Friday, 10 March 2017

AIR News Bulletin, Aurangabad 10.03.2017 6.50am

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 10 March 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १० मार्च २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      प्रसुती सुविधा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर;  महिलांना २६ आठवडे प्रसुती रजा मिळण्याची तरतूद

·      सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे आमदार प्रशांत परिचारक दीड वर्षासाठी निलंबित; चौकशीसाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन

·      शेतकऱ्यांच्या कर्ज माफीसाठी विरोधी पक्षासह सत्ताधारी पक्षाचीही विधानसभेत घोषणाबाजी; ोन्ही सभागृह तहकूब

आणि

·      आंतरजातीय विवाहाच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठवण्यासाठी २१ हजार रूपयांची लाच घेतांना नांदेड जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्याला अटक

****

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामकाजाला कालपासून प्रारंभ झाला. काल पहिल्या दिवशी प्रसुती सुविधा सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झालं. या विधेयकात संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी प्रसुती रजा बारा आठवड्यांवरून २६ आठवडे करण्याची तरतूद आहे. दोन अपत्यांसाठी ही सुविधा मिळू शकणार आहे. तिसऱ्या अपत्यासाठी फक्त १२ आठवड्याची रजा मिळू शकेल. तीन महिन्यांपेक्षा कमी वयाच्या बालकाला दत्तक घेणाऱ्या महिलेलाही १२ आठवड्याची रजा घेता येणार आहे. दहा पेक्षा अधिक कर्मचारी काम करत असलेल्या आस्थापना या कायद्याच्या कक्षेत येणार असल्याचं कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी हे विधेयक मांडताना सांगितलं. या चर्चेत महाराष्ट्रातून भाजप खासदार डॉ प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आदींनी सहभाग घेतला.

****

सैनिकांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे टीका होत असलेले भारतीय जनता पक्षाचे पंढरपूरचे आमदार प्रशांत परिचारक यांना विधानपरिषद सभापतींनी दीड वर्षांसाठी निलंबित केलं आहे. परिचारक यांच्या चौकशीसाठी नऊ सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आपला अहवाल सादर करणार आहे. या मुद्यावरुन विधान परिषदेचं कामकाज गेल्या दोन दिवसांपासून बाधित झालं होतं.  

      शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाल्यानं विधान परिषदेचं कामकाज काल आधी १५ मिनिटांसाठी आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

****

शेतकरी कर्ज माफीसाठी काल विधानसभेत सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसह सर्वपक्षीय आमदार एकवटल्याचं चित्र दिसून आलं. कामकाज सुरू होण्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या प्रांगणात शेतकरी कर्ज माफीसाठी आंदोलन करत सरकार विरोधी घोषणा दिल्या. याचवेळी शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनीही कर्ज माफीसाठी घोषणाबाजी केली.

विधानसभेचं कामकाज सुरु होताच, या मागणीवर विरोधी तसंच सत्ताधारी पक्षाचे आमदार आक्रमक झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाल्यानं कामकाज सुरूवातीला तीन वेळा तहकूब झालं. त्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज दिवस भरासाठी तहकूब केलं.

दरम्यान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वार्ताहरांशी बोलतांना शेतकऱ्यांना सक्षम करून त्यांना कर्ज मुक्त करण्याचं सरकारचं धोरण असल्याचं सांगितलं. यासाठी पंचसूत्री योजना आखली असल्याचं ते म्हणाले. विरोधक शेतकऱ्यांना नव्हे तर राज्यातल्या सहकारी बँकांना लाभ पोहोचवण्यासाठी कर्जमाफी मागत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.  

****

शेतकरी कर्जमाफीसाठी भारतीय जनता पक्ष अनुकूल असेल तर, सरकारनं तातडीने कर्जमाफी जाहीर करावी, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. काल विधानसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सरकारचा घटक पक्ष असलेला शिवसेना पक्षही या मागणीसाठी आग्रही असल्यानं, सरकारनं आता शेतकऱ्यांचा अंत न पाहता कर्ज माफीची घोषणा करावी, असं विखे पाटील म्हणाले.

****

महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याकरता एक समिती तयार करण्यात येईल, असं गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल विधानपरिषदेत सांगितलं. लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते. वरिष्ठ महिला पोलीस, दोन महिला विधानसभा सदस्य, दोन महिला विधानपरिषद सदस्य यांचा या समितीत समावेश असेल, असं केसरकर म्हणाले.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

आंतरजातीय विवाहाच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठवण्यासाठी २१ हजार रूपयांची लाच घेतांना नांदेड जिल्हा परिषदेचा समाजकल्याण अधिकारी सुनील खमीतकर आणि निरिक्षक अमोल श्रीमनवार या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला केंद्र शासनाकडून प्रोत्साहनपर अडीच लाख रूपयांचं अनुदान दिलं जातं. याबाबतचा प्रस्ताव पाठवण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.

****

ज्येष्ठ नाट्यसमीक्षक वि. भा. देशपांडे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष होते. वि.भा. या नावाने ते ओळखलं जात. समीक्षणासंदर्भात ५१ पुस्तकांचं त्यांनी लेखन केलं आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्कारासह, नाट्यगौरव आणि नाट्यदर्पण पुरस्कार, वि..खांडेकर नाट्य समीक्षक अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. मराठी नाट्यकोश आणि मराठी वाड्:मय इतिहासाच्या सातव्या खंडाचं वि. भां.नी संपादनही केलं. त्यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.

****

औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत आयोजित तीन दिवसीय मराठवाडा इंडस्ट्रीयल इलेक्ट्रीकल फेअर २०१७ या प्रदर्शनाचं उद्घाटन इंडियन इलेक्ट्रीकल्स ॲण्ड इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रमेश चांडक यांच्या हस्ते काल करण्यात आलं. उत्पादक आणि ग्राहक यांच्यात सुसंवाद साधण्याच्या हेतूनं चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर आणि मराठवाडा ऑटो क्लस्टर यांनी संयुक्तरित्या हे प्रदर्शन भरवलं आहे.

****

जागतिक मूत्रपिंड दिन काल सर्वत्र साजरा करण्यात आला. निरोगी मूत्रपिंडांसाठी निरोगी जीवनशैली असं यावर्षीचं घोषवाक्य आहे. यानिमित्त परभणी जिल्हा सामान्य रूग्णालयात मूत्रपिंडांचे आजार आणि स्थूलता यासंदर्भात जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्यावतीनं ब्रेनडेड रूग्णांचे अवयव दान करणाऱ्या नातेवाईकांचा तसंच डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी अवयव दानाचा संकल्प केला.

****

लातूर इथं तूर खरेदी केंद्रांवर व्यापाऱ्यांकडून तूर खरेदी होत असल्याबद्दल शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी संघटनेनं केली आहे.

****

बीड जिल्ह्यात धारूर इथं एका सराफा दुकानावर काल आयकर विभागानं छापा घातला. राम चिद्रवार यांचं हे दुकान असून, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. या कारवाई दरम्यान, बाजारपेठेतले इतर दुकानदार दुकानं बंद करून निघून गेले होते.

****

वारंवार नोटीसा देही वीजबील न भरणाऱ्या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातल्या ४८१ ग्राहकांचा वीजपुरवठा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं कायमस्वरूपी खंडीत केला आहे. त्यांचं वीज मीटरही जप्त करण्यात आलं आहे. दरम्यान, कारवाईच्या भीतीनं जवळपास दोन हजार थकबाकीदारांनी १ कोटी ४८ लाख ३७ हजार रूपयांचा भरणा केला असल्याचं कंपनीच्यावतीनं सांगण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या सोनगाव तालुक्यातल्या गोरेगाव इथं तसंच बीड जिल्ह्यातल्या पिंपळनेर इथं दोन दिवसीय राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानाची काल सांगता झाली. क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्यावतीनं हे अभियान आयोजित करण्यात आलं होतं. या अभियानात हिंगोली जिल्ह्यातल्या
२०० हून अधिक गर्भवती महिला आणि बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली

हिंगोली जिल्ह्यातल्या सोनगाव तालुक्यातल्या गोरेगाव इथं तसंच बीड जिल्ह्यातल्या पिंपळनेर इथं दोन दिवसीय राष्ट्रीय आरोग्य जनजागृती अभियानाची काल सांगता झाली. क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्यावतीनं हे अभियान आयोजित करण्यात आलं होतं. या अभियानात हिंगोली जिल्ह्यातल्या २०० हून अधिक गर्भवती महिला आणि बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. बीड जिल्ह्यातल्या क्षयग्रस्त महिलांनी सकस आहाराबरोबरच वेळेवर तपासणी आणि उपचार करणं गरजेचं आहे, असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितलं. जिल्ह्यातलं माता मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी स्वच्छता राखणंही आवश्यक असल्याचं मत सांगळे यांनी व्यक्त केलं.
****
लातूर इथं मालमत्ता कर न भरलेल्या चार दुकानांना काल महानगर पालिका सहायक आयुक्त वसुधा फड यांच्या पथकानं टाळं लावलं. महानगरपालिकेनं २२ दुकानांना मालमत्ता कर भरण्याची नोटीस पाठवली होती. त्यापैकी १८ जणांनी कर भरला तर उर्वरित चार दुकानांना टाळं ठोकण्यात आलं. आतापर्यंत करवसूली पथकानं ११ कोटी रूपयांच्या कराची वसूली केली आहे.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय-  घाटीचा बाह्य रूग्ण विभाग परवा रविवार बारा मार्च रोजी सुरू राहणार असून सोमवारी तेरा मार्चला होळीनिमित्त सुट्टीमुळं बाह्य रूग्ण विभाग बंद राहणार असल्याचं घाटीच्या वैद्यकीय अधिक्षकांनी कळवलं आहे.
//****//

. बीड जिल्ह्यातल्या क्षयग्रस्त महिलांनी सकस आहाराबरोबरच वेळेवर तपासणी आणि उपचार करणं गरजेचं आहे, असं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितलं. जिल्ह्यातलं माता मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी स्वच्छता राखणंही आवश्यक असल्याचं मत सांगळे यांनी व्यक्त केलं.

****

लातूर इथं मालमत्ता कर न भरलेल्या चार दुकानांना काल महानगर पालिका सहायक आयुक्त वसुधा फड यांच्या पथकानं टाळं लावलं. महानगरपालिकेनं २२ दुकानांना मालमत्ता कर भरण्याची नोटीस पाठवली होती. त्यापैकी १८ जणांनी कर भरला तर उर्वरित चार दुकानांना टाळं ठोकण्यात आलं. आतापर्यंत करवसूली पथकानं ११ कोटी रूपयांच्या कराची वसूली केली आहे.

****

औरंगाबाद इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालय-  घाटीचा बाह्य रूग्ण विभाग परवा रविवार बारा मार्च रोजी सुरू राहणार असून सोमवारी तेरा मार्चला होळीनिमित्त सुट्टीमुळं बाह्य रूग्ण विभाग बंद राहणार असल्याचं घाटीच्या वैद्यकीय अधिक्षकांनी कळवलं आहे.

//****//

No comments:

Post a Comment