविद्यालयं,
शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय विमान सेवा,
मेट्रो रेल, चित्रपट गृहं, जिम्स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह,
मद्यालयं, प्रेक्षागृहं, सभामंडप तसंच सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य गर्दी होणारे कार्यक्रमांवर राज्यभर बंदी कायम असणार आहे. याशिवाय धार्मिक आणि प्रार्थना
स्थळंही बंदच राहणार आहेत. सलून, ब्युटीपार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट
आणि इतर अतिथी सेवांवरही राज्य सरकारनं बंदी कायम
ठेवली आहे. या सेवा वगळता अन्य सर्व सेवा राज्यात सुरू करण्यास परवानगी देण्यात
आली आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची
आज जयंती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या
मातोश्री निवासस्थानी पुण्यश्लोक
अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन
केलं. प्रजेच्या
सुखासाठी अहिल्यादेवींनी दानधर्माच्या माध्यमातून अनेक चांगली कामं केली, जी आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष
देतात, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनीही अहिल्यादेवींना अभिवादन केलं. प्रजाहितदक्ष राज्यकर्ता कसा असावा,
हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिल्याचं उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
राज्यातल्या ५२ हजार ४२८ स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचं वितरण सुरळीत सुरु असून
मे महिन्यात ७३ लाख ६५ हजार ४०० क्विंटल अन्नधान्याचं वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी
पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
तसंच या
काळात ३२ लाख ७७ हजार ७७८ शिवभोजन थाळ्यांचं वाटप करण्यात आलं असून, पंतप्रधान गरीब कल्याण
अन्न योजनेत एप्रिल ते जून या काळात प्रत्येक लाभार्थ्याला दरमहा ५ किलो तांदूळ, तसंच
प्रत्येक शिधापत्रिका धारकाला १ किलो तूर किंवा चणा डाळ मोफत देण्याची योजना सुरु असल्याची
माहिती ही भुजबळ यांनी दिली. टंचाई
भासवून चढ्या दरानं धान्य विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या
औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
मराठवाड्यात अनेक ठिकाणी
आज मोसमी पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद
जिल्ह्यातल्या सिल्लोड
तालुका परिसरात दुपारी ४ वाजेनंतर
वादळी वारा, मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. फुलंब्री तालुक्यातल्या वडोद बाजार इथंही आज ५ वाजेच्या सुमारास पावसाच्या
सरी कोसळल्या. जालना जिल्ह्यातल्या
भोकरदन तालुक्यातल्या राजूर परिसरात सुमारे अर्धातास वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी झाडंही उन्मळून पडली.
लातूर जिल्ह्यातल्या लातूर, शिरूर अनंतपाळ तालुक्यांतही आज ढगांच्या गडगडाटासह मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. हिंगोली जिल्ह्यातल्या
नर्सी नामदेव परिसरात काही वेळापूर्वी वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला आहे. बीड
जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातही आज विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. परभणीच्या
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं येत्या तीन दिवस मराठवाड्यात
मोसमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या
गंगापूर इथं असलेल्या बुलढाणा अर्बन बँकेच्या वखारीला काल रात्री लागलेली आग पूर्णपणे
विझवण्यात आज दुपारी यश आलं. औरंगाबाद महानगर पालिकेच्या दोन, तर गंगापूर नगरपरिषदेच्या
एका बंबाच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणायला अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाच
तास लागले. या भीषण आगीमुळे गोदाम पूर्णपणे कोसळलं. या घटनेत जीवित हानी झाली नसली,
तरी सोयाबीन, तांदूळ, कापसाच्या गाठी, तूर आणि मका मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याची
माहिती अग्निशमन विभागानं दिली आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या
परतूर तालुक्यातल्या मापेगाव इथल्या ४५ वर्षीय मृत व्यक्तीचा अहवाल आज सकाळी कोरोना
विषाणूग्रस्त असा आला आहे. जालना तालुक्यातल्या गोलापांगरी इथल्या एका अंगणवाडी सेविकेचा
अहवालही कोरोनाबाधित असा आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी
दिली. मापेगाव इथला रुग्ण परवा दुपारी न्यूमोनिया आजारावर उपचार घेण्यासाठी जिल्हा
सरकारी रुग्णालयात दाखल झाला होता. काल पहाटे या रुग्णाचा जिल्हा रुग्णालयात उपचार
सुरू असताना मृत्यू झाला होता. जालना जिल्ह्यातला कोरोना विषाणुमुळे झालेला हा पहिला
मृत्यू आहे.
****
नांदेड जिल्ह्यात आज
आणखी दोन कोरोनाविषाणू बाधित रूग्ण आढळून आले. आता जिल्ह्यात एकूण कोरोनाविषाणू बाधित
रुग्णांची संख्या १४६ झाली आहे. हे दोन्ही रूग्ण मुखेड तालुक्यातल्या भेंडेगाव इथले
आहेत. ते मुंबईहून नुकतेच परतले आहेत. नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत १०३ रूग्ण बरे होऊन
घरी परतले आहेत, तर ३५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
नांदेड शहरात प्रतिबंधित
क्षेत्रामधल्या नागरिकांना
मानसिक आधार देऊन त्यांचं समुपदेशन करण्यासाठी इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयातल्या
सहयोगी प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत, त्या भागात हे तज्ज्ञ फिरून समुपदेशन करतील,
अशी माहिती जिल्हाधिकारी
डॉ. विपिन ईटनकर यांनी दिली.
****
लातूर जिल्ह्यातल्या
प्रत्येक कोरोनाबाधित क्षेत्रामध्ये व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून त्या त्या भागतल्या
नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवल्या जाणार असल्याचं जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी
सांगितलं आहे. या भागांमध्ये एकेका महिला अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या अधिकाऱ्याकडे आपल्या मागण्या आणि समस्या वैयक्तिक पातळीवरही नोंदवता येणार आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये व्हाट्सअप ग्रुपची सुरुवात करणारा लातूर जिल्हा राज्यात एकमेव
असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता परभणी जिल्हा प्रशासनानं प्रतिबंधात्मक
उपाययोजना म्हणून, उद्या एक
जूनपासून पुढील आदेशापर्यंत दुपारी
तीन ते सकाळी सात वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त कोणालाही
फिरता येणार नाही. प्रतिबंधित क्षेत्र वगळता दुकानं आणि आस्थापना सुरू करण्यासंदर्भात दिवस, वेळ आणि वार निश्चीत
करण्यात आले असून, सकाळी ७ ते दुपारी
३ वाजेपर्यंतच हे व्यवहार सुरू राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिले आहेत.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या मलकापूर
शहरात आज तीन कोरोनाबाधित रुग्ण
आढळून आले. यामुळे बुलडाणा जिल्ह्यातली कोरोना बाधितांची संख्या आता एकोणसाठ वर
पोहोचली आहे. त्यापैकी ३३ रुग्ण बरे
झाले असून, २३ कोरोना बाधित रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
*****
***
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE –31 MAY 2020 TIME – 13.00
Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May
2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ३१ मे २०२० दुपारी १.०० वा.
****
पाणी ही आपली एक जबाबदारी
आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात गावागावात सोप्या पारंपरिक उपायांनी पाणी जिरवलं पाहिजे,
असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाद्वारे
त्यांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. येणाऱ्या पाच जून रोजी 'पर्यावरण दिना'निमित्त
प्रत्येकानं आपापल्या परिसरात काही झाडं लावावीत, तसंच उष्णता वाढत असल्यामुळे पक्ष्यांसाठी
पाण्याची व्यवस्था करावी असंही ते म्हणाले.
कोरोनाच्या साथीच्या आजाराविरुद्ध
देश लढा देत असतानाच, पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये अम्फानचा चक्रीवादळामुळे नागरिक,
विशेषतः शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. तरीही जनतेनं मोठ्या धैर्यानं या परिस्थितीचा
सामना केल्याचं सांगत, पश्चिम बंगाल आणि ओदिशाच्या नागरिकांच्या पाठिशी संपूर्ण देश
उभा आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसंच देशाच्या अनेक भागांमध्ये टोळधाडीनं केलेलं
नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचे कृषी विभाग शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी आधुनिक साधनांचा उपयोग करीत आहेत. नवीन शोधांवरही
लक्ष देत आहेत, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
कोरोना विषाणूच्या साथीदरम्यान
मोठ्या प्रयत्नांनी सावरलेली परिस्थिती पुन्हा बिघडू द्यायची नसेल, तर प्रत्येकानं
परस्परांतलं ६ फुटांचं अंतर, चेहऱ्यावर मास्क आणि हात धुणे, या सावधगिरीच्या उपायांचं
पालन करायचं आहे, हेही नरेंद्र मोदी यांनी आवर्जून सांगितलं.
****
कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार
करण्यासाठी अधिकाधिक डॉक्टर आणि परिचारिकांना मानधन तत्वावर सेवेत घेण्यात यावं, असे
निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज दिले आहेत. त्यानुसार ४५ वर्षांपेक्षा
कमी वयाच्या निरोगी आणि अंतर्वासिता पूर्ण केलेल्या नोंदणीकृत डॉक्टरांना मानधन तत्त्वावर
कोविड कालावधीसाठी गरजेनुसार घेण्यात येणार आहे. या डॉक्टरांना दरमहा ८० हजार रुपये
मानधन दिलं जाईल. तसंच भूलतज्ज्ञ आणि अतीव दक्षता तज्ज्ञांना दरमहा दोन लाख रुपये मानधन
देण्यात येणार आहे.
मुंबईतली परिचारिकांची कमतरता
भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर तातडीनं सेवेत घेण्यात येणार असल्याचं याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
टाळेबंदी सुरू झाल्यापासून
राज्यात आतापर्यंत कोरोना संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ४ लाख ३७ हजार ६५५ परवाने पोलीस
विभागामार्फत देण्यात आले. तसंच राज्यभरात ५ लाख एकाहत्तर हजार ४३४ व्यक्तींचं विलगीकरण
करण्यात आलं आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
२२ मार्च ते २९ मे या कालावधीत
कलम १८८ नुसार राज्यात १ लाख १९ हजार २२२ गुन्हे नोंदवण्यात आले असून, २३ हजार ५३३
व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ५ कोटी ९१ लाख ७४ हजार २७१ रुपयांचा
दंड या कालावधीत आकारला गेला आहे. या दरम्यान पोलिसांवर हल्ले होण्याच्या २५५ घटना
घडल्या. त्यात ८३३ व्यक्तींना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे. परदेशी नागरिकांकडून
झालेले व्हिसा उल्लंघनाचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत, अशी माहिती गृहमंत्री
देशमुख यांनी दिली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या
संख्येत आज सकाळी ४२ रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ हजार
५४० झाली आहे. यापैकी नऊशे शहात्तर कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, ७० जणांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं आता चारशे चौऱ्याण्णव रुग्णांवर उपचार सुरू असल्याचं
प्रशासनानं कळवलं आहे.
आज शहरात आढळलेल्या रुग्णांमध्ये
भवानी नगर, जुना मोंढा इथल्या ४, कैलास नगर ३, एन-सहा सिडको ३, जाफर गेट, जुना मोंढा
१, संजय नगर, मुकुंदवाडी १, रहीम नगर, जसवंतपुरा १, व्यंकटेश नगर, जालना रोड १, समता
नगर १, नवीन बायजीपुरा १, अहिंसा नगर, आकाशवाणी
परिसर १, किराडपुरा ३, पिसादेवी रोड १, बजाज नगर १, देवळाई परिसर १, नाथ नगर १, बालाजी
नगर १, हमालवाडा १, जुना बाजार २, भोईवाडा १, मनजित नगर, आकाशवाणी परिसर २, सुराणा
नगर १, आझम कॉलनी १, सादात नगर १, महेमूदपुरा, हडको १, निझामगंज कॉलनी १, शहागंज १,
गल्ली क्रमांक २४ संजय नगर १, बीड बायपास रोड १, स्वप्न नगरी मधल्या एका रुग्णाचा समावेश
आहे. यामध्ये २४ महिला आणि १८ पुरुष रुग्ण आहेत.
****
AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 31 MAY 2020 TIME – 07.10 AM
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक –३१
मे
२०२० सकाळी ७.१० मि.
****
**
देशभरातली टाळेबंदी उठवण्याच्या पहिल्या टप्प्याची घोषणा; ८ जूनपासून धार्मिक आणि प्रार्थना स्थळं, हॉटेल्स, रेस्टॉरंटस
आणि शॉपिंग मॉल्स सुरू होणार
**
राज्यात टाळेबंदी उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात चर्चा
**
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन विद्यापीठ स्तरांवरच्या परीक्षा घेण्याचे
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
**
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, सुपारी, पान, किंवा पान मसाल्याचं सेवन करून थुंकल्यास, आर्थिक
दंडासह सार्वजनिक सेवेच्या शिक्षेची तरतूद
**
राज्यात काल दिवसभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ९९ रुग्णांचा मृत्यू तर दोन हजार
नऊशे चाळीस नवे रुग्ण
** औरंगाबाद जिल्ह्यात ३९, लातूर आणि उस्मानाबादमध्ये
प्रत्येकी सात नवे रूग्ण तर परभणीत एक जणांचा मृत्यू
**
आणि
**
पेट्रोल आणि डिझेलवर प्रतिलिटर दोन रुपये अधिभार वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय
****
केंद्र
सरकारने देशभरातली टाळेबंदी उठवण्याच्या पहिल्या टप्प्याची काल घोषणा केली. टाळेबंदीचा
चौथा टप्पा आज समाप्त होत आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं काल नव्यानं मार्गदर्शक सूचना
जारी करून राज्य सरकारनं निर्धारित केलेले प्रतिबंध- कंटेनमेंट क्षेत्र वगळता अन्य
भागातली टाळेबंदी उठवली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात मात्र ३० जूनपर्यंत या टाळेबंदीची
कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रीन आणि ओरेंज झोनमध्ये सकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत
काही व्यवहार वगळता अन्य सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी राहील. उद्यापासून राज्यातर्गंत
आणि आंतरराज्यीय वाहतुकीवर कोणतेही निर्बंध असणार नाहीत, यासाठी कोणाच्याही परवानगीची
गरज असणार नाही. मात्र यासंबंधीचे नियम बनवण्याचे राज्यांना अधिकार देण्यात आले आहेत.
पहिल्या
टप्प्यात ८ जूनपासून धार्मिक आणि प्रार्थना स्थळं, हॉटेल्स, रेस्टॉरंटस आणि इतर आतिथ्य
सेवेशी संबंधित सेवा, शॉपिंग मॉल्स सुरू केले जातील. दुसऱ्या टप्प्यात शाळा, महाविद्यालय,
शैक्षणिक, प्रशिक्षण आणि कोचिंग संस्था राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत चर्चा
करून सुरू केले जाणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकार आपल्या राज्यातले शिक्षणसंस्था
चालक, पालक आणि इतर भागीदारांसोबत चर्चा करतील. त्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेतला
जाईल.
आंतरराष्ट्रीय
विमान सेवा, मेट्रो रेल, चित्रपट गृह, जिम्स, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, नाट्यगृह,
मद्यालय, प्रेक्षागृह, सभामंडप तसंच सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, साहित्यिक,
सांस्कृतिक, धार्मिक आणि अन्य गर्दी होणारे कार्यक्रम सुरू करण्यासंदर्भात तिसऱ्या
टप्प्यात परिस्थितीचं मूल्यमापन करून याबाबतची तारीख निश्चित केली जाणार आहे.
आरोग्य
मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अत्यावश्यक सेवा वगळता देशभरात रात्री ९ वाजेपासून
सकाळी पाच वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील.
याशिवाय
कार्यालयात, कपंनीमध्ये, दुकानात कामाच्या वेळा निश्चित कराव्या, थर्मल स्क्रीनिंग,
सॅनिटायझर, हॅण्ड वॅाश बंधनकारक, तसंच सामाजिक अंतराचं पालन करावं, असं सरकारनं या
निर्देशात सांगितलं आहे. टाळेबंदीच्या या टप्प्यातही मास्क लावणं, सामाजिक अंतर पाळणं,
हे नियम पाळावे लागतील. अंत्यसंस्कारावेळी २० जणांना परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक
सभा, कार्यक्रमांना बंदीच आहे, लग्न समारंभासाठी फक्त ५० जणांना परवानगी असेल, असं
केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.
राज्य
सरकार आपल्या आवश्यकतेनुसार प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेरही बंधन आणू शकेल किंवा त्यावर
बंदीही घालू शकेल. ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्ती, गंभीर आजारी लोक, गरोदर महिला
आणि दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना घरीच राहण्याचा सल्ला सरकारनं या मार्गदर्शक
सूचनांमध्ये दिला आहे. मात्र अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक गरजांसाठी ते घराबाहेर
जाऊ शकतील.
****
राज्यात
टाळेबंदी उठवण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
अध्यक्ष शरद पवार यांच्यात काल रात्री सुमारे तासभर चर्चा झाली. केंद्र सरकारनं टाळेबंदीत
वाढ केल्यानंतर राज्यात त्याची कशाप्रकारे अंमलबजावणी करायची, कोणत्या गोष्टी सुरु
करता येतील, याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान,
राज्यात प्रतिबंधित क्षेत्र कोणते ते ठरवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे आज प्रशासनातल्या
संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय टाळेबंदी उठवण्यासंदर्भातही या बैठकीत
चर्चा होईल.
****
विद्यार्थ्यांच्या
सुरक्षेची पूर्ण काळजी घेऊन विद्यापीठ स्तरांवरच्या परीक्षा घेण्यात याव्यात असे निर्देश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. विद्यापीठांच्या परीक्षा तसंच शैक्षणिक वर्षाबाबत
मुख्यमंत्र्यांनी काल राज्यातल्या अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची दूरदृश्य संवाद
प्रणाली द्वारे बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. परीक्षांबाबतची अनिश्चितता संपवण्याचा
विषय प्राधान्यानं हाताळावा लागणार असल्याचं सांगतानाच, जुलै महिन्यात परीक्षा घेता
येणार नसल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. अंतिम वर्षात सर्व सत्रांच्या सरासरी इतके
गूण किंवा श्रेणी प्रदान देऊन, श्रेणी सुधारासाठी ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देण्याबाबत
कायदेशीर बाबी तपासून पाहण्याची सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. आगामी शैक्षणिक वर्ष
कधीपासून सुरु करायचं याबाबतही विविध प्रस्ताव तयार केले जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी
दिली. मुंबई, पुणे आणि औरंगाबादची परिस्थितीही सतत बदलत आहे. त्यामुळे या संकटाचं संधीत
रुपांतर करता येईल का, त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येईल का, याचा विचार करायला
हवा असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी
परीक्षा वेळेत घेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची आणि नियोजनाची माहिती दिली.
****
राज्यात
सार्वजनिक ठिकाणी तंबाखू, तंबाखूजन्य पदार्थ, सुपारी, पान, किंवा पानमसाल्याचं सेवन
तसंच थुंकल्यास, आर्थिक दंडासह सार्वजनिक सेवेची शिक्षा करण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरून ही माहिती दिली.
कोरोना
विषाणू सारख्या महामारीचा संसर्ग हा थुंकीच्या माध्यमातून होत असल्याचं निष्पन्न झाल्यानं,
जनतेच्या हितासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशा
प्रकारच्या पहिल्या गुन्ह्यासाठी एक हजार रुपये दंड आणि एक दिवस सार्वजनिक सेवा, त्याच
व्यक्तीला दुसऱ्या गुन्ह्यासाठी तीन हजार रुपये दंड आणि तीन दिवस सार्वजनिक सेवा तर
तिसऱ्या आणि त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये दंड आणि पाच दिवस सार्वजनिक
सेवा, अशा शिक्षेची तरतूद आहे. भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार सहा महिन्यांपासून
दोन वर्षांपर्यंत शिक्षा तसंच दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेचीही तरतूद असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यात
काल एक हजार चौऱ्यांशी रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून बरे झाल्यानं, त्यांना रुग्णालयांमधून
सुटी देण्यात आली. आता राज्यात आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची एकूण संख्या
अठ्ठावीस हजार एक्क्याऐंशी झाली आहे.
दरम्यान,
राज्यात काल दिवसभरात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ९९ रुग्णांचा मृत्यू झाला तर दोन
हजार नऊशे चाळीस नवे रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या पासष्ट हजार
एकशे अडुसष्ट झाली आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात काल कोरोना विषाणू बाधित ३९ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण
रुग्णांची संख्या आता एक हजार ४९८ एवढी झाली आहे. काल आढळलेल्या रूग्णांमध्ये जुना
मोंढा पाच, उस्मानपुरा आणि रोशन गेट परिसरात प्रत्येकी चार, जुना बाजार, सुराणा नगर,
नारळी बाग आणि शिवशंकर कॉलनीत प्रत्येकी दोन रुग्ण आढळले. तर मुझफ्फर नगर, हडको, व्यंकटेश
नगर, हमालवाडी, न्यू वस्ती जुनाबाजार, भवानी नगर, मनजीत नगर, शिवाजी नगर, नारेगाव परिसर,
न्याय नगर, संजय नगर, मुजिब कॉलनी, कटकट गेट, नेहरू नगर, वसंत नगर, जवाहर कॉलनी, रहेमानिया
कॉलनी मधील गल्ली क्रमांक बारा, मिसारवाडी, समता नगर आणि सिडको एन आठ, मध्ये प्रत्येकी
एक रूग्ण आढळला आहे. याशिवाय वैजापूर मध्येही दोन रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान,
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय - घाटीतून दोन, जिल्हा सामान्य रुग्णालयातून
१० रुग्ण काल बरे होऊन घरी परतले.
दरम्यान,
औरंगाबाद जिल्ह्यात दौलताबाद प्राथमिक आरोग्य केंद्रातले वैद्यकीय अधिकारी आणि परिचारिका
तसंच वडगाव कोल्हाटी इथल्या कोविडग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एकूण बेचाळीस
जणांना कोरोना विषाणूची लागण झालेली नाही. या सर्वांच्या तपासणी अहवालात हे स्पष्ट
झालं असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते यांनी दिली.
****
लातूर
जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. शहरातल्या देसाई
नगर इथल्या बाधित रुग्णाच्या कुटुंबातले तीन जण, जिजामाता नगर मधला एक, मोती नगरमध्ये
दोन, तर उदगीत इथल्या एका रुग्णाचा यात समावेश आहे. तसंच याआधीच्या बाधित सात रुग्णांचे
पुनर्तपासणी अहवालही दुसऱ्यांदा विषाणुची लागण कायम असल्याचेच आले आहेत.
उदगीर
उपजिल्हा रुग्णालयातून काल दोन रुग्णांना सुटी देण्यात आली. राज्यमंत्री संजय बनसोडे
तसंच रुग्णालय व्यवस्थापनानं विषाणू मुक्त झालेल्या या दोघांवर पुष्पवृष्टी करून निरोप
दिला.
दरम्यान,
जिल्ह्यातल्या २७ प्रतिबंधित क्षेत्रातल्या नागरिकांना व्हाट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून
अत्यावश्यक सेवांचा तत्काळ पुरवठा केला जात आहे. यासाठी त्या भागातल्या शंभर कुटुंबातला
प्रत्येकी एक सदस्य आणि प्रशासकीय अधिकारी यांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला
आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर,
ग्रुपवर
संदेश पाठवल्यानंतर या भागातील अनेकांना अत्यावश्यक सेवा तात्काळ उपलब्ध करून दिल्या
जाणार आहेत तसेच या भागाच्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रत्येक भागात एक महिला
अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली महिलांच्या काही मागण्या अथवा समस्या त्यांना ग्रुपवर
देण गैरसोयीचं वाटू शकतं त्यामुळे संबंधित महिला अधिकार्यांना थेट संदेश पाठवून आवश्यक
तात्काळ सेवा मिळू शकतात अरुण समुद्रे आकाशवाणी बातम्यांसाठी लातूर
****
उस्मानाबाद
जिल्ह्यात काल सात नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यात कळंब तालुक्यातल्या पाच
तर उमरगा आणि उस्मानाबाद तालुक्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यात
एकूण रुग्णसंख्या आता ७१ झाली आहे. यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून अठरा जणांना
उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली,
५१ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत.
****
नांदेड
जिल्ह्यात काल कोरोना विषाणूचा आणखी एक रुग्ण आढळला. त्यामुळे जिल्ह्यातल्या रुग्णांची
संख्या आता एकशे चव्वेचाळीस झाली आहे.
****
जालना
जिल्ह्याच्या मंठा तालुक्यातल्या नानसी इथं एका व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं
स्पष्ट झालं. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता एकशे तेवीस झाली आहे. जिल्ह्यातले
बारा रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाल्यानं त्यांना काल कोवीड रुग्णालयातून सुटी देण्यात
आल्याची माहिती जालना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.
****
परभणी
जिल्ह्यात एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा काल सकाळी मृत्यू झाला. जिंतूर तालुक्यातल्या
वाघीबोबडे इथला रहिवासी असलेल्या या ६० वर्षीय वृद्धावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
होते.
दरम्यान,
पूर्णा तालुक्यात माटेगांव इथं दोन, तर सेलू तालुक्यात ब्रह्मवाकडी, गंगाखेड तालुक्यात
माखणी, जिंतूर शहर, तसंच मानवत शहरात प्रत्येकी एक असे सहा रुग्ण कोरोना विषाणू बाधित
आढळून आले. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बालासाहेब नागरगोजे
यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात सध्या ७१ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत
दरम्यान,
परभणी जिल्ह्यात पुणे - मुंबईहून विनापरवानगी आलेल्या नागरिकांमुळे ही रुग्ण संख्या
वाढत असल्याची बाब समोर आली आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर….
ग्रीन झोन
मधून ऑरेंज झोन मध्ये गेलेल्या परभणी जिल्ह्यातील नागरिकांना विनापरवानगी आलेल्या नागरिकांमुळे
त्रास सहन करावा लागत आहे यासंदर्भात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले
माझे सगळे
जनतेला विनंती आहे की बाहेर गावांवरून आपल्या शहरांमध्ये दाखल होत आहेत. त्यांच्यासाठी
आपण क्वारंटाइन फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे मंगल कार्यालयात आणि इतर मंगल कार्यालयात
त्यांना १४ दिवस क्वारंटाइन करून ठेवत आहोत आणि ग्रामीण भागत जात असतील त्यांना आपण
शाळेमध्ये क्वारंटाइन करत आहोत असे जर लोक आपल्या घरात, गावात येत असतील त्यांची माहिती
control room, मला किंवा मनपा आयुक्त यांना तात्काळ द्यावी यांना आपण वेगळ क्वारंटाइन
करून आणि आवश्यकता भासल्यास त्यांचं स्क्रीनिंग करून घेऊ अशी माझी सर्वांना विनंती
आहे
आकाशवाणी
बातम्यासाठी परभणीहून विनोद कापसीकर
****
नाशिक
जिल्ह्यात काल कोरोना विषाणू संसर्गाचे नवे पंधरा रुग्ण आढळले. जिल्ह्यात आता रुग्णांची
संख्या एक हजार एकशे सहासष्ट झाली आहे. जिल्ह्यात या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या
एकसष्ट रुग्णांपैकी ४८ रुग्ण मालेगांवचे आणि आठ नाशिक शहरातले आहेत. नाशिक जिल्ह्यात
या विषाणूचे सातशे शहाऐंशी रुग्ण बरे झाले असल्याची माहितीही जिल्हा प्रशासनानं दिली
आहे.
****
बुलडाणा
जिल्ह्यात काल आणखी तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. हे सर्व मलकापूर इथले रहिवासी आहेत. तर एका रुग्णाला
काल उपचारानंतर प्रकृती सुधारल्यामुळे घरी सोडण्यात आलं. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत
३३ कोरोना विषाणूबाधित रुग्णांना यशस्वी उपचारानंतर सुटी देण्यात आली.
****
अहमदनगर
जिल्ह्यात काल कोरोना विषाणू बाधा झालेले नवे सात रुग्ण आढळले. यात संगमनेर इथले दोन
रुग्ण आहेत. जिल्ह्यातल्या या रुग्णांची संख्या आता एकशे चोवीस झाली आहे.
****
देशवासियांच्या
आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याकडे मोठ्या गतीनं प्रवास सुरू असतानाच कोरोना विषाणूच्या
संकटानं ग्रासलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांनी
त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातलं पहिलं वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशवासियांना एक पत्र
लिहिलं आहे, त्यात त्यांनी ही बाब नमूद केली. आपल्या सरकारनं मिळवलेल्या यशाचा उल्लेख
करताना पंतप्रधानांनी, कोरोना विषाणूचं संकट परतवून लावण्याचा देशाचा संकल्प याद्वारे
जाहीर केला.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार
आहेत. या मालिकेचा हा दुसऱ्या टप्प्यातला बारावा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
पेट्रोल
आणि डिझेलवर लिटरमागे प्रत्येकी दोन रुपये अधिभार वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं
घेतला आहे. टाळेबंदीमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यानं हा निर्णय घेण्यात
आला. आता पेट्रोलवरचा राज्य सरकारचा अधिभार १० रुपये १२ पैसे, तर डिझेलवरचा तीन रुपये
झाला आहे.
****
औरंगाबाद
जिल्हा कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त व्हावा यासाठी सर्वांनी एकमेकांतलं अंतर, मास्क
आणि वारंवार हात धुणं आदी नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन पालकमंत्री सुभाष
देसाई यांनी केलं आहे. त्यांनी काल औरंगाबाद इथं यासंदर्भातील आढावा बैठक घेतली. जिल्हा
प्रशासन आणि महापालिकेला त्यांनी यावेळी काही सूचना केल्या. ते म्हणाले...
तपासणी
केंद्र ठिकाणी आहेत त्याचं ठिकाणी चालू आहे त्यांच्याबरोबर fever camps घ्यावे आणि ते ज्या–ज्या प्रभागांमध्ये जास्त आपल्याला
रुग्णांची किंवा संसर्ग होतो किंवा लक्षणे दिसतात त्या लक्ष नसताना test घेतली तरी
ती वाढलेली असे दिसते त्या मुन्सिपल वार्डच्या हद्दीमध्ये camps सुरु करावे रक्तदान कमी पडता कामा नये जरी कोविडच आणि रक्तदानाचं
फार काही नसलं तरी इतर आजारांसाठी रक्तदान फार महत्वाचे आहे इतर आजार आणि कोरोना ही युती होऊ नये हे एकत्र येऊ नये एवढीच
दक्षता घ्यायची म्हणून खाजगी रुग्णालय खाजगी
डॉक्टर त्यांनी त्यांच कामकाज सुरु करावं
यंदाच्या
उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरची मागणी तुलनेनं कमी आहे, सध्या जिल्ह्यात पाण्याच्या टँकरची
संख्या १३८ असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. टोळधाड आली तर नियंत्रण मिळवण्यासाठी
सर्व प्रयत्न सुरू असून तयारी करण्यात आली असल्याचं पालकमंत्री देसाई यांनी यावेळी
सांगितलं.
दरम्यान,
पालकमंत्री देसाई यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील कोविड-19
संशोधन केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या विषाणूच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी हे
संशोधन केंद्र नक्कीच मोलाचं काम करेल, असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. कुलगुरू
डॉ. प्रमोद येवले यांनी यावेळी मुख्यमंत्री सहायता निधीकरता विद्यापीठ आपत्ती व्यवस्थापन
विभागाचे ३५ लाख रुपये आणि विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातील नऊ लाख २६ हजार
रुपयांचा धनादेश पालकमंत्री देसाई यांच्याकडे सुपूर्द केला.
****
मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी राज्य सरकारने
२०० कोटी रुपयांची तरतूद केलेली असून, योजनेचं काम
सुरू करण्यासाठी हा निधी पुरेसा असल्याचं, आमदार अंबादास दानवे
यांनी म्हटलं आहे. काल औरंगाबाद इथं मराठवाडा पाणी परिषदेच्या
समारोप सत्रात ते बोलत होते. माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या
परिषदेत ऑनलाईन पद्धतीनं सहभागी होत, मराठवाड्यातली पाणी टंचाई
दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. परिषदेचे
अध्यक्ष नरहरी शिवपुरे, जलतज्ज्ञ रमेश पांडव, आणि जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी या परिषदेला मार्गदर्शन केलं.
****
छोट्या-मोठ्या
व्यावसायिकांना एका दिवसाआड अटी आणि शर्तीवर व्यवसाय सुरू करण्यास प्रशासनानं परवानगी
द्यावी, अशी मागणी परभणीच्या महापौर अनिता सोनकांबळे आणि उपमहापौर भगवान वाघमारे यांनी
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्याकडे केली आहे. गेल्या सुमारे ६८ दिवसांपासून ही दुकानं
बंद असल्यामुळे दुकान मालकांसह नोकरदार तसंच अन्य कामगार वर्ग अडचणीत असल्याचं, या
निवेदनात म्हटलं आहे.
****
लातूर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातले शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार तीन जून पर्यंत
बंद राहणार आहे. व्यापारी संघटनेच्या विनंतीवरुन हा निर्णय घेण्यात आल्याचं सभापती
ललितकुमार शहा यांनी सांगितलं. यापूर्वी आजपर्यंत हे व्यवहार बंद ठेऊन उद्या सोमवापासून
ते सुरू होणार असल्याचं घोषित करण्यात आलं होतं.
****
परभणी
जिल्ह्यातल्या गंगाखेड इथल्या संत जनाबाई तसंच पालम तालुक्यातल्या फळा इथले संत मोतीराम
महाराज यांच्या पालखीलाही हेलिकॉप्टरने पंढरपूरला जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी
गंगाखेड तालुका कॉंग्रेस समिती तसंच संत जनाबाई संस्थानच्या वतीनं करण्यात आली आहे.
यंदा पंढरपूरचा पायी आषाढी वारी सोहळा रद्द करून, प्रमुख पालख्या हेलिकॉप्टरने पंढरपूरला
नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यापार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. या
संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आलं आहे.
****
मराठवाडा
पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी काल उस्मानाबाद तालुक्यातल्या लोहारा ग्रामीण
रुग्णालयास भेट देऊन तिथल्या अडीअडचणी जाणून घेतल्या. याठिकाणी लागणाऱ्या आवश्यक त्या
सोयी-सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्या.
लोहारा इथं भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात गेल्या दीड महिन्यांपासून उभारण्यात आलेल्या
विलगीकरण केंद्रालाही आमदार चव्हाण यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
****
अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरच्या मेहकरी पुलावर स्टील गर्डर
बसवण्याचं काम सुरू झालं आहे. दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अहमदनगरपासून ४० किलोमीटर अंतरावरच्या या पुलाचं
काम पूर्ण झाल्यावर हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्याला जोडला जाईल. येत्या वर्षभरात पुलाचं
काम पूर्ण होणं अपेक्षित आहे.
****
महात्मा
जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ आणि छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफी झालेल्या लातूर जिल्ह्यातल्या सर्व ३७ हजार शेतकऱ्यांना
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे कर्जवाटप केलं जाणार आहे. माजी मंत्री आणि बँकेचे
मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यांनी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या संदर्भातील
माहिती दिली. खरीप हंगाम २०२० मधे एकशे वीस कोटी रुपयांचं हे कर्जवाटप केलं जाणार असल्याचंही
त्यांनी यावेळी सांगितलं.
****
शिवसेनेच्या
औरंगाबाद शाखेनं "आपला वॉर्ड - कोरोना मुक्त वार्ड" या मोहिमेच्या दुसऱ्या
टप्प्याला कालपासून सुरुवात झाली. आमदार अंबादास दानवे यांनी शहरातल्या नारळीबाग वार्डात
५० ते ५५ वर्षे वरील नागरिकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून पल्स ऑक्सीमीटर आणि थर्मामीटरगनच्या
साह्यानं शरीरातलं ऑक्सिजनचं प्रमाण, पल्स रेट त्याचप्रमाणे शरीराचं तापमानाची तपासणी
करुन या मोहिमेची सुरुवात केली.
****