Friday, 2 September 2022

 

आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

०२ सप्टेंबर २०२ सकाळी ११.०० वाजता

****

देशातल्या पहिल्या संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या आय एन एस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोची इथल्या गोदीमध्ये जलावतरण करण्यात आलं. या स्वदेशी युद्धनौकेची निर्मिती कोचीन शिपयार्ड लिमिटेड या भारतीय कंपनीने केली आहे. भारतीय नौदलाचा समृद्ध वारसा लक्षात घेऊन संपूर्णपणे नव्याने बनवण्यात आलेल्या नौदलाच्या नवीन बोधचिन्ह आणि ध्वजाचं अनावरणही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.

****

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ई-आवास वेब पोर्टलचं उद्घाटन काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते झालं. केंद्रीय सशस्त्र पोलीस दल हे देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या प्रत्येक पैलूसाठी मजबूत आधारस्तंभ असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.

****

केंद्रिय मंत्रीमंडळाच्या सुरक्षा समितीनं तेजस मार्क-२ या योजनेला मंजुरी दिली आहे. समितीनं प्रोटोटाईप, उड्डाण परिक्षण आणि प्रमाणीकरणा बरोबरचं तेजस मार्क-२ या लढाऊ विमानांच्या संरचना आणि विकासासाठी साडे सहा हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. तेजस मार्क-२ हे विमान भारतीय वायुसेनेची गरज पूर्ण करेल असा विश्वास भारतीय वायु सेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल वी. आर चौधरी यांनी व्यक्त केला आहे.

****

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. गेल्या जुलै आणि ऑगस्ट महिन्यात या परिक्षा घेण्यात आल्या होत्या.

****

मुंबईत गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण केल्याप्रकरणी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विभाग प्रमुख विनोद अरगिलेसह तिघांना ताब्यात घेतलं आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेनंतर संबंधित महिलेनं पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.

****

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री ब गटातल्या सामन्यात श्रीलंकेनं बांग्लादेशचा दोन गडी राखून पराभव केला. अ गटात आज संध्याकाळी पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात निर्णायक सामना होणार आहे.

//********//

 

No comments:

Post a Comment