▼

Saturday, 16 November 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 16.11.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 १६ नोव्हेंबर २०१९ सकाळी ११.०० वाजता
****

 आज राष्ट्रीय पत्रकारिता दिन, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आजच्या पत्रकारिता दिनाच्या सर्व माध्यमांना शुभेच्छा दिल्या. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वार्तांकनास मुक्त आणि स्वतंत्र वातावरण मिळायला हवं, आणि सरकार त्यासाठी प्रयत्न करत आहे. टिका करणं हे माध्यमांचं काम आहे ते त्यांनी करायला हवं परंतू, खोट्या बातम्या पासून त्यांनी दुर रहायला हवं असं जावडेकर यांनी एका संदेशात म्हटलं आहे.
****

 वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा इथल्या रामदेव पेट्रोल पंप वर काल रात्रीत पावणे नऊच्या सुमारास चोरट्यांनी चोरी करून २ लाख ६० हजार रुपये पळवल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावर  पोलीसांनी तपास करून अवघ्या ४ तासात आरोपीला जेरबंद केलं आहे.
****

 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत आहेत. ते आज  अर्धापूर तालुक्यातल्या खैरगाव इथं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणार आहेत.
****

              लातूर इथले प्रसिद्ध दंत व्यंगोपचार तज्ञ डॉ आनंद अंबेकर यांना या वर्षीचा दंत व्यंगोपचार क्षेत्रातला मानाचा डॉ. जॉर्ज जेकब पुरस्कार जाहीर झाला आहे. अंबेकर  यांनी दंत व्यंगोपचार क्षेत्रात केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून, येत्या २२ नोव्हेंबरला भुवनेश्वर इथं पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****

 अकोला जिल्ह्यात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान आणि संयुक्त राष्ट्र  बाल आपत्ती निधी- युनिसेफ भारत शाखा यांच्या वतीनं, बाल हक्कसंरक्षण हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत लोकांना बाल हक्क संरक्षण आणि बालविवाह प्रतिबंधाचं महत्त्व सांगण्यात येत आहे.   बालदिनाचे औचित्य साधत या मोहिमेचा तिसरा आणि शेवटचा टप्पा १४ नोव्हेंबर रोजी सुरू होऊन २८ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. असं महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या अकोला जिल्हा मुख्य समन्वयक माधुरी सरोदे आणि प्रीती पळसपगार यांनी कळवलं  आहे.
****

              इंदोर इथं सुरू असलेल्या भारत आणि बांग्लादेश यांच्यातल्या  पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुस-या डावात बांगलादेशच्या ३ बाद ३७ धावा झाल्या आहेत. पहिल्या डावात भारतानं काल मयंक अग्रवालच्या द्विशतकी खेळीच्या बळावर सहा बाद ४९३ धावा केल्या. सध्या भारताकडे ३१० धावांची आघाडी आहे.
*****
***

No comments:

Post a Comment