आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१६ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
भंडारदरा, निळवंडे धरणातून उद्या १७ जुलै पासून पाण्याचं
आवर्तन सोडण्यात येणार असल्याचं अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण
देशमुख यांनी सांगितलं आहे. भंडारदरा धरणात चार हजार ७१३ दश लक्ष घन फूट तर निळवंडे
धरणात एक हजार ७०६ दश लक्ष घन फूट पाणीसाठा आहे. जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने निळवंडे
धरणातून उद्या सकाळी सहा वाजता पिण्यासाठी १५०० घनफूट प्रतिसेकंद वेगाने आवर्तन सोडण्यात
येईल. हे आवर्तन पाच ते सहा दिवसांचं असेल, असं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे.
****
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, धनगर
समाजाला अधिवासीच आरक्षण दिले जाईल, धनगर समाजाला आरक्षण देताना अ आणि ब अशी वर्गवारी
करून आरक्षण देता येणं शक्य आहे, असं मत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त
केलं आहे. सांगली महापालिका क्षेत्रातल्या विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत
होते.
****
आघाडीचा मुख्यमंत्री करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनी
आपल्या पक्षात किती आमदार राहतील याचा आधी आढावा घ्यावा, अशी टीका गृहनिर्माण मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे, ते शिर्डी इथं पत्रकांरांशी बोलत होते. आगामी
विधानसभा निवडणुकीत लोकसभेपेक्षा वेगळे निकाल नसतील, २२० जागांचे उद्दीष्ट पूर्ण होईल,
असं ही ते यावेळी बोलतांना म्हणाले. .
****
राज्य विधान परिषदेच्या
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आज सायंकाळी बीड जिल्ह्यातल्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयास
भेट देणार आहेत. जिल्ह्यात अनेक महिलांची गर्भाशय काढून टाकल्याचा प्रकार समोर आला
आहे, या पार्श्वभूमीवर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली आहे. डॉ
गोऱ्हे उद्या संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बीड इथं एक बैठकही घेणार आहेत. त्याचबरोबर वंजारवाडी
इथल्या पीडित महिलांशी तसंच आशा आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांशी त्या संवाद साधणार आहेत.
या दौऱ्यात त्या साखर कारखाना संचालक, मुकादम संघटना प्रतिनिधी तसंच अशासकीय संस्थाच्या
प्रतिनिधींबरोबरही चर्चा करणार आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment