आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१५ जून
२०२१ सकाळी ११.०० वाजता
****
गेल्या
दहा वर्षात वनाखालील क्षेत्र ३० लाख हेक्टरनं वाढवण्यात भारताला यश आलं असल्याचं, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वाळवंटीकरण, दुष्काळ आणि जमिनीचा
ऱ्हास याविषयीच्या बैठकीत ते बोलत होते. भारतानं नेहमीच जमिनीच्या ऱ्हासाच्या समस्येबद्दल
आंतरराष्ट्रीय स्तरावर सकारात्मक भूमिका घेतली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
****
स्वच्छ
पर्यावरण आणि समावेशक विकास हेच भारताचे अग्रक्रम असल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री
पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार परिषदेत ते काल बोलत होते.
२०३० पर्यंत ४५० गिगावॅट नविकरणीय ऊर्जा निर्मितीचं भारतानं समोर ठेवलेलं उद्दिष्ट
स्थायी विकासाबाबतच्या संयुक्त राष्ट्रांच्या उद्दिष्टाप्रती भारताची वचनबद्धता सिद्ध
करतं, असं ते म्हणाले.
****
करदात्यांना
आयकर विभागाच्या संकेतस्थळावर फॉर्म १५ सी ए आणि फॉर्म १५ सी बी भरण्यात येणाऱ्या
अडचणी लक्षात घेऊन, आयकर विभागानं येत्या ३० जूनपर्यंत, हे विवरण पत्र आयकर विभागाच्या
स्थानिक कार्यालयात जमा करण्यास परवानगी दिली आहे. नव्या ई फाईलिंग पोर्टल वर हे विवरणपत्र
३० जून नंतर अपलोड केले जातील, त्यानंतर आयकर दात्यांना कागदपत्र ओळख क्रमांक प्राप्त
होईल.
****
भारतीय
पुरातत्व सर्वेक्षण विभागानं त्यांच्या अखत्यारीतील सर्व स्मारकं, पुरातन स्थळं, उद्या
१६ जून पासून सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. ही स्मारकं आणि पुरातन स्थळं कोविड प्रतिबंधात्मक
नियमांना अनुसरुन सुरु करणं बंधनकारक असल्याचं, याबाबत जारी पत्रात नमूद करण्यात आलं
आहे.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात वैजापूर इथं इम्रान निजाम शेख या इसमाच्या घरात असलेला अवैध देशी आणि विदेशी
मद्य साठा तसंच शासनानं प्रतिबंधित केलेला गुटखा, पोलिसांनी काल जप्त केला. एक लाख
१५ हजार ७२० रुपयांचा हा बेकायदेशीर साठा बाळगल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
****
नागपूर
ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दुरांतो ही विशेष रेल्वे आज पासून सुरु होणार
आहे. मध्य रेल्वेच्या या नागपूर-मुंबई दुरांतो विशेष रेल्वे गाडीसाठी तिकिट आरक्षणाची,
काल पासून सुरुवात झाली.
****
No comments:
Post a Comment