आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
२२ जुलै २०२० सकाळी ११.०० वाजता
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोविड
बाधितांच्या संख्येत आज ९९ ने वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यातली कोरोना विषाणू बाधितांची
एकूण संख्या आता ११ हजार ७६५ झाली आहे, त्यापैकी ६ हजार ४९७ रुग्ण बरे झाले आहेत, तर
४०८ जणांचा मृत्यू झाला. उर्वरित ४८६० जणांवर उपचार सुरु आहेत.
****
सांगली महापालिका क्षेत्रात
सतत वाढणाऱ्या कोविड रुग्णांमुळे तीन खासगी रुग्णालयांना या रुग्णांवर उपचार करण्याची
परवानगी देण्यात आली आहे. शासकीय कोरोना रुग्णालय पूर्ण क्षमतेने भरले असल्यामुळे हा
निर्णय घेण्यात आला आहे. सध्या सांगलीत उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या ६२८ वर
गेलेली आहे.
****
राज्यात काल आणखी आठ हजार
३६९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या
तीन लाख २७ हजार ३१ इतकी झाली आहे. यापैकी एक लाख ८२ हजार २१७ रुग्ण कोरोना विषाणू
मुक्त झाले असून, सध्या एक लाख ३२ हजार २३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल २४६ रुग्णांचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं मृत्यू झालेल्यांची संख्या
१२ हजार २७६ झाली आहे. तर काल सात हजार १८८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून
सुटी देण्यात आली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
भारत- अमेरिका व्यापार परिषदेच्या वतीनं आयोजित भारत संकल्पना परिषदेत भाषण करणार आहेत.
या परिषदेच्या स्थापनेला यंदा ४५ वर्ष होत असल्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात
आलं आहे. उज्जल भविष्य काळाच्या निर्मितीसाठी ‘भारत संकल्पना परिषद’ अशी यंदाच्या वर्षाची
संकल्पना आहे.
****
राज्यसभेच्या ६२ नवनिर्वाचित
सदस्यांना आज पद आणि गोपनियतेची शपथ दिली जाणार आहे. कोविड प्रादुर्भावामुळे हा शपथविधी
सोहळा राज्यसभेत न होता राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनात होत आहे.
****
No comments:
Post a Comment