Saturday, 31 August 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.08.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
उस्मानाबाद जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत असल्याचं जाहीर केलं आहे. आज उस्मानाबाद इथं, परिवार संवाद या कार्यक्रमात जगजीतसिंह पाटील यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले....
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपल्या हक्काचं पाणी आणलं. युवकांना न्याय देण्यासाठी इथं उद्योग आणून रोजगार उपलब्ध करून देणं, आणि हे सर्व आपल्याला करत असताना सगळ्यांना बरोबर घ्यायचंय, अडीअडचणी दूर करायच्यात. आपलं सामर्थ्य वाढवायचंय. आणि हे करण्यासाठी आपण सर्वजण मिळून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू.
माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्यासह जिल्ह्यातून पाटील यांचे समर्थक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा उद्या उस्मानाबाद इथं पोहोचते आहे.
****
राज्यभर गाजलेल्या जळगाव घरकुल घोटाळ्यात माजी मंत्री सुरेश जैन यांना सात वर्ष तुरुंगवास आणि शंभर कोटी रुपये दंड तसंच माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. धुळे विशेष न्यायालयानं या प्रकरणात आज सर्व ४८ आरोपींना शिक्षा सुनावली. या सर्वांना ताब्यात घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
****
धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या वाघाडी रसायन कारखाना स्फोटातल्या मृतांची संख्या तेरा झाली आहे. आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा स्फोट झाला. यामध्ये सुमारे ५८ जण जखमी झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली. जखमींमध्ये सहा लहान बालकांचाही समावेश आहे. पंधरा गंभीर जखमींना धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. धुळ्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळाची पाहणी करून, जखमींची चौकशी केली.
दरम्यान, या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत शासनानं जाहीर केली आहे. जखमींचा उपचाराचा सर्व खर्च शासन करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
****
सत्ता असो किंवा नसो शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त झाला पाहिजे, ही आमची भूमिका असून त्यासाठी लढा सुरूच राहणार असल्याचं युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते आज जालन्यात दोन दिवसीय महारेशीम महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. राज्यमंत्री अर्जुन खोतकर यावेळी उपस्थित होते. रेशीम कोष उत्पादनात जालना जिल्ह्यानं मोठी प्रगती केली असून, देशाच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन जिल्ह्यात होत असल्याचं खोतकर यांनी सांगितलं.
****
महाराष्ट्रात एक लाख रुपयांपर्यंत माल वाहतुकीवर “ई-वे” बिल आवश्यक नाही, असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं आहे. कोणत्याही किंमतीचा कापूस, सूत, कापड, वस्त्र यासारखा माल राज्यांतर्गत ५० किलोमीटर पर्यंतच्या अंतरावर प्रक्रिया करण्यासाठी पाठवला, तर तो “ई-वे” बिलामधून वगळण्यात आला असल्याचं,  मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
मराठवाडा विकास मंडळाच्या वतीनं आज औरंगाबाद इथं, ‘मानव विकास निर्देशांक’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र घेण्यात आलं. उद्योग राज्यमंत्री अतुल सावे यांनी या चर्चासत्राचं उद्घाटन केलं. मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, माजी सनदी अधिकारी भास्कर मुंडे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड या जिल्ह्यातल्या तीस तालुक्यांमधला मानव विकास निर्देशांक वाढवण्यासाठी शिक्षण, आरोग्य आणि उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यात वाई गोरखनाथ इथं आज महापोळा साजरा झाला. मराठवाड्यासह विदर्भातूनही आलेल्या शेकडो बैलजोड्यांनी गोरखनाथाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा घातली.
****
दरम्यान, हिंगोली जिल्ह्याच्या काही भागांत काल रात्रीपासून पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना जीवदान मिळालं, त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला.
परभणी जिल्ह्यातही अनेक भागात आज दुपारी पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद तसंच जालना शहर परिसरातही आज पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या.
****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****

 धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातल्या वाघाडी इथल्या एका रसायनांच्या कारखान्यामध्ये आज सकाळी झालेल्या भीषण स्फोटात सात जण ठार, तर ४६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यात आणखीनही काही कामगार अडकले असून, मृतांचा आकडा वाढू शकतो अशी माहिती पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे यांनी दिली आहे. स्फोटानंतर भीषण आग लागली असून, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. कंपनीत अजूनही रसायनांच्या मोठ्या टाक्या फुटण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाघाडी गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. स्फोटामुळे परिसरातल्या गावातल्या घरांचंही मोठं नुकसान झालं असून, स्फोटाचं कारण अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 जनतेची इच्छा असल्यास आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. ते आज औरंगाबाद इथं जन आर्शिवाद यात्रेनिमित्त आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. वरळी, दिग्रस आणि मालेगावमध आगामी निवडणूक लढवण्यासंदर्भात कार्यकर्त्यांनी आपल्याला आग्रह केला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. राज्यात सध्या बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचा पीकविमा योजना, कर्जमुक्तीसाठी आक्रोश, हे प्रश्न गंभीर असल्याचं त्यांनी नमुद केलं. हे प्रश्न सोडवण्यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
****

 राज्यातल्या त्रेचाळीस निसर्गपर्यटन स्थळांचा परिपूर्ण विकास झाला असून आणखी एकशे  एकोणचाळीस निसर्ग पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधीचं वाटप करण्यात आल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. स्थानिकांच्या रोजगारनिर्मितीसाठी पर्यटन हे राज्याचं  मोठं शक्तीस्थान आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच निसर्ग पर्यटन मंडळ विविध उपक्रम राबवत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****

 चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर पाच टक्के राहिला. मुख्य आर्थिक सल्लागार के. सुब्रमणिअन यांनी नवी दिल्ली इथं ही माहिती दिली. याआधी जानेवारी ते मार्च या तिमाहीत हा दर पाच पूर्णांक आठ दशांश टक्के होता. विकास दरातील घसरणीला देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय बाबीदेखील कारणीभूत आहेत असं त्यांनी सांगितलं. यासंर्भातल्या अधिकृत सांख्यिकीनुसार या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत उत्पादन क्षेत्रात शून्य पूर्णांक सहा दशांश टक्क्यांची घट झाली, तर खाणकाम क्षेत्रात दोन पूर्णांक सात दशांश टक्क्याची वाढ झाली अशी माहितीही सुब्रमणिअन यांनी दिली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष बिबेक देबरॉय हे देखील या वार्ताहर परिषदेला उपस्थित होते. या वर्षात भारताचा विकास दर सहा पूर्णांक पाच दशांश टक्के राहील असा विश्वास देबवर्मा यांनी व्यक्त केला आहे.
****

 भारताचं चांद्रयान दोन चंद्राच्या आणखी जवळ सरकलं आहे. चंद्राच्या जवळच्या चौथ्या कक्षेत हे यान नेण्याची प्रक्रिया काल संध्याकाळी यशस्वी झाली. त्यामुळे हे यान चंद्रापासून सर्वात जवळ 124 किलोमीटर आणि सर्वात लांब 164 किलोमीटर अंतरावर असलेल्या कक्षेत दाखल झालं आहे. या यानामधली सर्व यंत्रणा योग्य पद्धतीनं काम करत असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या मोहिमेअंतर्गत कक्षाप्रवेशाची शेवटची प्रक्रिया रविवारी संध्याकाळी केली जाणार आहे.  
****

 जालना शहर परिसरात आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पाऊणतास पावसानं चांगली हजेरी लावली.

दरम्यान, परभणी जिल्ह्यातल्या परभणी आणि पूर्णा शहरात काल पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर परिसरात काल रात्री सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला.

जालना,जळगाव,बीड जिल्ह्यातही काल पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद, बीड, परभणी, सातारा इथं आज ढगाळ वातावरण असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****

 अकोला जिल्ह्यातील काही भागात भोई आणि कुंभार समाज घटकांतर्फे काल `गाढव पोळा` साजरा करण्यात आला. राज्यात सर्वत्र बैल पोळा साजरा करण्यात येतो. त्याच धऱतीवर गाढवाचीही प्रत्येक कामात होत असलेली मदत अधोरेखित करण्यासाठी त्याची पुजा करण्याकरता हा सण साजरा करण्याची अकोला जिल्ह्यात परंपरा आहे.
****


 मराठवाड्यातला मानव विकास निर्देशांक उंचावण्यासाठी आज औरंगाबाद इथं मराठवाडा विकास मंडळाच्यावतीनं चर्चासत्र होणार आहे. मानव विकास विभाग, आरोग्य, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातल्या जिल्हा नियोजन सभागृहात हे चर्चासत्र होत आहे. ‘मानव विकास निर्देशांक’ या विषयावर विदर्भ विकास मंडळाचे तज्ञ सदस्य डॉ. कपील चांद्रायन यांचं व्याख्यान होणार आहे.
*****
***

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.08.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३१  ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आपल्या महाजनादेश यात्रे अंतर्गत नांदेड आणि लातूर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. त्यांची लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं दुपारी दोन वाजता सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी साडे चार वाजता उद्गीर इथंही या महाजनादेश यात्रे अंतर्गत त्यांची सभा होणार आहे. लातूर इथली सभा संध्याकाळी सात वाजता होणार आहे.  शिरुर ताजबंद, हंडरगुळी, आणि लोहारा, येरोळमोड, तळेगावरोड, आष्टामोड आणि ममदापूर या ठिकाणी त्यांच्या महाजनादेश यात्रेचं स्वागत होणार आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल संध्याकाळी नांदेड जिल्ह्यात दाखल झाली आहे.
****

 नांदेड जिल्‍हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी तीन दिवस चाललेल्या प्रक्रियेत एकूण चारशे दोन विषय शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली आहे. सामाजिक शास्‍त्र, गणित, विज्ञान, तसंच भाषा विषयासाठी ही पदभरती करण्यात आली आहे.
****

 बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रूपयांच्या आराखड्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते काल झाला. शहरांतर्गत वीस कोटी रुपयांच्या रस्ते कामालाही मुंडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
****

 राज्य रेशीम संचालनालयाच्या वतीनं जालना इथं आजपासून दोन दिवसीय महारेशीम महोत्सव आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जुना मोंढा परिसरातल्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे.
****

नाशिक जिल्ह्यातील पेठ इथले नायब तहसीलदार बाळासाहेब नवले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली. या नायब तहसिलदारानं तक्रारदाराकडून वडिलोपार्जित शेतजमिनीचे हिस्से वाटप पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात सहा हजार रुपयांची मागणी केली होती. त्यावरून आलेल्या तक्रारीनुसार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून ही कारवाई केली.
****

 नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील शिरड या गावातील एका युवकाचा काल बुडून मृत्यू झाला. पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी पाण्यात उतरलेल्या शिवाजी संभाराव फाळके या तरुणाचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.
*****
***
Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 31 August 2019
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۱ ؍اگست  ۲۰۱۹ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸

 مرکزی وزیر مالیات نِر ملا سیتا رمن نے کل نئی دِلّی میں عوامی شعبے کے دس بینکوں کو آپس میں ضم کرنے کا اعلان کیا۔
 اِس فیصلے سے عوامی شعبے کی سر کاری بینکوں کی تعداد 27؍  سے گھٹ کر اب 12؍ہو گئی ہے۔ فیصلے کے مطا بق کینیرا بینک اور سِنڈیکیٹ بینکس ضم ہو ں گے۔ ساتھ ہی الہ آ باد بینک کااِنڈین بینک میں انضمام ہو گا۔ اِس کے علا وہ یو نین بینک ‘ آندھرا بینک اور کار پو ریشن بینک اِن تین بینکوں کو آپس میں ضم کیا جائے گا۔ سیتا رمن نے کہا ہے کہ یو نائیٹیڈ بینک اور   اورینٹل بینک آف کامرس دو نوں بینکوں کو پنجاب نیشنل بینک میں ضم کیا جا ئے گا۔

***** ***** ***** 

 مہا راشٹر کے وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے دعویٰ کیا ہے کہ اِس سال کا قحط مراٹھواڑہ کا آخری قحط ہو گا۔ ہنگولی میں کل مہا جنادیش یاترا کے تحت منعقدہ جلسۂ عام سے خطاب کر تے ہوئے پھڑ نویس نے یہ بات کہی۔ اِس دوران وزیر اعلیٰ نے ہنگولی ضلعے کے سین گائوں تعلقے کے گورے گائوں کو اضا فی تعلقے کا در جہ دینے کا اعلان بھی کیا۔ پر بھنی میں بھی مہا جنادیش یاترا کے تحت وزیر اعلیٰ نے خطاب کیا۔ اُنھوں نے کہا کہ گذشتہ تین چار سالوں سے جاری غیر مسلسل بارش کی وجہ سے کسان مشکلات سے دو چار ہیں لیکن مشکل کی اِس گھڑی میں ریاستی حکو مت کسانوں کے ساتھ کھڑی ہے۔

***** ***** ***** 

 پر بھنی میں ہی منعقدہ اخباری کانفرنس میں بولتے ہوئے وزیر اعلیٰ پھڑ نویس نے دعویٰ کیا کہ مراٹھواڑہ کی ہمہ جہت تر قی کے لیے راستوں کا جال تیار کیا جا رہا ہے اور یہ کام پوری رفتار سے جا ری ہے۔ وزیر اعلیٰ پھڑ نویس کی مہا جنا دیش یاترا کل ناندیڑ پہنچی۔ ناندیڑ میں نیشنلِسٹ کانگریس پارٹی کے سابق رکن اسمبلی باپو صاحب گور ٹھیکر اور بھو کر نگر پریشد کے پانچ کائونسلروں نے وزیر اعلیٰ کے جلسۂ عام میں بی جے پی میں شمو لیت اختیار کر لی۔

***** ***** ***** 

 رِپبلیکن پارٹی آف اِنڈیا کے رہنما اور مرکزی وزیر رام داس آٹھولے نے کہا ہے کہ اپو زیشن خود اعتمادی کھو چکی ہے۔
 آٹھولے کل ناسک میں بول رہے تھے۔ اُنھوں نے دعویٰ کیا کہ اُنکے انتخا بی اتحاد میں کوئی اختلافات نہیں ہیں۔
 دوسری جانب آٹھولے نے یہ بھی کہا کہ سیٹوں کی تقسیم کو لے کر مسائل کھڑے ہونے کی صورت میں اتحاد میں نئے شامل ہو نے والوں کو RPI کے کو ٹے سے امید واری دی جائے گی۔

***** ***** ***** 

 دسویں جماعت کے لیے منعقد کیئے گئے ری ایکزام کے نتیجوں کا کل اعلان کر دیا گیا۔ مہا راشٹربھر سے ری ایکزام میں شریک ہوئے دو لاکھ اکیس ہزار629؍ طلباء میں سے پچاس ہزار667؍ طلباء کا میاب ہوئے ہیں۔ طلباء کی کامیابی کا تنا سب 22؍ فیصد رہا۔ کامیاب طلباء کے علاوہ دو مضا مین میں ناکام رہے۔ ایک لاکھ اٹھا رہ ہزار طلباء ATKT کے ذریعے گیارہویں جماعت میں داخلوں کے اہل ہوں گے۔ نمبرات کی دو بارہ جانچ کے لیے آج سے 9؍ ستمبر تک در خواستیں داخل کی جا سکتی  ہیں۔

***** ***** ***** 

 بد عنوا نی سے نجات دلا نے ‘ قرض معا فی‘ آلود گی سے پاک اور بیروز گاری سے آزاد نیا مہا راشٹر بنا نے کے لیے جن آشیر واد یاترا نکا لی گئی ہے۔ شیو سینا یوا سیناسر براہ آدِتیہ ٹھا کرے نے یہ بات کہی۔ آدِتیہ ٹھا کرے کل اورنگ آباد میں جلسۂ عام سے مخا طب تھے۔ آدِتیہ نے کہا کہ شیو سینا نے اقتدار میں رہتے ہوئے بھی عوامی مسائل کو حل کرنے کے لیے آندو لنوں کے ذریعے جد و جہد کی ہے۔ اِس موقعے پر سو خواتین میں سلائی مشینیں تقسیم کی گئیں۔ آدِتیہ ٹھا کرے  نے پیٹھن ‘ گنگا پور‘ ویجا پور اور کنڑ تعلقوں میں بھی عوام سے بات چیت کی۔

***** ***** ***** 

 کسا نوں کی جا نب سے اپنے بیلوں کو سجا نے کا تہوار پولہ کل جو ش و خروش سے منا یا گیا۔ اِس موقعے پر کسا نوں نے اپنے بیلوں کو خوب سجا یا اور شام کو اُنکا جلوس نکا لا گیا۔ پولے کے تہوار کے موقعے پر ہوئی بارش سے کسا نوں کی خوشی میںمزید اضا فہ ہو گیا۔
 اِس بیچ پر بھنی ضلعے کے جنتور تعلقے کے بر اہمن گائوں میں پولے کے موقعے پر بیلوں کی صفائی کے دوران بیل کے حملہ کرنے سے ایک کسا ن کی موقع پر ہی موت ہو گئی۔
 ہنگولی ضلعے کے موہ گائوں میں بھی بیل کے حملے میں ایک بارہ سالہ بچے کو جان سے ہاتھ دھو نا پڑا۔ ایک دیگر حادثے میں جالنہ ضلعے کے پِمپل گائوں میں بیلوں کو نہلا نے کے لیے ندی پر گئے پندہ سالہ لڑ کے کی پانی میں ڈوبنے سے موت ہو گئی۔

***** ***** ***** 

 پر بھنی اور پو رنا میں کل بارش کی آمد ہوئی۔ اورنگ آ باد شہر اور اطراف میں بھی کل رات قریب دو گھنٹے موسلا دھار بارش ہوتی رہی۔ ہمارے نمائندے نے بتا یا کہ جالنہ’ بد نا پور اور عنبڑ میں بھی کل بارش ہوئی ہے۔

***** ***** *****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 31.08.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -३१  ऑगस्ट  २०१ सकाळी ७.१० मि.
****

v सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकांचं विलिनीकरण करण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा 
v यंदाचा दुष्काळ हा मराठवाड्यातला शेवटचा दुष्काळ ठरणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
v  मुंबई लैंगिक अत्याचार प्रकरणी विशेष तपास पथकामार्फत चौकशीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
v दहावीच्या पुनर्परीक्षेत सुमारे २३ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण
आणि
v बैलपोळ्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा
****

 सार्वजनिक क्षेत्रातल्या दहा बँकांचं विलिनीकरण करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत केली. या निर्णयामुळे आता सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी बँकांची संख्या २७ वरून १२ झाली आहे. या निर्णयानुसार कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण होणार आहे, अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेत विलिनीकरण होणार असून युनियन बँक, आंध्रा बँक आणि कार्पोरशेन बँक या तीन बँकांचं विलिनीकरण होणार आहे. युनायटेड बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या दोन बँकांचं पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण होणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. थकीत कर्जांचं प्रमाण आठ लाख ६५ हजार कोटींवरुन सात लाख ९० हजार कोटी रुपयांपर्यंत कमी झाल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
****

 यंदाचा दुष्काळ हा मराठवाड्यातला शेवटचा दुष्काळ असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल हिंगोली इथं, महाजनादेश यात्रेच्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या गोरेगावला अतिरिक्त तालुक्याचा दर्जा दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली, ते म्हणाले.....

 गोरेगावला अतिरिक्त तालुका म्हणून याठिकाणी मी घोषित करतो. आणि त्या ठिकाणी अतिरिक्त तहसिलदाराचं कार्यालय आणि सगळ्या प्रकारची कार्यालय हे त्या गोरेगाव मध्ये येतील. म्हणजे उद्या ज्या दिवशी त्या तालुका करायचा असेल, सगळी तयारी झालेली असेल, कार्यालयावरची पाटी फक्त बदलावी लागेल, अतिरिक्त तालुक्याचा अतिरिक्त काढावा लागेल. आणि नुस्त तालुका ठेवावा लागेल. अश्या सगळ्या सोयी  या ठिकाणी गोरेगाव मध्ये तुमच्या माध्यमातंन होतील. हा विश्वास मी तुम्हाला देतो.

 परभणी इथंही मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान सभेला संबोधित केलं. गेल्या तीन-चार वर्षापासून अनियमित पावसामुळे शेतकरी सातत्यानं संकटात सापडला असून, या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रस्त्यांचं जाळं निर्माण करण्यात येणार असून, त्यापैकी बरीच कामं प्रगतीपथावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी परभणी इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं.
 मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा काल नांदेड इथं पोहोचली. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्यासह भोकर नगर परिषदेतल्या पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत भारतीय जनता पक्षात काल प्रवेश केला.
****

 विरोधकांचं मनोबल खचलं असल्याची टीका भारतीय रिपब्लीकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. युतीमध्ये मतभेद नाहीत परंतु जागा वाटपात अडचणी आल्याच, तर युतीत प्रवेश केलेल्यांना रिपाईच्या कोट्यातून उमेदवारी देऊ असंही त्यांनी नमूद केलं.
****

 मुंबईतल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीनं खासदार सुप्रिया सुळे, यांच्या नेतृत्वात काल मुंबईत निषेध मोर्चा काढला. गुन्हा होऊन महिनाभरानंतरही आरोपी पकडले जात नाहीत, हे राज्य सरकारच्या गृहखात्याचं अपयश असल्याचं सांगतानाच, सुळे यांनी हे निष्क्रीय सरकार कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याऐवजी यात्रा काढण्यात मग्न असल्याची टीका केली. विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी खासदार सुळे यांनी केली.

 दरम्यान, या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल सादर करण्याच्या आणि आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना दिल्या आहेत. जालना इथल्या तरुणीवर गेल्या सात जुलैला ुंबईत ुनाभट्टी परिसरात सामुहिक लैंगिक अत्याचार झाला होता, या तरुणीचा परवा औरंगाबाद इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
     दहावीच्या पुनर्परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. राज्यभरातून पुनर्परीक्षेला बसलेल्या दोन लाख एकवीस हजार सहाशे एकोणतीस परीक्षार्थींपैकी २२ पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के म्हणजेच पन्नास हजार सहाशे सदुसष्ट परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसह दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेले एक लाख अठरा हजार एकशे एकसष्ठ परीक्षार्थी ए टी के टी सवलतीच्या माध्यमातून अकरावी प्रवेशासाठी पात्र आहेत. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी आजपासून येत्या नऊ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
****

 भ्रष्टाचारमुक्त, कर्जमुक्त, प्रदुषणमुक्त, बेरोजगारमुक्त, नवमहाराष्ट्र घडवण्यासाठी जनाआशीर्वाद यात्रा काढल्याचं, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं जन आशीर्वाद यात्रेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते. नागरिकांच्या विविध समस्यांसाठी शिवसेनेनं सत्तेत असतांना सुध्दा विविध आंदोलनांच्या माध्यमातून संघर्ष केला, याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधलं. ठाकरे यांच्या हस्ते १०० महिलांना शिलाई यंत्राचं वाटप करण्यात आलं. पैठण, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यांमध्येही ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधला.
****

 बैल पोळ्याचा सण काल सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. गावोगावी शेतकऱ्यांनी बैलांना विविध आभुषणांनी सजवून संध्याकाळी मिरवणूक काढली. वाशिम जिल्ह्यातल्या ढोरखेडा इथं महिलांच्या हाती बैलांचा कासरा देण्याचा नवीन पायंडा सुरु करण्यात आला. नांदेड, परभणी, औरंगाबाद जिल्ह्यात काही गावात पोळ्याच्या मुहूर्तावर पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणीत झाला.

 दरम्यान, परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या मौजे ब्राह्मणगाव इथं पोळ्यानिमित्त बैलांना स्वच्छ करत असतांना बैलानं धडक दिल्यानं आसाराम राठोड या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हिंगोली जिल्ह्यात मोहगाव इथं बैलानं लाथ मारल्यामुळे एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातल्या पिंपळगाव कड इथे बैल धुण्यासाठी नदीवर गेलेल्या पंधरा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
****

 परभणी जिल्ह्यातल्या परभणी आणि पूर्णा शहरात काल पावसानं हजेरी लावली. औरंगाबाद शहर परिसरात काल रात्री सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला, जालना जिल्ह्यातही जालना, बदनापूर, अंबड परिसरात काल पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****

 नांदेड जिल्ह्यातल्या जिल्‍हा परिषद शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी तीन दिवस चाललेल्या प्रक्रियेत एकूण ४०२ विषय शिक्षकांना पदस्थापना देण्यात आली. उर्दू भाषा, सामाजिक शास्‍त्र, गणित, विज्ञान, मराठी माध्‍यमासाठी सामाजिक शास्‍त्र, तसंच भाषा विषयासाठी ही पदभरती करण्यात आली.
****

 लातूर-पुणे दरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता लातूर-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस ही नवी  रेल्वे गाडी  सुरु करण्याची मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली आहे. देशमुख यांनी काल दिल्लीत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेवून ही मागणी केली. लातूर इथं रेल्वे बोगी कारखाना उभारण्याच्या कामाला गती द्यावी, लातूर मुंबई रेल्वेसेवा पूर्ववत करावी, यासह इतर अनेक मागण्याही देशमुख यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केल्या आहेत.
****

 बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या १३३ कोटी ५८ लाख रूपयांच्या आराखड्याच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला. शहरांतर्गत २० कोटी रुपयांच्या रस्ते कामालाही मुंडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
****

 राज्य रेशीम संचालनालयाच्या वतीनं जालना इथं आजपासून दोन दिवसीय महारेशीम महोत्सव आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जुना मोंढा परिसरातल्या मैदानावर हा महोत्सव होणार आहे.
****

 जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मानं दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक, तर सौरभ चौधरीनं कांस्य पदक मिळवलं. पन्नास मीटर एअर रायफल प्रकारात संजीव राजपुत यानं रौप्य पदक पटकावलं आहे.
****

 भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवसअखेर भारताच्या पाच बाद दोनशे चौसष्ट धावा झाल्या. कालच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार विराट कोहली ७६ तर मयंक अग्रवाल ५५ धावांवर होता.
*****
***

Friday, 30 August 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 30.08.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.००
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दहा बँकांच्या विलिनीकरणाची घोषणा केली. या निर्णयामुळे आता सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी बँकांची संख्या २७ वरून १२ झाली आहे. या निर्णयानुसार कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचं विलिनीकरण होणार आहे. अलाहाबाद बँकेचं इंडियन बँकेत विलिनीकरण होणार असून युनियन बँक, आंध्रा बँक आणि कार्पोरशेन बँक या तीन बँकांचं विलिनीकरण होणार आहे. युनायटेड बँक आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या दोन बँकांचं पंजाब नॅशनल बँकेत विलिनीकरण होणार असल्याची माहिती सीतारामन यांनी दिली. थकीत कर्जांचं प्रमाण आठ लाख ६५ हजार कोटींवरुन सात लाख ९० हजार कोटी रुपयांपर्यंत कमी झाल्याचं सीतारामन यांनी सांगितलं.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं आज देशभरात दीडशे ठिकाणी छापे घातले. सर्वसामान्य नागरिक तसंच छोट्या व्यावसायिकांच्या दृष्टीकोनातून अत्याधिक भ्रष्टाचार असलेल्या सरकारी ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या कारवाईबाबत अधिक माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.
****
दहावीच्या पुनर्परीक्षेचा निकाल आज माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेस्थळावर जाहीर झाला. राज्यभरातून पुनर्परीक्षेला बसलेल्या दोन लाख एकवीस हजार सहाशे एकोणतीस परीक्षार्थींपैकी २२ पूर्णांक शहाऐंशी शतांश टक्के म्हणजेच पन्नास हजार सहाशे सदुसष्ट परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. तर दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेले एक लाख अठरा हजार एकशे एकसष्ठ परीक्षार्थी ए टी के टी सवलतीच्या माध्यमातून अकरावी प्रवेशासाठी पात्र असल्याचं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निकालपत्रात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी उद्या ३१ ऑगस्टपासून येत्या नऊ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
****
यंदाचा दुष्काळ हा मराठवाड्यातला शेवटचा दुष्काळ असेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आज हिंगोली इथं, महाजनादेश यात्रेच्या सभेत मुख्यमंत्री बोलत होते. जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या गोरेगावला अतिरिक्त तालुक्याचा दर्जा दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. हा तालुका लवकरच नियमित केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं. आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. परभणी इथंही मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेदरम्यान सभेला संबोधित केलं. गेल्या तीन-चार वर्षापासून अनियमीत पावसामुळे शेतकरी सातत्यानं संकटात सापडला असून, या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
****
कर्मवीर भाऊराव पाटलांच्या त्यागातून कर्तृत्ववान पीढी घडवण्याचं काम रयत शिक्षण संस्थेनं केलं असून ही परंपरा पुढे चालवण्यासाठी संस्थेची पुढची पिढीही सज्ज आहे, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथं, रयत शिक्षण संस्थेच्या विविध इमारतीचं उद्घाटन आणि नामकरण आज शरद पवार यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना रयत परिवारच्या वतीनं नऊ लाख रुपयांची मदत करण्यात आली.
दरम्यान सध्याच्या राजकीय परिस्थितच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर इथं पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी खासदार पद्मसिंह पाटील हे पक्ष सोडणार असल्याच्या बातम्यांबाबत काहीही माहिती नसल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं. 
****
विरोधकांचं मनोबल खचलं असल्याची टीका भारतीय रिपब्लीकन पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते. युतीमध्ये मतभेद नाहीत परंतु जागा वाटपात अडचणी आल्याच, तर युतीत प्रवेश केलेल्यांना रिपाईच्या कोट्यातून उमेदवारी देऊ असंही त्यांनी नमूद केलं.
****
केंद्र सरकारनं देशातील प्रत्येक गावात चार प्रकारचे शाश्वत स्वच्छतेचे संदेश भिंतीवर रंगविणे तसंच प्रत्येक गावात स्वागत फलक लावणे या स्पर्धेची घोषणा केली होती. यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांनी सहभाग घेऊन राज्यभरात एक लाख १६ हजारांपेक्षा जास्त संदेश रंगवले. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज जालना इथं ही माहिती दिली. ६ सप्टेंबर रोजी दिल्ली इथं स्वच्छता महोत्सवात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे
****
राज्य रेशीम संचालनालयाच्या वतीनं जालना इथं उद्यापासून दोन दिवसीय महारेशीम महोत्सव आणि शेतकरी संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जुना मोंढा परिसरातल्या मैदानावर हा महोत्सव होईल. या महोत्सवात परवा एक सप्टेंबर रोजी सिरसवाडी इथल्या रेशीम कोष बाजारपेठेच्या इमारतीचं भूमीपूजन होणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा आणि परभणी शहरात आज पावसानं हजेरी लावली. पूर्णा शहरात दुपारच्या सुमारास तर परभणी शहरात सायंकाळी पाऊस झाल्याचं आमच्या वार्तहरानं कळवलं आहे.
****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.08.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० ऑगस्ट २०१९ दुपारी .०० वा.
****
शरीर, बुद्धी आणि आत्म्याला परस्परांशी जोडणारा योग, आता जगाला एकसंध करत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे, आज नवी दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते योग पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. निरोगी तसंच रोग प्रतिबंधात्मक जीवनशैलीचं महत्त्व सांगताना पंतप्रधानांनी भारतीय आहार पद्धती स्वीकारण्यावर अधिक भर दिला. शेतकऱ्यांनी भरड उत्पादन वाढवावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. कमी पाण्यात, सर्व प्रकारच्या जमिनीत उगवणारं ज्वारी, बाजरी, नाचणी आणि जवासारखं भरड धान्य शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवून देईल, त्याबरोबरच देशवासियांना उत्तम पोषण आहार मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले.
आयुष मंत्रालयानं पुढच्या साडे तीन वर्षांत देशभरात बारा हजार आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्धार केला असून, यापैकी हरयाणातल्या दहा आरोग्य केंद्रांचं उद्धाटन पंतप्रधानांनी केलं. आयुष प्रणालीचे तज्ज्ञ तसंच डॉक्टरांच्या सन्मानार्थ १२ आयुष स्मृती टपाल तिकीटांचं प्रकाशनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.
****
पाकिस्तान स्थित कर्तारपूर गुरूद्वारा मार्गिकेच्या बांधकामासंदर्भात भारत पाकिस्तान यांच्यात गुरूदासपूर इथं तांत्रिक मुद्यावर चर्चा सुरू झाली आहे. जम्मू काश्मिरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर पहिल्यांदाच ही चर्चा होत आहे. या पूर्वीही या मुद्यावर अनेक बैठका झाल्या आहेत. जुलैमहिन्यात भारत पाकिस्तान सीमेवर अटारी इथं शेवटची बैठक झाली होती.
****
लष्कर प्रमुख विपीन रावत आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते काश्मीरच्या सुरक्षा स्थिती आणि सुरक्षा रक्षकांच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. जम्मू काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७० कलम हटवल्यानंतर लष्कर प्रमुखांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. दरम्यान, राज्यातल्या पाच जिल्ह्यात मोबाइल सेवा पुन्हा सुरू केल्याची माहीती आयुक्ता संजीव वर्मा यांनी दिली आहे. 
****
मुंबईत चेंबूर इथं लैंगिक अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीनं आज मुंबईत निषेध मोर्चा काढला. खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात पक्षाच्या अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. गुन्हा होऊन महिनाभरानेही आरोपी पकडले जात नाहीत, हे राज्य सरकारच्या गृहखात्याचं अपयश असल्याचं सांगतानाच, त्यांनी हे निष्क्रीय सरकार असल्याची टीकाही केली.
आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचं निवेदन यावेळी पोलिसांना देण्यात आलं. विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी खासदार सुळे यांनी केली. कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याऐवजी सरकार यात्रा काढण्यात मग्न असल्याची टीका त्यांनी केली.
या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल सादर करावा आणि आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना दिल्या आहेत. गेल्या सात जुलैला मुंबईत चुनाभट्टी इथं ही घटना घडली होती.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज लातूर तसंच नांदेड जिल्ह्यात पोहोचणार आहे. नांदेड इथं या यात्रेच्या स्वागतासाठी दुचाकी फेरी काढली जाणार आहे. उद्या मोंढा मैदानावर मुख्यमंत्र्यांची सभा होणार असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांची जनाशिर्वाद यात्रा आज औरंगाबाद इथं दाखल होत आहे.
****
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या पूरस्थीतीची पाहणी करण्यासाठी  केंद्रीय पथक सध्या राज्यात दाखल झालं आहे. आज हे पथक सांगली जिल्ह्यात पाहणी करणार आहे. आज सांगली शहर आणि सांगलीवाडी तर उद्या म्हणजेच ३१ ऑगस्टला ब्रम्हनाळ, भिलवाडी, बुर्ली, शिरगाव आणि वाळवा या गावांना भेटी देणार आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी या पथकानं काल पुण्यात आढावा बैठक घेतली. मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी या पथकाला जीवित तसंच आर्थिक नुकसानाची माहिती दिली.
****
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं जुलै महिन्यात घेतलेल्या इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महारिझल्ट डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटही काढता येईल.
****
बैलपोळा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. शेतकऱ्यांनी काल सायंकाळी बैलांची हळद दुधानं खांदेमळणी केली. आज बैलाला झूल पांघरून, विविध आभुषणांनी सजवून संध्याकाळी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या निमित्तानं बैलांना पुरण पोळी खाऊ घातली जाते.
****
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्याला आजपासून किंगस्टन इथं सुरूवात होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी आठ वाजता हा सामना सुरू होईल. दोन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे.
 
****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.08.2019 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३०  ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं जुलै महिन्यात घेतलेल्या इयत्ता दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महारिझल्ट डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होईल. विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटही काढता येईल.
****
केरळची भूमी आपल्यासाठी विशेष असून केरळच्या धरती आणि संस्कृतीला प्रणाम असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज कोची इथं मनोरमा वृत्त वाहिनीच्या संमेलनात दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत होते.

दरम्यान, योगाला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट योगदान देणाऱ्या योग अभ्यासक आणि प्रशिक्षकांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्ली इथं योग पुरस्कार देऊऩ गौरव करणार आहेत. २०१६ मधे चंदीगड इथं दुसरा अंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करतांना मोदी यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. आयुष प्रणालीचे प्रमुख चिकित्सक आणि विशेषज्ञांच्या उपस्थितीत १२ स्मृती टपाल टिकीटांचं लोकार्पण मोदी आज करणार आहेत.
****
आमदार अवधूत तटकरे हे आपला निर्णय घ्यायला समर्थ असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे. तटकरे यांच्या खासदारकीला काल शंभर दिवस पूर्ण या पार्श्वभूमीवर ते काल पत्रकारांशी बोलत होते. सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे, पुतणे आमदार अवधूत तटकरे तसंच भास्कर जाधव यांनी नुकतीच शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली, त्यासंदर्भात तटकरे बोलत होते.
****
मुंबईमध्ये सामहिक अत्याचाराला बळी पडलेल्या मूळ जालना इथल्या तरूणीच्या मृत्यूप्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल सादर करावा आणि आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना दिल्या आहेत.
****
बैलपोळा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. यासाठी काल सायंकाळी हळद दुधानं बैलांची खांदेमळणी करण्यात आली. आज बैलाला विविध आभुषणांनी सजवून संध्याकाळी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या निमित्तानं पुरण पोळीचं खास जेवण बैलांना खाऊ घातलं जातं.
****


Regional Urdu Text Bulletin, Aurangabad.
Date: 30 August 2019
Time:  8:40 to 8:45 am
آکاشوانی اَورنگ آباد
علاقائی خبریں
تاریخ:  ۳۰ ؍اگست  ۲۰۱۹ئ؁
وَقت: صبح ۴۰:۸۔ ۴۵:۸

 وزیر اعظم نریندر مودی نے کہا ہے کہ مضبوط اور صحت مند قوم نئے بھارت کی شناخت ہوں گی۔کھیلوں کے قومی دن کے موقعے پر کل نئی دہلی میں وزیر اعظم کے ہاتھوں ملک گیر فِٹ اِنڈیا مومنٹ کا آغازہوا۔ اِس مو قعے پر خطاب کرتے ہوئے اُنھوں نے کہا کہ چست درست رہنا صرف ایک لفظ نہیں ہے بلکہ خوشحال زندگی کی لازمی شرط ہے ۔ جناب مودی نے کہاکہ روز مرہ کی زندگی میں
جسما نی مشقت اور کھیل کود کی تر غیب دینے کی غرص سے یہ مہم چلائی جا رہی ہے ۔ اُنھوں نے کہا کہ یہ مہم وقت کی ضرورت ہے کیوں کہ تیکنا لو جی کے بڑھتے استعمال کے سبب جسمانی مشقت میں کمی آئی ہے جسکی وجہ سے ملک میں ذیا بیطس اور تنائو جیسے امراض کے تناسب میں اضا فہ ہوا ہے ۔ وزیر اعظم نے کہا کہ یہ مہم ملک کو صحت مند مستقبل کی طرف لے جا ئے گی ۔ اپنے خطاب میں اُنھوں نے عوام سے اِس مہم کی قیادت کرنے کی اپیل کی۔
 کھیلوں کے قو می اعزازات کل نئی دِلی میں صدرِ جمہوریہ رامناتھ کووِند کے ہاتھوں تقسیم کیئے گئے۔ اِس مرتبہ پہلوان بجرنگ پُنیا اور Para Athlete دیپا ملک کو راجیو گاندھی کھیل رتن ایوارڈ سے نوازا گیا۔ جبکہ دیگر کھلاڑیوں کو ارجُن انعام‘ درونا چاریہ ایوارڈ اور دھیان چند اعزاز سے سر فراز کیا گیا۔

***** ***** ***** 

 ممبئی-ناگپور سمرُدھی مہا مارگ کا کام تیزی سے جا ری۔اور اگراِسی رفتار سے کام ہو تا رہا  تو دِسمبر2020؁ تک یہ شاہراہ پو ری طرح بن کر تیار ہو جا ئے گی۔ وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس نے کل جالنہ میںمہا جنآدیش یاترا کے دوران صحا فیوں کو یہ بات بتائی۔اُنھوں نے اِس یقین کا بھی اظہار کیا کہ سمردھی مہا مارگ کی وجہ سے اورنگ آ باد اور جالنہ میں صنعتی سر ما یہ کاری میں بڑے پیما نے پر اضا فہ ہوگا۔
 وزیر اعلیٰ نے مزید بتا یا کہ مائکرو آبپاشی اسکیم کے تحت حکو مت 80؍ فیصد سبسیڈی دے رہی ہے۔ اُنھوں نے مراٹھواڑے کے کسا نوں سے  مائکرو آبپاشی طریقہ کار کو اختیار کرنے کی اپیل کی ۔
 اِس موقعے پر مرکزی وزیر رائو صاحب دانوے‘ جالنہ کے رابطہ وزیر ببن رائو لو نیکر اورمملکتی وزیر ار جُن کھوتکر  سمیت دیگر معزز شخصیات موجود تھیں۔
 ما جنآدیش یاترا کے دوران آج وزیر اعلیٰ لاتور میں مختلف مقامات پر عوامی اجلاس سے خطاب کریں گے۔

***** ***** ***** 

 وزیر اعلیٰ دیویندر پھڑ نویس کے ہاتھوں کل واٹر گریڈ منصوبے کے تحت جالنہ ضلعے کے پر تور اور منٹھا نیز جالنہ تعلقے میں
176؍ دیہاتوں کے لیے مشترکہ پانی فراہمی منصوبے کا آغاز عمل میں آیا۔اِس موقعے پر ریاستی وزیر رائو صاحب دانوے اور پانی فراہمی کے وزیر ببن رائو لونیکربھی موجود تھے۔
 **** ***** ***** 

 ریاستی ثانوی تعلیمی بورڈ کی جانب سے جولائی میں لیے گئے دسویں جماعت کے سپلیمنٹری امتحا نات کے نتائج آج دو پہر ایک بجے ظاہر کیئے جائیں گے۔ متعلقہ طلبہ اپنے نتائج کے پرنٹ آئوٹ بورڈ کی ویب سائٹ
 WWW. MAHARESULT.NIC.INسے حاصل کر سکتے ہیں۔

***** ***** ***** 

 آج بیلوں کا تہوار پولا منا یاجا رہا ہے۔اِس خصوص میں کل شام بیلوں کے کاندھوں پر ہلدی والا دودھ لگا یا گیا۔ سال بھر کھیت میں کام کر نے والوں بیلوں کو آرام دینے کے لیے یہ تہوار منا یا جا تا ہے۔ اِس موقعے پر بیلوں کو مختلف زیورات پہنا کر خوب سجا یا سنوا را جا تا ہے اورپُرن پولی سے اُنکی تواضع کرنے کے بعد شام کے وقت بیلوں کی ریلی نکا لی جا تی ہے ۔

***** ***** ***** 

 مسافروں کی بڑھتی تعداد کو مد ِ نظر رکھتے ہوئے جنوب وسطی ریلوے ناندیڑ- اورنگ آباد- ناندیڑ خصو صی ریل گاڑی
 شروع کرنے جا رہا ہے۔ یہ گاڑی3؍ ستمبر سے 30؍ ستمبر کے دوران اِتوار کو چھوڑ کر ہفتے کے باقی 6؍ دِن چلائی جائے گی۔ 8؍ ڈبوں پر مشتمل یہ گاڑی صبح8؍ بجے ناندیڑ سے روانہ ہوگی اور دوپہر12؍ بجکر45؍ منٹ پر اورنگ آبادپہنچے گی ۔ جبکہ واپسی کے سفر میں یہ گاڑی اورنگ آباد سے شام 6؍ بجکر 10؍ منٹ پر روانہ ہو گی اور رات11؍ بجے ناندیڑ پہنچے گی۔

***** ***** ***** 

 بھارت اور ویسٹ اِنڈیز کے ما بین جا ری ٹسٹ سیریز کا دوسرا مقابلہ اور آخری مقابلہ آج سے کنگسٹن میں کھیلا جائے گا۔ بھارت کے معیاری وقت کے مطابق یہ مقابلہ رات8؍ بجے شروع ہو گا۔

***** ***** ***** 

 لاتور ضلعے میں آیوشمان بھارت - وزیر اعظم عوامی صحت اسکیم کے سے مستفید ہو رہے خواتین بچت گروپس کے اہلِ خانہ کو گولڈ کارڈ فراہم کرنے کے لیے لاتور میونسپل کار پوریشن کی جانب سے خصو صی مہم چلا ئی جا رہی ہے ۔

***** ***** *****

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 30.08.2019 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 30 August 2019
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक -३०  ऑगस्ट  २०१ सकाळी ७.१० मि.
****
** निरोगी आणि समृद्ध आयुष्यासाठी सुदृढता आवश्यक; देशव्यापी फिट इंडिया मोहिमेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
** मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद आणि जालन्यात औद्योगिक गुंतवणूक वाढण्याची मुख्यमंत्र्यांना अपेक्षा
** शालेय क्रीडा विभागानं बंद केलेले ४८ क्रिडा प्रकार पुन्हा सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
आणि
** भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून दुसरा कसोटी क्रिकेट सामना
****
सुदृढता आणि निरोगी राष्ट्र ही नवीन भारताची ओळख असणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं पंतप्रधानांनी काल देशव्यापी फिट इंडिया मोहिमेची सुरुवात केली. सुदृढता हा केवळ शब्द नाही, तर निरोगी आणि समृद्ध आयुष्यासाठी आवश्यक अट आहे, असं ते म्हणाले. लोकांना त्यांच्या दैनंदिन आयुष्यात शारिरीक परिश्रम आणि खेळांना प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. तंत्रज्ञानाच्या शोधामुळे शारिरीक परिश्रम कमी होऊ लागले. मधुमेह, अतितणाव सारख्या जीवनशैलीशी निगडित आजारांचं प्रमाण भारतात वाढत आहे. आपल्या जीवनशैलीतील छोट बदल हे आजार रोखू शकतात, असं त्यांनी यावेळी सांगितलं. या बदलांसाठी देशाला प्रेरित करण्यासाठीच फिट इंडिया मोहीम आहे, असं त्यांनी सांगितलं. ही मोहीम काळाची गरज असून, देशाला निरोगी भविष्याकडे घेऊन जाणारी असल्यामुळे जनतेनं फिट इंडिया मोहिमेचं नेतृत्व करावं, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
****
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार काल नवी दिल्लीत, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलिट दिपा मलिक यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अन्य खेळाडूंना अर्जून,  ध्यानचंद तसंच द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गाचं काम वेगात सुरू असून, कामाची गती अशीच राहिल्यास डिसेंबर २०२० पर्यंत या महामार्गावरून प्रवास करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. महाजनादेश यात्रेदरम्यान ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते. समृध्दी महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद आणि जालन्यात औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.. ते म्हणाले...

समृध्दी महामार्गाचं काम वेगात सुरू आहे, कदाचित  डिसेंबर २०२० पर्यंत या महामार्गावरून प्रवास करता येईल,इतक्या वेगाने हे काम चालले आहे. याच्यामुळे जालना आणि औरंगाबादला देखील Industrial stratgy location तयार होणार आहे आणि DMIC जो आहे त्याच्या करता खूप मोठे वरदान याठिकाणी समृद्धी महामार्ग आणि ड्रायपोट ठरणार आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतो आपण करतो आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. परतीच्या पावसाचा अंदाज घेऊन, दुष्काळ निवारण योजनांचा आढावा घेतला जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शासन सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत ८० टक्के अनुदान देत असून, दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन पध्दतीचा वापर करून उसाचं पीक घ्यावं, त्याचवेळी पर्यायी पिकांचांही प्राधान्यानं विचार करावा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
परभणी इथंही काल महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी बोलतांना मराठवाड्यातील पाणी, रोजगार, रस्ते आणि इतर विकाम कामं मार्गी लावण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, महाजनादेश यात्रा आज लातूर जिल्ह्यात दाखल होणार असून जिल्ह्यात ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
एकात्मिक पाणीपुरवठा वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातल्या १७६ गावांच्या संयुक्त पाणीपुरवठा योजनेचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांची यावेळी उपस्थिती होती.
****
शालेय क्रीडा विभागानं बंद केलेले सुमारे ४८ खेळ पुन्हा सुरू करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षण क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री अशिष शेलार यांनी केली आहे. ते काल पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. २०१७ मध्ये क्रीडा संचालनालयानं हे खेळ बंद केले होते, ते पुन्हा सुरू करण्याचा शासन निर्णय काल तातडीनं जारी करण्यात आल्याचं शेलार म्हणाले. यामध्ये टेनिस, फुटबॉल, लंगडी या खेळांचा समावेश आहे.
****
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं जुलै महिन्यात घेतलेल्या इयत्ता दहावीच्या फेरपरिक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. मंडळाच्या डब्लु डब्लु डब्लु डॉट महारिझल्ट डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होणार असून विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटही काढता येईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे.
****
 
राज्य शासनाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि डॉ. एस. आर. रंगनाथन  २०१८-२०१९चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्कारात डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता ग्रंथमित्र पुरस्कार लातूरच्या संजय सुर्यवंशी यांना तर ग्रंथालय सेवक ग्रंथमित्र पुरस्कार परभणीच्या मधुकर चौधरी आणि औरंगाबादच्या मोहन गोरे यांना मिळाला आहे.
****
बैलपोळ्याचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. यासाठी काल सायंकाळी हळद दुधानं बैलांची खांदेमळणी करण्यात आली. आज बैलाला विविध आभुषणांनी सजवून संध्याकाळी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या निमित्तानं पुरण पोळीचं खास जेवण बैलांना खाऊ घातलं जातं.
****
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या आणि शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्याला आजपासून किंगस्टन इथं सुरूवात होत आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी आठ वाजता हा सामना सुरू होईल. दोन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे.
****
लातूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला बचत गटाच्या कुटुंबांना गोल्डन कार्ड तयार करून देण्यासाठी महानगरपालिका विशेष मोहीम राबवत आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी भागातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये त्यासाठी विशेष शिबीराचं आयोजन करण्यात येणार असुन सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा समन्वयक डॉ कुलदीप शिरपूरकर यांनी केलं आहे.
****
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड आवश्यक असल्याचं, राज्याचे उद्योग आणि खनिकर्म तसंच अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. ते काल हिंगोली इथं, विभागीय वनाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. गेल्या काही वर्षांत निर्माण झालेल्या दुष्काळ सदृष्य परिस्थितीला आपणच जबाबदार असल्याचं मत, सावे यांनी व्यक्त केलं.
****
प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वे नांदेड -औरंगाबाद-नांदेड अशी नवीन विशेष गाडी चालवणार आहे. ही विशेष गाडी  ३ सप्टेंबर ते  ३० सप्टेंबर दरम्यान रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस चालणार आहे. आठ डबे असलेली ही गाडी सकाळी ८ वाजता नांदेडहून सुटेल आणि दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी औरंगाबादला पोहोचेल तर परतीच्या प्रवासात औरंगाबादहून्‍ सायंकाळी ६ वाजून १० मिनीटांनी सुटेल आणि नांदेडला रात्री ११ वाजता पोहोचेल.
****
शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आर्शिवाद यात्रा आज औरंगाबादमध्ये येणार आहे. शहरातल्या ताठे मंगल कार्यालयात सकाळी अकरा वाजता ते विजय संकल्प मेळाव्यात युवकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ही जन आर्शिवाद यात्रा जिल्ह्यातल्या पैठण, गंगापूर, वैजापूर आणि कन्नड तालुक्यांमध्ये जाणार असून तिथंही ते युवकांशी संवाद साधणार असल्याचं पक्षाच्या वतीनं कळवण्यात आलं आहे.
****
जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या सातोना इथल्या महावितरण कार्यालयातला  कनिष्ठ अभियंता अमोल मोहिते याला पाच हजार रूपयाची लाच घेतांना काल लाच लुचपत विभागानं रंगेहाथ पकडलं. नवीन डिपी बसवण्यासाठी सर्वेक्षण करून अंदाजपत्रक काढून देण्यासाठी मोहिते यानं दहा हजार रूपयांची लाच तक्रारदाराकडं मागितली होती. तडजोडीअंती ठरलेली पाच हजार रूपये लाच स्वीकारतांना काल त्याला पोलिसांनी अटक केली.
****