आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१७ नोव्हेंबर डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
१९८४ च्या शीख दंगल प्रकरणी, दिल्ली उच्च न्यायालयानं,
काँग्रेस नेता सज्जनकुमार यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र
न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर गेल्या २९ ऑक्टोबर रोजी सुनावणी
झाल्यावर, न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता. आज हा निर्णय सुनावताना न्यायालयानं,
सज्जनकुमार यांना ३१ डिसेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्यास सांगितलं आहे. सत्र न्यायालयानं
या प्रकरणी सज्जनकुमार यांची निर्दोष मुक्तता करत, उर्वरित तिघांना आजन्म कारावास तर
दोघांना प्रत्येकी साडे तीन वर्ष शिक्षा सुनावली होती.
****
मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये नवनिर्वाचित
सरकार आज शपथग्रहण सोहळ आज होत आहे. राजस्थानात जयपूर इथं माजी मुख्यमंत्री तसंच काँग्रेसचे
ज्येष्ठ नेते अशोक गहलोत मुख्यमंत्रिपदाची तर सचिन पायलट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत
आहेत.
मध्यप्रदेशात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ मुख्यमंत्री
म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील.
छत्तीसगढमध्ये काँग्रेसनं मुख्यमंत्री म्हणून प्रदेशाध्यक्ष
भूपेश बघेल यांची निवड केली आहे. रायपूर इथं काल झालेल्या पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या
बैठकीत बघेल यांची विधिमंडळ नेता म्हणून नियुक्ती झाल्याची घोषणा करण्यात आली. भूपेश
बघेल आज दुपारनंतर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.
****
शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेनं बीड जिल्हा
परिषदेत भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा काढून घेतला आहे. काल बीड इथं झालेल्या राज्यस्तरीय
बैठकीत हा निर्णय झाल्याच शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत
सांगितलं. राज्य कार्यकारिणीच्या या बैठकीत अनेक महत्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले
असल्याची माहिती मेटे यांनी यावेळी दिली.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पर्थ इथं सुरु असलेल्या
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवशी उपाहारापर्यंत
ऑस्ट्रेलियानं दुसऱ्या
डावात २३३ धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात ४३ धावांची आघाडी
घेतलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने, दुसऱ्या डावात सहा बाद १९३ धावा
केल्या आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment