Saturday, 20 July 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 20.07.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –  20 July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जुलै २०१९ दुपारी .०० वा.
****

 भारतीय रिझर्व्ह बँकेनं आपल्या प्रमुख व्याजदारांमधे कपात केल्यानंतर त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यामधे देशातल्या बँका कमी पडत आहेत, अशी खंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली आहे. ते काल मुंबईत, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या प्रमुखांशी बोलत होते. बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना भेडसावणारी रोखीची समस्या सोडवण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पानंतरच्या काळात केलेल्या उपायांची परिणामकारकता आणि बँकांची भूमिका याविषयी दास यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं. बँकिंग क्षेत्रात सुधारणा होत आहेत, मात्र भविष्यात अनेक आव्हानंही समोर आहेत, असं ते म्हणाले. अर्थव्यवस्थेत वित्तीय तरलता आणि भांडवलाच्या प्रमाणात वृद्धी अपेक्षित असल्याचं दास यांनी सांगितलं. जोखमीचं मूल्यमापन, कर्जवसूली, आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी अंतर्गत व्यवस्था इत्यादी विषयांवरही यावेळी चर्चा झाली. डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या आवश्यकतेवर दास यांनी यावेळी भर दिला.
****

 अरुणाचल प्रदेश आणि आसामात आज पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता साडेपाच इतकी मोजली गेली. अरुणाचल मधे काल दुपारी राजधानी इटानगरसह बहुतेक पश्चिमी भागात पाच पूर्णांक ६ दशांश, ३ पूर्णांक ८ दशांश आणि ४ पूर्णांक ९ दशांश तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याचा केंद्रबिंदू इटानगरपासून पूर्वेला १०७ किलोमीटर अंतरावर कामेंग जिल्ह्यात होता.
****

 संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जम्मू आणि काश्मीरच्या एक दिवसीय दौऱ्यावर असून ते कारगील दिनाच्या २० व्या स्मरण दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहे. तसंच यावेळी ते सैन्याच्या तुकडीशी संवाद साधणार असून सीमारेषेवरील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेणार आहे. तसंच कठुआ  जिल्ह्यातल्या उझ नदीवरील आणि संबा जिल्ह्यातल्या बसंतार भागात दोन पुलांच उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र प्रसाद आणि सैन्य दलाचे प्रमुख बिपीन रावत देखील त्यांच्यासोबत उपस्थीत राहतील.
****

 कर्नाटकमध्ये काँग्रेस-जे डी एस सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आणखी दोन दिवस मिळाले. राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी सरकारला काल दोन संधी दिल्यानंतर सभागृह तहकुब करण्यात आले. आता सोमवारी पुन्हा विश्वासदर्शक ठरावावर चर्चा होणार आहे. युतीच्या नेत्यांच्या दीर्घकाळ चाललेल्या भाषणानंतर विधानसभा अध्यक्ष के आर रमेश यांनी काल सभागृहातलं कामकाज तहकुब केलं. मात्र विश्वासदर्शक ठरावावरील मतदानासाठी सोमवारपर्यंत वाट बघणार असल्याचं भाजप नेते बी एस येदीयुरप्पा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि काँग्रेस नेत्यांनी राज्यपाल वजुभाई वाला हे सभागृहाच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  
****

 पाकिस्ताननं दहशतवादी हाफीज सईद केलेल्या अटकेच्या हेतूबाबत अमेरिकन प्रशासनानं शंका व्यक्त केली आहे. हाफीज सईद २००१ मधील भारतीय संसदेवरील हल्ला आणि २००८ च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधार आहे. पाकने सईदला यापूर्वी केलेल्या अटकेमुळं त्याच्या किंवा लष्कर-ए तयबाच्या दहशतवादी कारवायांवर कोणताही परिणाम झाला नसल्याचं अमेरिकनं म्हटलं आहे. त्यामुळे सईदवर निर्णायक कारवाई करण्यासाठी अमेरिका इम्रान खान सरकारवर दबाव आणणार असल्याचं ट्रम्प प्रशासनातल्या अधिका-यानं म्हटलं आहे. पाकिस्तान दहशतवादी गटांविरोधात निर्णायक कारवाई करेपर्यंत अमेरिका पाकिस्तानच्या सुरक्षेसाठीच्या मदतीवरील बंदी उठवणार नसल्याचंही ट्रम्प प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. 
****

 नांदेड जिल्ह्यात उगवलेली पीकं पावसाअभावी वाळून जात आहेत. या पीकांचे पंचनामे करून राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीचे निवेदन डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्यावतीने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना काल सादर करण्यात आलं.
****

 गेल्या १५ दिवसापासून गायब असलेल्या पावसानं अहमदनगर शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात हजेरी लावली .जिल्ह्यात जामखेड, संगमनेर, अहमदनगर तालुका या भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.
*****
***

No comments:

Post a Comment