Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 15 April 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१५ एप्रिल २०१८
सकाळी ६.५०
मि.
*****
o शेतकरी कृषी कर्जमाफी योजनेचे अर्ज
स्वीकारण्याला आता एक मे पर्यंत मुदतवाढ
o भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी
o आयुष्यमान भारत योजनेचा पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांच्या हस्ते शुभारंभ
आणि
o
गोल्डकोस्ट
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल दहाव्या दिवशी भारताला आठ सुवर्ण, चार रौप्य आणि चार कांस्य पदक
****
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान
योजनेअंतर्गत कृषी कर्जमाफी योजनेचे अर्ज स्वीकारण्याची मुदत येत्या एक मे पर्यंत वाढवण्यात
आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं काल यासंदर्भात एक पत्रक जारी करून, ही मुदतवाढ दिल्याचं
जाहीर केलं. कर्ज माफीचे अर्ज सादर करण्यासाठी काल अखेरचा दिवस होता, मात्र आता हे
अर्ज येत्या एक मे पर्यंत सादर करता येणार आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ
घेता यावा, यासाठी ही मुदत वाढवण्यात आल्याचं, याबाबतच्या पत्रकात म्हटलं आहे.
****
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७वी जयंती काल सर्वत्र उत्साहात
साजरी झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मध्य प्रदेशात
महू या बाबासाहेबांच्या जन्मस्थळी आयोजित कार्यक्रमात बाबासाहेबांना
आदरांजली अर्पण केली. बहुमुखी व्यक्तिमत्वाचे
धनी असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांनी जातीभेद आणि पूर्वग्रह मुक्त आधुनिक भारताच्या
निर्माणासाठी संघर्ष केला, असं राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नमूद केलं. समाजात समानता आणण्यासाठी बाबासाहेबांनी नेहमी अहिंसेचा मार्ग निवडला, हे तरुण पिढीने ध्यानात
घ्यायला हवं, असंही राष्ट्रपती यावेळी म्हणाले.
राष्ट्रपती,
उपराष्ट्रपती तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सकाळी संसद भवन परिसरात बाबासाहेबांच्या
प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं.
नवी दिल्लीत
काल सायंकाळी ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर : व्यक्ति नहीं संकल्प’ या पुस्तकाचं उपराष्ट्रपती
व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं.
मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी चैत्यभूमी इथं बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
मराठवाड्यात
सर्वत्र काल विविध उपक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. या
बाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून..
औरंगाबाद इथं भडकलगेट परिसरात
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी काल सकाळपासूनच विविध पक्ष संघटनांसह सर्वसामान्यांनी
गर्दी केली होती. सर्वपक्षीय उत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन सभा घेण्यात आली. यावेळी बाबासाहेबांच्या पुतळ्यावर
हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली. सायंकाळनंतर क्रांतीचौक परिसरातून विविध देखाव्यांसह शोभायात्रा
काढण्यात आल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लेखक
योगिराज बागुल यांचं ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि
त्यांचे दलितेतर सहकारी’ या विषयावर विशेष व्याख्यान झालं.
आंबेडकरांच्या एकूण ३६ वर्षांच्या चळवळीमध्ये दलितेतर सहकाऱ्यांचं योगदान
मोठं असल्याचं बागुल यांनी नमूद केलं.
जालना शहरात गांधीचमन चौकातून संविधान फेरी
काढण्यात आली, मस्तगड इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार
रावसाहेब दानवे, यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
बीड जिल्हाधिकारी
कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी बी एम कांबळे यांनी, तर परभणी इथं जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी
बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.
बीड जिल्ह्यातल्या
अंबाजोगाईसह लातूर तसंच
उस्मानाबाद इथं राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाच्या वतीनं घोषवादन करत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.
परभणी शहरात मिरवणुका, संदेशफेरी, विशेष व्याख्यान,
तसंच विद्यार्थ्यांच्या सामुहिक अभ्यासातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं.
लातूर इथं, सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीन
भंते पैय्यानंद यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आलं.
नांदेड इथं शहराच्या विविध भागातून वाहन फेरी सह विविध उपक्रम राबविण्यात आले.
*****
आयुष्यमान भारत ही योजना निरोगी, समाधानी आणि सक्षम
नवभारताची उभारणी करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आयुष्यमान भारत
योजनेअंतर्गत काल छत्तीसगड राज्यात बिजापूर जिल्ह्यात, पहिल्या आरोग्यसेवा केंद्राचं
उद्घाटन पंतप्रधानांनी काल केलं, त्यावेळी ते बोलत होते. दोन हजार २२ पर्यंत देशात
दीड लाख आरोग्य केंद्रं उभारली जाणार असून, सर्व सुविधांनी युक्त असलेली ही केंद्रं
ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी फॅमिली डॉक्टरप्रमाणे काम करतील, असं पंतप्रधानांनी
म्हटलं आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
ऑस्ट्रेलियात गोल्डकोस्ट इथं सुरू असलेल्या २१ व्या राष्ट्रकुल क्रीडा
स्पर्धेत काल दहाव्या दिवशी भारतानं आठ सुवर्ण पदकांची कमाई केली.
मुष्टियुध्द प्रकारात पाच वेळच्या विश्वविजेत्या मेरी कोमनं ४८ किलो वजनी गटात
सुवर्णपदक पटकावलं. पुरूषांच्या
७५ किलो वजनी गटात विकास कृष्णननं तर ५२ किलो वजनी गटात गौरव सोळंकीनं सुवर्णपदक
पटकावलं. ९१ किलो वजनी गटात सतीश
कुमारनं, साठ किलो गटात मनीष कौशिकनं आणि
एकोणपन्नास किलो वजनी गटात अमित पंघल यांनी रौप्य पदकं पटकावली.
टेबल टेनिस मध्ये महिला एकेरीत मनिका बत्रानं सुवर्णपदक मिळवलं, तर पुरूष
दुहेरी गटात शरथ कमल आणि जी. साथियन यांच्या जोडीनं
रौप्य पदक पटकावलं.
नेमबाजीत पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात संजीव राजपूतनं तर
पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रानं सुवर्णपदक पटकावलं.
कुस्तीमध्ये पुरुषांच्या १२५ किलो वजनी गटात सुमित मलिकनं तर, महिलांच्या फ्रीस्टाईल प्रकारात पन्नास किलो वजनी गटात विनेश फोगटनं सुवर्णपदक
पटकावलं.पुरुषांच्या
८६ कीलो वजनी गटात सोमवीरनं आणि महिलांच्या ६२ कीलो वजनी गटात साक्षी मलिकनं कांस्य
पदक पटकावलं.
बॅडमिंटनमध्ये महिला दुहेरीमध्ये अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीनं
कांस्य पदक जिंकलं.
बॅडमिंटनमध्ये सायना नेहवालला सुवर्णपदक मिळाले आहे.
तर पी.व्ही सिंधूला रौप्य पदक मिळालं आहे. भारत तिसऱ्या स्थानी कायम आहे.
या पदकामुळे आता भारताची सुवर्ण पदकाची संख्या २६
तर रौप्य पदकाची संख्या १७ झाली आहे.
****
देशभरात
कालपासून ग्रामस्वराज अभियानाला प्रारंभ झाला, उस्मानाबाद
जिल्ह्यातल्या पोहनेर आणि उमरगा तालुक्यातल्या मुरळी या गावांचा यात समावेश आहे. पाच
मे पर्यंत चालणाऱ्या या अभियानात विविध योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात महावितरणच्या वतीनं गरीब कुटुंबांची संख्या अधिक असलेल्या गावात शंभर टक्के
विद्युतीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर शिबीरं लावण्यात येणार असून, लाभार्थ्यांना
तात्काळ वीज जोडणी देण्यात येणार आहे.
औरंगाबाद परिमंडळ अंतर्गत सोयगाव तालुक्यात गलवाडा
गावात सुमारे शंभरहून अधिक घरांना वीज जोडण्या देण्यात येत आहेत.
****
उस्मानाबाद इथं काल रात्री ११ ते १२ वाजे दरम्यान, ढगांचा कडकडाट आणि विजांच्या
लखलखाटसह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी पिकं तसंच आंब्याचं मोठं नुकसान झालं
आहे. सातारा जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेडचे ज्येष्ठ पत्रकार नृसिंह दांडगे यांचं काल
दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे
जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. गावकरी, झुंजार नेता, नवाकाळ इत्यादी
वृतपत्रांचे वार्ताहर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी
साडेनऊ वाजता नांदेड इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
***
औरंगाबाद जिल्ह्यातल्या नांदूर मधमेश्वर जलदगती कालव्यातून
उन्हाळी हंगामासाठी काल दुपारी पाणी सोडण्यात आलं. यासाठी आमदार भाऊसाहेब पाटील-चिकटगावकर,
आमदार प्रशांत बंब आणि आमदार सुभाष झांबड यांनी नुकतचं गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या
कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर पाणी सोडण्याचा निर्णय महामंडळानं घेतला
आहे.
****
केंद्र शासनाच्या ई - राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात
ई -नाम या योजनेत शेतकऱ्यांचा अधिकाधिक सहभाग वाढवावा यासाठी लातूर बाजार समितीच्या
वतीनं काल तालुक्यातल्या २५ गावांत ग्रामसभा तसंच चावडी वाचन घेऊन शेतकऱ्यांना माहिती
देण्यात आली. या योजनेमुळे शेतकऱ्यांना आपला माल अधिक दराने विकता येणं शक्य असल्याने,
शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी ई -नाम पोर्टल वर नोंदणी करावी, असं आवाहन
समितीचे सभापती ललित शहा, यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात दूधनवाडी शिवारात
काल रात्री दहा वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघात दोनजण ठार झाले. राहुल
कांबळे आणि राम तोतरे ठार झालेल्यांची नावे
आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment