Sunday, 21 June 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 21 JUNE 2020 TIME - 11.00 AM


आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
 २१ जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी कोरोना विषाणूचे नवे १३७ रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या तीन हजार ४९७ झाली आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार ८५७ झाली असून एक हजार ४५३ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या एकशे सत्त्याऐंशी असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. 
****
देशात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या चार लाख १० हजार ४६१ झाली आहे. काल आतापर्यंतचे सर्वाधिक पंधरा हजार ४१३ नवे रुग्ण आढल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
****
देशात कोरोना विषाणूच्या आजारातून बरे झालेल्यांची संख्या दोन लाख २७ हजार ७५५ झाली आहे. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या तेरा हजार २५४ झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
**** 
या दशकातलं पहिलं सूर्यग्रहण आज पहायला मिळत आहे. देशाच्या उत्तर भागात हे कंकणाकृती  तर उर्वरित भागात खंडग्रास असून सकाळी दहा वाजेच्या सुमारास याला प्रारंभ झाला आहे.
****
लातूर जिल्ह्यात मान्यवर तसंच सर्वसामान्यांनी कुटुंबीयांसह गच्चीवर, दिवाणखान्यांमधे योगाभ्यास करून योग दिन साजरा केला. लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद महाविद्यालयानं सामाजिक संपर्क माध्यमातून योग प्रात्यक्षिकं आणि सहभाग उपक्रमांचं आयोजन केलं होतं.
****
नांदेड इथंही अनेक योग साधकांनी आज घरी गच्चीवर योग अभ्यास करून योग दिन साजरा केला. जळगाव, वाशीम इथंही योग दिन साजरा करताना कोरोना विषाणू संसर्गासंबंधी मार्गदर्शक सूचनांसह आवश्यक उपाययोजनांचं पालन करण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कामं अपूर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा, तसंच ग्रामीण भागात सर्व कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा व्हावा, असे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी काल लातूरमधे एका बैठकीत दिले आहेत.
****

00

No comments:

Post a Comment