Sunday, 17 February 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 17.02.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१७  फेब्रुवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



 तीन हजार ६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या ख्रिस्तियन मिशेलचा जामिन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयानं काल फेटाळून लावला. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालयानं मिशेलच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. दुबईतून मिशेलचं प्रत्यार्पण केल्यावर सक्तवसुली संचालनालयानं गेल्या २२ डिसेंबरला त्याला अटक केली होती. येत्या २६ फेब्रुवारीपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

****



 जयपूर ते सिकंदराबाद साप्ताहिक रेल्वे गाडी काल रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे आज ही रेल्वे गाडी आज धावणार नाही. पूर्णा, नांदेड, हिंगोली मार्गे जाणारी ही गाडी दर शनिवारी जयपूर इथून रात्री नऊ वाजता सुटते. राजस्थान  मध्ये सुरु असलेल्या गुर्जर आंदोलनामुळे ही रेल्वे रद्द करण्यात आली असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे.

****



 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आज राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येत आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्यातल्या ६५ केंद्रांवर २१ हजार ६०० उमेदवार ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह इतर उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

****





 औरंगाबादमध्ये दोन दिवसीय राष्ट्रीय कर परिषदेला कालपासून सुरूवात झाली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातले न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं. कर व्यावसायिकांनी कायद्यानुसार आचारसंहिता आणि नैतिकता जोपासल्यास, न्यायालयात येण्याची गरज पडणार नाही, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

****



 परभणी इथं काल भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. कॉंग्रेस पक्षाला केरळातील मुस्लिम लीग चालते, मग एमआयएमचे नेते का नाही चालत, असा सवाल आंबेडकर यांनी केला. या सभेसाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय हजर होता.

****



 पोषक वातावरण आणि कीड रोगांचा फारसा प्रादुर्भाव नसल्यानं यंदा आंबा उत्पादनात १० ते २० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता कृषी विभागानं व्यक्त केली आहे.

*****

***

No comments:

Post a Comment