आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०३ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता
****
मुंबई महानगरपालिकेच्या सत्ता स्पर्धेत असलेल्या शिवसेना आणि भारतीय
जनता पक्ष या दोन्ही पक्षांबरोबर अंतर राखूनच असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलं
आहे. महापौर निवडीबाबत बदलत्या घडामोडींवर पक्ष लक्ष ठेऊन असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. ते मुंबई इथं वार्ताहरांशी बोलत होते.
राज्य सरकारच्या विरोधात शिवसेनेनं अविश्वास ठराव आणला आणि स्वत: सरकार स्थापन करण्याचा
निर्णय घेतला, तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळी आपली भूमिका स्पष्ट करेल, असं ते म्हणाले.
****
ॲसिड हल्ल्यातल्या पिडीत व्यक्तीसाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय
सहायता निधीतून अतिरिक्त एक लाख रुपये देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. ॲसिड
हल्ल्यातल्या पिडीत व्यक्तीवर तात्काळ उपचार होण्याकरता आर्थिक निधी उपलब्ध व्हावा
यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सहा खुनांच्या आरोपाखाली अटकेत असणाऱ्या सातारा
जिल्ह्यातल्या धोम इथला संतोष पोळ याची साथीदार ज्योती मांढरे हिला जिल्हा सत्र न्यायालयानं
माफीचा साक्षीदार म्हणून घोषित केलं. ज्योती मांढरे हिला काही अटी घालण्यात आल्या असून
काल झालेल्या सुनावणी दरम्यान पोळ याचा सीलबंद कबुलीनामा सादर करण्यात आला. पोळ याच्याविरोधात
असणाऱ्या सहा खूनाच्या खटल्यांचं कामकाज स्वतंत्रपणे किंवा एकत्रितपणे चालवायाचं याबाबतचे
म्हणणं येत्या २४ मार्चला उज्वल निकम हे सादर करणार आहेत.
****
दुबई टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुष
दुहेरीच्या उपान्त्य फेरीत, भारतीय टेनिसपटू रोहन बोपन्ना आणि त्याचा जोडीदार पोलंडचा
मार्सिन माटकोवस्की यांचा सामना आज लिएंडर पेस आणि त्याचा जोडीदार स्पेनचा गुलरमो गार्सीलोपेझ
यांच्यासोबत होणार आहे. ९ पुरुष एकेरीत अँडी मरेनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे.
//*******//
No comments:
Post a Comment