Friday, 19 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 19.07.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१९  जुलै  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
केंद्रिय निवडणूक आयोगानं, राष्ट्रवादी  कॉंग्रेस पक्ष, तृणमुल कॉँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांना नोटीस बजावली आहे. लोकसभा निवडणुकीतल्या खराब कामगिरीमुळ‍ं या पक्षांना त्यांच्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्याबाबत ही नोटीस आहे. या पक्षांना २४ ऑगस्टपर्यंत उत्तर द्यायला सांगण्यात आलं आहे. या पुर्वी २०१४ मधील  निवडणुकीनंतरही अशी नोटीस या पक्षांना बजावण्यात आली होती. त्यावर या पक्षांना न्यायालयात दिलासा मिळाला होता. निवडणूक अधिनियमानुसार कोणत्याही पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यासाठी त्य़ा पक्षानं किमान चार राज्यांमधे लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकांमधे एकूण मतदानाच्या सहा टक्के मतदान आणि लोकसभेच्या चार जागा मिळवणं आवश्यक आहे.
****
र्नाटक विधानसभेत काल विश्वासमत प्रस्तावावर मतदान होऊ शकलं नाही. चर्चेदरम्यान वारंवार व्यत्यय येत असल्यानं, विधानसभा अध्यक्षांनी सदनाचं कामकाज काल दिवसभरासाठी स्थगित केलं.
****
औरंगाबाद हे जागतिक वारसा शहर घडण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असं पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात, आढावा बैठकीत बोलत होते. दौलताबाद किल्ल्यावर ध्वनि प्रकाश कार्यक्रमासह, पर्यटन विकासासाठी लागणारा आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करून देऊ, असं त्यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अठरा उमेदवार निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी तसंच मतदारांचं आशिर्वाद घेण्यासाठी आपण जन आशिर्वाद यात्रा काढली असल्याचं शिवसेनेचे युवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा इथं या यात्रेनिमित्त आयोजित सभेत ते काल बोलत होते. एक नवा महाराष्ट्र घडवणं तसंच संपूर्ण राज्यात शिवसेनेचा झेंडा उंचावण्याचा मानस आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
मुंबईतील एका न्यायालयानं कुख्यात गुंड दाऊद इब्राहीम याचा पुतण्या कासिम रिजवान याला २२जुलै पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कासकर याला पोलिसांनी मुंबईच्या अंतरराष्ट्रिय विमानतळावरून बुधवारी अटक केली होती. तो देश सोडून पळून जाण्याच्या तयारित होता. रिजवानला खंडणी वसुल करण्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे.
****



No comments:

Post a Comment