Thursday, 4 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 04 JUNE 2020 TIME - 13.00 AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 June 2020
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जून २०२० दुपारी १.०० वा.
****
जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात अकरा जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. यामध्ये नानशी इथले ८, केंधळी इथले दोन आणि वैद्य वडगाव इथला एक अशा एकूण अकरा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातल्या कोरोना विषाणूग्रस्तांची एकूण संख्या आता १७० झाली आहे.
****
परभणी जिल्ह्यात आज सकाळी दोन रुग्णांचा कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे, यामध्ये परभणीतील मिलिंद नगर इथल्या एका रुग्णाचा तसंच पाथरी तालुक्यातल्या रामपुरी इथल्या एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी रामपुरी ग्रामपंचायत हद्द आज सकाळपासून प्रतिबंधित श्रेत्र म्हणून घोषित केलं आहे. परभणी जिल्ह्यातल्या कोविडग्रस्तांची संख्या आता ८८ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री एका कोरोना विषाणूग्रस्ताचा मृत्यू झाला, त्यामुळे जिल्ह्यात या आजारामुळे मृतांची संख्या ८९ झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज सकाळी ६३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या १ हजार ७६७ झाली आहे. यापैकी १ हजार ११३ रुग्ण बरे झाले असून, ५६५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत

सिडको एन 6 संभाजी कॉलनीत ६, शिवशंकर कॉलनीत ५, राजा बाजार ४, सिडको एन -7 आंबेडकर नगर तसंच गारखेडा परिसरातल्या अजिंक्य नगरमध्ये ३, बेगमपुरा, रोशन गेट, चेतना नगर, सिडको एन 4 समृद्धी नगर, आणि गणेश कॉलनीत प्रत्येकी दोन, तर  लेबर कॉलनी, पडेगाव, बायजीपुरा, हर्सुल, भारतमाता नगर, संजय नगर, मुकुंदवाडी, देवळाई चौक, समर्थ नगर, शिवाजी कॉलनी, सईदा कॉलनी, एन-सात सिडको, एन-2 विठ्ठल नगर, विनायक नगर, जवाहर कॉलनी, बारी कॉलनी, हनुमान नगर-गारखेडा, मील कॉर्नर, सिडको एन चार, क्रांती नगर, विजय नगर -गारखेडा, अयोध्या नगर, न्यू हनुमान नगर, कैलास नगर, एन 1 सिडको, सुंदर नगर- पडेगाव, कटकट गेट, नेहरू नगर, जय भवानी नगर भागात प्रत्येकी एकेक आणि अन्य सहा रुग्णांचा समावेश आहे.
****
सातारा जिल्ह्यात आणखी ७ जणांना कोरोना विषाणुचा  संसर्ग झाला आहे. हडपसरहून सातारा इथं आल्यानंतर मृत्यू झालेल्या व्यक्तीचा कोरोनाविषाणू चाचणी अहवाल पॉजिटिव आला आहे.
****
देशात कोरोना विषाणूग्रस्तांचं बरे होण्याचं प्रमाण ४७ पूर्णांक ९९ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ८०४ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७  रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची लागण झालेले ९ हजार ३०४ नवीन रुग्ण आढळले. देशातली रुग्णसंख्या २ लाख १६ हजार ९१९ झाली आहे. गेल्या २४ तासात या आजारामुळे २६० रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत एकूण मृतांची संख्या ६ हजार ७५ झाली असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोविड संसर्गासंबंधी १ लाख ३९ हजार ४८५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४२ लाख ४२ हजार ७१८ नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याचं, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद - आयसीएमआरने सांगितलं आहे. देशात कोरोना विषाणू संसर्ग नमुन्यांची चाचणी करण्यासाठी सध्या ४९८ सरकारी आणि २१२ खासगी अशा एकूण ७१० प्रयोगशाळा कार्यरत असल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे
****
कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कान, नाक आणि घशाच्या आजारापासून स्वत:चा बचाव करण्यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्या आहेत. डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये कोविड संसर्गाला प्रतिबंध करणं, हा या मागचा उद्देश आहे. या आजारांच्या रुग्णांना तपासण्यापूर्वी त्यांचं तापमान तपासावं, कोविड संसर्गाचा संशय असलेल्या रुग्णांची स्वतंत्र कक्षात तपासणी करावी, मास्क-हातमोजे आणि शारीरिक अंतर राखण्यासह अनेक सूचना आरोग्य मंत्रालयानं केल्या आहेत.
****
रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असून संततधार सुरु आहे.काल आलेल्या निसर्ग वादळानं खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचं काम सुरु असून रस्त्यावर पडलेली झाडं बाजूला करण्याचे काम जिल्हा प्रशासन एनडीआरएफच्या मदतीनं  करत आहे. तरी संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली. सिल्लोड तालुक्यात कासोद इथं विजेचे खांब कोसळले. अनेक घरांवरचे पत्रे उडाले, यात काही जनावरांना मार लागला, मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
****


No comments:

Post a Comment