Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 12
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी आज झारखंडमधल्या रांची इथं किसान मानधन योजनेची सुरुवात करत आहेत. या योजनेअंतर्गत
साठ वर्ष पूर्ण झालेल्या सुमारे पाच कोटी छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार
रुपये मिळणार आहेत. या योजनेसाठी पुढच्या तीन वर्षांत दहा हजार सातशे चौऱ्याहत्तर कोटी
खर्च केले जाणार आहेत. अठरा ते चाळीस वर्षे वया दरम्यानचे शेतकरी या योजनेत आपली नावं
नोंदवू शकतात. आदिवासी मुलांसाठी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा चारशे एकलव्य निवासी शाळांचं उद्घाटन देखील पंतप्रधान
मोदी यांच्या हस्ते होत आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या
हस्ते रांची इथं झारखंड विधानसभेच्या नव्या इमारतीचं लोकार्पण झालं. देशातील ही पहिली
कागदविरहित विधानसभा ठरणार आहे.
****
संरक्षण संशोधन आणि विकास
संस्थेनं कमी वजनाच्या सहज वाहून नेता येण्याजोग्या स्वयंनिर्मित टँक विरोधी क्षेपणास्त्राची
यशस्वी चाचणी केली आहे. भारतीय सैन्यासाठी ही मोठी आनंदाची बाब असल्याचं संरक्षण मंत्रालयानं
म्हटलं आहे. आंध्र प्रदेश इथल्या करनूल इथं ट्रायपॉड लाँचरच्या साहाय्यानं या क्षेपणास्त्राची
चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रानं अगदी अचूक लक्ष्य साधलं, असंही संरक्षण मंत्रालयानं
जारी केलेल्या निवेदनात नमुद केलं आहे.
****
सरकारनं करदात्यांना
प्राप्तीकर नोटीस थेट न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद
यांनी ही माहिती दिली. ते काल अहमदाबाद इथं मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शंभर
दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या दोन ऑक्टोबरपासून
ही नोटीस सर्वप्रथम तपासणीसाठी केंद्रीय प्रणालीकडे जाईल, आणि त्यानंतरच या कारवाई
केली जाईल, असं रविशंकर प्रसाद म्हणाले.
****
पुणे - बंगळूर महामार्गावर
सातारा जवळच्या लिंब खिंड परिसरात आज पहाटे एका खाजगी बस आणि ट्रकमधील भीषण अपघातात
सहा जण ठार आणि वीस जण जखमी झाले आहेत. पहाटे पाच वाजता हा अपघात झाला. अपघात ग्रस्त
बस मुंबईहून बेळगावकडे जात होती.
****
आयोध्या रामजन्मभूमी
बाबरी मस्जित वाद प्रकरणातल्या मुस्लिम गटाचे सर्वोच्च न्यायलायतले वकिल राजीव धवन
यांना मिळणाऱ्या धमक्यांची सर्वोच्च न्यायलयानं नोंद घेतली आहे. या घटनांवर नाराजी
व्यक्त करत अशा घटना घडायला नकोत, असं पाच सदस्यीय घटना पीठाचे प्रमुख मुख्य न्यायमुर्ती
रंजन गोगोई यांनी म्हटलं आहे. धवन यांच्या
वकिलावरही सर्वोच्च न्यायलयाच्या परिसरात काल
हल्ला झाल्याचं पिटीआयचं वृत्त आहे.
****
जम्मु काश्मिरच्या कठुआ
इथं तीन संशयीत दहशतवाद्यांना आज अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून
विविध शस्त्रही जप्त करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिली.
****
जालना जिल्ह्यात या मोसमात
सरासरी सुमारे तिनशे नव्व्यान्नव मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक
सरासरी सहाशे अठ्ठ्यांऐंशी मिली मीटर आहे. जालना जिल्ह्यात सकाळपर्यंतच्या २४ तासांत
सुमारे १६ मिली मीटर पावसाची नोंद झाल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यातही सकाळपर्यंतच्या
२४ तासात सरासरी सुमारे २६ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातल्या पुर्णा
तालूक्यात सर्वाधिक ३८ मिली मीटर एवढा पाऊस झाला आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या
भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरून आज पुन्हा पाणी वाहत आहे. या नदीला पूर
येण्याची ही या वर्षीची सातवी वेळ आहे.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी अधिकाऱ्यांचं पथक पाठवलं
आहे.
****
बुलढाणा जिल्ह्यातल्या
पेनटाकळी प्रकल्पाचे एकूण नऊ दरवाजे वीस सेंटीमीटरने उघडण्यात आले असून पैनगंगा नदीपात्रामध्ये प्रती सेकंद सहा हजार सहाशे
बेचाळीस घनफूट विसर्ग सुरू आहे. बुलढाणा, चिखलीवरुन पाण्याची आवक वाढत असल्यानं दरवाजे
आणखी उघडण्याची शक्यता आहे. या विसर्गामुळे हिंगोली जिल्ह्यातल्या ईसापुर धरण क्षेत्रात
पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्याची शक्यता निर्माण झाली
आहे. असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
गणेशोत्सवानिमित्त दहा
दिवसांपूर्वी वाजत-गाजत प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या लाडक्या गणपती बाप्पांना आज राज्यात
भक्तीभावात निरोप दिला जात आहे. प्रशासानानं ठिकठिकाणी सर्व व्यवस्था केली आहे. कोल्हापूर
जिल्ह्यातल्या पहिला मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाची मिरवणूक मोठ्या
थाटात काढण्यात आली आहे. पालक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते विसर्जन मिरवणुकीला
प्रारंभ झाला आहे. औरंगाबाद इथं मुख्य विसर्जन मिरवणुकीला शहरातल्या संस्थान गणपतीपासून
सुरूवात होणार आहे. परभणी महानगरपालिकेनं गणेश मूर्तींचं विसर्जन नदी किंवा इतरत्र
कुठंही न करता ते पालिकेच्या जलशुध्दी केंद्राजवळच्या हौदात करावं असं आवाहन केलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment