Sunday, 4 October 2020

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र
०४ ऑक्टोबर २०२० सकाळी ११.०० वाजता
****
देशात गेल्या २४ तासांत कोविड बाधितांच्या संख्येत ७५ हजार ८२९ ने वाढ झाल्यानं बाधितांची एकूण संख्या ६५ लाख ४९ हजार ३७३ झाली आहे. यापैकी ५५ लाख ९ हजार ९६६ रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून बरे झाले आहेत. तर गेल्या २४ तासांत ९४० रुग्णांचा या संसर्गाने मृत्यू झाल्यानं मृतांचा एकूण आकडा एक लाख एक हजार ७८२ झाला आहे.
****
राज्यातलं कोरोना विषाणू बाधित रूग्ण बरे होण्याचं प्रमाण जवळपास ८० टक्के झालं आहे. काल १६ हजार ८३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १४ हजार ३४८ नविन रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ११ लाख ३४ हजार ५५५ रुग्ण बरे झाले आहेत.
****
मुंबईत गेल्या २४ तासांत दोन हजार ४०२ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत रुग्णांची संख्या २ दोन लाख १२ हजार ३३६ झाली असून एकूण मृतांचा आकडा नऊ हजार ५७ वर पोहचला आहे. आतापर्यंत एक लाख ७३ हजार ६७० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या २९ हजार १९१ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार १९३ झाली आहे. यापैकी २८ हजार ६७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ९५२ जणांचा मृत्यू झाला असून, सध्या चार हजार ५६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
कोविड रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करणाऱ्या खासगी रूग्णालयांच्या देयकांची तपासणी करून नाशिक महापालिकेने सुमारे अडीच कोटी रुपये रुग्णांच्या नातेवाईकांना परत केले आहेत. नाशिक महापालिकेने १३२ खासगी रुग्णालयांमध्ये लेखा परीक्षक नियुक्त केले आहेत.
गेल्या २४ जुलै पासून आजपर्यंत या लेखा परीक्षकांनी आपल्याकडे दाखल १३ हजार ८११ देयकांपैकी सात हजार ७२१ देयकं तपासली आणि ज्यादा आकारलेले दोन कोटी ५८ लाख ४७ हजार ६८१ रुपये रुग्णांना परत मिळवून दिले आहेत.
****
पाकिस्तानी सैनिकांनी आज जम्मू काश्मीरमध्ये पूंछ जिल्ह्याच्या मानकोट सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेच्या जवळ गोळीबार केला. सीमेवर तैनात भारतीय जवानांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं असल्याचं सैन्याचे जनसंपर्क अधिकारी कर्नल देवेंद्र आनंद यांनी सांगितलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हाही गोळीबार सुरूच होता.
//***********//

No comments:

Post a Comment