आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०६ ऑक्टोबर २०२१
सकाळी ११.०० वाजता
****
राज्यात धुळे, नंदुरबार, अकोला,
वाशीम, नागपूर आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांमधल्या ८४, तर त्याअंतर्गतच्या
३८ पंचायत समित्यांमधल्या १४१ रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी,
काल झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. काल या जागांसाठी ६५ टक्के मतदान झालं.
****
राष्ट्रीय
आरोग्य प्राधिकरणानं आयुषमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सुधारित आरोग्य
लाभ योजनेला मंजुरी दिली आहे. यामध्ये काही उपचारांचा खर्चाच्या भरपाईची रक्कम २० ते
४० टक्के वाढवण्यात आली आहे. सुमारे ४०० वैद्यकीय उपचारांचे दर सुधारित जाहीर करण्यात
आले आहेत, आणि एक म्युकर मायकोसिसचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. नोव्हेंबरपासून
याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
****
भौतिकशास्त्रात
अतुलनीय कामगिरी करणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना ‘नोबेल पुरस्कार जाहीर झाला. पृथ्वीच्या
हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंग संदर्भात कार्य केल्याबद्दल स्यूकुरु मनाबे आणि क्लाऊस
हॅसेलमॅन यांना, तर विस्कळीत क्लिष्ट पदार्थांमधल्या छुप्या रचनांच्या शोधासाठी इटलीचे
शास्त्रज्ञ जॉर्जिओ पॅरिसी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
अंमली
पदार्थ विरोधी विभागानं मुंबईत ज्या जहाजावर कारवाई केली, त्या जहाजावरच्या पार्टीसाठी
परवानगी मागणारं कोणतंही पत्र मुंबई पोलीसांना दिलं गेलं नव्हतं, असं स्पष्टीकरण मुंबई
पोलीसांनी दिलं आहे. या प्रकरणात अमली पदार्थ विरोधी विभागानं आणखी चार जणांना अटक
केली आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या खेळाडूंसाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्यासाठी
कृषीमंत्री दादा भुसे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातली १० एकर जागा
देण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. खासदार संजय जाधव यांच्या उपस्थितीत काल झालेल्या
बैठकीत कृषीमंत्र्यांनी ही मंजुरी दिली.
****
औरंगाबाद जिल्ह्यात लासूर इथं वीज वितरण कंपनीत कार्यरत कंत्राटी
कामगार बाळू धोत्रे याला दोन हजार रुपये लाच घेताना काल रंगेहाथ अटक करण्यात आली. तक्रारदाराच्या
शेतातला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
No comments:
Post a Comment