आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१९ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
जम्मू काश्मीरच्या पूंछ आणि
रजौरी जिल्ह्यांमध्ये नियंत्रणरेषेवर पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन
होत असून तिथे पाककडून तोफेचा मारा होत आहे. भारतीय सैन्य पाकच्या या हल्ल्याला चोख
प्रत्युत्तर देत आहे.दरम्यान, गुरेज सेक्टरमध्ये होत असलेला घुसखोरीचा प्रयत्न सैन्यानं
रोखला असून या कारवाईमध्ये दोन घुसखोर अतिरेकी ठार झाले आहेत.
****
भारत आणि चीन दरम्यान सीमेवर असलेल्या तणावाबाबत परराष्ट्र सचीव
एस. जयशंकर यांनी काल संसदीय समितीला माहिती दिली.सिक्किम मधल्या डोकलाम इथे चीननं सुरू केलेलं रस्ता बांधणीचं काम भारतीय
सैन्यानं थांबवल्यानंतर,भारतानं तिथून सैन्य हटवावं,या चीनकडून होणा-या मागणीबद्दल
त्यांनी या समितीला सांगितलं. दरम्यान या दोन देशांनी सीमेवरच्या तणावाच्या परिस्थितीला
चर्चेच्या माध्यमातून सोडवावं, असं आवाहन अमेरिकेनं केलं आहे.
****
वादग्रस्त इस्लामी धर्म प्रचारक
आणि इस्लामिक रिसर्च फाउंडेशनचा अध्यक्ष झाकिर नाईक याचं पारपत्र मुंबई पारपत्र कार्यालयानं
रद्द केलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेसमोर हजर न राहिल्यामुळे, गृह मंत्रालयाच्या
निर्देशानंतर विभागीय पारपत्र कार्यालयानं ही कारवाई केली. एक जुलै २०१६ पासून झाकीर
फरार आहे.
****
भारतीय क्रिकेट संघाच्या
गोलंदाजी प्रशिक्षकपदी भरत अरुण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी संजय बांगर यांची
तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदी आर. श्रीधर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय संघाचे
नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या शिफारसीवरून या नियुक्ती करण्यात आल्या आहेत.
****
चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सनदी लेखापाल परीक्षेत
डोंबिवलीचा राज शेठ देशभरातून पहिला आला आहे. त्यानं ८०० पैकी ६३० गुण मिळवले. या परीक्षेत
औरंगाबादचे ४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
****
काल जायकवाडी धरणाच्या डाव्या
कालव्यातून तीनशे तर उजव्या कालव्यातून पाचशे घनफूट प्रतिसेकंद या वेगाने पाणी सोडण्यात
आलं. धरण लाभक्षेत्राच्या तीनशे शहात्तर गावातल्या
एक लाख ८३ हजारहून जास्त हेक्टरवरच्या खरीप पिकांना याचा लाभ होणार आहे.
****
No comments:
Post a Comment