▼

Wednesday, 3 March 2021

आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र दिनांक ३ मार्च २०२१

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

दिनांक ३ मार्च २०२१

****

केंद्र सरकारनं सर्व खासगी रुग्णालयांना कोविड लसीकरण केंद्र म्हणून काम करण्यास परवानगी दिली आहे. सरकारनं यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात, खासगी रुग्णालयांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. 

****

जागतिक वन्यजीव दिवस आज पाळण्यात येत आहे. वन्यजीवांसह त्यांच्या नैसर्गिक परिसराचं आणि संसाधनांचं संवर्धन करणं, हे नागरीकांच घटनात्मक कर्तव्य असल्याचं, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. वन्यजीव संरक्षणासाठी काम करणाऱ्यांना सलाम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्तानं सर्वांनी संकल्प करूया, वन्यजीवांचं संरक्षण आणि जंगलांचं संवर्धन करूया, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. पृथ्वीवरील वन्यजीवांच्या विविध प्रजाती हा निसर्गाचा अद्वितीय अन् अनमोल असा ठेवा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

****

भारतीय स्टेट बँकेनं गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. ७५ लाखांच्या गृह कर्जापर्यंत सहा पूर्णांक ७० टक्के व्याज दर आकारण्यात येणार असून, ७५ लाखांपुढील गृह कर्जावर सहा पूर्णांक ७५ टक्के व्याज आकारण्यात येईल. नवीन कर्ज दराची ही योजना ३१ मार्चपर्यंत उपलब्ध असून, कर्जदाराला प्रक्रिया शुल्कावर शंभर टक्के सूट देण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला कर्जदारांना विशेष सूटही बँकेनं जाहीर केली आहे.

****

वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दररोज वाढत असून, राज्याचे माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या पोहरादेवी इथल्या भेटीच्या वेळी झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, पोहरादेवी इथं रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ५० रुग्ण आढळून आल्यानं पोहरादेवी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे.

दरम्यान, वाशिम जिल्ह्यातल्या मंगरुळपीर आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या घेऊन कर्तव्य बजावणाऱ्या २३ एस टी कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

****

बीड तालुक्यातल्या जप्ती पारगाव इथल्या एका खासगी गोडाऊनला काल आग लागली. या आगीमध्ये शासनाचा तसंच काही खासगी व्यापाऱ्यांच्या कापसाच्या गठाणी ठेवलेल्या होत्या. यात जवळपास ७० कोटी रूपयाचं नुकसान झालं आहे.

//****//

 

 

 

No comments:

Post a Comment