Monday, 15 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 15.07.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१५ जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ चं काम थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. सांगली ते सोलापूर आणि तुळजापूर ते वर्धा दरम्यान या महामार्गाचं काम गतीनं सुरू होतं, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीतून वळण रस्ता काढण्यात आला, मात्र काही शेतकऱ्यांना याचा मोबदला मिळाला नसल्यामुळे, अखिल भारतीय किसान सभा आणि संबंधित शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेच्या माध्यमातून हरकत घेतली. त्यामुळे न्यायालयाचं पुढील सुनावणी होईपर्यंत या महामार्गाचं काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
****

 जालना जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ६८८ पूर्णांक २१ शतांश मिलीमीटर असून, एक जूनपासून आजपर्यंत केवळ १३८ पूर्णांक ६३ शतांश मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. अत्यल्प पावसामुळे पेरण्या वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
****

 औरंगाबाद इथं काल, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांचंहिंदुत्व : संकल्पना आणि वर्तमानकाळातील अनुबंधया विषयावर व्याख्यान झालं. लोककलेचे अभ्यासक प्रभाकर मांडे लिखित हिंदुत्व या पुस्तकाचं विमोचन काल सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते झालं. हिंदुत्वाबाबत राजकिय पूर्वग्रहातून गैरसमज पसरवले जात आहेत, त्यामुळे हिंदुत्वाची व्यापकता समजून घेण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 प्रख्यात विचारवंत दिवंगत प्राध्यापक नरहर कुरुंदकर यांच्या ८७ व्या जन्मदिनानिमित्त नांदेड इथं आज व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमात मनमाड इथले कवी खलील मोमीन यांचं आजची कविताया विषयावर व्याख्यान होईल.
****

 जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेत आतापर्यंत सुमारे एक लाख ब्याऐंशी हजारावर यात्रेकरूंनी पवित्र अमरनाथ शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे.
*****
***

No comments:

Post a Comment