Sunday, 1 March 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 01.03.2020 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 01 March 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १ मार्च २०२० सायंकाळी ६.००
****

 राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासू दोन दिवसांच्या छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. छत्तीसगडचे राज्यपाल अनुसूया उके आणि मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्वामी विवेकानंद विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. तिथून ते हवाईदलाच्या हेलिकॉप्टरनं बिलासपूरला रवाना झाले. या भेटीत ते उद्या बिलासपूर इथल्या गुरु घासीदास विद्यापीठात दीक्षांत समारंभात व्याख्यान देतील, तसंच विद्यापीठ आवारा नव्यानं बांधलेल्या पाच इमारतींचं उद्धाटनही करतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****

 संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गिरणी कामगारांचं मोठं योगदान आहे. या प्रत्येक गिरणी कामगाराला घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. गिरणी कामगारांनी त्यांना मिळालेली घरे इतरांना विकू नयेत आणि मुंबईबाहेर जाऊ नये, सं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.

 मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळानं उभारलेल्या तीन हजार ८९४ सदनिकांची सोडत आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
****

 देशात बेरोजगारीचा आकडा वाढत असताना सीएए, एनआरसी आणि एनपीआर आणून सरकार दोन समाजात फूट पाडत असल्याची टीका युवक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सुबोध हरितवाल यांनी केली आहे. ते आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.

 देशाला खरी गरज एनआरयू, म्हणजेच नॅशनल रजिस्टर फॉर अन एम्प्लॉयमेंटची आहे. राष्ट्रीय बेरोजगारी रजिस्टरच्या मागणीसाठी भारतीय युवक काँग्रेसच्या वतीनं यंग इंडिया के बोल या अखिल भारतीय भाषण स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढच्या महिन्यात युवक काँग्रेस सरकारला बेरोजगारांचा आकडा देऊन नोकऱ्या उपलब्ध करण्याची मागणी करणार असल्याचं ते म्हणाले.
****

 काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या वतीनं राज्यभरात आरक्षण बचाव अभियान राबवण्यात ये आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज सकाळी औरंगाबाद इथून झाली. यावेळी राष्ट्रीय समन्वयक मनोज बागडी, प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे, प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे उपस्थित होते. मराठवाड्यात हे अभियान तीन दिवस राबवलं जाणार आहे.  
****

 विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातील कुणबी मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्ग-ओबीसीत समावेश करायला सरकारला भाग पाडू, अशी ग्वाही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.  कुणबी मराठा सेवा संघ आणि कुणबी युवा संघाच्या वतीनं आज जालना शहरात झालेल्या कुणबी हक्क परिषदेत ते बोलत होते.

 यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार कैलास गोरंट्याल, राहुल पाटील, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदी उपस्थित होते.
****

 लातूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातल्या विविध यात्रांमध्ये  पशु आणि अश्व प्रदर्शनं भरली जातात, अशा प्रकारच्या प्रदर्शनांसाठी दिल्या जाणाऱ्या निधीच्यामेत भरीव वाढ करण्यात येईल, अशी ग्वाही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

 सिद्धेश्वर रत्नेश्वर यात्रेनिमित्त भरवलेल्या पशु प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. देवणी गोवंश लातूर जिल्ह्याचं भूषण आहे. त्याच्या संगोपन आणि संवर्धनासाठी  शासनाकडून सर्व प्रकारचं सहकार्य केले जाईल,संही ते म्हणाले.
****

 नांदेड इथं शंकर साहित्य दरबार संमेलनाला आज सकाळी सुरवात झाली. या संमेलनाचंद्घाटन ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार डी. पी. सावंत आदि उपस्थित होते. साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल यावेळी ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांचा सन्मान करण्यात आला.
****

 ठेवीदारांनी बँकेत ठेवलेल्या पैशावरच बँका चालतात. त्या टिकाव्यात, वाढाव्यात यासाठी दिलेल्या कर्जाची वसुलीही तितकीच महत्वाची आहे. हे आव्हान स्वीकारलं, तरच बँका टिकतील आणि वाढतील, असं प्रतिपादन माजी विधानसभा ध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं.

 डॉ. अभय मंडलिक यांच्या सहकार कायदा आणि वसुलीची प्रक्रिया या पुस्तकांचं प्रकाशन आज बागडे यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते.
*****
***

No comments:

Post a Comment