आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१२ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद आजपासून दोन दिवसांच्या राज्याच्या दौ-यावर येत आहेत. ते आज पुण्यात
राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला
संबोधित करणार आहेत.
****
कोरोना
विषाणूमुळे होणा-या आजाराला “कोविड-२०१९” असं नाव अधिकृतरीत्या दिलं असल्याचं जागतिक
आरोग्य संघटनेनं जाहीर केलं आहे. कोरोना, वायरस आणि डिसीज या तिन्ही शब्दांची आद्याक्षरं
मिळून हे नाव तयार केलं असून, २०१९ मधे त्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ते वर्ष या नावात
समाविष्ट केलं आहे. या आजाराला अधिकृत नाव देण्याची मागणी संशोधकांनी केली होती.
दरम्यान,
या रोगाचा संशय असलेले तीन रुग्ण राज्यात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. राज्याच्या
आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. तीन संशयित रुग्णांपैकी दोन पुण्याच्या नायडू
रुग्णालयात तर एक मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात असून, आतापर्यंत राज्यात या रोगाचा
एकही रुग्ण दिसून आलेला नसल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे.
****
वर्धा
जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथल्या जळीत प्रकरणातल्या आरोपीवर येत्या दोन आठवड्यात आरोपपत्र
दाखल केलं जाईल, असं, या प्रकरणाची चौकशी करणा-या विशेष तपास पथकाच्या अधिका-यांनी
सांगितलं आहे.या आरोपीची पोलीस कोठडी येत्या
वीस तारखेला संपणार असून, त्याआधीच आरोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती
या अधिका-यांनी दिली.
****
कोरेगाव
भीमा हिंसाचार प्रकरणी चौकशी करणा-या समितीला राज्य सरकारनं येत्या आठ एप्रिलपर्यंत
अंतिम मुदतवाढ दिली आहे.राज्याच्या गृहविभागानं काल यासंदर्भातली अधिसूचना जारी केली.
****
निजामाबाद
- तिरुपती रॉयलसीमा ही जलद रेल्वे गाडी नांदेडहून तिरुपतीसाठी सोडण्याची नांदेडवासियांची
मागणी आहे. या मागणीचं निवेदन नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे दिलं.
****
वाशीम
जिल्ह्यात थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर ग्रामसभेनं अविश्वास ठराव संमत करून
सरपंचपदच रद्द केलं आहे. मंगरूळपीर तालुक्यातल्या शेंदुरजना मोरे इथल्या
ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे अविनाश अशोक धामंदे यांना
सरपंच पदावरुन दूर व्हावं लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment