आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०४ डिसेंबर २०१७ सकाळी ११.०० वाजता
****
नौदल दिन आज साजरा होत आहे. भारतीय नौदलाची कामगिरी आणि देशाच्या संरक्षणात असलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. आज देशाच्या प्रगत तंत्रज्ञानाचं तसंच सागरी क्षेत्रातल्या कामगिरीचं प्रदर्शन घडवलं जातं. देशाची कीनारपट्टी सुरक्षित ठेवण्याबरोबरच इतर राष्ट्राच्या सहकार्यानं संयुक्त कवायती, मानवतावादी मोहीमा, आप्तकाळी मदत कार्य यामध्ये भारतीय नौदलाची... महत्वाची भूमिका आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
****
आयुष आणि समृद्ध आरोग्य या विषयावरचं पहिलं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि चर्चासत्र नवी दिल्ली इथं आजपासून सुरु होत आहे. ‘आरोग्य २०१७’ असं नाव असलेल्या या कार्यक्रमाचं उद्धाटन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होणार आहे. आयुष या पर्यायी उपचार पद्धतींची जागतिक स्तरावर क्षमता वाढवणं ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे.
****
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज आज भरत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.
****
औरंगाबाद इथल्या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयातर्फे आज गंधर्व संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात प्रसिद्ध गायिका डॉ.अश्विनी भिडे-देशपांडे यांचं शास्त्रीय गायन, पंडित रामदास पळसुले यांचं तबलावादन आणि कल्याण अपार यांचं शहनाईवादन होणार आहे. मराठवाड्यात संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या कलाकारांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. महाविद्यालयात आज सायंकाळी सहा वाजता या महोत्सवाचं उद्घाटन होईल.
****
हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांना गुजरातमध्ये राजकोट इथं अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. यावेळी खासदार सातव यांना झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर बसस्थानकावर एस टी बसवर दगडफेक करण्यात आली.

No comments:
Post a Comment