Wednesday, 20 May 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 20 MAY 2020 TIME – 07.10 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 20 May 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक२० मे २०२० सकाळी ७.१० मि.
****
** राज्यात आता कोरोना विषाणू बाधित रूग्णांची संख्या अधिक असलेल्या महानगरपालिकाचं फक्त रेड झोनमध्ये, अन्य भागात येत्या शुक्रवारपासून बहुतांशी व्यवहार सुरू करण्यास परवानगी
** राज्यात काल दिवसभरात दोन हजार एकशे २७ नवे कोरोना विषाणू बाधित रूग्ण, ७६ रूग्णांचा मृत्यू
** औरंगाबादमध्ये दोन जणांचा मृत्यू तर ५४ नवे रूग्ण
** नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या रूग्णांच्या संख्येत वाढ, बहुतांशी रूग्ण स्थलांतरीत
** बाधितांवर उपचारासाठीच्या खासगी रुग्णालयांच्या दरांवर नियंत्रण आणण्याची गरज- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
** कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पदवी, पदविका तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची राज्य सरकारची विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मागणी
आणि
** येत्या एक जूनपासून देशभरात २०० बिगर वातानुकुलित रेल्वेगाड्या सुरु होणार
**
राज्य सरकारनं टाळेबंदीच्या चौथ्या टप्प्यातल्या मार्गदर्शक सूचना काल जारी केल्या. राज्याची रेड झोन आणि बिगर रेड झोन अशी दोन भागात विभागणी केली असून, संपूर्ण जिल्हा नव्हे तर फक्त महापालिका क्षेत्राचा रेड झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. या मार्गदर्शक सूचना परवा २२ मे म्हणजे शुक्रवारपासून राज्यात लागू होणार आहेत.

राज्यांची red zone आणि  non red zone  अशी दोन भागात विभागणी केली आहे या वेळी महत्त्वाचा बदल म्हणजे संपूर्ण जिल्हा नव्हे तर केवळ पालिका क्षेत्र रेडझोन केले आहे त्यानुसार मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला आणि अमरावती महापालिका क्षेत्रांचा समावेश रेडझोनमध्ये केला आहे या सर्व क्षेत्रात केंद्र सरकारच्या दिशा निर्देशानुसार प्रतिबंधित क्षेत्र आखली जाणार आहेत प्रतिबंधित क्षेत्र ठरवण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले त्यात एखादी कॉलनी झोपडपट्टी  मोहल्ला बिल्डींग सोसायटी गल्ली पोलीस ठाण्याचा भाग किंवा काही गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करता येते यापेक्षा भाग उदाहरणार्थ संपूर्ण महापालिका क्षेत्र किंवा संपूर्ण तालुका प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यापूर्वी मुख्य सचिव यांचा सल्ला घ्यावा लागेल प्रतिबंधित क्षेत्रात किंवा अत्यावश्यक सेवा सुरू राहतील वैद्यकीय करणे अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा याशिवाय या क्षेत्रात कुणाला प्रवेश करता येणार नाहीत किंवा तिथून बाहेर जाता येणार नाही होणार नाही राज्यभरात विमान,  मेट्रो, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृह, प्रार्थना धार्मिक, सामाजिक क्रीडाविषयक, मनोरंजनात्मक, कुठल्याही करण्यासाठी लोकांना एकत्र येणार नाही
घरपोच खाद्य पुरवठा करण्यासाठी उपहारगृहांना प्रतिबंधित क्षेत्र वगळता राज्यभर परवानगी देण्यात आली आहे अत्यावश्यक सेवा वगळता रात्री ७ ते सकाळी ७ पर्यंत घराबाहेर पडता येणार नाही ६५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती, मधुमेह ,हृदयरोग,दमा यांसारखे आजार असलेल्या व्यक्ती गर्भवती आणि दहा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलींनी जीवनावश्यक आणि वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्ला राज्य सरकारने दिला आहे रेडझोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने पूर्वीप्रमाणे उघडे राहतील इतर दुकाने महापालिकांच्या परवानगीला उघडता येतील मद्य विक्रीच्या दुकानांना परवानगी असेल तर ती उघडी राहू शकतील किंवा मध्ये घरपोच वितरित करता येईल रेड झोन'मध्ये केश कर्तनालय वगैरे सुरू करायला परवानगी देण्यात आली नसली तरी इतरत्र ती सुरू होऊ शकतील की कमर सेवा पुरवठादार आता जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करू शकणार आहेत ते रेडझोनमध्ये उद्योग सुरू करायला परवानगी दिली आहे याशिवाय मजुरांची वाहतूक गरजेची नसेल तर बांधकाम ही सुरू होऊ शकते मात्र रिक्षा, cab रेडझोनमध्ये बंद राहतील अत्यावश्यक कामासाठी चार चाकी मध्ये चालक आणि इतर दोन व्यक्ती तर दुचाकीवर एका व्यक्तीला परवानगी आहे रेड झोन'मध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी गरजेप्रमाणे कामावर येऊ शकतील मात्र खासगी कार्यालये पूर्णपणे बंद राहतील रेडझोनमध्ये आरटीओ उपनिबंधक कार्यालय शैक्षणिक कामांसाठी विद्यापीठ महाविद्यालय सुरू होऊ शकतील उत्तरपत्रिका तपासणी निकाल जाहीर करणार ऑनलाइन अभ्यासक्रम निर्मिती पाच टक्के किंवा दहा कर्मचारी यापैकी जे जास्त असेल त्यानुसार सुरू राहतील खाजगी कार्यालय मात्र पूर्णपणे बंद असते रेडझोन वगळता इतर ठिकाणी सर्व प्रकारची सरकारी आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होऊ शकते ठिकाणी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला ही परवानगी देण्यात आली आहे या ठिकाणी दुचाकीवर एक व्यक्ती रिक्षा आणि चार चाकी मध्ये चालक आणि इतर दोन व्यक्ती प्रवास करु शकतील जिल्हा अंतर्गत बस वाहतूक ५० टक्के प्रवासी क्षमतेसह सुरू होऊ शकेल आंतरजिल्हा वाहतुकीसाठी स्वतंत्र निर्देश नंतर दिले जाणार आहेत रेडझोन वगळता इतरत्र मॉल बघता सर्व प्रकारची दुकान नऊ ते पाच दरम्यान उघडता येतील मात्र तिथे गर्दी झाल्याचे किंवा सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळले तरीही दुकान बंद करण्याचे आदेश देण्याची मुभा स्थानिक प्रशासनाला दिली आहे उघड्याला परवानगी असलेल्या दुकानातही ग्राहकांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवावे लागेल आनिआणि एकावेळी पाच पेक्षा जास्त लोकांना दुकानात प्रवेश करता येणार नाही लग्न समारंभ आणि अंत्यसंस्काराला जास्तीत जास्त पन्नास लोकांना बोलवता येईल मात्र सुरक्षित अंतर पाळावं लागेल या शिवाय सर्वत्र घराबाहेर पडताना मास्क लावणे गरजेचे असेल सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याला बंदी आहे
****
देशभरातल्या कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं काल एक लाखाचा टप्पा पार केला. देशभरात सध्या एक लाख एक हजार १३९ नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या आजारामुळे आतापर्यंत तीन हजार १६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ३९ हजार १७४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ३९ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे, असं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.
****
राज्यात काल दिवसभरात दोन हजार एकशे २७ नवे कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले. यामुळे आता राज्यातल्या एकूण रूग्णांची संख्या ३७ हजार १३६ एवढी झाली आहे. दिवसभरात ७६ रूग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४३ जण मुंबईतले,  १५ ठाणे, सहा पुणे तर तीन जण अकोला शहरातले आहेत.
याचबरोबर राज्यभरात काल एक हजार दोनशे दोन रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी समाजमाध्यमावर बोलतांना सांगितलं. आतापर्यंत या आजारातून नऊ हजार ६३९ रूग्ण बरे झाले आहेत तर एक हजार दोनशे ४९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रूग्ण संख्या दुप्पट होण्याच्या वेगात सुधारणा झाली असून यापूर्वी तीन दिवस असलेला हा वेग आता १४ दिवसावर गेला आहे, असं ते म्हणाले.
****
पुण्यात १९३ नवीन रूग्ण आढळून आल्यामुळे बाधित रूग्णांची संख्या ४३७० एवढी झाली आहे. यामध्ये पिंपरी चिंचवडमधल्या पाच रूग्णांचा समावेश आहे. दिवसभरात उपचारादरम्यान दहा रूग्णांचं निधन झालं, यामुळे मृतांची संख्या २२१ वर पोहोचली आहे.
***
औरंगाबाद जिल्ह्यात काल ५आणखी कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या एक हजार ७झाली आहे. काल सापडलेल्या रुग्णांमध्ये बायजीपुऱ्यात सात, किराडपुरा, सादात नगरमधल्या गल्ली क्रमांक सहा मध्ये प्रत्येकी चार, गारखेड्यातली आदर्श कॉलनी, सातारा गाव, आणि गंगापूर तालुक्यातल्या फुलशिवरा इथं प्रत्येकी तीन, रुग्ण आहेत. मकसूद कॉलनीत दोन, रोहिदास नगर, शिवशंकर कॉलनी, जाधववाडी, जटवाडा रोड, हिमायत बाग, पुंडलिक नगर, मुकुंदवाडी, नारेगाव, जयभीम नगर, संजय नगर, हीम नगर, कैलास नगर, गादल नगर, शिवनेरी कॉलनी, सेव्हन हिल परिसरात विद्यानगर, दुर्गा माता कॉलनी, न्याय नगर, मकसूद कॉलनी, जाधववाडी, गारखेडा परिसर, मित्र नगर, मिल कॉर्नर, मुकुंदवाडीतलं शिवशक्ती नगर, मुकुंद नगर, रहेमानिया कॉलनी इथले प्रत्येकी एक, तसंच अन्य भागातले चार रुग्ण आहेत.
दरम्यान, औरंगाबाद इथं काल दोन कोरोना विषाणू बाधितांचा मृत्यू झाला. हिमायत बागमधल्या ६५ वर्षीय पुरुष, आणि हर्सुल इथल्या ६३ वर्षीय पुरुषाचा काल शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत या आजाराने ३६ जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव येथून बंदोबस्तावरून परतलेल्या औरंगाबादच्या सातारा परिसरातल्या राज्य राखीव पोलिस बलाच्या बाधित झालेल्या जवानांपैकी ६४ जवान यशस्वी उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. तर घाटीतून काल तीन रुग्णांना घरी सोडण्यात आलं.  जिल्ह्यात आतापर्यंत ४०१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत.
****
औरंगाबाद शहरात उद्या गुरुवारपासून टाळेबंदी शिथील करण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं, अन्नधान्य, किराणा आणि भाजीमंडई सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचं परिपत्रक मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिक पांडेय यांनी काल जारी केलं. याठिकाणी गर्दी होणार नाही तसंच शारीरिक अंतर राखणं, नियमित मास्कचा वापर करणं बंधनकारक असणार असल्याचं त्यांनी या परिपत्रकात नमूद केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येनं शंभरी पार केली आहे. काल आणखी नऊ जण बाधित असल्याचं आढळून आल्यानं जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एकशे सहा झाली आहे. काल शहरातल्या करबला नगर इथं तीन, कुंभार टेकडी इथं सहा, आणि अबचलनगर इथं एक रुग्ण सापडला. यात सहा पुरूष, दोन महिला तर एक चार वर्षे वयाचा बालक आहे. आता पर्यंत ३० रूग्ण बरे होऊन घरी परतले असून, पाच रुग्णांचा मृत्यू झाला, तर दोन बाधित रुग्ण फरार असल्याचं उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितलं.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. अहमदपुर तालुक्यातल्या खंडाळी आणि लातूर तालुक्यातल्या बोरगाव इथं प्रत्येकी एक रुग्ण सापडले असून, ते मुंबईहून आले होते. उदगीर आणि जळकोट इथंही प्रत्येकी एक रुग्ण सापडला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल आणखी सहा जणांचे अहवाल कोरोना विषाणू बाधित असल्याचे आले. यापैकी परंडा तालुक्यातले दोन, तर भूम, तुळजापूर, उस्मानाबाद, लोहारा इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. यापैकी एक जण पुण्याहून, तर अन्य पाच जण मुंबईहून आले होते. उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १६ झाली आहे.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी आठ जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले. यामध्ये बीड शहरातले पाच, गेवराई तालुक्यात इटकूर, केज तालुक्यात चंदन सावरगाव आणि केळगाव, इथंला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या २० झाली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथं काल आणखी २९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. तर नाशिक शहरात एक रुग्ण आढळला. मालेगाव
शहरातल्या एकूण बाधितांची संख्या आता ६४८ झाली आहे.
****
वाशिममध्ये पाच जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणूबाधित महिलेसोबत हे सर्वजण मुंबईहून आले होते. या सर्वांना जिल्ह्यात प्रवेश केल्यावर तत्काळ विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं.
****
कोरोना विषाणू बाधितांवर उपचारासाठीचे खासगी रुग्णालयांचे दर पाहता, सरकारनं त्यावर नियंत्रण आणण्याची गरज, विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वर्तवली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, त्यांना एक निवेदन सादर केलं, त्यानंतर फडणवीस माध्यमांशी बोलत होते. खरीप हंगाम तोंडावर आला आहे, यासाठी सरकारची काहीही तयारी नाही, शेतमाल खरेदीची व्यवस्था नाही, असं सांगतानाच, केंद्र सरकारप्रमाणे राज्य सरकारनेही बारा बलुतेदारांसाठी विशेषत: शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी फडणवीस यांनी केली.
****
बारावीनंतर विविध पदवी परिक्षांच्या अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी एम एच टी- सी ई टी ही परिक्षा जुलै मध्ये घेतली जाणार आहे. यासोबतच प्रमुख व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परिक्षांचे अर्ज भरण्यासही ३० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातली माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
****
राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत पदवी, पदविका तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी उच्च शिक्षण विभागानं विद्यापीठ अनुदान आयोगाकडे केली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. याबाबत माहिती देताना ते म्हणाले.


आठ ते दहा लाख विद्यार्थ्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोविडच्या प्रादुर्भावामुळे आम्ही रद्द करू शकत नाही त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेळ प्रदान करणे या पर्यायाला युजीसीने मान्यता द्यावी अशा पद्धतीचे पत्र पाठवले  
पुढील दोन दिवसांत आयोगाकडून काही निर्णय न आल्यास, राज्यातल्या सर्व विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या सोबत चर्चा करून तसंच विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊनच अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन सामंत यांनी दिलं.
****
येत्या एक जूनपासून देशभरात २०० बिगर वातानुकुलित रेल्वेगाड्या सुरु करणार असल्याचं रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आहे. या गाड्यांसाठी ऑनलाईन तिकीट नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरु होईल, असं त्यांनी ट्विट संदेशात सांगितलं. विशेष श्रमिक रेल्वेगाड्यांव्यतिरिक्त या रेल्वे असतील, तसंच कामगारांना त्यांच्या घरी पोहोवचण्यासाठी श्रमिक रेल्वे गाड्यांची संख्या दुप्पट करण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
स्थलांतरित कामगारांसाठी अधिक रेल्वेगाड्या सोडण्याची सूचना केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांना केली आहे. स्थलांतरितांच्या या जथ्थ्यांमधल्या महिला, मुलं तसंच वृद्धांची विशेष काळजी घेण्याची सूचनाही केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. या गाड्या सोडण्यासंदर्भात रेल्वे विभागाशी समन्यव साधावा, रेल्वे तसंच बस सोडण्याच्या वेळा स्पष्ट असाव्यात, असंही या पत्रात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद इथून काल एक विशेष श्रमिक रेल्वे झारखंड राज्यातल्या डाल्टनगंजसाठी रवाना झाली. या रेल्वेतून औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातले जवळपास एक हजार सहाशे मजूर गेल्याचं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं.
****
रुग्णालयांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी प्रत्येकानं आपलं कर्तव्य समजून कोरोना विषाणूला रुग्णालयाबाहेरून लढा देण्याची गरज असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. ते लातूर इथं पत्रकारांशी बोलत होते. कोवीड १९ या साथीवर मात करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने जे प्रयत्न केले त्याचा परिणाम म्हणून तुलनेने राज्यातला मृत्यू दर आणि साथीच्या प्रसाराचा वेग कमी राहिला असल्याचं ते म्हणाले.
****
कोरोना विषाणूचा रूग्ण आढळल्यानंतर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आष्टी तालुक्यातल्या पाटण सांगवी गावात प्रवेश केल्यामुळे बीडचे विधान परीषद सदस्य सुरेश धस यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. आष्टी तालुक्यात पाटण सांगवीत सात रूग्ण आढळले आहेत. लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी आपण या गावाला भेट दिल्याचं आमदा धस यांनी सांगितलं.
****
बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला कोरोना विषाणू बाधित रूग्ण जिल्हा रुग्णालयात इतरत्र फिरत असतानाच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. यासंबंधिचा एक चित्रफित समाजमाध्यमावर प्रसारीत झाल्यानंतर त्यांनी हे आदेश दिले. आष्टी तालुक्यातल्या सात बाधित रुग्णांनी पुणे इथं उपचार घेण्याचं ठरवलं असल्यानं, त्यांना पुण्याला नेण्याची सोय करत असताना हा रूग्ण कक्षाच्या बाहेर पडून सर्वत्र फिरत होता.
****
नांदेड शहरात श्रीनगर परिसरात एक पादत्राणांचं दुकान परवानगी नसतांना उघडल्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुकान चालकास पाच हजार रुपये दंड ठोठावत दुकान बंद केलं. अन्य एका दुकानदारानं निर्धारित वेळेनंतर दुकान सुरू ठेवल्यामुळं त्या दुकानदाराकडूनही मनपा पथकानं दंड आकारला आहे.
****
राज्य सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या औरंगाबाद शाखेनं केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, खासदार डॉ. भागवत कराड, आमदार अतुल सावे यांनी या मागणीचं निवेदन काल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलं. कोरोना विषाणूविरूद्धच्या युध्दात काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कुठल्याही प्रकारची कपात करण्यात येनये, औरंगबाद शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा, आदी मागण्या या निवदेनात नमूद करण्यात आल्या आहेत.
उस्मानाबाद, परभणी इथंही भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशासनाला विविध मागण्याचं निवेदन देण्यात आलं. 
****
राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे राज्यात कोरोनाविषाणू संसर्गजन्य आजार परसरत असून मृत्यूचं प्रमाण चिंताजनक असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नांदेडचे विधान परिषदेचे सदस्य राम पाटील रातोळीकर यांनी केला आहे. रातोळीकर यांनी काल जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्याकडे दिलेल्या निवेदनात हा आरोप केला. राज्य सरकारने ऑटो चालक, नाव्ही, बारा बलुतेदार यांना प्रत्येकी किमान पाच हजार रुपये अनुदान द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
****
लातूर शहरापासून जवळच असलेल्या दहा हजार लोकवस्तीच्या गंगापूर या गावा अन्न सुरक्षा आणि पंतप्रधान गरीब योजनेतून तांदू आणि गव्हाचं वाटप केलं जात आहे. वेळेवर आणि पुरेस अन्नधान्य मिळाल्या मुळे सरपंच बाबु खंदाडे  आणि लाभार्थ्यांनी, आनंद व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारने चालू केलेले अन्न सुरक्षा योजनेमुळे ग्रामीण भागात खूप मोठा फायदा याचा उपयोग झालेला आहे.गरिबांना मात्र ख्यायला तरी  मिळालं आहे आणि पंतप्रधानांनी केलेलं काम आहे हे कौतुकास्पद काम आहे आणि ग्रामीण भागामध्ये  मोठा उपयोग या अन्न सुरक्षा योजनेमार्फत झालेला आहे
माझं नाव अन्नसुरक्षा योजनेमध्ये आहे लॉकडाउनमध्ये पाच किलो तांदूळ घरी घरी मोफत वाटप केलेला आहे आणि गोरगरीब भुकेने व्याकूळ राहिलेला नाही
****
उस्मानाबाद इथल्या रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालयाच्या नवीन इमारतीसाठी राज्य शासनानं १६ कोटी रुपये निधी मंजूर केला असून, इमारत उभारणीचं काम सुरू आहे. तेर इथल्या उत्खनन स्थळाजवळ उभारल्या जात असलेल्या या संग्रहालयात जवळपास ४५ हजार पुरातन वस्तू दाखवता येणार आहेत. राज्य पुरातत्व खात्याचे संचालक डॉ तेजस गर्गे यांनी ही माहिती दिली. पुढच्या पाच वर्षांत या संग्रहालयाची उभारणी पूर्ण होणं अपेक्षित असून, त्यानंतर ते सर्वसामान्यांसाठी खुलं होईल, असंही डॉ गर्गे यांनी सांगितलं.
****
देशभरातल्या कामगारांच्या समस्यांकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीनं काल देशव्यापी निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात अनेक ठिकाणी घोषणा फलके हाती घेऊन भाकप कार्यकर्त्यांनी मूक निदर्शनं केली. स्थलांतरित कामगारांसाठी अधिकाधिक रेल्वे आणि बससेवा पुरवली जावी, प्रवासादरम्यान भोजनाची सोय असावी, सर्व मजुरांना प्रत्येकी १० हजार रुपये प्रवास भत्ता द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं.  
****
नांदेड तालुक्यात खडकुत शिवारातल्या नदीवरच्या बंधाऱ्याची उंची वाढवण्याची सूचना जिल्हा पाटबंधारे विभाग तसंच जलसंधारण खात्याला दिली असल्याचं आमदार मोहन हंबर्डे यांनी सांगितलं. या बंधाऱ्याची उंची वाढवल्यास खडकुत आणि एमशेटवाडी गावातल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यागंगाखेडसह तालुक्यातल्या नऊ गावातल्या शेतकऱ्यांना सरकारनं घोषित केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची मागणी गंगाखेड तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी केली आहे. गेल्यावर्षी अवकाळी पावसात झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शासनानं हेक्टरी आठ हजार रुपये मदत जाहीर केली होती, मात्र हे मदत या गावांना अद्यापर्यंत मिळालेली नाही, असं त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर शहरातल्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याबद्दल नागरिकांनी आमदार मेघना बोर्डीकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यापार्श्वभूमीवर आमदार बोर्डीकर यांनी काल बैठक बोलावून नगरपालिका प्रशासनाला याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
****
येत्या खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्यात पीक कर्जासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे. शेतकर्यांनी ३१ मे पर्यंत जालना डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज मागणी नोंदणी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्याच्या ऊमरी तालुक्यातल्या जामगाव परीसरात देशी मद्याची वाहतूक करणारा मिनी डोअर टेंपो वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे पलटला. काल दुपारी हा अपघात झाला. नागरिकांना या अपघाताची माहिती मिळताच काहींनी मद्याच्या पेट्या पळवण्याचा प्रयत्न केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****


No comments:

Post a Comment