आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ डिसेंबर २०२०
सकाळी ११.०० वाजता
****
केंद्र
सरकारच्या कृषी सुधारणा कायद्याविरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर
केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना चर्चेला बोलावलं असून, आज या चर्चेचा दुसरा टप्पा आहे.
कालही सरकारनं शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण
करण्यासाठी केंद्र सरकार सदैव कटीबद्ध असून, त्यांच्या कल्याणासाठी चर्चेला केव्हाही
तयार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यावेळी म्हणाले. कृषी सुधारणा
कायद्याचा देशभरातल्या शेतकऱ्यांना लाभच होईल, असा पुनरुच्चार तोमर यांनी केला. शेतकऱ्यांच्या
प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचा प्रस्ताव कृषीमंत्र्यांनी
यावेळी मांडला.
****
नौदलानं
ब्राह्मोस या स्वनातित क्षेपणास्त्राची काल यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्रानं
आपल्या लक्ष्याचा अचूक वेध घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. संरक्षण संशोधन
आणि विकास संस्था - डीआरडीओचे अध्यक्ष डॉ जी सतीश रेड्डी यांनी नौदलाचं अभिनंदन केलं
आहे. आता हे क्षेपणास्त्र पायदळ, वायूदल तसंच नौदलातही तैनात करण्यात आलं आहे.
****
एमआयटी
विश्वशांती विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वतीनं आजपासून तीन दिवसाच्या
ऑनलाईन राष्ट्रीय सरपंच परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती
विभागाचे मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन होणार आहे,
तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते परिषदेचा समारोप होईल.
****
भारत
आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय क्रिकेट सामना कॅनबेरा इथं सुरु
आहे. भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा
भारताच्या २८ षटकांत ४ बाद १३० धावा झाल्या होत्या. शुभमन गील ३३, तर शिखर धवन १६,
श्रेयस अय्यर १९ तर के.एल.राहुल पाच धावा करुन बाद झाले.
****
सांगली
जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथं सहकारी न्यायालयाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती
पी. बी. कुलाबाला यांच्या हस्ते काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं. या
न्यायालयाच्या कक्षेत वाळवा, शिराळा, पलूस आणि कडेगाव या चार तालुक्यांचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment