Saturday, 22 August 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 22.08.2020 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२२ ऑगस्ट २०२० सकाळी ११.०० वाजता

****

गणेशोत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवरील नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.

****

देशात कोरोना विषाणूचे आतापर्यंतचे सर्वाधिक ६९ हजार ८७४ रुग्ण आढळले आहेत. रुग्ण संख्या आता २९ लाख ७५ हजार ७०१ झाली आहे.

****

देशात कोरोना विषाणुवर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या २२ लाख २२ हजार ५७७ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७४ पुर्णांक ६९ शतांश टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

****

देशात आज सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमधे कोरोना विषाणू संसर्गामुळे ९४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ५५ हजार ७९४ झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के पर्यंत घटला आहे.

****

भारत पाकिस्तान सीमेनजिक पंजाबमधील तरन तारन जिल्ह्यातल्या दाल इथं सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी आज पहाटे केलेल्या कारवाईमधे दोन संशयीत मारले गेले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणू बाधित १४६ नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये ग्रामीण भागातले एकोणऐंशी, आणि महापालिका हद्दीतले सदुसष्ट रुग्ण आहेत.

***

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या २० हजार १९० इतकी झाली आहे. यापैकी १५ हजार १५२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

****

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणुच्या ४ हजार ४१६ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६२२ रुग्ण या संसर्गावर उपचार घेत असताना मृत्यूमुखी पडले आहेत.

****

अमरावती जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित ११८ नवे रुग्ण आढळून असून जिल्ह्यातल्या रुग्णांची संख्या ४ हजार ३३४ झाली आहे. काल या संसर्गावर उपचार घेत असलेल्या चौघांचा मृत्यू झाल्यानं जिल्ह्यातल्या मृतांची संख्या १०७ झाली आहे.

****

No comments:

Post a Comment