Sunday, 23 August 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 23 AUGUST 2020 TIME – 13.00

 

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 August 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २३ ऑगस्ट २०२० दुपारी १.०० वा.

****

कोरोना विषाणुच्या रुग्णांना वाढीव देयकं आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून त्यांनी आकारलेल्या वाढीव रकमेच्या किमान ५ पट दंड वसूल करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना याबद्दलचे लेखी आदेश पाठवण्यात आले आहेत. खासगी रुग्णालयांबद्दल वारंवार येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन राज्यशासनानं हा निर्णय घेतला आहे.

****

पुणे विभागातल्या कोरोना विषाणुच्या रुग्णांची संख्या १ लाख ८८ हजार सातशे अडुसष्ट झाली असून यापैकी १ लाख ३४ हजार ६३१ रुग्णांनी या संसर्गावर मात केली आहे. पुणे विभागात या संसर्गामुळे ४ हजार ९९२ रुग्णांचा मृत्य झाला असून, सध्या एकोणपन्नास हजार १४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

****

देशात कोरोना विषाणुच्या संसर्गासाठी कालपर्यंत तीन कोटी ५२ लाख ९२ हजार २२० नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यात काल आठ लाख एक हजार १४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. देशात सध्या सात लाख सात हजार ६६८ रुग्णांवर या संसर्गासाठी उपचार सुरू असून एकूण रुग्ण संख्येच्या तुलनेत हे प्रमाण २३ पूर्णांक २४ शतांश टक्के आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदी हटवण्यात येत असल्याच्या पार्श्र्वभूमीवर चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांचं चित्रिकरण आता सुरू करता येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज या संदर्भातले दिशा निर्देश जारी केले. आरोग्य मंत्रालय आणि गृह मंत्रालयाशी विचार विनीमय करून हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या दिशानिर्देशांनुसार कॅमेऱ्यासमोर असलेल्यांशिवाय उर्वरितांना मास्क वापरणं तसंच इतर खबरदारी घेणं बंधनकारक असेल.

****

हमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांनकोरोना विषाणू संसर्गावर मात केल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जिल्ह्यात आता पर्यंत ३ हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचं जिल्ह्यातलं प्रमाण आता एकोणाएंशी टक्क्यांहून अधिक आहे.

****

नाशिक जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोना विषाणुचे ९१२ नवे रुग्ण आढळले असून जिल्ह्यातली या रुग्णांची संख्या आता २९ हजार ३३५ झाली आहे. काल दिवसभरात १० रुग्णांचा या संसर्गावर उपचार सुरू असताना मृत्य झाल्यामुळे यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ७६१ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातले २३ हजार ७७७ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेऊन बरे झाले असून जिल्ह्यात सध्या ४ हजार सातशे सत्त्याण्णव रुग्ण उपचार घेत आहेत.

****

ाणे जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे एक हजार २८४ रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या एक लाख १३ हजार ८८४ झाली आहे. जिल्ह्यात काल या संसर्गामुळे २६ रुग्ण मृत्यूमुखी पडले असून  मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची एकूण संख्या आता तीन हजार २४० झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक २६ हजार ४०५ रुग्ण कल्याण शहरात आढळले असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.

****  

धुळे जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोना विषाणुचे  २६९ रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्ण संख्या ६ हजार सातशे शहाऐंशी झाली आहे. यापैकी ४ हजार ९८१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. जिल्ह्यात या संसर्गामुळे आतापर्यंत २०६ रुग्णांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे.

****

रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणुचे नवे ३८७ रुग्ण काल आढळले. जिल्ह्यात या संसर्गावर उपचार घेत असलेल्या नऊ रूग्णांचा काल मृत्यू झाल्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या ६९८ झाली आहे.

****

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सातारा जिल्ह्यातल्या हजार ७००  गावांपैकी हजार २२ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीन यशस्वीपणे राबवला आहे. या बरोबरच २०० गावांतली सार्वजनिक गणेश प्रतिष्ठापना यंदा रद्द करण्यात आली आहे.

****

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मध्यरात्री पासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने हे धरण ९४ पूर्णांक २१  टक्के भरलं आहे. ५०० घनफूट प्रतिसेकंद या वेगानं या धरणातून पाण्याचा पहिला विसर्ग करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातला शिवना टाकळी मध्यम प्रकल्पात ९३ पूर्णांक ४९ टक्के जलसाठा झाल्यानं ४ हजार ३२० घनफ़ूट प्रति सेकंद या वेगानं काल रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत पाणी सोडण्यात आलं.

****

No comments:

Post a Comment