Monday, 28 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 28.01.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८  जानेवारी  २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 भारतीय रेल्वे पर्यटन आणि खानपान महामंडळ - आयआरसीटीसीच्या उपाहारगृह आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दिल्लीच्या विशेष न्यायालयानं राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर केला आहे. याप्रकरणी लालू यादव त्यांच्या पत्नी राबडीदेवी आणि मुलगा तेजस्वी यादव यांनाही न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. आयआरसीटीच्या उपाहारगृहांचं कंत्राट देताना भ्रष्टाचार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

****



 भारतीय जनता क्षाच्या राज्य कार्यकारिणीची आज जालना इथं बैठक हो आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्रिमंडळातले भाजपचे मंत्री, पक्षाचे पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कृषी आणि राज्यकीय ठरावांसह बारा विषयांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे.

****



 राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचं राज्यस्तरीय अधिवेशन काल नागपूर इथं झालं. वृत्तपत्र विक्रेत्यांचं कार्य अतिशय उच्च दर्जाचं असून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत ज्ञान पोहचवणं त्यांच्याद्वारे होतं असं राज्याचे उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी बोलतांना नमूद केलं.

****



 प्राचार्य ना.य.डोळे स्मृती पुरस्कार अभिनेते - सामाजिक कार्यकर्ते अतुल कुलकर्णी यांना काल प्रदान करण्यात आला. लातूर जिल्ह्याच्या उदगीर इथं आयोजित कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुध्द जाधव यांच्या हस्ते कुलकर्णी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

****



 भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना सध्या माऊंट मौंगानुई इथं सुरू आहे. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा, न्यूझीलंडच्या बेचाळीसाव्या षटकांत सहा बाद १९६ धावा झाल्या होत्या. यजुवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्यानी प्रत्येकी दोन तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी एक गडी बाद केला.

*****

***

No comments:

Post a Comment