आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१४ ऑगस्ट
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
हिंदी
दिवस आज साजरा केला जात आहे. देशभरात या निमित्तानं विविध साहित्यिक तसंच सांस्कृतिक
कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. नवी दिल्लीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राजभाषा कीर्ती आणि गौरव पुरस्कार प्रदान केले.
इंग्रजीच्या प्रभावातून दूर होऊन, राजभाषा हिंदीला प्रोत्साहन देणं आवश्यक असल्याचं
प्रतिपादन, नायडू यांनी यावेळी केलं. शासकीय कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी इंग्रजीचा
अट्टहास सोडून, जनसामान्यांच्या भाषेत संवाद साधावा, असं आवाहन त्यांनी केलं. प्राथमिक
शिक्षण हे भारतीय भाषांमधूनच दिलं जावं, या मुद्यावर उपराष्ट्रपतींनी भर दिला.
केंद्रीय
गृहमंत्री राजनाथसिंह यांनी यावेळी केलेल्या भाषणात, हिंदी ही देशाला जोडणारी भाषा
असल्याचं नमूद केलं.
****
स्वदेश
दर्शन योजनेअंतर्गत राबवण्यात येणा-या देशातल्या पहिल्या आदिवासी क्षेत्र पर्यटन प्रकल्पाला
आज छत्तीगडमधल्या गांग्रेल इथून सुरुवात होणार आहे. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.
जे. अल्फोन्स यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्धाटन होणार आहे. या प्रकल्पात पर्यावरण
पूरक लाकडी झोपडया, हस्तकला प्रदर्शन, पर्यटन माहिती केंद्र, तसंच विविध कार्यशाळा
अशा उपक्रमांचा समावेश आहे.
****
भारत
आणि रशिया या देशांमधल्या तांत्रिक आणि अर्थविषयक सहकार्यासाठीच्या आंतर-सरकारी आयोगाची
२३ वी बैठक आज रशियात मॉस्को इथं होत आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या बैठकीत
सहभागी होणार आहेत. द्वी पक्षीय व्यापार आणि गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संस्कृती
या क्षेत्रांमधल्या परस्पर सहकार्याबाबत या बैठकीत चर्चा होईल.
****
नाशिक
जिल्ह्यात चार महिलांचा काल बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाला. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर बेळगाव ढगा इथं ही दुर्घटना घडली. बंधाऱ्यावर कपडे
धुण्यासाठी गेलेल्या या महिलांपैकी एकीचा पाय घसरून ती बंधाऱ्यात पडली, तिला वाचवण्याच्या
प्रयत्नात इतर तिघींचाही बुडून मृत्यू झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
ऋषीपंचमी
आज सर्वत्र भक्तीभावानं साजरी होत आहे. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज
महिलांनी श्रीगणेश अथर्वशीर्षाचं समूहपठण केलं. विदर्भ पंढरी अशी ओळख असलेल्या शेगाव
इथं, ऋषीपंचमीनिमित्त गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे.
****
No comments:
Post a Comment