▼

Sunday, 20 September 2020

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र २० सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२० सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता

****

शेतकरी उत्पादनं व्यापार आणि वाणिज्य प्रोत्साहन आणि सुविधा विधेयक,शेतकऱ्यांना ते घेत असलेल्या पिकासाठी आगाऊ स्वरुपात करार करता येण्याची तरतूद असलेलं विधेयक आणि अत्यावश्यक वस्तू दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मांडण्यात आलं असून त्यावर चर्चा सुरू आहे.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गाचे ९२ हजार ६०५ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्ण संख्या ५४ लाख ६१९ झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.

****

देशात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४३ लाख तीन हजार ४३ आहे. सध्या दहा लाख दहा हजार ८२४ रुग्ण या संसर्गावर उपचार घेत आहेत.

****

कोरोना विषाणू संसर्गामुळे सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांमधे देशभरात एक हजार ११३ रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. या संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्या एकूण रुग्णांची संख्या ८६ हजार ७५२ झाली आहे.

****

जळगाव जिल्ह्यात काल दिवसभरात कोरोना विषाणुचे ७४२ नवे रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातली या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ३०१  झाली आहे. काल १९ रुग्णांचा मृत्यु झाला, त्यामुळे जिल्ह्यातली मृतांची संख्या १ हजार ८० झाली असून सध्या ९ हजार ८८५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

नाशिक जिल्ह्यातल्या निफाड इथं काल मध्यरात्रीच्या सुमारास ५५ मिलीमीटर पाउस झाला. जिल्ह्यातल्या नांदूरमधमेश्वर धरणातून आज १२ हजार घनफूट प्रतिसेकंद या वेगानं पाणी सोडण्यात येत आहे.

****

सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुचे ९७७ नवे रुग्ण आढळल्यानं जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ३० हजार ९२ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ८ हजार ४२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

//************//

 

  

No comments:

Post a Comment