आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१९ जून २०२० सकाळी ११.००
वाजता
****
औरंगाबाद
जिल्ह्यात आज सकाळी एक्याण्णव कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये 35
महिला आणि छप्पन्न पुरुषांचा समावेश असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. या नवीन ९१ रुग्णांमुळे
आता जिल्ह्यात एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या 3207 झाली आहे. यापैकी 1753 कोरोना
विषाणू बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 170 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला
आहे. सध्या जिल्ह्यात 1284 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
****
भारत
- चीन सीमा भागामधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी पाच वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीच्या
माध्यमातून ही बैठक होणार असून, यावेळी विविध पक्षांचे प्रमुख सहभागी होणार असल्याचं
पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं आहे.
****
वाशिम
जिल्ह्यात आता पर्यंत एकूण 65 कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी 6 कोरोनाबाधित
रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान,
जिल्ह्यातली 14 गावं आणि कारंजा, रिसोड, मालेगाव आणि वाशिम शहरात प्रत्येकी एक वसाहत
प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.
****
नांदेड
जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातल्या तामसा इथं काल पोलिस, कृषी आणि आरोग्य विभागातील
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर आणि परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठीच्या
औषधाचं वितरण करण्यात आलं. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश
कार्याध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या वतीनं हा उपक्रम राबवण्यात आला.
****
अकोला
जिल्ह्यातल्या जवळपास सर्वच तालुक्यात सरासरीपेक्षा थोडा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे
शेतकरी खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि कापसासह इतर पिकांची पेरणी करत
आहेत. टाळेबंदीत बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून, कृषी विभागानं
शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे, कृषीनिविष्ठा पोहोचवल्या असल्यानं शहरातील कृषी केंद्रांवरील
गर्दी दिसून येत नाही.
****
No comments:
Post a Comment