Thursday, 25 August 2022

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 25.08.2022 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी संक्षिप्त बातमीपत्र

 आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२५ ऑगस्ट २०२ सकाळी ११.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कामगार मंत्र्यांच्या राष्ट्रीय संमेलनाला, दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं आंध्र प्रदेशमधल्या तिरुपती इथं हे दोन दिवसांचं संमेलन आयोजित केलं आहे. कामगारांबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सहकारी संघराज्याच्या भावनेतून हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.

स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेच्या समारोप समारंभाला देखील पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून  आज संबोधित करणार आहेत.

****

देशातल्या तृतीयपंथीयांना आयुष्मान भारत योजनेचे लाभ मिळणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय यांच्यात काल यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आल्या.

****

पुण्यातल्या मार्केटयार्ड परिसरातून एक हजार २८८ किलो वनस्पती तुपाचा साठा अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला. संबंधित दुकानातून घेण्यात आलेले वनस्पती तुपाचे नमुने तपासल्यानंतर हे तूप मानवी आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं निदर्शनास आलं. आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध व्हावं आणि आरोग्यासाठी धोकादायक असणाऱ्या वनस्पती तुपाची खरेदी विक्री करू नये, असं आवाहन अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे.

****

अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गावर काल एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. नारायणडोह गावच्या शिवारात पांडुरंग साठे हे आपली जनावरं चारत असताना, चाचणी घेणारं रेल्वे इंजीन आलं, त्यापासून जनावरांना वाचवण्याच्या प्रयत्नात साठे यांच्यासह एक गाय इंजिनाखाली आली, त्यात त्यांचा मृत्यू झाला.

****

टोकियोमध्ये सुरु असलेल्या बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एम आर अर्जुन आणि ध्रुव कपिला जोडीनं डेन्मार्कच्या के. अस्‍त्रप आणि ए. रासमुसेन जोडीचा २१-१६, २१-१७ असा पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष एकेरीमध्ये लक्ष्य सेननं लुईस एनरिक पेनालवरचा २१-१७, २१-१० असा पराभव केला. किदाम्बी श्रीकांतचा जे पी झाओ बरोबरच्या सामन्यात पराभव झाला.

****

No comments:

Post a Comment