Thursday, 14 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 14.02.2019 11.00AM




आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१४ फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंड मधील रूद्रापूर येथिल राज्‍य समन्वित सहकारिता विकास परियोजनाचं उद्धाटन करणार आहेत. या योजनेमुळे ग्रामिण अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमात  दीन दयाळ उपाध्याय किसान कल्याण कार्यक्रमा मधून निवड झालेल्या  शेतकऱ्यांना दोन टक्के व्याजदाराने कर्ज वाटप केले जाणार आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्‍न दुप्‍पट करण्याच्या दृष्टीने हे महत्तवाचे पाउल असेल असे ते म्हणाले

****



 उडान योजनेमुळं देशाच्या विमान  उड्डाण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे असं नागरी उड्डाण मंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटल आहे. काल आकाशवाणीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. या योजनेची जगभरात एक स्वतः ची ओळख झाली असल्याचं ते यावेळी म्हणाले.

****



 १६ व्या लोकसभेचं अंतिमसत्र काल संपलं. या सत्राचा अहवाल देताना संसदीय कामकाज मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेच्या ३३१ बैठका झाल्याचं सांगितलं. २०५विधेयकं लोकसभेत तर १५४ विधेयकं राज्यसभेत सादर करण्यात आली.

****





 पालघर जिल्ह्यातल्या डहाणू, तलासरी आणि आसपासच्या परिसरात काल पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी पावणे अकरा आणि दुपारी एक वाजेच्या सुमारास जाणवलेल्या या धक्क्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर तीन पूर्णांक एक इतकी नोंदली गेली.

****



 औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीच्या वतीनं ॲमेझिंग औरंगाबाद या प्रकल्पांतर्गत राष्ट्रगीताची एक विशेष ध्वनिचित्रफीत तयार करण्यात आली आहे. औरंगाबाद परिसरातल्या वारसा स्थळांचं दर्शन घडवणाऱ्या या ध्वनिचित्रफितीचं आज लोकार्पण होत आहे. शहरातल्या महात्मा गांधी संस्थेच्या रुक्मिणी सभागृहात सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

****



 परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामटे यांच्या विरोधात काल २७ पैकी २६ सदस्यांनी अविश्वास ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला. विकास कामांबद्दल सदस्यांना विश्वासात  न घेता मनमानी पद्धतीनं कामटे कारभार करतात असा आरोप सदस्यांनी केला आहे.

*****

***

No comments:

Post a Comment