Thursday, 18 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  18 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 कर्नाटक विधानसभेचं महत्त्वपूर्ण सत्र आज सुरू झालं. आपल्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळावर सदनाला विश्र्वास असल्याचं नमुद करत मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी यात विश्र्वासमत प्रस्ताव सादर केला. सोळा बंडखोर आमदारांनी अध्यक्षांकडे राजिनामे सोपवल्यानंतर कर्नाटकमधील जनतादल धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेस आघाडीचं सरकार अल्पमतात आलं आहे. दोन अपक्ष आमदारांनीही समर्थन मागं घेतल्यानं सध्याच्या सरकारची सदस्य संख्या एकशे एक वर आली आहे. दोन अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्यामुळं भाजप सदनातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. जनता दल धर्मनिरपेक्ष आणि काँग्रेस आघाडीकडे शंभराहून कमी सदस्य असून भाजपकडे एकशे पाच आमदार असल्याचा दावा कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडुरप्पा यांनी केला आहे.
****

 वादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणात मध्यस्थ समितीच्या प्रगतीचा आज सर्वोच्च न्यायालयानं आढावा घेतला. सरन्यायाधिश रंजन गोगोईंच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठानं या संदर्भातला अहवाल गेल्या आठवडयात मागवला होता. माजी न्यायमूर्ती एफ एम आय खलिफुल्ला यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय मध्यस्थ समितीनं १८ जुलै पर्यंत आपला अहवाल द्यावा अशी विंनती न्यायालयानं या समितीला केली होती. यानुसार या समितीने हा अहवाल सादर केला असुन हा अहवाल गुप्त ठेवुन या संदर्भात येत्या दोन ऑगस्टपासून नियमित सुनावणी घेणार असल्याचं सर्वौच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
****

 आंतरराष्टीय न्यायालयाने काल दिलेल्या निर्णयानुसार पाकिस्ताननं कुलभुषण जाधव यांना भारताकडे सोपवावं अशी मागणी भारतानं केली आहे. विदेशमंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत सांगितलं की, आंतरराष्ट्रिय न्यायालयाच्या निर्णयाने भारत आणि जाधव यांचीच नाही तर कायद्यावर विश्वास ठेवणार्यांची बाजु योग्य आहे हे सिध्द झालं आहे. जयशंकर यापुढे म्हणाले की जाधव हे निर्दोष असुन जबरदस्तीने लिहुन घेतलेल्या कबुलीनाम्याने सत्य बदलत नाही.यासंदर्भात ताबडतोब पाकिस्तानने भारतीय दुतावासास संपर्क करुन जाधव यांना भारताच्या ताब्यात देण्याची प्रकीया पुर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली.
****

 केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत ५८ कालबाह्य कायदे रद्द करणार्‍या विधेयकाला मंजुरी देण्यात आली, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. रालोआ सरकारनं आतापर्यंत कालबाह्य झालेले हजार ८२४ कायदे रद्द केले आहेत. अरुणाचल प्रदेशात हजार ८८० मेगावॅट वीज निर्मितीक्षमतेचा दिबंग बहुउद्देशीय प्रकल्प उभारायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं जावडेकर यांनी नमुद केलं.
****

 केंद्रीय मंत्रीमंडळानं १५व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवला आहे. यामुळे विविध आर्थिक अंदाजांचा तुलनात्मक अभ्यास व्हायला तसंच आर्थिक सुधारणांसंदर्भात नवीन तथ्यांचा विचार करुन २०२० ते २०२५ सालासाठीच्या शिफारशी करायला मदत होणार आहे. केंद्रीय मंत्रीमंडळानं संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा यासाठी पुरेसा, सुरक्षित आणि कालमर्यादेचं बंधन नसणारा निधी उपलब्ध
व्हावा यासाठी सुधारित प्रस्तावालाही मंजूरी दिली आहे.
****

 मराठवाड्यात पावसानं ओढ दिली असल्यानं या ठिकाणी कृत्रीम पावसाचा प्रयोग करणार असून यासाठीची यंत्रणा सज्ज असल्याचं कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज तुळजापूर थं सांगितलं. मराठा आरक्षण जसं उच्च न्यायालयात टिकलं सं  सर्वोच्य न्यायालयातही टिकू दे अशी प्रार्थना आपण देवी चरणी केली असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****

 इंडोनेशियाच्या जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे किदांबी श्रीकांत आणि पी.व्ही. सिंधू उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. या दोन्ही खेळांडूनी जपानच्या खेळांडून पराभूत केलं.

दरम्यान, म्युनिच इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अनीष भनवाल यानं २४ मीटर रॅपिड ओहायर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक पटकावलं आहे.
****

 झेकेस्लोवाकियात आयोजित टबोर ॲथेलेटिक्स स्पर्धेत भारताच्या हिमा दासनं काल २०० मीटर्सच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं. गेल्या पंधरवडाभरातलं तिचं हे चौथं सुवर्णपदक आहे.  दोनशे मीटरचं अंतर तिनं २३ सेकंद आणि २५ मिलि सेंकदांत पार केलं.  तिच्या पाठोपाठ  २३ सेकंद आणि ४३ मिलि सेकंदांची वेळ नोंदवत व्ही. के. विस्मयानं  दुसरा  क्रमांक  पटकावला.  पुरुषांच्या चारशे मीटर शर्यतीत मुहम्मद अनासनं सुवर्ण, तर टॉम निरमलनं रौप्य पदक पटकावलं.
*****
***

No comments:

Post a Comment