▼

Tuesday, 11 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 11.12.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

११ नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



 छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट सर्वाधिक २६ जागांवर आघाडीवर असल्याचं वृत्त आहे. राजस्थानात दोनशे जागांपैकी काँग्रेस १०१, तर भारतीय जनता पक्ष ८१ जागांवर आघाडीवर आहे. मध्यप्रदेशात २३० जागांपैकी काँग्रेस ११२ आणि भाजप १०२ जागांवर आघाडीवर आहे. छत्तीसगढमध्ये काँग्रेसची बहुमताकडे वाटचाल सुरु असून, एकूण ९० जागांपैकी काँग्रेस ६० तर भाजप २३ जागांवर आघाडीवर आहे. तेलंगणात ११९ जागांपैकी तेलंगणा राष्ट्र समिती ७७, तर काँग्रेस ३२ जागांवर आघाडीवर आहे.   

****



 संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, या अधिवेशनात जनहिताच्या प्रश्नांवर भरीव कामकाज होईल, असा विश्वास व्यक्त केला. आज सकाळी संसद भवन परिसरात वार्ताहरांशी संवाद साधताना, पंतप्रधानांनी, संसदेच्या दोन्ही सभागृहात विविध मुद्यांवर वादविवाद झाले तरी, संवाद होणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलं.

****



 स्वत:च्या मानवी हक्कांबाबत जागरूक राहताना इतरांच्या मानवी हक्कांवर गदा येणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सचिव शरद देशपांडे यांनी केली आहे. ते काल बीड इथं मानवी हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मुलांचे शिक्षण, आरोग्य, पोषण आहार हेही मानवी हक्काचे घटक आहेत. त्यामुळे सर्व मुलांना शिक्षण मिळणं आवश्यक आहे. शिक्षणानं मुलांवर चांगले संस्कार होऊन सुदृढ समाज निर्मिती होण्यास मदत होते असंही देशपांडे यावेळी म्हणाले.

****



 औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या रहिमाबाद इथल्या तलाठी दिपाली जाधव हिला दिडहजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. तक्रारदार यांच्या पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार नोंद करण्यासाठी जाधव हिनं ही लाच घेतली.

****



 राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नाशिकमध्ये थंडीची तीव्रता वाढली असून, आज हंगामातलं सर्वाधिक नीचांकी नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तपमानाची नोंद झाली.

*****

***

No comments:

Post a Comment