आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२३ जुलै २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय प्रसारण दिवस आज साजरा होत आहे. २३ जुलै
१९२७ रोजी मुंबईतून भारतीय रेडिओ सेवेच्या प्रसारणाला प्रारंभ झाला. इंडियन ब्रॉडकास्टिंग
कंपनीच्या नावे सुरू असलेल्या या रेडिओचं १९३६ साली ऑल इंडिया रेडिओ असं नामकरण करण्यात
आलं.
****
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि क्रांतिकारक चंद्रशेखर
आझाद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे.
या दोन्ही वीरांना स्वातंत्र्य लढ्यातल्या बलिदानासाठी कृतज्ञ राष्ट्र कायम स्मरण करेल,
असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
****
ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथं तीन गोदामांना आग लागून
मोठं आर्थिक नुकसान झालं. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. रसायनाच्या गोदामात
लागलेली ही आग, पसरत गेल्यानं, शेजारची दोन गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. भिवंडी
आणि कल्याण इथल्या अग्निशामक दलाच्या सहा बंबांनी सहा तास प्रयत्न केल्यानंतर ही आग
आटोक्यात आली. सुदैवानं आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
****
सरकारी विभागांशी संबंधित माहिती मधे पारदर्शकता
आणि उत्तरदायित्वासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
यांनी म्हटलं आहे. माहिती अधिकार अर्जांचं प्रमाण कमी करण्यासाठी अनेक शासकीय
विभाग स्वत:हुन माहिती देण्यासाठी सरसावले असल्याचं ते म्हणाले.
****
सर्वेाच्च न्यायालय आज कर्नाटकच्या दोन अपक्ष
आमदारांच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे, मुख्यमंत्री एच डि कुमारस्वामी यांनी आपलं बहुमत तात्काळ सिद्ध
करावं अशी मागणी या याचिकेत केलेली आहे.
दरम्यान कुमारस्वामी सरकारला आज सायंकाळी विश्वासमत चाचणीला सामोरं जायचं आहे.
****
राज्यातील पर्जन्यमानाची परिस्थिती पाहून टंचाईच्या
उपाय योजना १५ जुलै पर्यंत राबवाव्यात असा शासन निर्णय झालेला होता. त्याच प्रमाणं
ज्या जिल्हयात १५ जुलै नंतर पर्जन्यमान परिस्थिती पाहून त्या त्या जिल्हा प्रशासनानं
टंचाई उपाययोजना राबविण्या बाबत निर्णय घ्यावा,
असं सूचित केलेले होते. त्यानुसार लातूर जिल्हयात ३१ जुलै या योजना चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
*****
***
No comments:
Post a Comment