Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 29 May 2018
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ मे
२०१८
दुपारी १.०० वा.
****
प्रधान मंत्री मुद्रा
योजना जाहीर केल्या पासून बँका आणि वित्तीय संस्थांनी आतापार्यंत १२ कोटी युवकांना
६ लाख कोटी रूपये कर्जाचं वाटप केलं असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज दिली. १२ कोटी लाभार्थ्यांपैकी २८ टक्के म्हणजेचं ३ कोटी २५ लाख युवकांनी पहिल्यांदाच
उद्योग सुरु करण्यासाठी कर्ज घेतलं आहे. या लाभार्थ्यांमध्ये ७४ टक्के म्हणजेच ९ कोटी
महिलांचा समावेश आहे. तर यातील ५५ टक्के लाभार्थी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास
वर्गातील असल्याचंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना ८ एप्रिल
२०१५ रोजी सुरू झाली होती. या योजनेतंर्गत विनासहकारी, सुक्ष्म, लघु उद्योगांच्या उभारणीसाठी
१० लाख रूपयांचं कर्ज बँका, वित्तीय संस्थार्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे
*****
केंद्रीय माध्यमिक
मंडळ- सीबीएसईतर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्र विषयाची
प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच लिंक झाली होती. यात सहभागी विद्यार्थ्यांची यादी दिल्ली
पोलिसांनी सीबीएसईकडे आज पाठवली असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात
दिल्ली पोलिसांनी २७ आणि २८ मार्च रोजी विद्यार्थी आणि खाजगी शिकवणी चालकांविरोधात
दोन गुन्हे दाखल केले होते. प्रश्नपत्रिका लिंक झाल्यामुळे बारावीच्या अर्थशास्त्र
विषयांची पुर्नपरीक्षा २५ एप्रिल रोजी घेण्यात आली होती. तर दहावीच्या गणित विषयाची
पूर्नपरीक्षा घेण्यास सीबीएसईनेच विरोध दर्शविला होता.
दरम्यान, सीबीएसईचा
इयत्ता दहावीचा निकाल आज संध्याकाळी चार वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या
डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट सी बी एस ई डॉट एन आय सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर
पाहता येईल.
****
जगातील सर्वांत उंच
शिखर असलेल्या एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणाऱ्या पाच अदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी
२५ लाख रूपयांचा पुरस्कार देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी
केली. या मोहिमेत सहभागी झालेल्या इतर पाच विद्यार्थ्यांना एव्हरेस्ट शिखर सर करता
आले नाही. त्या विद्यार्थ्यांनाही प्रत्येकी
दहा लाख रूपयाचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
****
तेलंगणाच्या करीमनगर
जिल्ह्याच्या चेंजेरला इथं आज सकाळी राज्य परिवहन मंडळाची एक बस विरूद्ध दिशेनं येणाऱ्या
लॉरीला धडकून झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यु झाला तर १५ जण जखमी झाले. ही बस वारंगलहून
करीमनगरला जात होती.
*****
दक्षिण पश्चिम मॉनसून आज केरळ मध्ये पोहोचण्याची
शक्यता आहे. हवामान विभागान, येत्या २४ तासात अंदमान, निकोबार, केरळ, कर्नाटकचा तटवर्ती
भाग, तसंच तमिळनाडू इथं जोराचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, विभागानं या वर्षी देशात ९७ टक्के पाऊस
पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
****
गेल्या वर्षीच्या जुलै मध्ये लागू करण्यात आलेल्या
वस्तु आणि सेवा कराच्या कायद्यात शेतकऱ्यांशी संबधित कर आकारणीच्या नियमात कोणताही
बदल करण्यात आला नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. कृषि, मत्स्य, पशुपालन यासारख्या
सेवांना वस्तु आणि सेवा करातून मुक्त ठेवण्यात
आलं असल्याचं वित्त मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
औरंगाबाद शहराच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्त करण्यात
आलेले चिरंजीव प्रसाद आज दुपारनंतर आपल्या
पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
काल त्यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले.
प्रसाद सध्या नांदेड परिक्षेत्र विशेष पोलिस महानिरीक्षक पदी कार्यरत आहेत.
****
जागा नसल्यानं हिंगोली बाजार समितीत गेल्या गुरूवार
पासून बंद करण्यात आलेली हळद खरेदी कालपासून
पुन्हा सुरू झाली. सध्या चार हजार क्विंटलच्या जवळपास हळद विक्रीसाठी दाखल झाली असून प्रतिक्विंटल सात हजार ते साडे सात हजार रूपये भाव असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटल आहे.
****
गाळयुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत
बीड जिल्ह्यात साठ लहान मोठ्या तलावांमधून
आतापर्यंत तीन लाख घनमीटरहून अधिक गाळ काढण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या ३१७
गावांतल्या ३३५ तलावांची गाळ काढण्यासाठी निवड
करण्यात आली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment