Tuesday, 25 August 2020

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD DATE – 25 AUGUST 2020 TIME – 11.00 AM

 

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ ऑगस्ट २०२० सकाळी ११.०० वाजता

****

रायगड जिल्ह्यातल्या महाडमधील काजळीपुरा भागात अचानक कोसळलेल्या पाच मजली इमारतीच्या दुर्घटनेस जबाबदार असलेल्या बांधकाम व्यावसायिक, वास्तुविषारद आदी पाच जणांविरोधात महाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एक जण फरार झाला आहे. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू संसर्गाचे नवे १०० रुग्ण आढळले. जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या आता २१ हजार १७१ झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णांमध्ये महापालिका हद्दीतल्या ६१ आणि ग्रामीण भागातल्या ३९ रुग्णांचा समावेश आहे.

****

अमरावती जिल्ह्यात आणखी ११३ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ४ हजार ६८७ झाली आहे. आतापर्यंत ३ हजार ४०१ रुग्ण बरे झाले असून, ११२ रुग्णांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार १७४ जणांवर उपचार सुरु आहेत.

****

नागपूर महानगरपालिकचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोवीड विषाणूची लागण झल्याची माहिती त्यांनी आज त्यांनी सामाजिक माध्यमातून दिली आहे. दरम्यान, गेल्या १४ दिवसात आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली चाचणी करुन घ्यावी असं त्यांनी आवाहन केलं आहे.

****

माजी क्रिकेटपटू आणि उत्तरप्रदेश राज्य सरकारमधले मंत्री चेतन चौहान यांच्या मृत्यूची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेच्या उत्तरप्रदेश शाखेनं केली आहे. चौहान यांना कोणत्या परिस्थिती लखनौच्या सरकारी रुग्णालयातून गुरगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं, असा प्रश्न शिवसेनेनं विचारला आहे.

****

ऑनलाईन शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सोलापूर इथल्या एका शाळेनं अनोखा उपक्रम राबवला आहे. या शाळेनं गावातल्या इमारतींच्या ३०० दर्शनी भिंतींवर पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमांमधले काही धडे रंगवले आहेत. परिसरातल्या सुमारे १७०० विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे.

****

 

 

No comments:

Post a Comment