Saturday, 13 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 13.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

१३ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

 हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत आजपासून पुढचे तीन दिवस संपूर्ण देशभरात घरोघरी तिरंगा ध्वज फडकवला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं हे अभियान राबवताना राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये याकरता ध्वजसंहितेचं पालनही आवश्यक आहे. घरात फडकवण्यात येणारा राष्ट्रध्वज हा सुती, पॉलिएस्टर, रेशीम, खादी किंवा लोकरीपासून तयार केलेला असावा; केशरी रंग वरच्या बाजूने आणि हिरवा रंग जमिनीच्या बाजूने राहील याप्रमाणे ध्वज फडकवावा. आणि राष्ट्रध्वज उतरवताना सावधतेने आणि सन्मानाने उतरवून सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.

****

बीड इथं झालेल्या रानभाजी महोत्सवाचं जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी उद्‌घाटन केलं. नव्या पिढीला रानभाजीचं महत्त्व समजावं, यासाठी कृषी विभागाचा हा रानभाजी महोत्सव म्हणजे एक स्तुत्य कार्यक्रम असल्याचं, शर्मा यांनी म्हटलं आहे.

****

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतून उस्मानाबाद जिल्ह्यातील १० हजार दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध उपकरणं पुरवली जाणार आहेत. जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी, प्रत्येक पात्र गरजूपर्यंत ही योजना पोहोचण्यासाठी प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावं, असं आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात या योजनेच्या संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी त्यांच्या वैद्यकिय तपासणीनंतर केली जात आहे.

****

उस्मानाबाद इथं आज सकाळी ८ वाजता, आझादी का अमृतमहोत्सवी वर्षानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज चौकात, जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या राष्ट्रध्वजाचं अनावरण करण्यात आलं तर जिल्हा अप्रशासनाच्या वतीनं हर घर तिरंगा झेंडा जनजागृती फेरी ही काढण्यात आली.

//*********//

 

No comments:

Post a Comment