Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
March 2020
Time 18.00
to 18.05
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मार्च २०२०
सायंकाळी ६.००
****
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी निर्माण झालेल्या आपत्कालिन स्थितीत मदत करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी केलं आहे. यासाठी आपत्कालिन मदत निधी म्हणून पंतप्रधान नागरीक
सहायता आणि मदत निधीची स्थापना करण्यात आली आहे. या
मदत निधीतून आरोग्यशाली भारत निर्माण करण्यात येईल, असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात
म्हटलं आहे.
भारतीय जनता पक्षाचे सर्व
खासदार कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी त्यांच्या वार्षिक विकास निधीतून प्रत्येकी
एक कोटी रूपये देणार असल्याची घोषणा, पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली आहे.
केंद्रीय मदत निधीत ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. याशिवाय पक्षाचे सर्व खासदार आणि
आमदार एक महिन्याचं आपलं वेतनही देणार असल्याचं नड्डा यांनी ट्विटर संदेशाद्वारे सांगितलं.
पक्षाचे देशभरात ३८६ खासदार आहेत.
****
कोरोना
विषाणुचं संक्रमण थांबवण्यासाठी राज्यातून
इतरत्र स्थलांतर करत असलेल्या लोकांना ते जिथं असतील तिथंच थांबवण्यासाठी पाऊलं उचलण्याचे
निर्देश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह
कोश्यारी यांनी राज्यातल्या विभागीय आयुक्तांना दिल्या
आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी आज राज्यातल्या सर्व सहा विभागीय आयुक्तांशी
दूरध्वनीवरून चर्चा केली आणि प्रत्येक विभागातल्या करोना विषाणू संक्रमण तसंच लोकांचं स्थलांतर याबाबतच्या परिस्थितीची माहिती घेतली.
सर्व मोठ्या शहरांमध्ये तसंच औद्योगिक वसाहतींमध्ये सार्वजनिक उद्घोषणा करून स्थलांतर
करत असलेल्या लोकांना थांबण्याचा आग्रह करावा आणि त्यांच्या निवास तसंच भोजनाची व्यवस्था
करण्यासाठी शासन तसंच अशासकीय संस्था करीत असलेल्या प्रयत्नांबाबत त्यांना अवगत करावं, असं राज्यपालांनी सांगितलं.
****
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या पार्श्वभूमीवर लागू
करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊन कालावधीत भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तुंची
थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांचे गट स्थापन करत असल्याचं कृषी विभागाच्या
अधिकाऱ्यानं आज सांगितलं. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणावर भाजीपाला फळफळावळ उपलब्ध आहे.
मात्र लॉकडाऊनमुळे तो ग्राहकांपर्यंत पोहाचवण्यात अडचण येत असल्याचं ते म्हणाले. यावर
उपाय म्हणून आम्ही उत्पादक आणि ग्राहकांची थेट विक्री यंत्रणा निर्माण करत आहोत. यासाठी
तीन आणि पाच किलोग्रॅम वजनाचे भाजीपाल्याचे पाकिटं तयार करत असून हे पाकिटं संबंधित
गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोवण्यात येणार असल्याचं या अधिकाऱ्यांनं
सांगितलं. जिल्हा पातळीवर कृषी अधिक्षक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही योजना राबवली
जाणार आहे.
****
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधली गर्दी कमी
करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,
जिल्हा पुरवठा अधिकारी, महानगरपालिका यांनी एकत्र
येऊन शेतकरी गटामार्फत थेट ग्राहकांना भाजीपाला आणि फळे पुरवठा करण्याचा निर्णय आज
घेतला. शेतकरी गट कॉम्प्लेक्स किंवा सोसायटीचे अध्यक्ष,
सचिव यांना दररोज किती भाजीपाला लागेल याची माहिती घेऊन या भाजीपाल्यांच्या
पिशव्या अध्यक्ष किंवा सचिव यांना सुपुर्द करणार
आहेत.
****
राज्यात कोरोना विषाणूग्रस्त रूग्णांची संख्या १६७ एवढी
झाली असल्याचं आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आणखी १४ जण सकारात्क असल्याचं आढळून आलं आहे. मुंबईत
१२ जण तर नागपूरमध्ये दोघे जण
सकारात्मक असल्याचं आढळून आलं आहे.
याशिवाय आज दिवसभरात २८
जण नवे संशयित रूग्ण आढळून आले आहेत.
रक्ताची गरज लक्षात घेता स्वयंसेवी संस्थांना रक्तदान शिबिर
घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही
खाजगी डॉक्टर्सना लोकांवर उपचार करण्यासाठी कार्यरत राहण्याचं आवाहन केलं आहे.
****
राज्याचे
मुख्य सचिव अजोय मेहता यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्यास केंद्र सरकारनं मान्यता
दिली आहे. आता ३० जूनपर्यंत ते या पदावर कायम राहतील. यापूर्वी त्यांना सहा महिन्याची
मुदतवाढ देण्यात आली होती, ही मुदत येत्या ३१ मार्च रोजी संपणार होती. मात्र कोरोना
विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य आपातकालिन स्थिती लक्षात घेऊन
विशेष बाब म्हणून त्यांना आणखी तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
अहमदनगर मतदारसंघांमधून विविध कारणानिमित्त
इतर राज्यात गेलेल्या नागरिकांना दिलासा मिळावा आणि ते जिथे आहेत तिथेच त्यांची सोय
व्हावी यासाठी खासदार
डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी अहमदनगर मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यासाठी दोन हेल्पलाईन
नंबर जाहीर केले आहेत.
****
No comments:
Post a Comment