आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२१ नोव्हेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता
****
देशात गेल्या चोवीस तासात १० हजार ४८८ नवे कोविड रुग्ण
आढळले. त्यामुळे देशातल्या एकूण रुग्णांची संख्या आता तीन कोटी ४५लाख १० हजार ४१३ झाली
आहे. १२ हजार ३२९ रुग्ण बरे होवून घरी गेले असून आतापर्यंत तीन कोटी ३९ लाख २२ हजार
३७ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ११६ कोटी पन्नास लाख ५५ हजार जणांचं
लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागानं कळवलं आहे.
****
आज संयुक्त महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिन. उपमुख्यमंत्री
अजित पवार, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र
अर्पण करून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील वीरांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित
पवार यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांच्या त्यागाचं स्मरण यावेळी
केले.
****
शेतकरी आंदोलनात मृत्यू झालेल्या
शेतकऱ्यांच्या कुटूंबियांना केंद्र सरकारनं मदत करावी,
अशी मागणी होत असेल तर ती योग्यच असून, शेतकऱ्यांना
पंतप्रधान सहायता निधीतून मदत करावी अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत
यांनी केली आहे. ते आज सकाळी मुंबईत बातमीदारांशी बोलत होते.
****
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ११ जागांसाठी
जिल्ह्यातल्या १५ मतदान केंद्रावर आज
मतदान होणार आहे. शेतकरी विकास पॅनल विरुद्ध महाविकास आघाडी सहकार पॅनल दरम्यान ही निवडणूक होत आहे.
उद्या सोमवारी मतमोजणी होणार आहे.
****
थोर
स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई
श्रॉफ यांचा आज स्मृतीदिन. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने
दिल्या जाणारा पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार हिंगोली जिल्ह्यातले
सामाजिक कार्यकर्ते जयाजी पूरभाजी पाईकराव यांना आज प्रदान करण्यात येणार आहे.
//*****************//
No comments:
Post a Comment