Sunday, 18 August 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 18.08.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१८ ऑगस्ट  २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 जलउर्जा क्षेत्रातल्या भागीदारीच्या पलिकडे जात भारत आणि भूतान यांनी द्विपक्षीय सामंजस्याची नवी उंची गाठायला मान्यता दिली आहे. भूतानच्या नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान काल हा निर्धार करण्यात आला. दोन्ही देशांमधल्या संबंधाचे परस्पर हितसंबंध आणि विश्वासावर आधारित कायमस्वरुपी भागीदारीचे विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण हे तीन आधारस्तंभ असतील. 
****

 जम्मू काश्मीर आणि लडाख यांच्या सर्वांगीण विकासाठी घटनेतलं ३७० कलम रद्द करण्यात आल्याचं उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते लुथियानियाचे राष्ट्राध्यक्ष गीतानस नौसेडा यांच्याशी संवाद साधत होते. नायडू सध्या बाल्टीक प्रदेशातल्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशांमधले प्रादेशिक भेद दूरकरुन प्रशासकीय सहकार्यावर भर देण्यात येत असल्याचं प्रतिपादन नायडू यांनी केलं.
****

 कजाकस्थानमधल्या बारा वर्षे वयोगटाच्या आशियाई टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं सुवर्णपदक पटकवलं आहे. भारतानं चीनी ताईपेईला २-१ असं पराभूत करून हे विजेतेपद मिळवलं. अंतिम लढतीतल्या तीन सामन्यांत भारतानं दोन्ही एकेरीच्या लढती जिंकल्या दुहेरीत मात्र पराभव स्कीकारला. मानस धम्मे, अर्णव पपराकर आणि तामिळनाडूचे प्रणव रेथिन यांचा भारतीय संघात समावेश होता. संपूर्ण स्पर्धेत मानसनं त्याचे सगळे सामने जिंकण्याची किमया साधली.
****

 अकोला पंचायत समितीमधल्या घुसर, बोरगाव मंजू, भौरद, निंभोरा, आणि कापशी या पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांना आयएसओ  मानांकन देण्यात आलं आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. आर. मिश्रा यांनी पहिल्या टप्प्यात २८ पशुवैद्यकीय दवाखाने आयएसओ करण्याचा निर्धार केला आहे.
*****
***

No comments:

Post a Comment