▼

Monday, 17 April 2017

Text- AIR News Bulletin, Aurangabad 17.04.2017 10.00m


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

१७ एप्रिल २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

नांदेड इथून नागपूरला जाण्या करिता नांदेड ते अजनी ही उन्हाळी विशेष गाडी सुधारित वेळा पत्रकानुसार चालविण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वे विभागानं घेतला आहे. या गाडीच्या एकूण २२ फेऱ्या होणार असून आजपासून दर सोमवारी रात्री साडे आठ वाजता ही गाडी नांदेडहून सुटेल.

****

शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा आज नाशिक जिल्ह्यात दाखल होणार आहे. मालेगाव येथे मनमाड चौफुलीवर या यात्रेचं सर्वप्रथम आगमन होईल, त्यानंतर सटाणा आणि देवळा येथे हि यात्रा जाईल. सायंकाळी साडेचार वाजता निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत इथं तर सहा वाजता नाशिक शहरातील आडगाव इथं आगमन होणार आहे. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे. तसंच उद्या सिन्नर तालुक्यात शिवडी इथं सभा होणार आहे

****

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या वतीनं घोण्यत येणाऱ्या संगीत, नृत्य, वादन आदी विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सवलतीच्या गुणांचा लाभ मिळणार आहे. तीन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी १० गुण तर पाच परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५ गुण वाढून मिळणार आहेत.

****

देशाच्या उत्तर आणि अन्य भागातील उष्णतेची तीव्र लाट आणखी २ ते ३ दिवस कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेच्या लाटेनं जनजीवन विस्कळीत केलं आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पारा गेल्या दोन दिवसांपासून ४४ अंशांच्या आसपास आहे.

//*******//








No comments:

Post a Comment