आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२४ जून २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी
एकशे पंचवीस कोरोना विषाणू बाधित रुग्णांची वाढ झाली. यामुळे बाधितांची संख्या तीन
हजार नऊशे एकसष्ट झाली आहे. यापैकी दोन हजार एकशे छत्तीस रुग्ण बरे झाले असून एक हजार
सहाशे एकोणीस रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहे.
****
नांदेड जिल्ह्यात
आज सकाळी नवीन दोन कोरोनाविषाणू बाधीत रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणू
बाधित रुग्णांची संख्या तीनशे तेवीस झाली आहे. यापैकी आतापर्यंत १४ रुणांचा या संसर्गामुळे
मृत्यू झाला असून, २४५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू
आहेत.
****
जळगाव जिल्ह्यात आज एकशे
सहा संशयितांचे कोरोना विषाणू तपासणी अहवाल बाधित आले. जिल्ह्यातली बाधित रुग्णांची
संख्या दोन हजार पाचशे एकोणनव्वद झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या मिरज
कोविड रुग्णालयात आरोग्य, अन्न आणि औषध प्रशासनातर्फे प्लाझमा थेरपी वापरण्यास परवानगी
देण्यात आली आहे. इथल्या कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नव्वद आणि बरे होऊन घरी
गेलेल्या एकशे पंच्च्याण्णव रुग्णांनी प्लाझमा थेरेपीने उपचार घेण्यास सहमती दर्शवली
आहे.
****
उस्मानाबाद तालुक्यातल्या
वानेवाडी इथल्या शेतकऱ्यांनी टोळेबंदीमुळे अडचणीत आलेल्या निराधार लोकांसाठी स्वयंसेवी
संस्थेच्या मदतीने धान्य जमा केलं. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते या
धान्याचं काल वाटप करण्यात आलं.
दरम्यान जिल्हाधिकारी मुंडे
यांनी वानेवाडी इथल्या पाचव्या महिला शेतीशाळेस भेट दिली. महिला सक्षम झाली तरच कुटुंब
सक्षम होतं त्यामुळे महिला शेतकऱ्यांनीही आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचं त्यांनी
यावेळी म्हटलं.
****
हिंगोली जिल्ह्यात आज आखाडा
बाळापुर इथं भरलेल्या आठवडी बाजारात प्रचंड गर्दी दिसुन आली. कोणत्याही नियमांचं पालन
न करता नागरिक बाजारात फिरत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
No comments:
Post a Comment